फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Aditi Yadav Fake News: समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव आणि मैनपुरीच्या खासदार डिंपल यादव यांची मोठी मुलगी अदिति यादव सध्या अचानक चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिच्याबद्दल अनेक प्रकारच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. हे प्रकरण इतके वाढले की, तो राजकीय वादाचा विषय बनला आणि थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया देत कडक शब्दांत टीका केली.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अदिती यादवबद्दल अनेक बनावट पोस्ट व्हायरल होत होत्या. काही पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, ती परदेशात शिक्षण घेत आहे आणि कुटुंबाचे कोट्यवधी रुपये घेऊन गायब झाली आहे. इतकेच नाही तर तिच्या फोटोंचा गैरवापर करून खोट्या कहाण्या रचण्यात आल्या. या सर्व पार्श्वभूमीवर अदिती यादव नेमकी कोण आहे, ती काय शिक्षण घेत आहे आणि तिच्याबद्दल पसरणाऱ्या बातम्यांमागचे सत्य काय आहे. हे आज आपण जाणून घेणार आहोत.
अदिति यादव ही अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांची मोठी मुलगी आहे. तिचा जन्म २६ ऑगस्ट २००२ रोजी झाला. ती सक्रीय राजकारणापासून दूर राहते आणि सहसा प्रसारमाध्यमे किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये खूप कमी पाहायला मिळते. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ती आपली आई डिंपल यादव यांच्यासोबत निवडणूक प्रचारात दिसली होती, ज्यानंतर ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली.
अदिति यादवने आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण लखनऊमधील नामांकित ‘ला मार्टिनियर गर्ल्स कॉलेज’ (La Martiniere Girls College) मधून पूर्ण केले. वर्ष २०२० मध्ये तिने १२ वीच्या बोर्ड परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवले होते. तिच्या या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीची त्यावेळी सर्वत्र खूप चर्चा झाली होती.
दावा १ : काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती लंडनच्या ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’ (UCL) मधून ‘राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयाचे शिक्षण घेत आहे.
दावा २ : तर काही अन्य अधिकृत विधानांच्या आधारे असाही दावा केला गेला आहे की, ती भारतातच आपले शिक्षण सुरू ठेवून आहे आणि दिल्ली युनिव्हर्सिटीच्या ‘फॅकल्टी ऑफ लॉ’मधून कायद्याचे (Law) शिक्षण घेत आहे.
Jobs Without Degree 2026: १२ वी नंतर कॉलेजला ‘बाय-बाय’ करून ‘या’ ३ क्षेत्रांत करा लाखोंची कमाई…
सोशल मीडियावर काही समाजकंटकांनी अदिती यादवचा फोटो वापरून ती कोट्यवधी रुपये घेऊन गायब झाल्याच्या पोस्ट शेअर केल्या. या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. केवळ राजकीय द्वेषातून तिची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी या अफवा मुद्दाम पसरवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.






