Top Marathi News Today Live : बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
Marathi Breaking News Updates : गेल्या काही दिवसांपासून इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून हल्ले केले जात आहेत. इराणकडूनही या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. या देशांत युद्ध सुरु आहे. यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच पाकिस्तानात झालेली चर्चा फिस्कटली. त्यानंतर आता पुन्हा अशाप्रकारची चर्चा होईल, अशी शक्यता पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली. इराण-अमेरिका चर्चेची पुढील फेरी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात शनिवारी 21 तास चर्चा झाली. १९७९ नंतरची ही पहिलीच बैठक होती, ज्यात दोन्ही बाजूंचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मात्र, आठवड्याच्या अखेरीस पाकिस्तानात झालेल्या चर्चेनंतरही, दोन्ही बाजू शत्रूत्व संपवण्यासाठी कायमस्वरूपी शांतता करारावर पोहोचण्यात अयशस्वी ठरल्या. पाकिस्तानी संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, चर्चेनंतर समाधानाचे वातावरण आहे, कारण आतापर्यंत कोणतीही नकारात्मक घडामोड घडलेली नाही. आतापर्यंत केवळ सकारात्मक प्रगती दिसून आली आहे, जे दर्शवते की सुरू असलेले राजनैतिक प्रयत्न योग्य दिशेने जात आहेत.
14 Apr 2026 06:15 PM (IST)
Nanded News : नांदेड : नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी संबंधित व परिवारातील वेगवेगळ्या आयामामध्ये काम करणाऱ्या सहा माजी पदाधिकाऱ्यांनी राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांना उद्देशून लिहिलेले अनावृत्त पत्र सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, यामुळे संघ (RSS) व भाजप कार्यकत्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे.
14 Apr 2026 06:11 PM (IST)
Samrat Choudhary Bihar CM News Marathi: नितीश कुमार यांनी आज (14 एप्रिल 2026) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता सम्राट चौधरी हे बिहारचे नवे मुख्यमंत्री असतील. मिळालेल्या माहितीनुसार उद्या, १५ एप्रिल रोजी बिहार लोक भवन येथे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. नवीन सरकार स्थापनेची तयारी तीव्र झाली असून, मंत्रिमंडळ सदस्यांची संभाव्य यादीही समोर येत आहे.
14 Apr 2026 06:04 PM (IST)
Mumbai Indians: आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. चाहत्यांना रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सणे हंगामाची सुरुवात चांगली केली होती. तब्बल 12 वर्षांनी मुंबईने पहिला सामना जिंकला होता. मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्सने निराशाजनक कामगिरी केली आहे. सलग तीन सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे. यावर भारताचा माजी क्रिकेटर सदागोपान रमेशने हार्दिक पंड्या खडेबोल सुनावले आहेत.
14 Apr 2026 05:55 PM (IST)
खालापूरमध्ये ‘Savi Consultancy’ नावाच्या कंपनीकडून दाम दुप्पट व भरमसाठ व्याजाचे आमिष दाखवत कोट्यवधींचा घोटाळा उघड झाला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
14 Apr 2026 05:40 PM (IST)
कॉर्पोरेट आणि आयटी क्षेत्रात ‘लव्ह जिहाद’सारख्या प्रकारांची चौकशी झाली पाहिजे, असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले असून त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नाशिकमध्ये समोर आलेल्या कथित घटनेचा संदर्भ देत, अशा प्रकारचे प्रकार इतर कंपन्यांमध्येही घडले आहेत का, याची चौकशी संबंधित कंपनी व्यवस्थापनाने करावी, असे पडळकर यांनी म्हटले. तसेच, “जिहादी प्रवृत्तीची माणसं मोठ्या पदांवर असतील तर त्यांना तत्काळ हटवावे,” अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच, ज्या कंपन्यांमध्ये अशा प्रवृत्तीची व्यक्ती उच्च पदांवर आहेत, त्या ठिकाणी मुलींनी काम करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. कॉर्पोरेट आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींच्या पालकांनीही सतर्क राहून लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
14 Apr 2026 05:30 PM (IST)
खालापूरमध्ये ‘Savi Consultancy’ नावाच्या कंपनीकडून दाम दुप्पट व भरमसाठ व्याजाचे आमिष दाखवत कोट्यवधींचा घोटाळा उघड झाला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
14 Apr 2026 05:20 PM (IST)
वसईतील माणिकपूर नाका परिसरातील रस्ता सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. फुट्यार्डो इमारतीसमोर पाईपलाईन कामानंतर करण्यात आलेल्या अपुऱ्या दुरुस्तीमुळे रस्त्यावर बारीक खडी साचली आहे. यामुळे दुचाकीस्वारांचे टायर घसरून वारंवार अपघात घडत आहेत. गेल्या दीड महिन्यात अनेक जण जखमी झाले असून, नुकतेच दोन स्कूटी अपघात सीसीटीव्हीतही कैद झाले आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला असून, या समस्येविरोधात शिवसेना (उबाठा) गट आंदोलनाच्या तयारीत आहे.
14 Apr 2026 05:15 PM (IST)
लातूर शहराची बाजारपेठे मोठे असून लातूर लातूर शहरात व्यवसाय करणारे व्यापाऱ्यांची दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल दिवसाच्या माध्यमातून होत असते. लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये देखील दररोज कोट्यावधींचा व्यवहार केला जातो. लातूर जिल्ह्यातल मागील पंधरा दिवसापासून एसबीआय ची कॅश वितरण व्यवस्था ढासळली असून. लातूर जिल्ह्यातील सहकारी व खाजगी बँकांच्या चलन तुटवडा निर्माण झाला आहे.एसबीआय ही बँक लातूर जिल्ह्याची चेस्ट बँक आहे.या बँकेकडून जिल्ह्यातील सर्वच बँकांना चलन पुरवठा केला जातो. मागील 15 दिवसापासू चलन तुटवड्यामुळे व्यवहार करताना बँकांची मोठी अडचण निर्माण झाली असून त्यामुळे लातूर जिल्ह्यातील.व्यापारी शेतकरी व नागरिकांना या अडचणीचा फटका बसत असून यामुळे बँक बँकेच्या व्यवहारावर मोठा परिणाम झाला असून. सहकारी व खाजगी बँकेतून एसबीआय बँकेवर नाराजीचा सूर सध्या लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत असून ही इतर व्यवस्था लवकरात लवकर सुरळीत करून बँकांना व नागरिकांना सुरळीत व्यवहार करता यावा अशा पद्धतीची अपेक्षा लातूर जिल्ह्यातील बँकांनी जिल्हाधिकारी व रिझर्व बॅंकेना विनंती केली आहे.
14 Apr 2026 05:10 PM (IST)
. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात मोठा गोंधळ उडाला. मुंबईचे आमदार व संपर्कप्रमुख मंगेश कुडाळकर यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांचे दोन गट आमनेसामने भिडल्याने मेळावा अक्षरशः रणांगणात परिवर्तित झाला होता. निलंगा शहरातील टाऊन हॉल येथे आयोजित या मेळाव्यात संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकांच्या तयारीवर चर्चा अपेक्षित होती. मात्र कार्यक्रम सुरू असतानाच शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी उफाळून आली. जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी अचानक घोषणाबाजी सुरू करत, “जिल्हाप्रमुख हटाव, शिवसेना वाचवा” अशा जोरदार घोषणा दिल्या. घोषणाबाजीचे रूपांतर काही क्षणांतच धक्काबुक्की आणि गोंधळात झाले. दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांसमोर ठाकल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून आमदार कुडाळकर आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र संतापलेल्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी कायम ठेवली.
14 Apr 2026 05:05 PM (IST)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात येत आहे. शहराच्या मुख्य भागासह उपनगरांमध्ये निळ्या रंगाची उधळण पाहायला मिळत असून 'जय भीम'च्या घोषाने अवघे शहर दुमदुमून गेले आहे.जयंतीचे मुख्य आकर्षण शहराच्या मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर ठरला. सकाळी या ठिकाणी शासकीय व सामाजिक संस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अहिल्यानगर पोलीस दलाच्या बँड पथकाने बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर येऊन विशेष धून वाजवून मानवंदना दिली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पोलीस पथकाने केलेल्या या अभिवादनाने उपस्थित जनसमुदायाचे लक्ष वेधून घेतले.
14 Apr 2026 04:55 PM (IST)
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 135व्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज येथे मिरवणूक काढण्यात आली.संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रायगड हॉस्पिटलमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची१३५ वी जयंती साजरी करण्यात आली.सुरुवातीला या जयंती सोहळ्याची सुरुवात गेट पासून मिरवणूक काढण्यात आली.त्यावेळी यावेळी यादवराव तासगावकर शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ नंदकुमार तासगावकर, सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव वंदना तासगावकर, कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड,संचालक नागसेन कांबळे रायगड हॉस्पिटलचे सीईओ, रिटायर्ड कर्नल डॉ कुशाग्र पटेल,तसेच रमाकांत तरे,महेश काशीद,आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
14 Apr 2026 04:50 PM (IST)
कल्याण पश्चिम घोलप नगर येथील शेतकरी सहकारी गृहनिर्माण संस्था सोसायटी असलेला 14 इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्प शहरात चर्चेचा विषय बनला . या सोसायटीमधील काही रहिवाशांनी संबंधित विकासक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आणि KDMC अधिकाऱ्यांना हाताशी धरून जबरदस्तीने इमारती रिकाम्या करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपा नगरसेवक दया गायकवाड आणि नगरसेवक गणेश कोट यांनी देखील रहिवाशांच्या बाजूने असल्याचे इशारा विकासाला दिला . तर दुसरीकडे आता याच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि रहिवाशांनी आमच्यावर आणि विकासाकावर केलेले आरोप खोटे असल्याचे सांगितलं.शेतकरी गृहनिर्माण सहकारी सोसायटीचे सेक्रेटरी कमलाकर घोलप यांनी सांंगितले की, ज्या रहिवासियांनी आरोप केला आहे. तो निराधार आणि तथ्यहिन आहे. इमारतीच्या विकास कामासाठी विकासकाने कोणत्याही प्रकारची दबाव कोणावरही टाकलेला नाही. तसेच जोरजबरदस्ती केलेली नाही. विकासक हा सोसायटीला या कामात सहकार्य करीत आहे. जे रहिवासी आमच्यावर विकासावर खोटे आरोप करतात त्यांनी विकासाकडून भाडं घेतलेला आहे. विरोध करणाऱ्या रहिवाशांमधील काहीजण वैयक्तिक स्वार्थापोटी तथ्यहीन आरोप करत असल्याचे घोलप यांनी सांगितले .
14 Apr 2026 04:45 PM (IST)
मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात सकल हिंदू संमेलन संध्याकाळी पार पडले.प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपालजी होते. स्वागताध्यक्ष ह.भ.प. वामन महाराज भोईर यांच्याहस्ते प्रमुख पाहुणे व मान्यवरांना तुळशीचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे कृष्णगोपालजी,ह.भ.प.वामन महाराज भोईर,ह.भ.प.सच्चिदानंद कांबेकर,देवेंद्र भोजने,डाॅ.सागर कांबळे,रजनी गायकवाड,ललिता दळवी,ताई पवार उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी तालुका पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, सरपंच उमाताई मुंढे,जि.प.सदस्या नेहा पारंगे ,पंचायत समिती सदस्या अर्चना भोईर,माजी सभापती रमेश पाटील,माजी सचिन तांडेल, ग्रामपंचायत सदस्या रसिका राकेश खराडे, सदस्या प्रतिक्षा रोशन राऊत आदी मान्यवरांसह परिसरातील आंतरराष्ट्रीय बजरंग दलासह इतर हिंदू संघटना, शेकडो हिंदू समाज बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिपप्रज्वलन करुन
स्व.आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोधिवली येथील शिवगर्जना शस्रपथकाच्या मुला-मुलींनी दांड-पट्टा,लाठी-काठी,काकडा,ढाल- तलवार याची प्रात्यक्षिके दाखवली. प्रमुख पाहुणे कृष्णगोपालजी यांनी आपल्या भाषणात सांगितले की,हिंदू अत्यंत उदार व धार्मिक आहे.
14 Apr 2026 04:40 PM (IST)
वसईच्या मातीतील एका तरुणाने आपल्या कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मोठं यश मिळवलं आहे. इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन आयोजित ज्युनिअर मास्टर नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत दारिस दिलीप डाबरे याने गोल्ड मेडल पटकावत वसईचे नाव उज्ज्वल केले आहे. दारिस डाबरेच्या या अभिमानास्पद कामगिरीनंतर वसई-विरार शहरात आनंदाचं वातावरण आहे. या यशाबद्दल वसई विरार सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे महापौर अजिवजी पाटील आणि उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी दारिसच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्याच्या मेहनतीचे कौतुक केले.
14 Apr 2026 04:35 PM (IST)
कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील डिकसळ येथे असलेल्या डोंगरातील माती काढण्याचे काम गेली दोन महिने सुरु होते.त्याबाबत अनेक तक्रारी समाज माध्यमांवर सुरु होत्या,त्याबाबत त्या ठिकाणचे जमीन मालक यांनी आपल्या जमिनीतून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता माती उत्कहांना केले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यानंतर महसूल प्रशासनाने त्या मातीविरुदध आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेतली आणि त्यानंतर महसूल अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली.दरम्यान आता त्या टेकडीवर सुरु असलेले खोदकाम पूर्णपणे बंद झाले आहे.
डिकसळ गावाच्या हद्दीत असलेल्या टेकडीवर गेली दोन महिने माती उत्खन सुरु होते.त्याबाबत समाजमाध्यमांवर जोरदार टीका पर्यावरण प्रेमी यांच्यापासून सुरु होती.त्यानंतर त्या भागातील जमीन मालक यांनी आपल्या जमिनीची पाहणी केली असता आपल्याच जमिनीतून माती काढण्यात येत असल्याचे दिसून आले.हि बाब लक्षात येताच संबंधित शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी आणि कर्जत तहसीलदार यांना पत्र देऊन आपल्या जमिनीत काढण्यात येत असलेल्या माती उत्खननाची चौकशी करावी अशी मागणी केली.त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी पोलिसांच्या उपस्थितीत त्या जागेची पाहणी केल्यावर सत्य परिस्थिती समोर आली आहे.
14 Apr 2026 04:30 PM (IST)
कल्याण पश्चिम घोलप नगर येथील शेतकरी सहकारी गृहनिर्माण संस्था सोसायटी असलेला 14 इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्प शहरात चर्चेचा विषय बनला . या सोसायटीमधील काही रहिवाशांनी संबंधित विकासक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आणि KDMC अधिकाऱ्यांना हाताशी धरून जबरदस्तीने इमारती रिकाम्या करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपा नगरसेवक दया गायकवाड आणि नगरसेवक गणेश कोट यांनी देखील रहिवाशांच्या बाजूने असल्याचे इशारा विकासाला दिला . तर दुसरीकडे आता याच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि रहिवाशांनी आमच्यावर आणि विकासाकावर केलेले आरोप खोटे असल्याचे सांगितलं.शेतकरी गृहनिर्माण सहकारी सोसायटीचे सेक्रेटरी कमलाकर घोलप यांनी सांंगितले की, ज्या रहिवासियांनी आरोप केला आहे. तो निराधार आणि तथ्यहिन आहे.
14 Apr 2026 04:30 PM (IST)
कर्जत तालुक्यातील विविध भागात चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.या बाबत नेरळ पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करताना मंगळसूत्र चोरी आणि सोन्याच्या चैन चोरणाऱ्या सराईत गुन्हेगार यांना ताब्यात घेणे आहे.नेरळ पोलिसांनी पकडलेल्या सराईत गुन्हेगाराने तब्बल १२ गुन्ह्यांची उकल केली आहे.रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.
14 Apr 2026 04:25 PM (IST)
वसईच्या मातीतील एका तरुणाने आपल्या कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मोठं यश मिळवलं आहे. इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन आयोजित ज्युनिअर मास्टर नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत दारिस दिलीप डाबरे याने गोल्ड मेडल पटकावत वसईचे नाव उज्ज्वल केले आहे. दारिस डाबरेच्या या अभिमानास्पद कामगिरीनंतर वसई-विरार शहरात आनंदाचं वातावरण आहे. या यशाबद्दल वसई विरार सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे महापौर अजिवजी पाटील आणि उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी दारिसच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्याच्या मेहनतीचे कौतुक केले.
14 Apr 2026 04:20 PM (IST)
नागाव समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांच्या पुढाकारातून रोबोटिक वॉटर रेस्क्यू यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. बुडणाऱ्यांच्या बचावासाठी अत्याधुनिक ‘रोबो रक्षक’ आता नागाव बीचवर कार्यरत होणार असून हा निर्णय स्थानिक पातळीवर एक मोठा आणि दूरदृष्टीचा टप्पा मानला जात आहे.कलेक्टर कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत रायगड जिल्ह्यासाठी आपत्ती विषयक विशेष कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचा सहभाग होता, तसेच नागाव, काशीद आणि श्रीवर्धन समुद्रकिनारा येथील ग्रामपंचायतींनाही निमंत्रित करण्यात आले होते. ग्रामपंचायतीपैकी फक्त नागांव ग्रामपंचायत प्रशिक्षणास हजर होते.
14 Apr 2026 04:15 PM (IST)
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून एरोलीतील सेक्टर 15 येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भव्य असं स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकात डॉ. बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले मिरवणूक तसेच विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉक्टर आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा चित्ररूपी इतिहास त्याचप्रमाणे ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट दाखवण्यात आला.
14 Apr 2026 04:05 PM (IST)
खालापुरात कमी कालावधीत दाम दुप्पट, भरमसाठ व्याज देण्याचे आमिष दाखवत करोडो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या सावी कॅन्सल्टन्सी नावाच्या कंपनीच्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेले तीन वर्षे ही सावी कॅन्सल्टन्सी नावाची कंपनी खालापूर व चौक गावात आलिशान ऑफिस टाकून हा गोरखधंदा सुरु करण्यात आला होता. या कंपनीत पैसे गुंतवणाऱ्या लोकांना आकर्षक भेटवस्तू देऊन कमी कालावधीत पैसे दुप्पट करून देतो व आकर्षक भरमसाठ व्याज देतो सांगून काही एजंट करवी अनेकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले, आणि आता या सावी कॅन्सल्टन्सी कंपनीचे सर्व व्यवहार ठप्प झाले, गुंतवणूक केलेल्याना पैसे व परतावा न मिळाल्याने एकाने याबाबत खालापूर पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी कारवाई केली.
14 Apr 2026 04:02 PM (IST)
मीरा-भाईंदर शहरात रिक्षा चालकांना नवीन लायसन्स व बिल्ला मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या १५ वर्षांच्या वास्तव्याच्या दाखल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहितीच्या अधिकारातून (RTI) मिळालेल्या अधिकृत उत्तरांवरून हा गंभीर गैरप्रकार आमदार नरेंद्र मेहता यांनी उघडकीस आणला असून, या प्रकरणाची दखल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे.या उघडकीनंतर मीरा-भाईंदरमधील परिवहन विभाग आणि RTO अधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत बोगस कागदपत्रांच्या आधारे मिळवलेली लायसन्स व बिल्ले रद्द करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. शहरातील अनेक रिक्षाचालकांनी बनावट दाखले सादर करून नियमांना बगल दिल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याने प्रशासनाने तपासाची व्याप्ती वाढवली आहे.
14 Apr 2026 03:50 PM (IST)
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात हुंड्यासाठी एका विवाहित महिलेची गळा दाबुन हत्या केल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या अवघ्या ४ महिन्यातच सासरच्या मंडळींनी पैश्याच्या हव्यासापोटी छळ केला आणि तिची गळा दाबून हत्या केली. ही घटना सारोळे गावात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या विवाहित महिलेचे नाव सोनाली प्रतीक शिंदे (२२ वर्ष) असे आहे. अवघ्या ४ महिन्यांपूर्वी मोठ्या आशेने सोनालीचा विवाह प्रतिक्षी लावून देण्यात आला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली होती. “लग्नात टीव्ही दिला नाही, आमचा मानपान करून सोन्याची अंगठी पण आमच्या मुलाला घातली नाही,” असे टोमणे मारण्यात येत होते. आरोपी प्रतीकने तर सोनालीच्या वडिलांना धमकी दिली होती की, जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तो तिला माहेरी आणून सोडून देईल. त्यानंतर सोनालीच्या गरीब आई-वडिलांनी परिस्थिती नसतानाही 20 हजार रुपये देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील सोनालीचा छळ सुरूच होता.
14 Apr 2026 03:35 PM (IST)
10 फेब्रुवारी 2026 रोजी, कऱ्हाडे कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन झाले. अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे बाबा झाला. तर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे काका झाला. नुकतीच, बाळाची नामकरण विधी पार पडली. अभिनेता अधोक्षज कऱ्हाडेने त्याच्या सोशल मीडिया हॅन्डल @adhokshaj1989 च्या माध्यमातून बाळाचे नाव जाहीर केले. बाळाचे नाव ‘अक्षोभ्य’ ठेवण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये ‘चि. अक्षोभ्य चैताली अधोक्षज कऱ्हाडे!’ असे पूर्ण नाव लिहीत बाळाचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
14 Apr 2026 03:25 PM (IST)
जर तुम्ही उद्या, १४ एप्रिल रोजी, कोणत्याही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की देशभरातील बहुतेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. बँकेत जाण्यापूर्वी, तुमच्या शहरातील बँका उद्या उघड्या असतील की नाही हे नक्की तपासा. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) बँकांच्या सुट्ट्यांची यादी आगाऊ जाहीर करते, ज्यामध्ये कोणत्या बँका कोणत्या दिवशी आणि कोणत्या कारणांसाठी बंद राहतील याचा तपशील असतो. त्यामुळे, बँकेत जाण्यापूर्वी, आरबीआयच्या बँक सुट्ट्यांची यादी नक्की तपासा. चला जाणून घेऊया की उद्या, १४ एप्रिल रोजी, बँका कुठे आणि का बंद राहतील.
14 Apr 2026 03:15 PM (IST)
देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेल्या NEET UG 2026 ची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने परीक्षेपूर्वी सिटी इंटिमेशन स्लिप (शहर माहिती स्लिप) प्रसिद्ध केली आहे. यामुळे उमेदवारांना कळते की ते कोणत्या शहरात परीक्षा देणार आहेत. ही माहिती आगाऊ मिळाल्याने, विद्यार्थी त्यांच्या प्रवासाची आणि राहण्याची व्यवस्था आगाऊ करू शकतात, ज्यामुळे परीक्षेच्या दिवशी कोणतीही अडचण टाळता येते. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपली सिटी स्लिप सहजपणे डाउनलोड करू शकतात.
14 Apr 2026 03:04 PM (IST)
Pratap Sarnaik on Marathi Language News Marathi: येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
14 Apr 2026 02:00 PM (IST)
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नवीन सरकारी धोरणे, चार्जिंग स्टेशन्सची वाढती संख्या आणि नवीन मॉडेल्समुळे लोक पेट्रोल आणि डिझेलऐवजी इलेक्ट्रिक कारला पसंती देत आहेत. सध्या बाजारात असलेल्या बहुतेक इलेक्ट्रिक कार महाग असल्या तरी, ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. येत्या काही महिन्यांत, अनेक बजेट आणि प्रीमियम इलेक्ट्रिक कार भारतीय रस्त्यांवर धावताना दिसतील.
14 Apr 2026 01:55 PM (IST)
आपल्या चवदार व कुरकुरित बाकरवडीने जगभरात लोकप्रियता मिळवलेल्या व भारतातील प्रसिद्ध मिठाई, नमकीन व स्नॅक्सचे निर्माते असलेल्या चितळे बंधू मिठाईवाले यांच्या वतीने भोर तालुक्यातील रांजे येथे ‘रांजे व्हिजन पार्क’ या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. सदर प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या १६ एप्रिल रोजी संपन्न होईल, अशी माहिती चितळे बंधू मिठाईवाले या संस्थेचे भागीदार व चितळे कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे इंद्रनील व केदार चितळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
14 Apr 2026 01:50 PM (IST)
नाशिक येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुपारी मुंबई- आग्रा महामार्गावर एका तरुणावर भीषण हल्ला झाल्याचे समोर आले आहे. एका महिलेने अत्यंत क्रूरपणे एका व्यक्तीवर चॉपरने सपासप वार केले. हल्ल्यापूर्वी संबंधित महिलेने पीडित तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याला असहाय्य केले आणि त्यानंतर तो बेशुद्ध होण्याच्या स्थितीत असताना त्याच्यावर चाकू व चॉपरने मानेवर व डोक्यावर प्रहार केले. हा सर्व प्रकार महामार्गावरून जाणाऱ्या एका कार चालकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
14 Apr 2026 01:45 PM (IST)
भारतावरच नाही तर जगावर राज्य गाजवणारा बापमाणूस म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी फक्त अस्पृश्यांनाच न्याय मिळवून दिला का तर नाही. आज जागतिक अर्थतज्ज्ञ म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. त्याचं कारण म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडियाचा घातलेला पाया. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून जरी त्यांची ओळख असली तरी यामागे देखील प्रचंड असा संघर्ष आहे. लहानपणी शहरात जायचं म्हणून आत्याच्या बटव्यातून पैसै चोरणारा भिवा ते अर्थतज्ज्ञ डॉ. बी.आर. आंबेडकर हा प्रवास किती खडतर होता याची कल्पना न केलेलीच बरी.
14 Apr 2026 01:35 PM (IST)
मागील काही दिवसांपासून भारताचे आयटी केंद्र असलेल्या महाराष्ट्रातून कॉर्पोरेट जगताशी संबंधित धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांना लक्ष्य करुन लव्ह जिहादचा जाळे टाकले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिकच्या टीसीएस या मोठ्या कंपनीतील लैंगिक छळ आणि धर्मांतराचे प्रकरण ताजे असताना पुण्यातून देखील असाच आरोप करणारी घटना समोर आली आहे. आता इन्फोसिस पुणेच्या (Pune News) एका माजी कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
14 Apr 2026 01:28 PM (IST)
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून अमेरिका-इराण युद्धामुळे सल्फरच्या (गंधक) पुरवठ्यावर परिणाम झाला असून, देशातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन संकट निर्माण झाले आहे. आधीच शेतकऱ्यांना तेल आणि एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम होत होता, त्यात आता आणखी भर पडली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यामुळे केवळ तेल आणि एलपीजीसाठीच नव्हे, तर सल्फरसाठीही समस्या निर्माण होऊ शकतात. खते, बॅटरी, रसायने, धातू आणि सेमीकंडक्टरसाठी सल्फर आवश्यक आहे. युरियापासून ते कॉम्प्युटर चिप्सपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीसाठी सल्फ्यूरिक ऍसिड महत्त्वाचे आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यामुळे कारखान्यांचे उत्पादन मंदावू शकते आणि अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात. भारत आपल्या गरजेचा एक मोठा भाग आखाती देशांकडून आयात करतो.
14 Apr 2026 01:20 PM (IST)
क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांच्यातील संबंध सामान्य आहेत, अनेक पुरुष क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे. यातील सर्वात नवीन नाव अर्शदीप सिंहचे आहे, जो पंजाबी अभिनेत्री समरीन कौरला डेट करत असल्याची अफवा आहे. या सगळ्याची सुरुवात सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे झाली. आता, ते दोघे एकत्र गुरुद्वारात गेल्याची चर्चा आहे आणि त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
14 Apr 2026 01:13 PM (IST)
देशातील अग्रगण्य विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअर्सची चर्चा सध्या सुरु आहे. LIC कंपनी आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देणार आहे. 7 एप्रिल रोजी शेअर बाजारात दाखल केलेल्या माहितीनुसार, एलआयसीने जाहीर केले की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यानंतर यावर निर्णय घेतला गेला आहे.
14 Apr 2026 01:01 PM (IST)
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाची १७ लाख २३ रूपयांची फसवणूक केली आहे. ही घटना २ डिसेंबर ते २६ जानेवारी २०२६ कालावधीत खराडीत घडली आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय तरूणाने खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण खराडीत राहायला असून, २ डिसेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉटसअॅपद्वारे लिंक पाठवली. ग्रुपमध्ये अॅड करून घेत त्यांना अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याद्वारे नफा दर्शवून सायबर चोरट्यांनी संबंधित तरूणाला गुंतवणूक करण्यास सांगितले. तब्बल १७ लाख २३ हजार रूपयांची गुंतवणूक केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण तपास करीत आहेत.
14 Apr 2026 12:45 PM (IST)
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारताच प्रशासकीय बेशिस्तीला चाप लावण्यास सुरुवात केली आहे. शहरातील फोफावलेल्या अनधिकृत बांधकामांना जबाबदार धरून त्यांनी शुक्रवारी (ता. १०) एका कनिष्ठ अभियंत्यासह दोन कर्मचाऱ्यांना थेट निलंबित केले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे साडेतीन वर्षांनंतर महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्ट कारभाराला अभय देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
14 Apr 2026 12:30 PM (IST)
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिरात व्यापक जतन व दुरुस्तीच्या कामांना सुरुवात होत असून, बुधवार (दि. १५ एप्रिल) ते ३१ जुलै या कालावधीत सुमारे साडेतीन महिने मंदिर भाविकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सात मंदिरांच्या विकास आराखड्याअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत असून, या कालावधीत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याची संरचना, सभामंडप तसेच परिसरातील पायाभूत सुविधांची दुरुस्ती व सुशोभीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. या संदर्भातील माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाणे यांनी सोमवारी (दि.१३) मंदिर सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
14 Apr 2026 12:15 PM (IST)
पुणे महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रे व पंपिंग स्टेशन येथे तातडीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामांमुळे गुरुवारी (दि. १६) शहरातील बहुतांश भागात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवार रात्री १२ वाजल्यापासून ते गुरुवार रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असून, शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
14 Apr 2026 11:55 AM (IST)
कमी वेतनाच्या मुद्दयावरुन नोएडामध्ये कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आणि भयानक आंदोलन सुरु झालं. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोएडा (Noida News) सेक्टर 60 मध्ये कर्मचाऱ्यांच्या घोषणााबाजीने परिसर दणाणून गेला होता. वेतनवाढीसाठी हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरुन आपल्या हक्कासाठी आवाज उठवू लागले. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि आंदोलन चिघलळं, नोएडामध्ये वेतनवाढी झालेल्या तीव्र आंदोलन आणि जाळपोळनंतर सरकारला जाग आली. या कर्मचाऱ्यांसाठी योगी सरकारकडून (Yogi Adityanath) मोठी घोषणा करण्यात केली.
14 Apr 2026 11:45 AM (IST)
अमेरिकन वृत्तपत्र ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’नुसार, सौदी अरेबिया अमेरिकेवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नौदल नाकेबंदी तात्काळ उठवण्यासाठी आणि वाटाघाटीच्या टेबलावर परत येण्यासाठी दबाव टाकत आहे. सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांना भीती आहे की, जर अमेरिकेने नाकेबंदी सुरू ठेवली, तर इराण त्यांचे पर्यायी मार्ग रोखून प्रत्युत्तर देऊ शकतो. अशी परिस्थिती त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का असेल. होर्मुझ संकट असूनही, त्यांचे तेल इतर मार्गांनी वाहत होते, परंतु ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे ते मार्गही धोक्यात येतील.
14 Apr 2026 11:35 AM (IST)
टेक जायंट अॅपलच्या मालकीच्या डिव्हाईसमधील सॉफ्टवेयर यूजर्सना अधिक चांगली सुरक्षितता आणि चांगला अनुभव ऑफर करण्यासाठी ओळखले जातात. आयफोनमध्ये यूजर्सना केवळ एका मेन्यू सेटिंगमध्ये अनेक हिडन फीचर्स ऑफर केले जातात. हे फीचर्स एक्सेस करण्यासाठी यूजर्सना काही कोड्सचा वापर करावा लागतो. तंत्रज्ञानाच्या भाषेत या कोड्सना USSD (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्विस डेटा) असं म्हटलं जाते.
14 Apr 2026 11:25 AM (IST)
भारतीय लोकशाहीच्या पायाभरणीतील तेजस्वी शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची आज जयंती. त्यांचे कार्य आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची ज्योत प्रज्वलित करत आहे. अन्याय, अस्पृश्यता आणि विषमतेच्या अंधःकारातून समाजाला प्रकाशाच्या दिशेने नेण्यासाठी त्यांनी आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्पण केला.
14 Apr 2026 11:20 AM (IST)
पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची पहिली फेरी अयशस्वी ठरली आहे, परंतु आता लवकरच चर्चेची दुसरी फेरी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराण चर्चेसाठी उत्सुक असून त्यांनी अमेरिकेला पुन्हा एकदा वाटाघाटी करण्याची विनंती करणारा संदेश पाठवला आहे. उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनीही म्हटले आहे की, इस्लामाबादमध्ये इराणसोबत करार करण्याच्या दिशेने काही प्रगती झाली आहे. अमेरिकेच्या नेत्यांच्या या विधानांवरून असे सूचित होते की, इराणसोबत अमेरिकेची चर्चा लवकरच सुरू होऊ शकते.
14 Apr 2026 11:15 AM (IST)
एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर खूप जास्त शेअर केला जात आहे ज्यात वैष्णो देवीच्या पायथ्याशी भाविकासोबत अनोखा चमत्कार घडून आल्याचे दिसून आले. घडलं असं की, ५ वर्षांपूर्वी एका कुटुंबातील तरुण अचानक गायब झाला होता. अशात वैष्णो देवीच्या मंदिरात बहिणीची त्याच्या भावासोबत अनोखी भेट झाली. हरवलेल्या आपल्या भावाला पाहून बहिण भावूक झाली आणि हे दृष्य आता सोशल मिडियावर चांगलेच शेअर केले जात आहे.
14 Apr 2026 11:05 AM (IST)
नैनीतालमध्ये 24 वर्षीय विद्यार्थिनी दिव्या आर्याने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी तिने मित्राला मोबाईलचा पासवर्ड पाठवला. मित्राने 40 कॉल केले तरी प्रतिसाद न मिळाल्याने घरी गेल्यावर ती गळफास घेतल्याचे आढळले.
14 Apr 2026 10:45 AM (IST)
उत्तराखंड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नैनिताल जिल्ह्यात एमबीपीजी कॉलेजच्या 24 वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्राला मोबाईलचा पासवर्ड पाठवला. तरुणाने लागोपाठ ४० कॉल केले आहे. पण तिने कॉल रिसिव्ह केले नाहीत. तरुण तिच्या घरी गेला असता तरुणाने मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळली. ही घटना काठगोदाम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चांदमारी परिसरात घडली.
14 Apr 2026 10:35 AM (IST)
नक्की प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला याविषयी सविस्तर जाणून घ्यावे लागले. सुमारे पाच वर्षांपूर्वी एका कुटुंबाचा लाडका मुलगा अचानक गायब झाला होता. कुटुंबाने खूप प्रयत्न केले पण पोलिसांच्या शोधमोहिमेतही त्याचा काही थानपत्ता लागला नाही. हळूहळू वर्षे सरत गेली आणि लोकांना वाटले की. कदाचित तो पुन्हा कधीच परत येणार नाही. पण म्हणतात ना, जेव्हा सर्व दार बंद होतात तेव्हा देवाचे दार उघडे होते. बहिणीच्या प्रेमाने अखेर पाच वर्षांनंतर देवीच्याच दारी तिच्या भावाची भेट करुन दिली. सांगितले जात आहे की, जेव्हा बहिण वैष्णो देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती तेव्हा तिथे तिला तिचा अचानक गायब झालेला भाऊ भेटला. पायऱ्या चढत मंदिरात जात असताना वाटेतच तिची भावासोबत भेट झाली. त्याचे कपडे फाटलेले होते आणि तो बिकट परिस्थितीत असल्याचे दिसले. आपल्या असहाय्य भावाला ओळखताच बहिणीला अश्रू अनावर झाले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. हा सर्व प्रकार पाहून आजूबाजूचे लोकही थक्क झाले. ही घटना आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक याला आदिशक्तीचा चमत्कार मानत आहे.
14 Apr 2026 10:15 AM (IST)
इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, शांत समुद्रकिनाऱ्यावरील एक मनमोहक दृष्य आपल्या नजरेस पडेल. निळेशार पाणी त्यात उसळत्या लाटा आणि लोकांची नसलेली गर्दी यामुळे पक्षाच्या आनंदाकडे लगेच लक्ष जाते. आपल्याला यात दिसते की, एक लहान पक्षी पाण्याच्या दिशेने पळत जातो आणि लाटा ओसंडून किनाऱ्यावर येऊ लागल्या की तो परत पळत पळत पुन्हा किनाऱ्यावर येतो. असे तो बऱ्याचदा करतो जणू लाटांसोबत त्याची पकडा पकडीच सुरु आहे. हे असं करताना व्हिडिओत दोन चिमुकले पक्षी दिसून येतात. समुद्रकिनारा आणि लाटांची ते मजा घेत असतात. व्हिडिओ आपल्याला शिकवतो की, आपण कितीही लहान असलो तरी निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद आपल्या पद्धतीने घेऊ शकतो. आपण आजवर पक्षांना फक्त आकाशात उडताना पाहिलं होतं पण त्यांना असं समुद्रावर मजा करताना क्वचितच कुणी पाहिलं असावं.
14 Apr 2026 10:05 AM (IST)
मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या देखत बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मुंबईतील दादर परिसरात रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव अंकुश आंबोरकर (वय ४०) असे आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.






