फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदी डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे. कमला हॅरिस यांच्या पराभव करत डोनाल्ड ट्रम्प आता दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान आता ट्रम्प यांच्या कार्यकाळात रशिया-युक्रेन युद्ध कोणते वळण घेईल याकडे जगाचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रचारादरम्यान, ट्रम्प यांनी या संघर्षाचा शेवट करण्यासाठी एका दिवसात शांती करार घडवून आणण्याचा संकल्प व्यक्त केला होता. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे काय धोरण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
रशियाने अमेरिकेच्या नव्या नेतृत्वामुळे संघर्ष थांबण्याची आशा व्यक्त केली
तसेच याचवेळी, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्या विजयाचे स्वागत केले व अमेरिकेच्या नव्या नेतृत्वामुळे संघर्ष थांबण्याची आशा व्यक्त केली आहे. रशियानेही चर्चेचा पर्याय खुला ठेवला असून, अमेरिकेचे पुढील धोरण काय राहील यावर त्यांची प्रतिक्रिया अवलंबून आहे. याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन प्रशासनाने युक्रेनला प्रचंड लष्करी मदत पुरवली होती. यामुळे रशिया-अमेरिका संबंधात तणाव निर्माण झाला. मात्र ट्रम्प यांच्या पूर्वीच्या परराष्ट्र धोरणानुसार, त्यांनी अमेरिकन हितसंबंधांना प्राधान्य दिले व परकीय संघर्षांत अमेरिकेचा सहभाग कमी करण्याचा प्रयत्न केला.
यामुळे 2024 च्या ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारातील वक्तव्यानुसार, ते युक्रेनला मदत कमी करू शकतात किंवा पूर्णपणे थांबवू शकतात. त्यांच्या माजी कार्यकाळातही त्यांनी युक्रेनला मदत तात्पुरती रोखली होती. यामुळे अमेरिका-युक्रेनमध्ये विवाद निर्माण झाला होता. तज्ज्ञांच्या मते, यावेळी ट्रम्प यांचा युक्रेनबाबत हा दृष्टिकोन कायम राहिला तर युक्रेनला मोठ्या क्षेत्रांवरील नियंत्रण सोडावे लागण्याची शक्यता आहे.
जागतिक स्थिरतेसाठी रशिया-युक्रेन युद्ध थांबणे एक महत्त्वपूर्ण टप्पा
ट्रम्प यांच्या “अमेरिका फर्स्ट” तत्त्वज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपापेक्षा अमेरिकेचे हितसंबंध प्राधान्याने राखले जातात असे तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे त्यांचा पुढील कार्यकाळातही आंतरराष्ट्रीय संघर्षांतील अमेरिकेच्या भूमिकेत मर्यादा आणू शकतो. ट्रम्प जर रशिया-युक्रेन युद्धात चर्चेच्या मार्गाने शांतता आणू शकले तर जागतिक स्थिरतेसाठी तो एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरू शकतो. तथापि, ट्रम्प आता काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
इस्त्रायल हमास युद्ध संपेल का?
तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनाने मध्यपूर्वेतील संघर्ष थांबेल का याकडे देखील संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. राष्ट्राध्यपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प मध्यपूर्वेबाबत काय निर्णय घेतील यअसा प्रश्न पडला आहे. इस्त्रायल हमास, इस्त्रायल हिडबुल्लाह आणि इस्त्रायल-इराण युद्ध देखील काय वळण घेईल याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा- ट्रम्प जिंकताच चीनचा सूर बदलला; तणावपूर्ण परिस्थिती असूनही दिल्या शुभेच्छा