फोटो सौजन्य : IndianPremierLeague
RCB vs PBKS Live Update : पंजाब किंग्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघामध्ये फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. आज भारताला आयपीएल २०२५ चा नवा विजेता मिळणार आहे. या सामन्याचे आयोजन हे ऐतिहासिक मैदानावर करण्यात आले आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर होणार आहे. रजत पाटीदार आणि श्रेयस अय्यर या दोघांच्या नेतृत्वात आज दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. आजच्या पंजाब विरुद्ध बंगळुरु या सामन्यासंदर्भात तुम्हाला आम्ही माहिती देणार आहोत.
03 Jun 2025 11:26 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : १७ वर्षांची प्रतीक्षा संपली, आरसीबीने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली
03 Jun 2025 11:19 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : भुवीने १७ व्या षटकात पंजाबला दुहेरी धक्का दिला. त्याने नेहल वधेरा (१५) आणि मार्कस स्टोइनिस (६) यांना आपल्या जाळ्यात अडकवले.
03 Jun 2025 11:17 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : पंजाबला विजयासाठी आता १२ चेंडूत ४२ धावा हव्या आहेत जे सोपे दिसत नाही. १७ षटकांत ६ गडी बाद १४४ धावा झाल्या आहेत.
03 Jun 2025 11:15 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : पंजाबला सातवा झटका, अझमतुल्लाह ओमरझई आऊट
03 Jun 2025 11:10 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : पंजाबचा सहावा विकेट स्टोइनिसचा पडला असून त्याने २ चेंडूत ६ धावा काढल्या. या सामन्यात भुवीचा हा दुसरा विकेट होता. आरसीबी आता सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत आहे.
03 Jun 2025 11:07 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : पंजाबचा नेहल आऊट झाला असून १८ चेंडूत १५ धावा केल्या. भुवीच्या चेंडूवर कृणालने त्याचा झेल घेतला.
03 Jun 2025 11:07 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : आरसीबी विरुद्ध पीबीकेएस लाईव्ह स्कोअर: पंजाबला शेवटच्या चार षटकांत ६३ धावांची गरज आहे. हेझलवूडने १६ व्या षटकात १७ धावा दिल्या, ज्यामध्ये एक वाइडचा समावेश होता. शशांकने हेझलवूडविरुद्ध दोन षटकार मारले.
03 Jun 2025 11:04 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सामन्यावर पकड मिळवली आहे. आरसीबीने कर्णधार श्रेयस अय्यर आणि जोश इंग्लिस या दोघांना बाद करत पंजाबला बॅकफुटवर ढकललं आहे. पंजाबच्या 191 धावांचा पाठलाग करताना 14 ओव्हररनंतर 4 आऊट 106 रन्स झाल्या आहेत. नेहल वढेरा 6 तर शशांक सिंह 3 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
03 Jun 2025 10:59 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : पंजाब किंग्जला जिंकण्यासाठी ६ षटकांत ८७ धावांची आवश्यकता आहे. वधेरा सहा धावांसह आणि शशांक तीन धावांसह क्रीजवर आहे. १४ व्या षटकात सुयश शर्माने पाच धावा दिल्या.
03 Jun 2025 10:50 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : पंजाब संघाने १३ षटकांत ४ गडी बाद १०१ धावा केल्या आहेत. या संघाला आता विजयासाठी ४२ चेंडूत ९० धावा करायच्या आहेत. कृणाल पंड्याने एक अद्भुत स्पेल टाकला आणि ४ षटकांत १७ धावा देत २ महत्त्वाच्या विकेट घेतल्या.
03 Jun 2025 10:49 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : पंजाबला जिंकण्यासाठी आता ४८ चेंडूत ९३ धावांची आवश्यकता आहे. या संघावर दबाव आहे. १२ षटकांत २ गडी गमावून ९८ धावा करायच्या आहेत. जोश आणि नेहल यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.
03 Jun 2025 10:43 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : आरसीबीने अंतिम फेरीत पुनरागमन केले असून पंजाबला चौथा धक्का जोश इंगलिसच्या रूपात बसला. त्याने २३ चेंडूंचा सामना केल्यानंतर ३९ धावा केल्या. त्याने एक चौकार आणि चार षटकार मारले. १३ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इंगलिसला लिव्हिंगस्टोनने क्रुणालच्या गोलंदाजीवर झेलबाद केले. १३ षटकांनंतर पंजाबची धावसंख्या १०१/४ आहे.
03 Jun 2025 10:40 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : पंजाबने ११ ओव्हरमध्ये ९१ धावा केल्या आहेत आणि ३ विकेट गमावल्या आहेत. आता जिंकण्यासाठी ६० चेंडूंत ११० धावा हव्या आहेत. पंजाबला खूप काळजीपूर्वक खेळण्याची गरज आहे. जॉश इंग्लिश आणि नेहल वधेरा आता क्रीजवर आहेत.
03 Jun 2025 10:31 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला कर्णधार श्रेयस अय्यर अंतिम सामन्यात अपयशी ठरला. त्याने दोन चेंडूत एक धाव घेतली. दहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अय्यर शेफर्डने झेलबाद झाला. कट करण्याचा प्रयत्न करताना तो यष्टीरक्षक जितेशने झेलबाद झाला.
03 Jun 2025 10:28 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कृणाल पंड्या याने पंजाब किंग्सला दुसरा झटक दिला आहे. कृणाल पंड्या याने इमपॅक्टर प्लेअर प्रभसमिरन सिंह याला भुवनेश्वर कुमार याच्या हाती कॅच आऊट केलं. प्रभसिमरन सिंह याने 22 बॉलमध्ये 2 फोरसह 26 रन्स केल्या.
03 Jun 2025 10:26 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : सुयशने ८ वे षटक टाकले आणि या षटकात १५ धावा झाल्या. जोश आणि प्रभसिमरन यांनीही प्रत्येकी एक षटकार मारला. आता जिंकण्यासाठी ७२ चेंडूत १२१ धावा करायच्या आहेत.
03 Jun 2025 10:16 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : पंजाब किंग्सने 191 रन्सचा पाठलाग करताना पावरप्लेमध्ये आरसीबी विरुद्ध 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावू 56 रन्स केल्या आहेत. जोश इंग्लिस हा 8 धावांवर नाबाद खेळत आहे. तर प्रभसिमरन सिंह 15 रन्सवर नॉट आऊट आहे. त्याआधी प्रियांश आर्या 24 रन्स करुन आऊट झाला.
03 Jun 2025 10:03 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : प्रियांश आर्य हेझलवूडने बाद केला, पण सॉल्टने एक अद्भुत झेल घेतला. प्रियांशने या सामन्यात १९ चेंडूत २४ धावांची खेळी केली. पंजाबने ५ षटकांत एक विकेट गमावून ४३ धावा केल्या आहेत. जोश इंग्लिश क्रीजवर आला आहे.
03 Jun 2025 10:00 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगला जीवदान मिळालं आहे. हेझलवूडच्या गोलंदाजीवर रोमारियो शेफर्डने सोपा झेल सोडला. 10 धावांवर असताना हा झेल सोडला.
03 Jun 2025 09:59 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : पंजाब किंग्जचा डाव सुरू झाला आहे. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने पहिले षटक टाकले आणि १३ धावा दिल्या. प्रियांशने पहिल्या चेंडूवर चौकार मारला. प्रभसिमरनने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला.
03 Jun 2025 09:26 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : पंजाबसमोर १९१ धावांचे लक्ष्य आहे. अर्शदीपने २० व्या षटकात तीन धावा देऊन तीन विकेट घेतल्या.
03 Jun 2025 09:22 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : पंजाबकडून अर्शदीपने आठवी विकेट घेतली. त्याने कृणालला ४ धावांवर झेलबाद केले. ही अर्शदीप सिंगची दुसरी विकेट होती.
03 Jun 2025 09:20 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : शेफर्ड १७ धावांवर अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला आणि आरसीबीने त्यांचा ७ वा विकेट गमावला. भुवनेश्वर कुमार आता क्रीजवर आहे.
03 Jun 2025 09:14 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : आरसीबीचा स्फोटक फलंदाज रोमरियो शेफर्ड याला जीवनदान मिळालं आहे. सबस्टीट्यूड प्रवीण दुबे याने 1 रनवर रोमरियोचा कॅच सोडला. त्यामुळे रोमरियाला जीवनदान मिळालं.
03 Jun 2025 09:11 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : विजय कुमारने पंजाबला सहावे यश मिळवून दिले आणि त्याने शानदार फलंदाजी करणाऱ्या जितेश शर्माला बाद केले. जितेशने २४ धावांची खेळी केली. आरसीबीने १७.४ षटकांत ६ गडी गमावून १७१ धावा केल्या.
03 Jun 2025 09:06 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : लियाम लिव्हिंगस्टोने २५ धावांची खेळी केली आणि जेमीसनने त्याला बाद केले. या संघाने १७ षटकांत ५ गडी गमावून १६८ धावा केल्या आहेत.
03 Jun 2025 09:03 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 16.1 ओव्हरमध्ये 150 धावा पूर्ण केल्या. जितेश शर्मा याने ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला. आरसीबीच्या यासह 152 झाल्या. जितेश 17 तर लियाम लिविंगस्टोन 19 धावांवर नाबाद खेळत आहे. आता आरसीबी 200 धावांचा टप्पा पूर्ण करणार का? याकडे आरसीबी चाहत्यांचं लक्ष आहे.
03 Jun 2025 08:48 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने ४३ धावांची खेळी खेळली आणि उमरजीच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्याने कोहलीची विकेट घेतली असून आरसीबीने चौथी विकेट गमावली.
03 Jun 2025 08:43 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : विराट कोहली हाफ सेंचुरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याने ३० चेंडूत ३९ धावा केल्या आहेत.
03 Jun 2025 08:37 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : पंजाबच्या कायले जेमीन्सन याने विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार हे सेट जोडी फोडली आहे. जेमीन्सन याने रजत पाटीदार याला एलबीडब्ल्यू आऊट केलं.
१२ ओव्हरवर आरसीबीची धावसंख्या १०९/३ आहे.
03 Jun 2025 08:27 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : आरसीबीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार १६ चेंडूत २६ धावा करून बाद झाला आहे. त्याला काइल जेमिसनने बाद केले.
स्कोअर कार्ड
RCB : ९७-३/ ओवर - १०.५
03 Jun 2025 08:09 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live : आरसीबीला दुसरा झटका बसला आहे. मयंक अग्रवाल २४ धावा करून बाद झाला. त्याला युजवेंद्र चहलने माघारी पाठवले.
स्कोअर कार्ड
RCB : ६७ -२/ ओवर - ७.४
03 Jun 2025 07:44 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Final Match Live Updates Score Card : आरसीबीला संघाला दुसऱ्याच षटकात झटका बसला आहे. पंजाबच्या काइल जेमिसनने फील सॉल्टला झेलबाद करून माघारी पाठवले आहे.
स्कोअर कार्ड
RCB : १९-१/ ओवर - २.१
03 Jun 2025 07:37 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Live : पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. विराट कोहली आणि फील सॉल्ट फलंदाजी करत आहेत.
03 Jun 2025 07:34 PM (IST)
पहिल्या ओव्हरला सुरूवात झाली असून मैदानावर प्रेक्षकांचा जल्लोष दिसून येतोय आणि सिक्स मारून पहिल्या ओव्हरमध्ये आपण जिंकायला आलो आहोत हेच बंगळुरूच्या संघाने दाखवून दिली आहे.
03 Jun 2025 07:24 PM (IST)
प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने टॉसच्या अगदी आधी घोषणा केली की तो विराट कोहली आणि आरसीबीला पाठिंबा देत आहे. आमिर म्हणाला की विराटने सर्व काही जिंकले आहे. फक्त आयपीएल शिल्लक आहे.
03 Jun 2025 07:02 PM (IST)
रवी शास्त्री यांच्या उपस्थितीत रजत पाटीदार आणि श्रेयस यांनी टॉस उडवला आणि श्रेयस अय्यरने टॉस जिंकला असून गोलंदाजीला प्राधान्य दिलंय.
03 Jun 2025 06:55 PM (IST)
गुरुवार, २९ मे रोजी खेळवण्यात आलेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ८ विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी, रविवार, १ जून रोजी खेळवण्यात आलेल्या क्वालिफायर २ मध्ये पीबीकेएसने मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
📍 Narendra Modi Stadium, Ahmedabad
📸 The 2⃣ captains gear up for Final Face-off ❤️
𝗔𝗥𝗘. 𝗬𝗢𝗨. 𝗥𝗘𝗔𝗗𝗬? ⏳ #TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets | @PunjabKingsIPL pic.twitter.com/WG0cS0iTVv
— IndianPremierLeague (@IPL) June 2, 2025
03 Jun 2025 06:49 PM (IST)
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी देशभक्तीची लाट दिसून आली. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन आणि त्यांच्या टीमने देशभक्तीपर गीतांनी सर्वांचे मन जिंकले. 'वंदे मातरम', 'ये देश है वीर जवानों का' आणि 'लहरा दो', 'सुनो गौर से दुनियावालो' या गाण्यांनी त्यांनी सर्वांचे मन जिंकले. भारतमाता की जय म्हणत संपूर्ण स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा आवाज घुमला
03 Jun 2025 06:37 PM (IST)
भारतीय सशस्त्र दलांचा एक छोटासा व्हिडिओ मोठ्या स्क्रीनवर दाखवला जात आहे. गेल्या काही आठवड्यात सशस्त्र दलांना संघांनी दिलेली श्रद्धांजली देखील यात दाखवण्यात आली आहे.
SHANKAR MAHADEVAN & TEAM PAYS TRIBUTE TO INDIAN ARMED FORCES. ❤️🇮🇳 pic.twitter.com/8PQLpuYZEc
— Tanuj (@ImTanujSingh) June 3, 2025
03 Jun 2025 06:33 PM (IST)
IPL 2025 RCB vs PBKS Live : आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय सैन्याला सलाम करण्यात आला आहे. यादरम्यान, मनोज मुंताशीर यांनी लिहिलेले 'तेरी मिट्टी में मिल जवान' हे गाणे गायक बी पारक यांनी गेले.
03 Jun 2025 06:32 PM (IST)
संभावित प्लेइंग XI
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कप्तान), लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमारियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड, सुयश शर्मा
पंजाब किंग्स: प्रभसिमरन सिंह, प्रियंश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कप्तान), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टोइनिस, अजमतुल्लाह ओमरजई, काइल जैमीसन, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल
03 Jun 2025 06:27 PM (IST)
शंकर महादेवन यांनी आपल्या दोन्ही मुलांसह क्लोजिंग सेरेमनीमध्ये लष्कराला मानवंदना दिली. यावेळी प्रकृती आणि सुकृती कक्कर यांनीदेखील यावेळी त्यांना साथ दिली आणि सर्वच प्रेक्षक अत्यंत उत्साहात देशाला सलाम करत आहेत. 'म्युझिकल सिंदूर' अशी संकल्पना असणाऱ्या या सोहळ्याला सर्वांनीच उत्साहात साथ दिली आहे.
03 Jun 2025 06:21 PM (IST)
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघात खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्यात विराट इतिहास रचण्याची संधी चालून आली आहे. त्याला एका हंगामात ७०० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी ८६ धावांची गरज आहे. ज्यामुळे तो एक विक्रम रचेल.
03 Jun 2025 06:20 PM (IST)
IPL 2025 च्या समारोप समारंभाला सुरूवात झाली असून पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शौर्य गाजवणाऱ्या लष्कराला मानवंदना देण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर आणि देशाच्या तिन्ही दलांना सलाम करत शौर्याला मानवंदना देण्यात आली आहे. दणक्यात सुरूवात झाली असून आता आज कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
03 Jun 2025 06:02 PM (IST)
आरसीबी हा आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक मानला जात असतो. विराट कोहलीसारखे मोठे स्टार या संघामध्ये असल्याने हा संघ चर्चेत असतो. २००८ मध्ये या संघाची स्थापना विजय मल्ल्याने केली होती.
03 Jun 2025 05:43 PM (IST)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दाट ढग दिसून आले आहेत. तसेच काही वेळ हलका पाऊस देखील पडला आहे. दिलासा म्हणजे काही वेळाने पाऊस थांबला आहे.
03 Jun 2025 04:57 PM (IST)
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील टुंडला पोलिस स्टेशन परिसरात क्रिकेट सामन्यादरम्यान फलंदाजी करत असताना चेंडू छातीवर आदळून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
03 Jun 2025 03:48 PM (IST)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल फायनल सामना होणार आहे. दरम्यान,आरसीबीचा स्टार खेळाडू फील फिल साल्ट बाबा बनला आहे.
03 Jun 2025 02:24 PM (IST)
आयपीलएल 2025 चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही टिम्सच्या फॅन्समध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. या मॅचच्या 80,000 हून अधिक तिकीटांची विक्री झाली असल्याचं सांगितलं जात आहे. पण तुम्ही या मॅचची तिकीट खरेदी करू शकत नसाल किंवा आजचा सामना पाहण्यासाठी स्टेडिअमवर जाऊ शकत नसाल तर काही हरकत नाही. तुम्ही घसरबसल्या तुमच्या मोबाईलवर हा क्रिकेट सामना पाहू शकता आणि तेही फ्रीमध्ये. संपूर्ण बातमी वाचा