मुंबई- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी मुंबईत येत आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाची मोठी जय्यत तयारी सुरु असताना, पंतप्रधान मोदींच्या बीकेसीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणीहून एक मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान मोदींच्या बीकेसीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कमान कोसळली असून, यात एक पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
[read_also content=”नवाब मलिकांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ, किडनीची होणार तपासणी https://www.navarashtra.com/maharashtra/there-is-no-relief-for-nawab-malik-increase-in-judicial-custody-again-kidney-examination-to-be-done-362920.html”]
दरम्य़ान, मोदी कर्नाटकमधून महाराष्ट्रात येत आहेत. परंतु भाजप (BJP) सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) मुंबईकरांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईतील भव्यदिव्य कार्यक्रम होत असताना, मुंबईतील वाहतूक मार्ग देखील बदलण्यात आले आहेत, तसेच सुरक्षा यंत्रणा देखील वाढवण्यात आली आहे. मात्र त्याआधीच पंतप्रधान मोदींच्या बीकेसीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कमान कोसळली असून, यात एक पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत आणखी कुठलीही जिवितहानी झाली नाही, मात्र एक पोलीस जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.