
Maharashtra Breaking News Updates Today:
Ordnance Factory Day : आज १८ मार्च! भारताच्या संरक्षणाची आणि लष्करी सामर्थ्याची पायाभरणी करणाऱ्या ‘आयुध कारखाना दिना’ (Ordnance Factory Day 2026)चा उत्सव. जेव्हा आपण सीमेवर लढणाऱ्या आपल्या जवानांच्या शौर्याच्या कथा ऐकतो, तेव्हा त्यांच्या हातातील ती अचूक बंदूक आणि शत्रूच्या छाताडावर डागलेला तो गोळा ज्या ठिकाणी तयार होतो, त्या ‘ऑर्डनन्स फॅक्टरीज्’ (आयुध कारखाने) बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भारतीय संरक्षण उत्पादन युनिटपैकी एक असलेल्या इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या (OFB) ऐतिहासिक कार्याची आठवण करून देणारा हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
18 Mar 2026 03:40 PM (IST)
पुणे: प्रवाशांच्या जीविताशी संबंधित सुरक्षेला प्राधान्य देत राज्य परिवहन महामंडळाने पुणे एसटी विभागात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे चालक आणि वाहक या दोघांचीही ड्युटी सुरू होण्यापूर्वी ‘अल्कोटेस्ट’ चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या चाचणीत पात्र ठरल्यानंतरच चालकांच्या हाती बसचे स्टेअरिंग दिले जाणार आहे. पुणे विभागात एकूण 8८२ चालक, १,०५२ वाहक आणि ९१२ बस कार्यरत आहेत. दररोज या सर्व चालक-वाहकांची अल्कोटेस्टद्वारे तपासणी केली जाणार असून, प्रत्येक आगारात यासाठी विशेष यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तपासणीचे निकाल डिजिटल स्वरूपात नोंदवले जाणार आहेत, जे भविष्यातील शिस्तभंग कारवाईसाठी पुरावा म्हणून वापरले जाणार आहेत.
18 Mar 2026 03:30 PM (IST)
मुंबईच्या जवळ कोणत्या सोप्या ते माध्यम श्रेणी मध्ये मोडणाऱ्या किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत आहात तर बोईसर जवळ स्थित असलेल्या‘आसावा’
किल्ल्याला नक्की भेट द्या. या किल्ल्याचे नाव इतके प्रसिद्ध नसले तरी या किल्ल्याचा इतिहास मोठा आहे आणि येथे असणारा निसर्ग अगदी पाहताच क्षणी प्रेमात पाडते. हा किल्ला डोंगराळ आहे. या किल्ल्याची उंची 1000 ते 1100 फुटांपर्यंत आहे. पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा गणला जाणारा किल्ला पालघर बोईसर मार्ग तसेच आसपासच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी कामी येत होता. डहाणू, वैतरणा तसेच पालघर शहराच्या आसपासची शहर, गाव आणि ठिकाण या किल्ल्यावरून नीट दिसतात.
18 Mar 2026 03:20 PM (IST)
Nanded Gas Shortage : नांदेड: आखाती देशांमध्ये युद्ध सुरु असल्यामुळे गॅस आणि तेलाचा प्रश्न निर्माण होत आहे. व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून घरगुती गॅससाठी (LPG Gas) तासनतास रांगा लागल्या आहेत. ऑनलाईन बुकिंग सेवा देखील बंद झाली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आखाती देशातील युद्धाचा फटका देशातील सामान्य कुटुंबांना बसला आहे. याचाच प्रत्यय नांदेडमध्ये (Nanded News) देखील दिसून येत आहे.
18 Mar 2026 03:10 PM (IST)
लातूर जिल्ह्यातील रिक्त असलेल्या १० सरपंच आणि ५८ ग्रा. पं. सदस्यपदांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून, पुढील महिन्यात २८ एप्रिल रोजी या पदांसाठी मतदान होणार आहे. येत्या ३० मार्च रोजी या निवडणुकांच्या संदर्भात नोटीसीचे प्रसिद्धकरण करण्यात येणार असून, सात एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत इच्छुकांना नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील. अर्ज मागे घेण्याची मुदत १७ एप्रिल अशी आहे. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. आवश्यकता भासल्यास २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. पोटनिवडणूक जाहीर झालेले १० सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार असून, त्यामध्ये (आरक्षण) अहमदपूर तालुक्यातील मावलगाव (ना.मा.प्र.), किनगाव (अ. जाती स्त्री), जळकोट तालुक्यातील येवरी (ना.मा.प्र.), लातूर तालुक्यातील बोपला (अ. जाती स्त्री), भोईसमुद्रगा (ना.मा.प्र.), गंगापूर (अ. जाती स्त्री), औसा तालुक्यातील गांजनखेडा (आ. जमाती), किनीनवरे (आ. जाती), गोंद्री (ना.मा.प्र.) आणि बोरसुरी (आ. जाती स्त्री) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ही पदे रिक्त राहण्याची अनेक कारणे असून त्यामध्ये अपात्रता, राजीनामे, संबंधित सदस्यांचे निधन, मतदानावर बहिष्कार, अप्राप्त नामनिर्देशन, निवडणुकीच्या वेळी जागा भरलेली नसणे वगैरे कारणांचा समावेश आहे.
18 Mar 2026 02:50 PM (IST)
रणवीर सिंगचा बहुप्रतिक्षित चित्रपट, धुरंधर २, अखेर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १९ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित होत आहे, पण देशाच्या काही भागांमध्ये तो १८ मार्च रोजी लेट-नाईट शोजमध्येही प्रदर्शित होणार आहे, जी चाहत्यांसाठी एक पर्वणीच असणार आहे. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक, आदित्य धर यांनी चाहत्यांना एक विशेष विनंती केली आहे. या पोस्टमध्ये, त्यांनी प्रेक्षकांना स्पॉइलर्स शेअर न करण्याची विनंती केली आहे, जो धुरंधर ३ बद्दलचा एक संकेत मानला जात आहे.
18 Mar 2026 02:40 PM (IST)
आजकाल CSK संघातून मोठ्या बदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. IPL मधील तगड्या संघांपैकी एक म्हणून CSK कडे पाहिलं जातं. एमएस धोनीच्या कारकीर्दीत संघाने बरीच खतरनाक कामगिरी केली आहे. IPL चे किताबही आपल्या नावावर केले आहेत. त्यानंतर टीम बरीच बदलली आहे. दिग्गज प्लेयर्सनी निवृत्त संघामध्ये बदल यामुळे आता CSK संघ किती मजबूत आहे? हा प्रश्न समोर उभा राहतो. त्यात एमएस धोनी निवृत्ती घेतल्यानंतर संघासाठी बळकट विकेटकिपरची गरज आहे. कर्णधारपद ऋतुराजकडे असलं तरीही एमएम सारखी सूपर विकेटकिपरचा पर्याय म्हणून कोणाकडे पहावं असा प्रश्न होता पण आता यावर्षी या प्रश्नाचं ठोस उत्तर सापडलं आहे.
18 Mar 2026 02:35 PM (IST)
भारतीय शेअर बाजार बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात (तेजीमध्ये) उघडले. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला, सेन्सेक्स सुमारे ५१८.८४ अंकांनी वाढून ७६,५८९.६८ अंकांवर पोहोचला, तर निफ्टीदेखील १५७.७५ अंकांनी वाढून २३,७३८.९० च्या वर पोहोचला. मागील दोन ट्रेडिंग सत्रांमधील तेजी कायम ठेवत, कच्च्या तेलाच्या घसरत्या किमती आणि जागतिक बाजारांमधील मजबूत ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर ही तेजी दिसून आली. आयटी स्टॉक्समधील जोरदार तेजीने देशांतर्गत बाजारांमधील या सकारात्मक ट्रेंडला आणखी चालना दिली.
18 Mar 2026 02:30 PM (IST)
गुढी पाडवा हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा मराठी नववर्षाचा सण आहे. घराघरांत गुढी उभारली जाते, पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला जातो आणि रंगीबेरंगी शोभायात्रांमध्ये लोक सहभागी होऊन आनंद साजरा करतात. यंदा झी मराठीवरील कलाकारही या सणाला खास पद्धतीने सामील होत आहेत
18 Mar 2026 02:25 PM (IST)
जगातील सर्वात रहस्यमय आणि क्रूर मानल्या जाणाऱ्या उत्तर कोरिया (North Korea) या देशातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (North Korea’s supreme leader Kim Jong Un) यांनी पुन्हा एकदा संसदीय निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, किम जोंग उन यांनी ९९.९३% मते मिळवून आपल्या सत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. विशेष म्हणजे, ज्या देशात हुकूमशाही आहे, तिथे निवडणुका का घेतल्या जातात आणि मतदानाची टक्केवारी इतकी प्रचंड कशी असते, यावर आता जगभरात चर्चा सुरू झाली आहे.
18 Mar 2026 02:20 PM (IST)
सातारा: सातारा येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. प्राध्यापकाने विद्यार्थिनीला सोशल मीडियाद्वारे अश्लील मेसेज करून शरीरसुखाची मागणी केल्याचे समोर आले आहे. या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना उंब्रजमध्ये घडली. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध मंगळवारी १७ मार्च रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
18 Mar 2026 02:15 PM (IST)
सध्या मध्यपूर्वेतील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत तेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्याच्या फटका अनेक देशांना बसला आहे. भारतातही याचे चटके जाणवू लागले आहे. अनेक राज्यंमध्ये गॅस टंचाई झाल्याने हॉटेल्स, चहाचे स्टॉल्स बंद झाले आहे. तसेच घरगुती गॅस मिळणेही कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका महिलेला गॅस न मिळाल्याने तिने असे काही विचित्र कृत्य केले आहे की पाहून सगळेच चकित झाले आहेत.
18 Mar 2026 02:10 PM (IST)
रणवीर सिंग अभिनीत ‘Dhurandhar 2: The Revenge’चा प्रीमियर शो बुधवार, १८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहे. तर हा चित्रपट अधिकृतपणे गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. दमदार अॅडव्हान्स बुकिंगसह थिएटरमध्ये दाखल होणाऱ्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘A’ (एडल्ट) प्रमाणपत्रासह रिलीजची परवानगी दिली आहे.
18 Mar 2026 02:00 PM (IST)
मध्यपूर्वेतील इराण इस्रायल युद्धात (Israel Iran War) एक नवे वळणे आहे. इराणला मोठा दुसरा धक्का बसला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च सुरक्षा प्रमुख आणि माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचे जवळचे आणि विश्वासू सल्लागार अली लारीजानी यांचा मृत्यू झाला आहे. हा इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या इस्रायली हल्ल्यात खामेनेईंचा मृत्यू झाला होता.
18 Mar 2026 01:55 PM (IST)
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना या प्रयोगशाळेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर दाखल असलेल्या खटल्याची सुनावणी आता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात होणार आहे. पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पाठविल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता.सत्र न्यायालयाने दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) अधिकृत गोपनीयता कायद्यानुसार (ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट) सक्षम न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी हा निकाल दिला.
18 Mar 2026 01:50 PM (IST)
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसऱ्या टप्प्याचे कामकाज सुरु आहे. संसदेमध्ये अनेक मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांनी खडाजंगी सुरु आहे. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणूका (Rajysabha Election 2026) देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यसभेतील 30 हून अधिक 37 खासदारांचा कार्यकाळ संपला आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) राज्यसभेत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी राज्यसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि जेष्ठ नेते शरद पवारांचे कौतुक केले.
18 Mar 2026 01:45 PM (IST)
चंद्रपूर: वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बफर विभागात वन्यजीवांच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. बफर क्षेत्रातील सुमारे १४०० चौकिमी जंगल परिसरात एकूण ६१७ कृत्रिम व नैसर्गिक पाणवठे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागात २९६ नैसर्गिक जलस्रोत आहेत. या नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये पावसाळ्यानंतर साठलेले पाणी दीर्घकाळ टिकून राहते आणि ते आटत नाही, तोपर्यंत वन्यप्राण्यांना नैसर्गिकरित्या पाणी उपलब्ध होत राहते. मात्र, उन्हाळ्यात तापमान वाढल्याने अनेक जलस्रोत आटण्याची शक्यता लक्षात घेऊन कृत्रिम पाणवठ्यांवर विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी बफर क्षेत्रात ३२१ कृत्रिम पाणवठ्यांचे नियोजन करण्यात आले असून, त्यामध्ये सोलार बोरवेलद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
18 Mar 2026 01:40 PM (IST)
ओटीटी विश्वात आणखी एका रंजक प्रोजेक्टची भर पडणार आहे. प्राईम व्हिडिओने आपला नवीन ओरिजिनल चित्रपट ‘मेस’ची घोषणा केली आहे, जो कॉमेडी आणि सस्पेन्सचे एक अनोखे मिश्रण सादर करेल. हृतिक रोशन त्याचा चुलत भाऊ इशान रोशनसोबत या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हृतिक आणि इशान फिल्मक्राफ्ट प्रॉडक्शन्सचा एक विभाग असलेल्या त्यांच्या एचआरएक्स फिल्म्स या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करत आहेत. दिग्दर्शक राजेश ए. कृष्णन हे देखील या प्रोजेक्टमध्ये भागीदार आहेत.
18 Mar 2026 01:35 PM (IST)
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आणि ‘बिग बॉस १९’ चा स्पर्धक आवेज दरबार अचानक त्याच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. नुकतेच, आवेज दरबारने आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी एका इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बिग बॉस १९ च्या कलाकारांसह अनेक टीव्ही स्टार्स उपस्थित होते, पण त्याची गर्लफ्रेंड, नगमा, तिथे दिसली नाही, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. असा दावा केला जात आहे की आवेज आणि नगमा यांच्यात काहीतरी बिनसले आहे. त्यांचे ब्रेकअप झाल्याचाही दावा केला जात आहे. आता, आवेज दरबारने या अफवांवर मौन सोडले आहे. तो नक्की या प्रकरणावर काय म्हणाला जाणून घेऊयात.
18 Mar 2026 01:25 PM (IST)
पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या नेत्याला मिळणार, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अखेर पुणे जिल्हाचे अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दौंड तालुक्याला मिळाले आहे. दौंडचे वीरधवल जगदाळे यांची अध्यक्षपदी, तर आंबेगाव तालुक्याचे विवेक वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
18 Mar 2026 01:15 PM (IST)
वॉशिंग्टनमधून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सत्तेत आल्यापासून बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता या मोहिमेला अधिक वेग देण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने एक नवीन आणि धक्कादायक ‘एक्झिट प्लॅन’ तयार केला आहे. ज्या भारतीय नागरिकांकडे अमेरिकेत राहण्यासाठी वैध कागदपत्रे नाहीत, त्यांना जबरदस्तीने हद्दपार करण्याऐवजी स्वतःहून देश सोडण्यासाठी मोठे आर्थिक आमिष दाखवण्यात येत आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) यासाठी ‘CBP Home’ नावाचा प्रोग्राम लाँच केला आहे.
18 Mar 2026 01:08 PM (IST)
मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, इराणने जाहीर केले आहे की अमेरिका आणि इस्रायल वगळता इतर सर्व देशांच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली जाईल. याचदरम्यान, हवाई प्रवाशांसाठी एक चांगली बातमी असून नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने (MoCA) हवाई प्रवास सर्वांसाठी परवडणारा, पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने नवीन नियम जाहीर केले आहेत. सरकारचे म्हणणे आहे की, देशात दररोज ५ लाखांहून अधिक लोक हवाई प्रवास करत असल्याने, प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरवणे आवश्यक आहे.
18 Mar 2026 01:00 PM (IST)
पुणे महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी उपमहापौर पदाला अपेक्षित सन्मान दिला जात नसल्याची खदखद व्यक्त करत भाजपच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
18 Mar 2026 12:50 PM (IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. दीड तास झालेल्या या चर्चेमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली यावरुन चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शिंदे हे महाराष्ट्रामध्ये परतले असून त्यांनी त्यांच्या पक्षातील खासदारांचा खरपूस समाचार घेतला. यावरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली.
18 Mar 2026 12:50 PM (IST)
दरवर्षी २१ मार्च रोजी जागतिक डाउन सिंड्रोम दिन (WDSD) जागतिक स्तरावर साजरा केला जातो, जो लोकांना डाउन सिंड्रोमबद्दल जागरूक करण्यासाठी आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींचे हक्क, स्वीकृती आणि एकूण कल्याण यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. काही वैद्यकीय अहवाल असे सूचित करतात की जगातील प्रत्येक ८०० मुलांपैकी १ मुलाला ही समस्या असू शकते. भारतात दरवर्षी २५,००० ते ३०,००० मुले डाउन सिंड्रोम घेऊन जन्माला येतात.
18 Mar 2026 12:45 PM (IST)
इराण आणि इस्रायलमधील युद्धाने (US-Israel Iran War) आता १९ व्या दिवशी विनाशाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. १८ व्या दिवशी इस्रायलने तेहरानच्या काळजात घुसून इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी आणि बसिज दलाचे कमांडर घोलराझा सोलेमानी यांची हत्या केली होती. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण इराणमध्ये शोककळा पसरली होती. मात्र, इराणने या शोकाचे रूपांतर अवघ्या काही तासांतच भीषण सूडामध्ये केले आहे. इराणने आपल्या प्रगत क्षेपणास्त्र आणि ‘क्लस्टर बॉम्ब’च्या सहाय्याने इस्रायलच्या तेल अवीव शहराला रणांगण बनवले आहे.
18 Mar 2026 12:40 PM (IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे आता या जागेवर पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न असतानाच ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
18 Mar 2026 12:40 PM (IST)
अलीकडच्या तरुणाईला सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे प्रचंड वेड लागले आहे. यासाठी तरुणाई काहीही विचित्र आणि धोकादायक स्टंट करत आहे. यासाठी आपला जीवही धोक्यात घालायला तरुण मंडळी तयार आहेत. यामुळे त्यांचा जीव जाऊ शकतो, त्यांच्या आसपासच्या लोकांचा पर्वा आता तरुणाईला राहिली आहे. आता हे पाहाना नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एक तरुण स्केटिंग करताना धावत्या बसखाली घुसताना दिसत आहे. त्याचा हा स्टंट त्याला किती धोकादायक ठरु शकतो याचे जराही भान नाही.
18 Mar 2026 12:35 PM (IST)
मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत वादळी वारे आणि गारपीट होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे.
18 Mar 2026 12:30 PM (IST)
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु आहे. त्याचबरोबर राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूका देखील घेतल्या जात आहेत. यामध्ये ज्येष्ठ वकील मेनका गुरुस्वामी यांनी इतिहास घडवला आहे. भारतीय संसदेतील त्या LGBTQ+ समुदायातील पहिल्या खासदार (Rajya Sabha) ठरल्या आहेत. ३७ जागांवरून २६ नेते राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले असून, गुरुस्वामी यांचाही त्यात समावेश आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने (TMC) त्यांना उमेदवारी दिली होती. आता त्या देशातील पहिल्या LGBTQ+ समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या खासदार ठरल्या आहेत.
18 Mar 2026 12:25 PM (IST)
बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड. मुलीने आईला सांगताच तक्रार दाखल; पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत POCSO अंतर्गत गुन्हा नोंदवला.
18 Mar 2026 12:20 PM (IST)
भारताचा जुना मित्र असलेल्या सौदी अरेबियाने या कठीण काळात भारताची साथ निभावली आहे. होर्मुझचा मार्ग असुरक्षित झाल्याने सौदीने आता आपल्या ‘यान्बू’ (Yanbu) बंदरातून तांबड्या समुद्रामार्गे भारताला तेलाचा पुरवठा सुरू केला आहे.
18 Mar 2026 12:15 PM (IST)
चाकण येथील आंबेठाण पुलाजवळ रविवारी (दि. १६) मध्यरात्री भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर चाकण नगरपरिषदेने तात्काळ दखल घेत कारवाई सुरू केली आहे. या घटनेनंतर नगरपरिषदेच्या जलद कृती दलाने आंबेठाण पूल व मार्केट यार्ड परिसरात शोधमोहीम राबवून हल्ला करणारी भटकी कुत्री पकडली आहेत.
18 Mar 2026 12:10 PM (IST)
‘सुपर डुपर’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये कौटुंबिक गोंधळ आणि भावनांचा संगम पाहायला मिळणार आहे. तसेच हा चित्रपट येत्या ३ एप्रिलला संपूर्ण सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
18 Mar 2026 12:00 PM (IST)
मध्यपूर्वेतील युद्धाने आता भंयकर वळण घेतले आहे. इराण (Iran) आणि अमेरिका(America)-इस्रायलमध्ये सतत हल्ले सुरु असून प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. इराणकडून मध्यपूर्वेतील अमेरिकन दूतावासा आणि इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे मोठी खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिका स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून इराणला हटलण्यासाठी लष्करी तयारी करत असून फ्रान्सने यासाठी मदतीचे संकेत दिले आहेत. परंतु फ्रान्स युद्धात थेट उतरणार नसल्याचे सांगितले जात आहे.
18 Mar 2026 11:50 AM (IST)
महापालिकेत सात स्विकृत सदस्य नियुक्त होणार आहे. पक्षिय बलाबलनुसार प्रत्येक पक्षाला जागा मिळणार आहे. परंतु यात शिवसेना उबाठा गटालाही एक जागा मिळणार आहे. परंतु ती जागा त्यांना मळू नये यासाठी भाजपाचा जोरदार आटापीटा सुरू आहे. परंतु नियमांची प्रशासकिय अडचण आली आहे. त्यातूनही मार्ग काढण्यासाठी भाजपा वेळकाढू धोरण अवंलब करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेच ७५ नगरसेवक आहेत, त्यानुसार ७ स्विकृत नगरसेवक नियुक्त करण्यात येत आहेत. पक्षीय बलाबलनुसार भाजपला चार, शिवसेना शिंदे गटाला दोन तर शिवसेना उबाठा गटाला एक जागा मिळणार आहे. परंतु भाजपाकडून या गटाला एकही जागा मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपने संख्याबळाच्या आधारावर आपल्या पक्षाला पाच जागा मिळाव्या यासाठी आयुक्ताकडेही पत्र दिले आहे. यासाठी त्यांनी महापालिका निवडणूका संयुक्तपणे महायुती च्या माध्यमातून लढल्याचा पुरावाही त्यांनी दिला आहे.
18 Mar 2026 11:40 AM (IST)
नाशिक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोंदूगिरीच्या आड गंभीर गुन्हे केल्याचा आरोप असलेल्या ‘स्वघोषित कॅप्टन’ अशोक खरात याला नाशिक क्राइम ब्रांच युनिट-1 ने अटक केली असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एका ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले असून, या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला, सेलिब्रिटी तसेच प्रभावशाली व्यक्तींचा संबंध असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या धक्कादायक उघडकीमुळे प्रकरण आणखी गंभीर बनले असून, या संपूर्ण रॅकेटचा तपास आता अधिक सखोलपणे केला जात आहे.
18 Mar 2026 11:32 AM (IST)
मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत वादळी वारे आणि गारपीट होऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
18 Mar 2026 11:30 AM (IST)
बॉलीवूडचा (Bollywood) प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित नसून तो आता सातासमुद्रापार जागतिक नेत्यांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब! नुकताच लंडनच्या हायड पार्कमध्ये एक असा प्रसंग घडला की, ज्याची चर्चा आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Alexander Stubb and Mark Carney) जेव्हा आपल्या पत्नींसोबत लंडनच्या रस्त्यांवर मॉर्निंग वॉक आणि जॉगिंग करत होते, तेव्हा त्यांच्या संवादात अचानक भारताचा आणि बॉलीवूडच्या ‘धुरंधर’ चित्रपटाचा विषय निघाला.
18 Mar 2026 11:20 AM (IST)
मराठा इतिहासातील एक पराक्रमी, दूरदर्शी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे शहाजीराजे भोसले. १८ मार्च १५९४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या शौर्य, मुत्सद्देगिरी आणि राजकारणातील कौशल्यामुळे त्यांनी आदिलशाही आणि निजामशाही दरबारात महत्त्वाचे स्थान मिळवले.शहाजी राजेंचे आयुष्य संघर्षमय होते, पण त्यांनी कधीही धैर्य सोडले नाही. त्यांच्या त्याग, पराक्रम आणि दूरदृष्टीमुळे मराठा साम्राज्याची भक्कम पायाभरणी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा आणि बाळकडू दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच शिवाजी महाराजांनी पुढे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली
18 Mar 2026 11:10 AM (IST)
19 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नव वर्षाची सुरुवात. गोडाचे जेवण तयार करून, गुढी उभारून मोठ्या ऊत्साहात हा सण साजरा केला जातो. यादिवशी स्त्रिया पारंपारिक पद्धतीने तयार होतात. यानंतर फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केले जातात. मात्र सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक स्त्रियांना यासाठी वेळ मिळत नाही. पण चिंता करू नका. यावरील उपाय म्हणजे गुगल जेमिनी. तुम्हाला पारंपारिक लूकमध्ये गुढीपाडव्यानिमित्त स्पेशल फोटो क्लिक करण्याची इच्छा असेल तर जेमिनी तुमची मदत करू शकते. गुगल जेमिनीवर फोटो अपलोड करून आणि प्रॉम्प्ट पेस्ट करून तुम्ही पारंपारिक लूकमधील फोटो तयार करू शकता.
18 Mar 2026 11:00 AM (IST)
सांगली जिल्हा परिषदेतील सत्तेचा तिढा अखेर आज (दि. १८) सुटणार असून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पर्दाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे कारभारी कोण ठरणार, याचा फैसला आजच्या मतदानातून होणार आहे. ६१ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी ३१ आकड्याची गरज आहे. सध्याच्या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १८, काँग्रेस ११ आणि शिवसेना उबाठा गट १ असे महाविकास आघाडीचे ३० सदस्य आहेत. दुसरीकडे भाजप १६, शिवसेना शिंदे गट ७, राष्ट्रवादी अजित पवार गट ६, जनसुराज्य १ आणि रयत क्रांती १ असे समीकरण असून, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही.
18 Mar 2026 10:50 AM (IST)
‘द ट्रॅप’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर हे केवळ एक दृश्य नसून, एका गूढ आणि अंधाऱ्या खेळाची झलक देणारा पहिला इशारा आहे. गडद सावल्या, शांत पण अस्वस्थ करणारी नजर आणि काहीतरी दडवलेले असल्याची जाणीव या सगळ्यांमुळे पोस्टर पाहताच एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. ‘द ट्रॅप’ हे नाव जरी साधं वाटलं तरी त्यामागचा अर्थ खूप खोल आहे. एकदा या जाळ्यात अडकल्यावर सुटणं अशक्य, आणि प्रत्येक पात्र काही ना काही लपवतंय असा अंदाज या पोस्टरमधूनच प्रेक्षकांना येतो आहे.
18 Mar 2026 10:45 AM (IST)
मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध (US-Israel Iran War) आता टोकाला पोहोचला आहे. गेल्या 19 दिवसांपासून सुरु असलेल्या या युद्धात दोन्ही गट एकमेकांवर सतत हल्ले करत आहे. इराणच्या सतत हल्ल्यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान झाले आहे. इराणचे ड्रोन अमेरिकेला घातक ठरत आहे. नुकतेच इराणने बगदादमधील अमेरिकेच्या अतिसुरक्षित दूतावासावर भीषण ड्रोन्स मारा केला असून हा हल्ला धुडकावून लावण्यात अमेरिकी सैन्य हतबल झाले आहे. या हल्ल्याचा थरकाप उडवणार व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
18 Mar 2026 10:40 AM (IST)
सध्या इराण-इस्त्रायल युद्ध सुरु आहे. त्यामुळे इंधन पुरवठ्यात कमतरता जाणवत आहे. त्यातच राज्यातील एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. विधान परिषदेत नियम २६० अंतर्गत चर्चेला उत्तर देताना त्यांनी राज्यात लवकरच कमर्शियल गॅसपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती दिली.
18 Mar 2026 10:35 AM (IST)
18 Mar 2026 10:30 AM (IST)
जेव्हाही आपण घराबाहेर पडतो, आपण घरातून बाहेर निघण्याआधी गॅस बंद केला की नाही, खिडक्या उघड्या तर नाहीत ही सर्व तपासणी करुनच घराबाहेर पडतो. पण कधी कधी एखादी गोष्ट नीट चेक करायची राहून जाते आणि असंच काहीसं व्यक्तीसोबत घडून आलं ज्याचा परिणाम त्याला तीन वर्षांनंतर परतल्यानंतर दिसून आला. घरातून निघताना व्यक्ती खिडकी बंद करायला विसरला आणि या चुकीमुळे, जेव्हा तो ३ वर्षांनी घरी परतला, तेव्हा त्याचे घर हे घर न राहता कबुतरांच्या राहण्याचे ठिकाण झाले होते. व्हिडिओमध्ये व्यक्तीच्या संपूर्ण घरात कबुतरच कबुतर पसरलेल दिसून आले. काही किचनमध्ये फिरत होते तर काही सोफ्यावर आराम करत होते. याशिवाय संपूर्ण घरभर कबुतरांची पिसे पसरलेली होती. आपल्या घराचे हे दृश्य पाहताच व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ शूट करुन सोशल मिडियावर शेअर केला आणि आता हिच क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
18 Mar 2026 09:40 AM (IST)
पुणे: राज्याच्या हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे भारतीय हवामान विभागाने अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला असून संपूर्ण राज्यासाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. ऐन मार्च महिन्यात सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसासह गारपीट झाली असून, यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० मार्च २०२६ पर्यंत पावसाचे हे सावट कायम राहणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
18 Mar 2026 09:35 AM (IST)
मुंबई: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज १७ वा दिवस असून, सभागृहात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनासंदर्भातील प्रलंबित चर्चेवर आज २९३ च्या प्रस्तावांतर्गत सविस्तर चर्चा होणार आहे. या संवेदनशील विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि या अपघाताबाबत उपस्थित केले जाणारे प्रश्न यावर विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. यासोबतच सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या इतर प्रस्तावांवरही आजच चर्चा होणार असल्याने, राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आजच्या कामकाजाकडे आणि सभागृहातील वादळी चर्चेकडे लागले आहे.
18 Mar 2026 09:30 AM (IST)
तेहरान: इराणचे ज्येष्ठ नेते आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे सल्लागार अली लारीजानी यांचा इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला असून, सुरुवातीला नकार देणाऱ्या इराणनेही अखेर लारीजानी यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली आहे.
तेहरानच्या ईशान्येकडील परदिस भागात लारीजानी आपल्या मुलीच्या भेटीसाठी गेले असताना हा भीषण हल्ला झाला. या हल्ल्यात ६७ वर्षीय लारीजानी यांच्यासह त्यांचा मुलगा मोर्तजा, उपप्रमुख अलीरेजा बायात आणि अंगरक्षकांचाही मृत्यू झाला आहे. लारीजानी हे इस्रायल आणि अमेरिकेचे कट्टर शत्रू मानले जात होते, त्यामुळे त्यांचा मृत्यू हा इराणसाठी मोठा धोरणात्मक धक्का असल्याचे मानले जात आहे.
18 Mar 2026 09:25 AM (IST)
पालघर: जिल्ह्यातील पेसा (PESA) अंतर्गत होणाऱ्या नोकरभरतीत आदिवासींना १००% आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात बिगर आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू असून, आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा धडकणार आहे.
हुतात्मा चौकापासून सुरू होणाऱ्या या 'एल्गार' मोर्चाला जिल्ह्यातील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. भरती प्रक्रियेतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून बिगर आदिवासींमध्ये तीव्र संताप असून, प्रशासकीय कामकाजावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.