Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 15.10.2026
नेपाळमधील भीषण प्रलय, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि भारतीय शेअर बाजारातील सकारात्मक संकेत
एका ओळीत सारांश: नेपाळमधील महापुरातील मृतांचा आकडा १,२८० पार गेला असून, महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकीय वाद पेटला आहे. आणि जागतिक संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात पाहायला मिळाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरून आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या पडताळणीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह देशातील २० हून अधिक राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढीसह हिरव्यात व्यवहार सुरू झाला आहे. आगामी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंचे सराव शिबीर सुरू असून संघ निवडीबाबत क्रीडा वर्तुळात चर्चा रंगली आहे.
04 Sep 2026 04:53 PM (IST)
गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी १० हजारांची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर भारतीय स्टेट बँकेकडून ७३ कोटी ८२ लाख ९२ हजार ८५० रुपयांचे कृषी कर्ज उचलले, बनावट कागदपत्रे आणि कंपन्या तयार करून करोडो रुपये हडपणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका आरोपीला नागपूर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नागपूर रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे आरोपीची ओळख सचिन खुशाल कारेमोरे (४०, रा. नेरी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा) अशी पटली आहे.
04 Sep 2026 04:51 PM (IST)
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटना अलीकडच्या काळात समोर येत असतानाच नाशिकमध्ये आश्रमशाळेतील आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील विसरवाडी परिसरातील आश्रमशाळेत ही घटना घडली. सृष्टी ओंकार सूर्यवंशी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टी ही विसापूर येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत होती. आश्रमशाळेत असतानाच तिला ताप आला. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला पुन्हा आश्रमशाळेत आणण्यात आले. मात्र त्यानंतर अचानक तिला उलटी झाली. ताप आणि उलटीचा त्रास पुन्हा जाणवू लागल्याने सृष्टीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
04 Sep 2026 04:50 PM (IST)
राज्यातील राजकारणात आता रोजच नव्या घडामोडी पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालूच असून आता पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज्यातील विविध प्रश्नांवरून फडणवीसांना घेरत सपकाळ यांनी फडणवीसांना लक्ष्य केले आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत त्यांनी फडणवीसांचा उल्लेख 'फसवनीस' असा करत 'असंख्य मुद्द्यावर तुमचा खोटारडेपणा उघडा पडला असल्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला ‘फसवणीस’ नाव दिले आहे,' असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
04 Sep 2026 04:37 PM (IST)
नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होताना त्या कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर दिसता कामा नयेत. स्क्रॅप रिक्षांविरोधात ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले. स्क्रॅप झालेल्या किंवा नियमबाह्य रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी आज विशेष बैठक घेतली. परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, रिक्षा-टॅक्सी युनियनचे नेते शशांक राव तसेच राज्यभरातील विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
04 Sep 2026 04:37 PM (IST)
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणात आणि ऊर्जेच्या जागतिक बाजारात पुन्हा एकदा मोठे वादळ निर्माण झाले आहे. रशियाकडून कच्चे तेल (Russian Oil) आणि इतर ऊर्जा साधने खरेदी करणाऱ्या भारत आणि चीनसारख्या प्रमुख देशांवर १०० टक्क्यांपर्यंत प्रचंड आयात शुल्क (Import Duty) लादण्याची तरतूद असणारे एक विशेष विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. अमेरिकेच्या या आक्रमक पाऊलानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अत्यंत कठोर आणि स्पष्ट शब्दांत भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय मंचावर मांडली आहे. “एखाद्या देशाने रशियाकडून तेल खरेदी केले किंवा नाही केले, तरी त्यामुळे हा युक्रेन-रशिया संघर्ष संपणार नाही,” असे सांगत जयशंकर यांनी अमेरिकेच्या निर्बंध धोरणावर थेट सवाल उपस्थित केले आहेत.
04 Sep 2026 04:32 PM (IST)
समृद्धी महामार्गावर राहुरीतील तरुण उद्योजकाला भरदिवसा अडवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या तपासात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या दरोड्याचा मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाइंड परशुराम गायकवाड याला तब्बल १,१७१ किलोमीटर दूर असलेल्या दिल्लीतून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याबाबत तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर दरोडा टाकल्यानंतर टोळीतील आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी पसार झाले. यातील काही आरोपी महाराष्ट्रातच लपून बसले होते, तर मुख्य सूत्रधार परशुराम गायकवाड हा एका साथीदारासह दिल्लीला पोहोचला. पोलिसांच्या माहितीनुसार, दरोड्यातून मिळालेल्या पैशांपैकी मोठी रक्कम त्याने दिल्लीत मौजमजेसाठी खर्च केली.
04 Sep 2026 04:26 PM (IST)
महाराष्ट्रात मतदारयादीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून नवीन प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. या यादीत तब्बल 2 कोटी 6 लाख 88 हजारांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बीड विधानसभा मतदारसंघातील तब्बल 250 बीएलए अर्थात बूथ लेव्हल एजंट्सनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
04 Sep 2026 03:59 PM (IST)
राज्यभरात डीजेवर बंदी घालावी,IMAची मागणीडीजे बंदीच्या मागणीसाठी फडणवीस यांची भेट घेणारडीजेमुळे विविध गंभीर समस्या निर्माण होतातIMAच्या नियोजीत अध्यक्षा डॉ. मंजुशा गिरींची माहिती
04 Sep 2026 03:55 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना अभिनंदनाचा संदेश पाठवला आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवल्याबद्दल त्यांनी मेलोनी यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणाऱ्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांचे अभिनंदन केले.
04 Sep 2026 03:50 PM (IST)
India W Vs Pakistan W / Asia Cup 2026: दुबई येथे सुरू असणाऱ्या महिला टी २० आशिया कप स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. फायनलपेक्षा मोठा समजला जाणारा सामना उद्या या स्पर्धेत होणार आहे. कारण भारतीय महिला संघ पाकिस्तान महिला संघाशी भिडणार आहे.
04 Sep 2026 03:40 PM (IST)
सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयात एका विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर बसून तीव्र आंदोलन करण्यात आले.
04 Sep 2026 03:35 PM (IST)
Vidyanand Bapat Attack Pune DJ Ban Protest : पुण्यातील डीजे आणि लाऊडस्पीकर विरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवत डीजेला बंदी घालण्याची मागणी केली होती. यावरून सोशल मीडियावर त्यांना चांगलाच वाद उफाळला. पण गुरुवारी माध्यमांशी बोलताना बापट यांना अचानक मारहाणही करण्यात आली.
04 Sep 2026 03:25 PM (IST)
नेपाळमध्ये (Nepal Flood) भोटेकोशी नदीला आलेल्या महापुराने आणि भूस्खलनाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. या भीषण आपत्तीत सर्व काही उद्ध्वस्त झाले असतानाच, शुक्रवारी एका अत्यंत थक्क करणाऱ्या आणि आशेचा किरण दाखवणाऱ्या घटनेची नोंद झाली.
04 Sep 2026 03:20 PM (IST)
किया इंडियाने आपली बहुप्रतिक्षित आणि प्रीमियम ३-रो एसयूव्ही ‘Kia Sorento’ अधिकृतपणे भारतात लाँच करून लक्झरी एसयूव्ही सेगमेंटमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. भारतीय मार्केटमध्ये ही कार कंपनीची नवीन फ्लॅगशिप SUV म्हणून स्थान मिळवत असून, तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹२७.९९ लाख ठेवण्यात आली आहे
04 Sep 2026 03:15 PM (IST)
Sugar Price Drop : सणासुदीच्या काळात सर्वसमान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. स्वयंपाक घरातील रोजच्या जीवनावश्यक गोष्टींच्या किमती बऱ्याच कडाडल्या आहेत. त्यात साखरेने बराच भाव खाल्ला आहे. साखरेचा गोडवा अचानक गायब झाला होता पण त्यात आता पुन्हा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
04 Sep 2026 03:11 PM (IST)
BCCI Breaking: बीसीसीआय ही भारतीय क्रिकेटशी संबंधित एक महत्वाची संस्था आहे. भारतीय संघाची निवड आणि अन्य सर्व महत्वाच्या गोष्टींमध्ये बीसीसीआय महत्वाची भूमिका बजावत असते. मात्र आता या संस्थेने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वय लपवून फसवणूक करणाऱ्या खेळाडूंवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. वय चोरीच्या प्रकरणात बीसीसीआयने एकाच वेळी ६४ खेळाडूंवर दोन वर्षांची कडक बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
04 Sep 2026 02:59 PM (IST)
धुळ्यातील काँग्रेस नेत्या डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक करण्यात आला. मोबाईलचा गैरवापर करत अज्ञात व्यक्तींनी खासदार बच्छाव यांच्या नावाने त्यांच्या कुटुंबियांसह अनेकांना व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून तब्बल ६२ हजार रुपयांची मागणी केली. हा प्रकार लक्षात येताच डॉ. बच्छाव यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
04 Sep 2026 02:50 PM (IST)
'सण हा सुखद आणि लोकांना आनंद देणारा असला पाहिजे. डीजेचे आवाज आणि त्यावर रस्त्याचे कार्यक्रम याच्यामुळे या सणाचं गांभीर्य जायला मदत होते. विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही परंतु त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य आहे.', असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
04 Sep 2026 02:42 PM (IST)
हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, माझी तयारी आहे विद्यानंद बापटजी तुमच्या बरोबर जाहीर प्रतिवाद करण्याची, सांगा केव्हा आणि कोठे करायची', असे आव्हान देखील त्यांनी दिले.
04 Sep 2026 02:30 PM (IST)
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात नागपुरात आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेले १ हजार ५०० मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
04 Sep 2026 02:21 PM (IST)
नाशिकमध्ये आज आणखी आश्रम शाळेतील एका आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. सृष्टी ओंकार सूर्यवंशी असं मृत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
04 Sep 2026 02:10 PM (IST)
पुण्यातील कोरेगाव पार्क येथे बजाज फिनसर्वच्या आर्थिक सेवा व्यवसायांसाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य कॅम्पसचा भूमिपूजन सोहळा सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे. बजाज फिनसर्वचे अध्यक्ष संजीव बजाज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महापौर मंजुषा नागपुरे उपस्थित आहेत.
04 Sep 2026 02:00 PM (IST)
पुण्यातील डीजे आणि लाऊडस्पीकर विरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवत डीजेला बंदी घालण्याची मागणी केली होती. यावरून सोशल मीडियावर त्यांना चांगलाच वाद उफाळला. पण गुरुवारी माध्यमांशी बोलताना बापट यांना अचानक मारहाणही करण्यात आली. या मारहाणीचा अनेक स्तरावरून निषेध होऊ लागला आहे. विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीविरोधात राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या. पण आता विद्यानंद बापट यांच्यासाठी पुणेकरांनी जोरदार पाठिंबा दर्शवला आहे. पुण्यात येत्या रविवारी नागरिक डीजे मुक्तीसाठी मोर्चा काढणार असल्याचे समोर आले आहे.
04 Sep 2026 01:50 PM (IST)
भारतातील आणि संपूर्ण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी यांच्या समूहाबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अदानी समूह लॉजिस्टिक्स आणि पोर्ट्स क्षेतारा आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी पुढचं पाऊल टाकत आहेत. कंटेनर व्यवसायात नुकतीच त्यांनी एक मोठ्या उपक्रमाची घोषणा केली आहे. यासाठी गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर एक कंटनर यार्ड उभारण्यात येणार आहे. अदानी समुहाच्या या मोठ्या निर्णयामुळे अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये जोरदार तेजी आली आहे.
04 Sep 2026 01:40 PM (IST)
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक आणि लष्करी तणाव पुन्हा एकदा अत्यंत भीषण वळणावर येऊन पोहोचला आहे. सिंधू पाणी करारावरून (Indus Waters Treaty) सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) माजी प्रमुख नजम सेठी यांनी भारताला उघडपणे लष्करी कारवाईची आणि अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. जर भारताने सिंधू कराराचे उल्लंघन करून पाकिस्तानकडे जाणारे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला, तर पाकिस्तानी लष्कर चिनाब नदीवर उभारण्यात येत असलेल्या भारतीय धरण व बोगदा प्रकल्पांवर क्षेपणास्त्रांनी (Missiles) हल्ला करून ते नष्ट करेल, असा चिथावणीखोर दावा सेठी यांनी केला आहे.
04 Sep 2026 01:30 PM (IST)
नीट-युजी २०२७ परीक्षा कॉम्प्युटर आधारित टेस्ट मोडमध्ये घेण्यासाठी तयारी वेगाने सुरू झाली आहे. परीक्षा घेणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) देशभरात नवीन कॉम्प्युटर टेस्टिंग सेंटर तयार करण्याच्या प्रक्रियेत गुंतली आहे. यासाठी अशा सरकारी तांत्रिक संस्थांची ओळख पटवली जात आहे, जिथे आधीपासूनच कॉम्प्युटर आणि इतर आवश्यक आयटी सुविधा उपलब्ध आहेत. NTA शी संबंधित सूत्रानुसार, एजन्सीने या दिशेने ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) कडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. AICTE ने आपल्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी तांत्रिक संस्थांकडे तेथे उपलब्ध असलेले कॉम्प्युटर, इंटरनेट आणि इतर तांत्रिक सुविधांची माहिती मागवली आहे.
04 Sep 2026 01:20 PM (IST)
भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून १६ वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ४) पहाटे घडली आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिला वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे सुमारे पाच वाजता तिचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीने देखील अशाच प्रकारे गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली होती, या घटनेनंतर ही दुसरी आत्महत्या आहे, त्यामुळे बारामती परिसरात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
04 Sep 2026 01:10 PM (IST)
भारतीय महिला क्रिकेट संघाची फिरकीपटू श्री चरणी हिने दमदार कामगिरी करत आणखी एका मोठ्या विक्रमाच्या दिशेने झेप घेतली आहे. महिला आशिया चषक 2026 मध्ये हाँगकाँगविरुद्ध तिने 3.2 षटकांत 16 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह 2026 या कॅलेंडर वर्षातील तिच्या T20I विकेट्सची संख्या 31 झाली आहे. त्यामुळे एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक महिला T20I विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
04 Sep 2026 01:03 PM (IST)
करण जोहरच्या लोकप्रिय रिॲलिटी शो ‘द ट्रेटर्स’च्या दुसऱ्या सीझनचा ग्रँड फिनाले ३ सप्टेंबर रोजी पार पडला. या सीझनमध्ये क्रिस्टल डिसूझा आणि रिदा थराना यांनी आपल्या रणनीतीच्या जोरावर बाजी मारत विजेतेपद पटकावलं. दोघींना ट्रॉफीसोबत तब्बल ६६ लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली.
04 Sep 2026 01:02 PM (IST)
काखे (ता. पन्हाळा) येथे अनैतिक संबंधांच्या वादातून एका विवाहीत महिलेचा तिच्याच घराच्या अंगणात धारदार चाकूने सपासप वार करून निघृण खून करण्यात आल्याची थरारक घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पूजा अविनाश दाभाडे (वय ३३, रा. काखे) असे मृत महिलेचे नाव असून, सुरेश मधुकर दाभाडे (वय ३५) याने हा हल्ला केला आहे. भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे काखे परिसरासह संपूर्ण पन्हाळा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
04 Sep 2026 12:48 PM (IST)
बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत टिप्पर वाहतूक सुरू ठेवण्यासाठी दरमहा हप्ता म्हणून १ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जालना पथकाने बुधवारी (दि. २) पैठण एमआयडीसी परिसरात रंगेहाथ पकडले आहे. भारत लालचंद चव्हाण (वय ४६), पोलिस हवालदार, बक्कल क्रमांक ५१२, नेमणूक बिडकीन पोलिस ठाणे, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, असे आरोपीचे नाव आहे.
04 Sep 2026 12:36 PM (IST)
पानटपरीचालकाकडून ३०० रुपयांचा हप्ता घेतल्याप्रकरणी पुण्यातील खराडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. ५०० रुपयांची मागणी करून चालकाकडून ३०० रुपये घेऊन नंतर २०० रुपये द्यावे असे सांगण्यात आल्याचेही चौकशीनंतर समोर आले आहे. पोलिस शिपाई आकाश मुळे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पानटपरीचालकाकडून पैसे घेतल्यामुळे मोठी खडबळ उडाली आहे. यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे निरीक्षण निलंबन आदेशात नोंदविण्यात आले आहे.
04 Sep 2026 12:24 PM (IST)
पुरंदर तालुक्यात प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उर्वरित सुमारे ४० हेक्टर जमीन आता सक्तीने संपादित करण्यात येणार आहे. संमतीने जमीन देण्यासाठी संबंधित जमीनमालकांना प्रशासनाने अनेकदा मुदतवाढ दिली; मात्र, त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने कायद्यानुसार सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
04 Sep 2026 12:12 PM (IST)
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळलेली असतानाच, मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथून अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मावळ तालुक्यात खळबळ उडाली असून, बालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी ५१ वर्षीय आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने आरोपीला दिनांक ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक गावच्या हद्दीत एचडीएफसी. बँकेजवळील लंबोदर दूध डेअरीमध्ये दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचा आरोप आहे. आरोपीने पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
04 Sep 2026 11:50 AM (IST)
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सिंधुदुर्ग यांच्या वतीने बँकेच्या विविध शाखांसाठी ‘क्लर्क’ (Clerk) पदाच्या एकूण ६७ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ निवासी असणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
04 Sep 2026 11:44 AM (IST)
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक झाला असून त्यांच्या नावाने अनेकांना व्हॉट्सॲपवरून ६२ हजार रुपये पाठविण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर खासदार बच्छाव यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
04 Sep 2026 11:35 AM (IST)
हिंजवडी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसह विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. परिसराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पीएमआरडीएने तयार केलेल्या सुमारे ४२६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला गती देण्यासह विविध यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
04 Sep 2026 11:20 AM (IST)
अमेरिकेच्या न्यूयार्क शहरातील पब्लिक स्कूलमध्ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आठवी इयत्तेपर्यंतच्या मुलांसाठी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्सच्या वापरास तात्पुरती बंदी घातली जाईल. ही घोषणा न्यूयार्कचे मेयर जोहरान ममदानी यांनी केली आहे. देशातील सर्वात मोठ्या स्कूल डिस्ट्रिक्टकडून क्लासरुममध्ये एआयबाबत कडक भूमिका घेण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
04 Sep 2026 11:15 AM (IST)
जन्माष्टमीचा सण जवळ आला की भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीगीतांनी आणि भजनांनी वातावरण भक्तिमय होतं. मंदिरांमध्ये मध्यरात्री कृष्णजन्माचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तर दहीहंडीची तयारीही काही दिवस आधीपासूनच सुरू होते. या उत्सवात कृष्णाला समर्पित गाणी आणि भजनांना विशेष महत्त्व असतं. बॉलिवूडमध्येही श्रीकृष्णाच्या भक्तीवर अनेक अविस्मरणीय गाणी तयार झाली आहेत. मात्र, यापैकी एक भजन असं आहे, ज्याची लोकप्रियता तब्बल ४८ वर्षांनंतरही कायम आहे.
04 Sep 2026 11:10 AM (IST)
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप वापरणाऱ्या यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता कंपनीने भारतीय यूजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरअंतर्गत आता यूजर्स व्हॉट्सॲपवरूनच वीज, पाणी आणि क्रेडिट कार्डचे बिल भरू शकणार आहात. यासाठी यूजर्स बिल पेमेंट्स फीचरचा वापर करू शकतात. हे फीचर रोलआऊट करण्यात आल्यानंतर यूजर्स ॲपमधून बाहेर न पडता थेट व्हॉट्सॲपवरून पाणी, विज आणि क्रेडिट कार्ड बिल शोधू शकतात, मॅनेज करू शकतात आणि त्यांचे पेमेंट देखील करू शकतात. हे व्यवहार पूर्ण करण्यासाठी मेटाच्या मालकीचे हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म भारत कनेक्ट (BBPS) नेटवर्कचा वापर करणार आहे.
04 Sep 2026 11:05 AM (IST)
कामोठे परिसरात तीन वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर चिमुकली बसमध्ये एकटी राहिल्याचा गैरफायदा घेत चालकाने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय चालकाला अटक केली असून, पनवेल न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
04 Sep 2026 10:50 AM (IST)
कामोठे परिसरात तीन वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर चिमुकली बसमध्ये एकटी राहिल्याचा गैरफायदा घेत चालकाने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय चालकाला अटक केली असून, पनवेल न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
04 Sep 2026 10:40 AM (IST)
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. शहरातील आकाशवाणी चौकात असलेल्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली. ही आग हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या नवजात अतिदक्षता विभागात (NICU) लागली. त्याच मजल्यावर जनरल वॉर्डमधील ३६ आणि स्पेशल वॉर्डमधील १३ रुग्णही दाखल होते. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
04 Sep 2026 10:30 AM (IST)
जन्माष्टमीचा सण म्हटलं की श्रीकृष्णाच्या बाललीला, राधा-कृष्णाचं प्रेम आणि महाभारतातील रंजक कथा डोळ्यांसमोर येतात. कृष्णभक्तीत रमण्यासोबतच या कथा मनोरंजनाच्या माध्यमातून अनुभवायच्या असतील, तर ओटीटी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कृष्णाच्या विविध रूपांपासून ते महाभारताच्या गाजलेल्या कथांपर्यंत अनेक चित्रपट आणि मालिका ओटीटीवर उपलब्ध आहेत. त्यामुळे या जन्माष्टमीला घरबसल्या पाहण्यासाठी कोणते सिनेमे आणि शोज तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवेत, जाणून घेऊया.
04 Sep 2026 10:20 AM (IST)
राज्य सरकारने 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या गुरूवारी (दि.3) बदल्या केल्या आहेत. रवींद्र खेबुडकर (सीईओ, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग) यांची आयुक्त, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे येथे, गजेंद्र बावणे (आयुक्त, जीएसडीए, पुणे) यांची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, छत्रपती संभाजीनगर येथे तर डॉ. अपूर्वा बासुर, (प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार) यांची सीईओ, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे बदली करण्यात आली
04 Sep 2026 10:10 AM (IST)
कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नी यामिनी यादव (वय ३८, रा. झिंगाबाई टाकळी) हिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना झिंगाबाई टाकळी परिसरात घडली. पतीने पत्नीच्या गळ्यावर तसेच पोटावर केलेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झाली. मात्र, महिलेच्या शरीरावर बाहेरून गंभीर मारहाणीच्या स्पष्ट खुणा न दिसल्याने मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
04 Sep 2026 10:00 AM (IST)
सर्वात आरामदायी आणि परवडणारा प्रवास म्हणून भारतीय रेल्वेला प्राधान्य दिले जाते. मात्र, आता या रेल्वेसेवेत अडथळा येण्याची शक्यता आहे. कारण, चंदीगड रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या सुधारणा कामामुळे, 10 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत 36 दिवसांचा वीज आणि वाहतूक ब्लॉक लागू केला जाणार आहे. परिणामी, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले जातील, काही रद्द होतील आणि इतरांवर अंशतः परिणाम होईल.
04 Sep 2026 09:35 AM (IST)
IND vs PAK Women Asia Cup 2026: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या महिला टी-२० आशिया कप २०२६ मधील 'अ' गटातील सामन्यात भारतीय महिला संघाने ३ सप्टेंबर रोजी हाँगकाँगचा १३७ धावांनी धुव्वा उडवला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १९३ धावांचा डोंगर उभारला आणि हाँगकाँगला अल्पधावसंख्येत रोखत दणदणीत विजय मिळवला.
या शानदार विजयामुळे भारतीय संघाने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने संपूर्ण संघाच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला. गट टप्प्यात आता भारताचा पुढील सामना ५ सप्टेंबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्ट केले की, उपांत्य फेरी निश्चित झाली असली तरी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघ पूर्ण ताकदीने आणि विजयाच्या ध्येयानेच मैदानात उतरेल.
04 Sep 2026 09:25 AM (IST)
El Nino WMO Warning: देशात मान्सूनचा जोर ओसरल्याने आणि पावसाने मोठी ओढ दिल्याने ७४१ पैकी तब्बल ३५० जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जूनचा मुहूर्त हुकल्यानंतर जुलैमध्ये झालेल्या पावसानंतर ऑगस्टमध्ये अपुऱ्या पावसामुळे देशातील जवळपास ४७ टक्के भागाला गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक हवामान संघटनेने (WMO) अत्यंत चिंताजनक अपडेट दिली आहे.
WMO च्या ताज्या अंदाजानुसार, प्रशांत महासागरातील तापमान वाढीमुळे 'अल निनो'चा प्रभाव आता अधिक तीव्र होत असून, हा त्रास थेट फेब्रुवारी २०२७ पर्यंत जाणवणार आहे. यामुळे आगामी हिवाळ्यात नेहमीप्रमाणे अनुभवता येणारी गुलाबी आणि बोचरी थंडी गायब होऊन तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची दाट शक्यता आहे, ज्याचा थेट फटका शेती आणि रब्बी हंगामाला बसू शकतो.
04 Sep 2026 09:23 AM (IST)
Manoj Jarange Patil:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये पार पडलेली चर्चा पुन्हा एकदा निष्फळ ठरली आहे. या बैठकीतून कोणताही ठोस मार्ग निघू शकला नाही. हैदराबाद गॅझेटनुसार सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे वाटप करण्यात यावीत, या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम राहिले.
या चर्चेसाठी आलेल्या सरकारी शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते; मात्र दीर्घ चर्चेनंतरही तोडगा निघाला नाही. परिणामी, जरांगे यांनी सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली असून, त्यानंतर मुंबईत धडक देण्याचा इशारा दिला आहे. या भूमिकेमुळे राज्यातील ५८ लाख कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र आणि त्यांच्या वैधतेचा (व्हॅलिडिटी) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






