IPL 2025 : '…म्हणूनच माझी बदनामी'; आयपीएलपूर्वीच श्रेयस अय्यरची खदखद बाहेर...(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 चा थरार 22 मार्चपासून सुरू होणार आहे. या लीगची सर्व चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. आयपीएलचा हा 18 वा हंगाम असणार आहे. या कालावधीत एकूण 10 संघ खेळताना दिसणार आहेत. पहिला सामना गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. यावर्षी ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे कर्णधार ठरले आहेत. श्रेयस अय्यरबद्दल सांगायच झालं तर त्याला पंजाब किंग्स संघाने एकूण 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय तो पीबीकेएस संघाचा कर्णधारही असेल. मात्र याआधी श्रेयस अय्यरचे एक वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे.
श्रेयस अय्यर 2025 च्या वनडे विश्वचषक आणि २०२५ मधील चॅम्पियन ट्रॉफीमधील फलंदाजीबद्दल उघडपणे बोलला आहे. तो त्याच्या कमकुवतपणाबद्दल देखील व्यक्त झाला आहे. एक गोष्ट सांगणे महत्वाचे आहे की, अय्यरला काही काळ शॉट बॉल खेळताना खूप त्रास होत होता. आता त्याने याबाबत खुलासा केला असून त्याच्यासोबत झालेल्या चुकीच्या गोष्टींबाबत देखील त्याने चर्चा केली आहे.
आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार असणारा श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘मी माझी रणनीती ठेवली आहे. फारसा विचार केला नाही आणि प्रामाणिकपणे काम करत राहिलो आहे. माझा प्रामाणिकपणा आणि कामगिरीमुळे मला पुन्हा संधी मिळेल, असा मला विश्वास होता. या काळाने मला खूप काही शिकवलंअ आहे. मी माझ्या कौशल्यावर अधिक मेहनत घेतली.’
तसेच तो पुढे म्हणाला, मी निकालावर खूश आहे, कारण त्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. प्रशिक्षक प्रवीण आमरे सरांपासून प्रशिक्षक सागरपर्यंत सर्वांनी मेहनत घेतली आहे. या दोघांनी मला ताकद मिळवून देण्यास मदत केली जी आता माझ्या फलंदाजीत दिसते आहे.
याआधी जेव्हा श्रेयसला शॉर्ट बॉलवर त्याच्या कमजोरीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘कदाचित अशी धारणा तयार झाली असावी किंवा मला टाइपकास्ट झालो. पण मला नेहमीच माझी ताकद, क्षमता माहित होती आणि माझा स्वतःवर विश्वास होता.
आयपीएल २०२५ चा पहिला सामना २२ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल २०२५ पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.