एस. जयशंकर 'कुलतारंता टॉक्स'च्या मध्ये युरोपीय राष्ट्रांशी चर्चा करताना (फोटो सौजन्य: सोशल मीडिया
हे देखील वाचा : US Iran Peace Deal : ट्रम्प यांचा पुन्हा शांततेचा दावा; अमेरिका-इराण युद्ध थांबणार? होर्मुझबाबतही मोठे संकेत
जयशंकर यांनी फिनलँड येथे कुल्तारंता टॉक्सच्या १४ व्या भागांत सहभाग घेतला होता. यावेळी अनेक युरोपीय देशांनी भारताच्या रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या धोरणावर टीका केली. यावेळी जयशंकर यांनी युरोपलाच थेट प्रश्न केला. त्यांनी म्हटले की, युरोपमधील काही देश गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक शस्त्रे विकत आहेत, ज्यांचा भारताविरुद्ध वापर करण्यात आला. भारताने कधीही युरोपच्या सुरक्षेला धोका निर्माण केला नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या व्यक्तव्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणांवर सुरु असलेल्या चर्चांवर वेगळे चित्र पाहाला मिळाले.
भारतावर रशियन तेल खरेदीवरुन होणाऱ्या टीकेला उत्तर देताना जयशंकर यांनी स्पष्ट केले की, भारताचा उर्जा पुरवठा हा राष्ट्रीय हित लक्षात घेऊन ठरवला जातो. रशिया भारताचा मोठा तेल पुरवठादार, तर अमेरिका गॅस पुरवठ्यात आघाडीवर असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, भारताने कोणाकडून उर्जा खरेदी करायची, किंमत आणि देशाच्या गरजांवर निश्चित केले जाते.
त्यांनी स्पष्ट केले की, २०२२ पूर्वी भारताने रशियाकडून तेल खरेदी केली नव्हती. परंतु जागतिक बाजाराक स्थिरता रोखण्यासाठी अमेरिकेकच्या विनंतीनंतर भारताने रशियाकडून तेल पुरवठा घेण्याचा विचार केला. त्यांनी स्पष्ट केले की अमेरिकेच्या सांगण्यावरुनच हा निर्णय घेण्यात आला होता, जे जागतिक बाजारपेठेतील स्थिरतेसाठी आजही फायदेशीर ठरत आहे.
तसेच जयशंकर यांनी नैतिकतेच्या आधावार होणाऱ्या टिकांना धुडकावून लावले. त्यांनी युरोपच्या दुहेरी भूमिकेवर अप्रत्यक्ष टीका करत, केवळ तत्त्वांचा प्रश्न असल्याचे दाखवण्याचे गरज नाही, असे म्हटले. जयशंकर यांच्या या भूमिकेमुळे भारताची रशियाकडून तेल खरेदी करण्याचे कारण स्पष्ट झाले आहे. त्यांनी युरोपला भारत राष्ट्रीय हित आणि आंतरराष्ट्रीय हितासाठी ही खरेदी करत असल्याचा स्पष्ट संदेश आपल्या वक्तव्यातून दिला आहे.
हे देखील वाचा :Hormuz Attack: भारतीय नाविकांच्या मृत्यूप्रकरणी इराणचा हल्लाबोल; अमेरिकेवर केला गंभीर आरोप






