Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 15.10.2026
नांदेड येथे ट्रक आणि प्रवासी वाहनाची भीषण धडक होऊन ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहे. आगामी टी-२० आणि आंतरराष्ट्रीय मालिकांच्या तयारीसाठी भारतीय क्रिकेटपटूंचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) विशेष तंत्रज्ञान व फिटनेस सराव शिबीर सुरू आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष मोफत बस सेवा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन राज्यभरात सुरू झाले आहे नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आजपासून १८ व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेची सुरुवात झाली असून, जागतिक नेत्यांच्या स्वागतासाठी राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज महाराष्ट्रासह देशातील १८ राज्यांमध्ये ६० किमी ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे
11 Sep 2026 05:59 PM (IST)
नोकरी करणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमचा PF कापला जात असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. EPFO ने म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने PF मधून पैसे काढण्याचे नियम एकदम सोपे केले आहेत. आधी पैसे काढायला खूप किचकट प्रोसेस होती, पण आता गरजेच्या वेळी तुम्ही लगेच पैसे काढू शकता.अनेकदा असं होतं की घरात अचानक आजारपण येतं, मुलांची फी भरायची असते, घरात लग्न असतं आणि हातात पैसे नसतात. अशा वेळी आपला PF चा पैसाच कामाला येतो. हेच लक्षात घेऊन EPFO ने आता नियम शिथिल केले आहेत.
11 Sep 2026 05:45 PM (IST)
सध्या जागतिक राजकारणात भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणि राजनैतिक कौशल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जगभरात आर्थिक आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर, रशिया-युक्रेन युद्धात तोडगा काढण्यासाठी आणि दोन्ही देशांना चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी भारत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा सूर रशियाच्या राजकीय वर्तुळातून उमटत आहे.
11 Sep 2026 05:30 PM (IST)
धान उत्पादक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे. उपलब्ध शासकीय विवरणानुसार २००३ ते २०२४ या २१ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात ७८१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. यापैकी ३०५ प्रकरणे मदतीस पात्र ठरली, तर तब्बल ४७६ प्रकरणे अपात्र ठरली. म्हणजेच नोंद झालेल्या आत्महत्यांपैकी सुमारे ६१ टक्के प्रकरणे शासकीय मदतीच्या निकषांत बसली नाहीत. त्यानंतर २०२५ मध्ये ५० आणि जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत आणखी १० आत्महत्यांची नोंद झाली.
11 Sep 2026 05:16 PM (IST)
बँक ऑफ इंडियाने Global FinTech Fest (GFF) 2026 मध्ये डिजिटल बँकिंगच्या क्षेत्रात मोठे पाऊल टाकत 12 डिजिटल उपक्रम सुरू केले आहेत. मुंबईत 9 ते 11 सप्टेंबरदरम्यान आयोजित या कार्यक्रमात पेमेंट्स, कार्ड्स, डिजिटल करन्सी, सेल्फ-सर्व्हिस बँकिंग, अनुपालन, ग्राहक सहभाग आणि फिनटेक सहकार्याशी संबंधित नव्या सुविधा सादर करण्यात आल्या. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश कर्नाटक यांच्या उपस्थितीत बँकेच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.
11 Sep 2026 04:58 PM (IST)
एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारने समिती नेमली, त्याचे स्वागत आहे. मात्र केवळ समिती किंवा एसआयटी नेमून प्रश्न सुटणार नाही. एमपीएससीच्या अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आ. रोहित पवारांनी (Rohit Pawar) शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरात केली. वाचा सविस्तर...
11 Sep 2026 04:52 PM (IST)
शेवगाव तालुक्यात यंदा पावसाळ्यातच दुष्काळसदृश भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी अक्षरशः संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. पिके करपू लागली आहेत, विहिरी आणि जलसाठे आटत चालले आहेत, तर जनावरांच्या चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पावसाळ्याचे दिवस असूनही अशी भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने “आता उन्हाळ्यात काय होणार?” या चिंतेने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. अनेक भागांत खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, शेतीवर केलेला खर्चही वसूल होणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. वाचा सविस्तर...
11 Sep 2026 04:50 PM (IST)
यूएस ओपन २०२६ (US Open 2026) च्या स्पर्धेचे महिला एकेरीच्या अंतिम सामन्याचे चित्र आता अधिक स्पष्ट झाले आहे. अव्वल मानांकित आर्यना सबालेन्का आणि कझाकस्तानची एलेना रायबाकिना विजेतेपदासाठी आमनेसामने येतील. अमेरिकेच्या कोको गॉफ आणि जेसिका पेगुला यांचा प्रवास उपांत्य फेरीतच संपला आहे. वाचा सविस्तर...
11 Sep 2026 04:47 PM (IST)
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंबही सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?” असा सवाल करत सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरलं. महाराष्ट्र पोलिसांचा एकेकाळी मोठा दबदबा होता. मात्र गेल्या काही वर्षांत पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. पोलिसांचा वापर राजकीय विरोधकांवर दबाव आणण्यासाठी आणि वसुलीसाठी होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. राज्यातील या परिस्थितीला देवेंद्र फडणवीस यांचा कारभार जबाबदार असल्याचं सपकाळ म्हणाले. वाचा सविस्तर...
11 Sep 2026 04:45 PM (IST)
कल्पना करा की, जर तुमच्या जमिनीला, शेताला किंवा घराला एक असा विशिष्ट क्रमांक मिळाला, ज्यामुळे एकाच डिजिटल प्रणालीमध्ये नोंदी, नकाशे आणि नोंदणीची माहिती मिळवता येईल, तर जमिनीशी संबंधित अनेक कामे किती सोपी होऊ शकतील. केंद्र सरकार आता या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहे. नवीन प्रणालीअंतर्गत, देशातील जमिनीच्या प्रत्येक तुकड्याला १४-अंकी विशिष्ट क्रमांक देण्याची योजना आहे. याला भू-आधार किंवा यूएलपिन (युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर) म्हटले जाईल. वाचा सविस्तर...
11 Sep 2026 03:59 PM (IST)
भारताच्या यजमानपदाखाली १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत १८ वी ब्रिक्स शिखर परिषद (BRICS Summit 2026) पार पडत आहे. या जागतिक परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह जगातील अनेक बड्या देशांचे प्रमुख भारतात दाखल होत आहेत. मात्र, या भव्य आयोजनादरम्यान भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशसोबत एका निमंत्रणावरून राजनैतिक वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांनी या परिषदेत सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला असून, या निर्णयाने दोन्ही देशांमधील संबंधांवर पुन्हा एकदा चर्चेचे सावट पसरले आहे.
11 Sep 2026 03:55 PM (IST)
Maharashtra Drought Relief Fund: राज्याला दुष्काळाची चाहूल लागली असून दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला ५० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीअंतर्गत मिळालेला हा निधी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत खर्च करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय १० सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला.
11 Sep 2026 03:50 PM (IST)
Aali Mothi Shahani Movie: गणेशोत्सवाला आता काहीच दिवस बाकी असून सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याच उत्सवी वातावरणात ‘आली मोठी शहाणी’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘गणेश वंदना’ प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बाप्पाच्या चरणी श्रद्धा व्यक्त करणारं हे गाणं भक्तिभावासोबतच गणेशोत्सवाचा आनंद आणि प्रसन्न वातावरणाची अनुभूती देतं.
11 Sep 2026 03:40 PM (IST)
अहिल्यानगर: गुरुवारचा दिवस महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांसाठी काळा ठरला. अहिल्यानगर, भंडारा आणि नांदेड येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या भीषण रस्ते अपघातांत तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनांमुळे संबंधित परिसरात शोककळा पसरली आहे. कुठे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला, तर भंडाऱ्यात तिज उत्सवासाठी माहेरी निघालेल्या महिला आणि चिमुकल्यांचा प्रवास काळाने अर्ध्यावरच थांबवला. नांदेडमध्येही ट्रक आणि पिकअपच्या धडकेत आठ जणांना जीव गमवावा लागला.
11 Sep 2026 03:30 PM (IST)
Nashik Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू असून आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. कुंभमेळ्याशी संबंधित आवश्यक कामे अधिक वेगाने होण्यासाठी राज्य सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाला 1,800 कोटींचा अतिरिक्त निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी यासंबंधीचा शासन निर्णय जारी केला.
11 Sep 2026 03:20 PM (IST)
पुणे : राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज वेगवेगळ्या कारणावरुन अनेकजण टोकाचा निर्णय घेत आहेत. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली आहे. ही घटना २२ ऑगस्टला सकाळी साडेदहाच्या सुमारास कोथरुडमधील सुतारदरा लेनक्रमांक २९ मध्ये घडली आहे. मोनाली गोविंद पवार (वय २५ रा. सुतारदरा, कोथरुड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती गोविंद पवार याच्याविरूद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
11 Sep 2026 03:10 PM (IST)
नवी दिल्ली : जगभरातील अनेक कोट्यधीश आणि अब्जाधीश करदाते आता ग्रीस (अथेन्स) येथे स्थलांतरित होत आहेत. गेल्या २-३ वर्षांत या प्रवृत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. अलीकडेच, ब्रिटिश अब्जाधीश हेज फंड मॅनेजर ख्रिस रोकोस यांनी लंडन सोडल्याच्या बातमीने हा देश पुन्हा चर्चेत आला आहे. त्यांनी आपले कर निवासस्थान ग्रीसमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
11 Sep 2026 03:04 PM (IST)
मुलांच्या वस्तू जपून ठेवणे हा एक भावनिक निर्णय असतो. मुलांचे लहान झालेले किंवा जीर्ण झालेले कपडे, बूट, खेळणी आणि पाळणे अनेकदा आठवणी जपण्यासाठी घरात ठेवले जातात. पण जसजशा वस्तू हळूहळू वाढत जातात, तसतसा प्रश्न निर्माण होतो त्यांचे काय करायचे? दीर्घकाळ वापराअभावी, या वस्तू घरात खूप जागा व्यापू शकतात. वास्तुशास्त्रानुसार या वस्तूंबाबत विशिष्ट नियम सांगण्यात आलेले आहेत. असे मानले जाते की घरात ठेवलेल्या वस्तूंमुळे पर्यावरणावर आणि सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो. चला, वास्तुशास्त्रानुसार मुलांच्या जुन्या वस्तू घरात ठेवणे योग्य आहे की अयोग्य, हे जाणून घेऊया.
11 Sep 2026 02:59 PM (IST)
धुळे: सोलापूर राष्ट्रीय महामार्ग मराठ्यांनी मागील दोन तासांपासून रोखला आहे. पुणे-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूस वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मनोज जरांगेंचं उपोषण लवकरात लवकर थांबवा, अन्यथा महाराष्ट्रात गदारोळ घालण्याचा मराठा बांधवांनी इशारा दिला आहे.
11 Sep 2026 02:49 PM (IST)
मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचाग आमरण उपोषण सुरू असून आज आमरण उपोषणाचा 14 वा दिवस आहे.अंतरवाली सराटीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला धडक देऊ असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला होता त्या पार्श्वभूमीवर उद्या त्यांनी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक देखील बोलावली आहे. तर सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईला जाण्यासाठी तयारी केली जात असून जालन्यात मीडिया व्हॅन तयार करण्यात आली आहे.
11 Sep 2026 02:34 PM (IST)
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. नांदेड-हैदराबाद महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. तब्बल तासाभरापासून महामार्ग रोखून धरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
11 Sep 2026 02:26 PM (IST)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बुधवार पेठ परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली. परराज्यातून आणलेला संशयित खवा आणि पनीरचे 2 ते 4 कंटेनर जप्त करण्यात आले. पथकाने पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
11 Sep 2026 02:13 PM (IST)
मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचाग आमरण उपोषण सुरू असून आज आमरण उपोषणाचा 14 वा दिवस आहे.अंतरवाली सराटीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईला धडक देऊ असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला होता त्या पार्श्वभूमीवर उद्या त्यांनी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक देखील बोलावली आहे. तर सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईला जाण्यासाठी तयारी केली जात असून जालन्यात मीडिया व्हॅन तयार करण्यात आली आहे.
11 Sep 2026 02:02 PM (IST)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांकडे राज्यपालांचे लक्ष वेधले.
11 Sep 2026 01:55 PM (IST)
वाशिम : तालुक्यातील काटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरी व चौथीतील विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपावरून शिक्षकाला वाशिम ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात तब्बल १४ विद्यार्थिनींनी संबंधित शिक्षकाकडून गैरवर्तन झाल्याची माहिती दिल्याचे समोर आले असून, याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
11 Sep 2026 01:45 PM (IST)
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून जेडीयूचे माजी नेते आणि नितीश कुमारांचे (Nitish Kumar) निकटवर्तीय मानले जाणारे छोटू सिंह यांनी NDA सरकारबाबत मोठा दावा केला आहे. बिहार विधान परिषदेचे सभापती अवधेश नारायण सिंह यांना पदावरून हटवण्यात आले तर बिहारमधील NDAची सत्ता जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला. याचवेळी पटना पदवीधर मतदारसंघातून जेडीयूचे नीरज कुमार यांना कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
11 Sep 2026 01:35 PM (IST)
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या तळागाळातील नेतृत्वासाठी ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची मान उंचावली आहे. लंडन दौऱ्यादरम्यान ब्रिटीश संसदेच्या ऐतिहासिक ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ आणि ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये आयोजित विशेष आंतरराष्ट्रीय परिषदेत (International Conclave 2026) त्यांनी केलेले भाषण सध्या जगभरात चर्चेचा विषय बनले आहे. एरव्ही मराठी आणि हिंदी भाषेतून जनसंवाद साधणारे एकनाथ शिंदे यांनी या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर तब्बल अर्धा तास अस्खलित आणि प्रभावी इंग्रजीतून भाषण दिले. त्यांच्या या वक्तृत्वाने आणि सादरीकरणाने सभागृहात उपस्थित ब्रिटिश खासदार, उद्योजक आणि परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांना मंत्रमुग्ध केले.
11 Sep 2026 01:25 PM (IST)
मुंबईमध्ये चालू असलेल्या Global Fintech Fest 2026 मध्ये हे नवीन फिचर लॉन्च करण्यात आले. RBI चे गव्हर्नर आणि NPCI ने मिळून दोन नवीन गोष्टी आणल्या आहेत, एक म्हणजे UPI Tap & Pay आणि दुसरं MyUPI. या दोन्हीमुळे UPI वापरणं अजूनच सोपं होणार झालं आहे.आपण जसं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड मशीनवर टॅप करून पेमेंट करतो, अगदी तसंच आता मोबाईलने पण करता येणार आहे. तुम्हाला आता QR कोड शोधायची गरज नाही, कॅमेरा ओपन करायची गरज नाही, आणि सारखं सारखं ॲप ओपन करून पिन टाकायची पण गरज नाही. तुमचा फोन जर NFC सपोर्ट करत असेल तर फक्त फोन अनलॉक करायचा आणि दुकानदाराच्या मशीनवर म्हणजे PoS मशीनवर टॅप करायचा, पेमेंट होईल.
11 Sep 2026 01:15 PM (IST)
क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा फलंदाज धावा काढतो, गोलंदाज विकेट घेतो किंवा एखाद्या षटकात कोणतीही विशेष घटना घडते, तेव्हा या सर्व गोष्टींची नोंद ठेवली जाते. टीव्हीवर सामना पाहताना आपले लक्ष बऱ्याचदा खेळाडू आणि त्यांच्या कामगिरीवर असते, परंतु मैदानाबाहेर आणि पडद्यामागे अशी अनेक माणसे असतात जी प्रत्येक चेंडूचा आणि धावेचा हिशोब सांभाळतात. यापैकीच एक महत्त्वाची भूमिका क्रिकेट स्कोररची असते. क्रिकेटमध्ये वाढत्या डेटाच्या वापरामुळे आजच्या काळात या प्रोफेशनल्सची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची झाली आहे. अशा परिस्थितीत, आज आपण जाणून घेऊयात की क्रिकेटर्सच्या रेकॉर्डचा लेखाजोखा कोण ठेवतो आणि यात नोकरी कशी मिळते.
11 Sep 2026 01:05 PM (IST)
पोस्टमध्ये ९ ऑक्टोबरपासून सेल सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. X वर एका युजरने फ्लिपकार्टच्या सेलचं पोस्टर टाकलं आहे. त्यात लिहिलंय की यावर्षीचा Big Billion Days 9 ऑक्टोबरला सुरू होईल. त्या पोस्टरमध्ये बँक ऑफर्स पण दिसत आहेत. Axis आणि ICICI बँकेच्या कार्डवर 10% सूट मिळणार आहे असं त्यात लिहिलंय. Flipkart सगळ्यांसाठी 9 ऑक्टोबरला सेल सुरू होईल, पण ज्यांच्याकडे Flipkart Plus आहे त्यांच्यासाठी एक दिवस आधीच म्हणजे 8 ऑक्टोबरला रात्रीपासूनच सेल ओपन होईल. नेहमीप्रमाणे प्लस वाल्यांना आधी शॉपिंग करता येते. चांगले फोन पटकन आउट ऑफ स्टॉक होतात त्यामुळे प्लस असलेल्यांना फायदा होतो.
11 Sep 2026 12:48 PM (IST)
रेल्वे पटरीवर सातत्याने गांजा ओढणाऱ्या तरुणांनी रागातून रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाने गळ्यावर तसेच दुसऱ्याने छातीवरून चाकूने वार केले. नंतर तिसऱ्याने डोक्यात दगडही घातल्याचे समोर आले आहे. ही घटना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, पसार झालेल्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. तर दोन अल्पवयीन मुलांना पकडले आहे. अक्षय महादेव बोंबाळे (वय २८, रा. पुणा गेस्ट हाऊस, बुधवार पेठ) असे गंभीररित्या जखमी झालेल्याचे नाव आहे. रॉकी रणजित पात्रौ तसेच विकी रणजित पात्रौ (रा. रेल्वे कॉर्टर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
11 Sep 2026 12:36 PM (IST)
गांजा तस्करी प्रकरणात पोलिसांना गेले चार महिने गुंगारा देणाऱ्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. हडपसर परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अजय पोपटराव पाडुळे (वय ३०, रा. नवीन म्हाडा वसाहत, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष जाधव,उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, मितेश चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
11 Sep 2026 12:24 PM (IST)
पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी ४ कोटी ९६ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ‘दिशा कृषी उन्नतीची-२०२९’ या उपक्रमांतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे. याचा थेट लाभ जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदानित प्रात्यक्षिक संच देण्यात येणार आहेत. तसेच पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण करण्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरणासह नवीन शेततळी उभारण्यात येतील. जुन्या शेततळ्यांना प्लास्टिक अस्तरीकरण तसेच सुरक्षिततेसाठी कुंपण करण्याची कामेही केली जाणार आहेत. या निधीसाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रशासकीय मान्यतेचे आदेश व शुद्धिपत्रक काढण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्यात यापूर्वी न्यूक्लिअस अर्थसंकल्पातून स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवीन पर्याय उपलब्ध झाला. या निर्णयामुळे चारही तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
11 Sep 2026 12:12 PM (IST)
शांच्या व्यवहारातून तरुणाचे अपहरण करीत त्याला बेदम मारहाण करीत जखमी करणाऱ्या टोळक्याला डेक्कन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना ७ ते ८ सप्टेंबर कालावधीत जंगली महाराज रोड ते पिंपळे गुरव यादरम्यान घडली आहे. टोळक्याने मोटारीतून संबंधित तरुणाचे अपहरण करीत त्यांच्या दंडावर शस्त्राने वार केला केला. त्यानंतर त्यांच्याकडील किंमती ऐवज काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे. गौरव रमेश कांबळे (वय ३० रा. गंजपेठ) समीर सुनील मेहता (वय ३८, रा. शुक्रवार पेठ) रियान रफिक शेख (वय ५४ रा. गंजपेठ) संदीप निवृत्ती गावडे (वय ४५, रा. गंजपेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. संदीप सिताराम मेंगडे (वय ३६ रा. शिवणे, पुणे) असे अपहणातून सुटका झालेल्याचे नाव आहे. त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
11 Sep 2026 11:45 AM (IST)
नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची श्रद्धास्थान असलेली ‘महादेवी’ उर्फ ‘माधुरी’ हत्तीण तब्बल ४०९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा नांदणीच्या दिशेने निघाली आहे. उच्चस्तरीय समितीने माधुरीला मठात परत नेण्यास मंजुरी दिल्यानंतर गुजरातमधील वनतारा केंद्रातून विशेष ॲनिमल ॲम्बुलन्सनेद्वारे तिचा परतीचा प्रवास सुरू झाला. सुमारे १,१६० किलोमीटरचा प्रवास करून माधुरी नांदणी मठात दाखल होणार आहे.
11 Sep 2026 11:35 AM (IST)
दुलीप ट्रॉफी २०२६ चा अंतिम सामना ईशान किशनच्या द्विशतकामुळे आणि ईस्ट झोनच्या विजयामुळे लक्षात राहील. मात्र, याच सामन्यादरम्यान तिलक वर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात स्लेजिंगचा एक मजेशीर प्रकार घडला. याचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पहिल्या डावात फलंदाजी करत असताना तिलक वर्मा वैभवला स्लेजिंग करत आहेत. दरम्यान, दुसऱ्या डावात जेव्हा तिलक फलंदाजी करत होता, तेव्हा वैभवनेही स्लेजिंग सुरू केले. जेव्हा तिलकने पंचांकडे तक्रार केली, तेव्हा वैभवने उत्तर दिले की पहिल्या डावात त्याच्यासोबतही असेच घडले होते.
11 Sep 2026 11:25 AM (IST)
दिल्लीच्या खाजगी शाळांमध्ये ईडब्ल्यूएस (EWS) कोट्यांतर्गत दुसरी आणि त्यापुढील वर्गांमध्ये मोफत प्रवेश मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. शिक्षण संचालनालयाने (DoE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली असून, याची अंतिम तारीख २० सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्हालाही तुमच्या पाल्याला एखाद्या चांगल्या खाजगी शाळेत मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळवून द्यायचे असेल, तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.
11 Sep 2026 11:20 AM (IST)
मंत्र-तंत्र, पूजाविधीद्वारे 15 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत मुंबई महापालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्याला सुमारे 12 लाख रुपयांना गंडविणाऱ्या भोंदू बाबाला अभोणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हिराचंद शिवाजी बर्डे, (रा. पिंपळे खुर्द ता. कळवण जि. नाशिक) असे भोंदूबाबाचे नाव असून पोलिसांनी त्याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील चार संशयित आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून अन्य तिघे साथीदार फरार आहेत.
11 Sep 2026 11:10 AM (IST)
बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची परवानगी न घेता विविध आर्थिक व्यवहार करून संस्थेचे तब्बल 34 कोटी 77 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी सोसायटीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे आणि विभाग व्यवस्थापिका योगिनी योगेश पोकळे यांच्यासह इतरांविरोधात पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोसायटीचे लेखापरीक्षक मोहन रघुनाथ दलाल यांनी फिर्याद दिली आहे.
11 Sep 2026 11:05 AM (IST)
बुधवार पेठ परिसरात एफडीएची मोठी कारवाई केली आहे. संशयित खवा आणि पनीरच्या दोन ते चार कंटेनरमधील सॅम्पल गोळा करण्यात येत आहे. परराज्यातून हे कंटेनर आल्याचा संशय आहे. पुण्यात खवा आणि पनीरचे मोठ्या प्रमाणातील वितरण या ठिकाणाहून होते. तपासणीनंतर कारवाईची दिशा ठरणार आहे.
11 Sep 2026 10:46 AM (IST)
मंत्रालयात ५७० कर्मचाऱ्यांना मुळ विभागात पाठवण्यात आल्याची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. मंत्रालयातील मंत्री आस्थापनांमध्ये शिफारस, उसनवारी आणि मौखिक पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना (Mantralaya employees) अखेर त्यांच्या त्यांच्या मुळ विभागात पाठवण्यात आले आहे.
11 Sep 2026 10:36 AM (IST)
गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पडावा, तसेच उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने पुणे शहरातील मद्यविक्रीवर निर्बंध घातले आहेत. गणेश चतुर्थी, विसर्जन मिरवणुका आणि अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही भागांत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित परिसरातील दारूची दुकाने, बार आणि परमिट रूमना या कालावधीत मद्यविक्री करता येणार नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी, १४ सप्टेंबर रोजी पुणे शहरात मद्यविक्री बंद राहणार आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी ज्या मार्गांवरून गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका जाणार आहेत, त्या मार्गांवरील संबंधित परिसरातही मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडत असल्याने गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
11 Sep 2026 10:26 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. त्यातच राज्यातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात हलका ते मध्यम, तसेच जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला पाहायला मिळत नाही. मात्र, आता हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे.
11 Sep 2026 10:16 AM (IST)
शहरातील वाढत्या वाहतूक समस्येमुळे आणि स्टेशन परिसरातील गर्दीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कल्याण-डोंबिवली रिंग रोडच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यासाठी महासभेने रोडमॅपमधील बदलांना मंजुरी दिली आहे. यामुळे दीर्घकाळ रखडलेल्या रिंग रोडचा मार्ग मोकळा झाला आहे. काम पूर्ण झाल्यावर, कल्याण ते डोंबिवली प्रवासाला फक्त सहा मिनिटे लागण्याची शक्यता आहे. हा रिंग रोड एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधला जाणार आहे. कोपर आणि भोपर दरम्यानच्या काही इमारतींना प्रस्तावित मार्गामुळे फटका बसत होता. स्थानिक विरोधामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम रखडले होते. आता, प्रशासनाने खाडीपासून काही भाग वळवून एक नवीन रोडमॅप तयार केला आहे. महासभेने या नवीन नकाशाला मंजुरी दिली आहे.
11 Sep 2026 10:06 AM (IST)
18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया तसेच अन्य डिजिटल प्लॅटफॉर्मवर अकाउंट उघडण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. सोशल मीडिया वापरण्यासाठी पालक किंवा कायदेशीर पालकांची संमती अनिवार्य करण्यासह विविध सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
11 Sep 2026 09:35 AM (IST)
FDA Guidelines Mahaprasad Bhandara: सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) आता धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमधील महाप्रसाद व भंडारा वाटपाकडे मोर्चा वळवला आहे. सार्वजनिक अन्न सुरक्षेच्या दृष्टीने एफडीएने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सर्वधर्मीयांच्या सामूहिक अन्न वाटपासाठी किमान सात दिवस आधी अन्न आणि औषध प्रशासनाला पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ठरवून दिलेल्या वेळेत पूर्वसूचना न दिल्यास किंवा नियमांची पूर्तता न केल्यास अन्नवाटपाची परवानगी दिली जाणार नाही, असे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले होते.
11 Sep 2026 09:30 AM (IST)
Truck Trax Crash Chhattisgarh Laborers: भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडली. लाखनी-साकोली तालुक्याच्या हद्दीतील पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि ट्रॅक्स या दोन वाहनांदरम्यान जोरदार अपघात झाला. या भीषण धडकेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लाखनी-साकोली परिसरातील पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि ट्रॅक्स वाहनामध्ये हा अपघात झाला.अपघाताची तीव्रता जास्त असल्याने वाहनातील आठ जणांनी जागीच प्राण गमावले. मृत झालेले आठही नागरिक मूळचे छत्तीसगड राज्यातील असून ते महाराष्ट्रात रोजगारासाठी मजूर म्हणून काम करत होते.
11 Sep 2026 09:25 AM (IST)
18 th BRICS Summit India: भारताच्या यजमानपदाखाली १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ १२ आणि १३ सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीत पार पडणार आहे. या ऐतिहासिक परिषदेसाठी 'भारत मंडपम' येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे भारतात आगमन झाले असून, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत. दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे १२ आणि १३ सप्टेंबर रोजी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
11 Sep 2026 09:20 AM (IST)
Abhijeet Dipke Meets Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या हक्काच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आता १३ दिवस पूर्ण झाले आहेत. जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे अंतरवाली सराटी येथे पोहोचून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
11 Sep 2026 09:12 AM (IST)
Women Junior Asia Cup 2026: महिला ज्युनियर आशिया चषक २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवत उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचा १९-० असा एकतर्फी पराभव केला. या दणदणीत विजयासह गतविजेत्या भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या दिशेने पाऊल टाकत अंतिम चार संघात स्थान मिळवले आहे.
सामन्याच्या ७व्या मिनिटाला पूजा साहूने गोल नोंदवून भारताचे खाते उघडले, तर ९व्या मिनिटाला रोशनी ऐंदने आघाडी २-० अशी दुप्पट केली. ११व्या मिनिटाला तनुश्री दिनेश काडू, तर १३व्या मिनिटाला सुखवीर कौर आणि सानिका चंद्रकांत माने यांनी लागोपाठ गोल करत सामन्यावर पूर्ण पकड मिळवली.






