सिंधुदुर्ग : रविवारी सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup house) छापेमारी मारत तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांनी आपण स्वत:हून अटक होण्याचे म्हटलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा राऊत यांना ईडीनं अटक (ED Arrest) केल्यानंतर आज कोर्टात (Court) हजर केलं. यावेळी पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया येत असताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) संजय राऊतांच्या (Sanjay raut) अटकेवर बोलताना भाजपावर बोचरी टिका केली आहे.
[read_also content=”सत्तेचे दिवस फिरल्यानंतर तुमची काय अवस्था होईल बघा, उद्धव ठाकरेंचा भाजपावर जोरदार प्रहार https://www.navarashtra.com/maharashtra/uddhav-thackeray-press-conference-this-day-also-go-after-that-bjp-look-uddhav-thackeray-310532.html”]
दरम्यान, भाजपा (BJP) सत्तेचा गैरवापर करत असून, महाराष्ट्राचा (Maharashtra) आवाज (Voice) दाबण्याचे कटकारस्थान आहे आणि हे सर्व जगजाहीर आहे, अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. (Aditya Thackeray rection on sanjay raut arrest) संजय राऊत यांना ईडीने अटक झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. शिवसेनेसह मविआच्या नेत्यांवर राजकीय सुडापोटी कारवाई होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आज आदित्य ठाकरे कोकणातील दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात आहेत. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.