
Maharashtra Breaking News Today 11. 09.2026
11 Sep 2026 09:35 AM (IST)
FDA Guidelines Mahaprasad Bhandara: सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) आता धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमधील महाप्रसाद व भंडारा वाटपाकडे मोर्चा वळवला आहे. सार्वजनिक अन्न सुरक्षेच्या दृष्टीने एफडीएने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
सर्वधर्मीयांच्या सामूहिक अन्न वाटपासाठी किमान सात दिवस आधी अन्न आणि औषध प्रशासनाला पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ठरवून दिलेल्या वेळेत पूर्वसूचना न दिल्यास किंवा नियमांची पूर्तता न केल्यास अन्नवाटपाची परवानगी दिली जाणार नाही, असे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले होते.
11 Sep 2026 09:30 AM (IST)
Truck Trax Crash Chhattisgarh Laborers: भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडली. लाखनी-साकोली तालुक्याच्या हद्दीतील पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि ट्रॅक्स या दोन वाहनांदरम्यान जोरदार अपघात झाला. या भीषण धडकेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लाखनी-साकोली परिसरातील पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि ट्रॅक्स वाहनामध्ये हा अपघात झाला.अपघाताची तीव्रता जास्त असल्याने वाहनातील आठ जणांनी जागीच प्राण गमावले. मृत झालेले आठही नागरिक मूळचे छत्तीसगड राज्यातील असून ते महाराष्ट्रात रोजगारासाठी मजूर म्हणून काम करत होते.
11 Sep 2026 09:25 AM (IST)
18 th BRICS Summit India: भारताच्या यजमानपदाखाली १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ १२ आणि १३ सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीत पार पडणार आहे. या ऐतिहासिक परिषदेसाठी 'भारत मंडपम' येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे भारतात आगमन झाले असून, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत. दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे १२ आणि १३ सप्टेंबर रोजी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
11 Sep 2026 09:20 AM (IST)
Abhijeet Dipke Meets Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या हक्काच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आता १३ दिवस पूर्ण झाले आहेत. जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे अंतरवाली सराटी येथे पोहोचून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
11 Sep 2026 09:12 AM (IST)
Women Junior Asia Cup 2026: महिला ज्युनियर आशिया चषक २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवत उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचा १९-० असा एकतर्फी पराभव केला. या दणदणीत विजयासह गतविजेत्या भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या दिशेने पाऊल टाकत अंतिम चार संघात स्थान मिळवले आहे.
सामन्याच्या ७व्या मिनिटाला पूजा साहूने गोल नोंदवून भारताचे खाते उघडले, तर ९व्या मिनिटाला रोशनी ऐंदने आघाडी २-० अशी दुप्पट केली. ११व्या मिनिटाला तनुश्री दिनेश काडू, तर १३व्या मिनिटाला सुखवीर कौर आणि सानिका चंद्रकांत माने यांनी लागोपाठ गोल करत सामन्यावर पूर्ण पकड मिळवली.
नांदेड येथे ट्रक आणि प्रवासी वाहनाची भीषण धडक होऊन ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहे. आगामी टी-२० आणि आंतरराष्ट्रीय मालिकांच्या तयारीसाठी भारतीय क्रिकेटपटूंचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) विशेष तंत्रज्ञान व फिटनेस सराव शिबीर सुरू आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष मोफत बस सेवा आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन राज्यभरात सुरू झाले आहे नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आजपासून १८ व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेची सुरुवात झाली असून, जागतिक नेत्यांच्या स्वागतासाठी राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज महाराष्ट्रासह देशातील १८ राज्यांमध्ये ६० किमी ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे