मुंबई- शिवसेनेतून (shivsena) शिंदे गटाने (Shinde Group) बंड करत राज्यात भाजपासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं आहे. त्यानतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेतून ३९ आमदार आणि त्यानंतर १२ खासदार बाहेर पडले. यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली असून, आमदार, खासदारांसह नगरसेवक, पदाधिकारी (MLAs, MPs, corporators and officers) यांनी देखील शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. दरम्यान, राज्यात शिंदे गटातील ९ आमदारांन मंत्रिपदं देण्यात आली आहेत. त्यानंतर आता केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, यात शिंदे गटातील खासदारांना संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
[read_also content=”मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, एयर क्वालिटी इंडेक्स कितीवर माहितेय का? आरोग्यतज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा… https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-air-quality-has-declined-do-you-know-how-high-the-air-quality-index-is-health-experts-gave-this-warning-362871.html”]
यांची वर्णी लागणार…?
दरम्यान, केंद्रात शिंदे गटाला तीन मंत्रिपद मिळण्याची माहिती सुत्रांनी दिला आहे. यात १ कॅबिनेट मंत्रिपद तर २ राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मंत्रिपदामध्ये खासदार मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर मुंबईचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील श्रीरंग बारणे (Shreerang Barane) आणि विदर्भाचे प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच…
एकिकडे राज्यातील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे, जानेवारीच्या अखेरीस दुसरा मंत्रिमंडळ विस्तारास मुहूर्त मिळणार असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यात शिंदे गटातील तीन खासदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे.