अजिंक्य रहाणे(फोटो-सोशल मीडिया)
KKR vs LSG : आयपीएल २०२५ चा २१ वा सामना काल ८ एप्रिल मंगळवारी रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात एलएसजीने कोलकाता नाईट रायडर्सचा ४ धावांनी पराभव केला. एलसजीने प्रथम फलंदाजी करत २३८ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रतिउत्तरात केकेआरला ७ गडी गमावून २३४ धावाच करता आल्या आणि केकेआरला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे संतापेलला दिसून आला. खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांना कोणतीही मदत मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या सामन्यात दोन्ही संघाच्या मिळून ४७२ धावा करण्यात आल्या आहेत. हा एक विक्रमच झाला आहे.
सामन्यापूर्वी कोलकात्याकडून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांत २३८ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरादाखल, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला केकेआर हे लक्ष्य सहज पूर्ण करेल असे वाटत असताना अखेर त्यांना ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. कोलकात्याला २० षटकांत २३४ धावाच करता आल्या. परभवानंतर खेळपट्टीवरून कोणतीही मदत मिळू न् शकल्याने रहाणे नाराज झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा : PBKS vs CSK : CSK विरुद्ध ‘किंग’ ठरल्यानंतरही पंजाबच्या खेळाडूला दणका! BCCI सोबत नडणे पडले महागात
आयपीएल २०२५ मध्ये कोलकात्याला घरच्या मैदानावर दुसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवानंतर फिरकीपटूंना खेळपट्टीकडून कोणतीही मदत न मिळाल्याने अजिंक्य रहाणेकडून निराशा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी जेव्हा घरच्या परिस्थितीचा फायदा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला तेव्हा रहाणेने म्हटला की, त्याच्या कोणत्याही वाक्यामुळे ‘अराजकता’ निर्माण होण्याची शक्यता आहे. सामना संपल्यानंतर रहाणे बोलला की, ‘सर्वप्रथम मी हे स्पष्ट करतो की, फिरकीपटूंना कोणतीही मदत मिळाली नाही.’
तसेच घरच्या परिस्थितीचा फायदा कसा मिळतो? याबाबत विचारले असता रहाणे म्हणाला की, विकेटबद्दल बरीच चर्चा झाली आहे. जर याबाबत मी आता काही बोललो तर गोंधळ उडेल. क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्यावर टीका करत रहाणे म्हणाला की, आमच्या क्युरेटरला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. मला वाटते की ते त्यावर खूश असणार आहेत. घरगुती फायद्यांबद्दल तुम्हाला जे वाटेल ते लिहिण्याची मुभा आहे, तुम्हाला जे वाटले ते लिहू शकता. जर मला काही अडचण असेल तर मी ती येथे न्ब बोलता आयपीएलला बोलेल.