
Maharashtra Breaking News Today 06.10.2026
06 Oct 2026 09:55 AM (IST)
Election Commission Row INDIA Bloc Delhi March: कथित मतचोरी आणि मतदार याद्यांमधील विशेष पुनर्निरीक्षण प्रक्रियेतील (SIR) गोंधळाच्या मुद्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. दादरच्या शिवाजी पार्कात कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन आणि मुंबईत ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) ऐतिहासिक संयुक्त मोर्च्यानंतर आता हा राजकीय संघर्ष थेट देशाच्या राजधानीत पोहोचला आहे. १० ऑक्टोबरच्या सीजेपीच्या प्रस्तावित दिल्ली आंदोलनापूर्वीच, आज 'इंडिया' (INDIA) आघाडीचे सर्व खासदार दिल्लीत एकत्र येत निवडणूक आयोगाविरोधात भव्य मोर्चा काढणार आहेत. सलग १५ दिवसांपासून सुरू असलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे केंद्रीय राजकारणात खळबळ उडाली असून, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दोन वर्षांनंतर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा मोठे ऐक्य दाखवत रस्त्यावर उतरण्याची तयारी पूर्ण केली आहे.
06 Oct 2026 09:45 AM (IST)
Sudan Military Plane Crash Tragedy: फ्लायदुबई विमानात भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी १८० प्रवाशांचे प्राण वाचवल्याची घटना ताजी असतानाच, लष्कराच्या एका वाहतूक विमानाला भीषण अपघात झाल्याची दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे. टेकऑफनंतर काही वेळातच एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) सोबतचा संपर्क अचानक तुटल्याने लष्कराचे हे विमान कोसळले. या विमानात २५ प्रवाशांसह लष्करी कर्मचारी व क्रू मेंबर्स स्वार होते. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण दुर्घटनेत तब्बल ३२ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला की इतर काही कारणांमुळे, याचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एकामागून एक घडणाऱ्या या दुर्दैवी हवाई दुर्घटनांमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
06 Oct 2026 09:35 AM (IST)
MPSC Protest Pune Raj Thackeray: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावली. मात्र, भावनिक राजकारणापेक्षा वास्तव मांडत राज ठाकरेंनी व्यासपीठावर रोहित पवारांच्या उपस्थितीतच एमपीएससी परीक्षार्थींना कडू सत्याची जाणीव करून दिली. "सत्ता बदलली आणि उद्या दुसरं कोणतंही सरकार आले तरी एकाच वेळी ७० हजार पदांची सरकारी भरती होणे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या निव्वळ अशक्य आहे," असे परखड विधान राज यांनी केले.
06 Oct 2026 09:25 AM (IST)
Pakistan T20 Captaincy Controversy: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाकडून T20 सामन्यात झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर आणि सततच्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अखेर मोठा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. आगामी श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी पाकिस्तानने आपला नवा संघ जाहीर केला असून, त्यातून विद्यमान कर्णधार सलमान अली आगाची तडकाफडकी गच्छंती करण्यात आली आहे. सलमान अली आगाला थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवत फलंदाज साहिबजादा फरहानकडे पाकिस्तानच्या T20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
06 Oct 2026 09:10 AM (IST)
Pradeep Purnekar Murder Case: ठाण्यातील मानपाडा भागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास ठाणे गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) अत्यंत वेगाने सुरू आहे. पूर्णेकर यांच्यावर गोळीबार आणि धारदार शस्त्राने हल्ला करताना घटनास्थळी ५ आरोपी हजर होते, त्यापैकी पप्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार या तिघांना पोलिसांनी अलिबाग आणि ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या संपूर्ण हत्येचा मुख्य सूत्रधार आणि महत्त्वाचा दुवा मानला जाणारा संतोष कनोजिया उर्फ 'टल्ली' आणि त्याचा आणखी एक साथीदार गेल्या सात दिवसांपासून फरार आहेत.
06 Oct 2026 09:05 AM (IST)
Satara Crime News Bat Attack Daughter Murder: साताऱ्यातील गोडोली परिसरात एका शिक्षकाने रागाच्या भरात आपल्याच चिमुकल्या मुलीच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने मारहाण करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी पुरुषोत्तम कदम याने स्वतःच '११२' क्रमांकावर कॉल करून पोलिसांना मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती देत अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळाची पाहणी आणि संशयास्पद हालचालींवरून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत कसून चौकशी केली असता, खुद्द वडिलांनीच हा भीषण गुन्हेगारी प्रकार केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी सातारच्या पोलिसांनी आरोपी शिक्षक पुरुषोत्तम कदम याला अटक केली असून या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Maharashtra to World Breaking News :
महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पायाभूत प्रकल्पांचा आढावा आणि महायुतीच्या जागावाटपाच्या मुद्द्यांवर मुंबईत उच्चस्तरीय राजकीय बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T20 मालिकेतील पहिला सामना आज रंगणार असून, दुसरीकडे भारत ‘अ’ संघ पुदुचेरी येथे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत मैदानात उतरणार आहे.
प्रसिद्ध टेक ब्रँड व्हिवोचे (Vivo) कॅमेरा आणि मोठ्या बॅटरी क्षमतेसह नवीन स्मार्टफोन्स आज भारतीय बाजारात लाँच होणार आहे. मुंबईतील सायन परिसरातील आणिक बस आगारात भीषण आग लागून काही बेस्ट बसेस जळून खाक झाल्याची दुर्घटना घडली.
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार पूर्ण होत असतानाच ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला असून मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हवामानातील बदलांमुळे उष्णतेचा पारा चढला. ठाण्यातील प्रदिप पुर्णेकर प्रकरणातील आरोपींवर पोलीस कारवाई तीव्र झाली असून कोर्टात महत्त्वाचे पुरावे सादर करण्यात आले.