अक्षर पटेल आणि पॅट कमिन्स(फोटो-सोशल मीडिया)
DC vs SRH: आयपीएल 2025 मध्ये आज (30 मार्च) रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विशाखापट्टणम येथे खेळवला जाता आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स गोलंदाजी करताना दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2025 मधील 18 व्या हंगामात लखनौ जायंट्सला पराभूत करत पहिला सामना जिंकला आहे, तर दिल्ली आज या हंगामातील आपला दुसरा सामना खेळत आहे. त्यामुळे दूसरा विजय मिळवण्यास दिल्ली प्रयत्नशील असणार आहे. तर, हैदराबादने राजस्थानविरुद्धचा या हंगामातील आपला पहिला विजय मिळवला असून लखनऊविरुद्धचा दुसरा सामना मात्र हैदराबादला गमवावा लागला होता. अशा स्थितीत आता हैदराबाद विरुद्ध दिल्ली असा तिसरा सामन्यात घमासान अनुभवायला मिळणार आहे.
हेही वाचा : MI vs GT : GT कडून पराभव, पण Rohit Sharma ने रचला मोठा विक्रम; आयपीएल इतिहासातील ठरला 3 रा भारतीय
दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघामध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने आपला दबदबा कायम राखला आहे. IPL मध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण 24 सामने खेळले गेलके आहेत. त्यापैकी सनरायझर्स हैदराबादने 13 सामने जिंकले आहेत. तर दिल्ली 11 सामने जिंकले आहे. गेल्या मोसमात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना पार पडला होता. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला होता.
यावेळी दिल्लीला जेक-फ्रेजर मॅकगर्क आणि फाफ डू प्लेसिस यांच्या कडून मोठ्या अपेक्षा असणार आहे. त्याशिवाय आशुतोष शर्मा आणि विपराज निगम यांच्याकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत. तर हेनरिक क्लासेन, ,सनरायझर्स हैदराबाद संघाला अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. तर गोलंदाजीमध्ये पॅट कमिन्स, ॲडम झाम्पा आणि हर्षल पटेल यांच्यावर आशा असणार आहे.
हेही वाचा : GT vs MI : शुभमन गिलच्या नावे अनोखा विक्रम : एकाही भारतीयाला जमलं नाही, ते जीटीच्या कर्णधाराने करून दाखवलं…
दिल्ली कॅपिटल्स संघ
अक्षर पटेल (कर्णधार), जेक-फ्रेजर मॅकगर्क, केएल राहुल (यष्टीरक्षक), फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फरेरा, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव.
सनरायझर्स हैदराबाद संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन,अभिनव मनोहर, झीशान अन्सारी, अनिकेत वर्मा