संग्रहित फोटो
मुंबई- राज्यात पार पडलेल्या 5 विधान परिषदेच्या (MLC Election) निवडणुकांत भाजपा आणि शिंदे गटाला (BJP and Shinde Group) अपेक्षित यश मिळालेलं नाही. कोकण शिक्षक मतदारसंघ वगळता इतर चारही ठिकाणी भाजपाला निखळ यश मिळालेलं नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे (Satyjeet Tambe) यांना विजय मिळाला असला, तरी ते यश अपक्षांचं यश आहे. नागपूर आणि अमरावती या दोन्ही जागी महाविकास आघाडीनं भाजपाला चांगलीच टक्कर दिली. यातली नागरपूरची जागा काँग्रेसनं जिंकली आहे. तर अमरावतीच्या जागेवर चुरशीच्या झालेल्या निवडणुकीनं या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मतं मोजली जाण्याची शक्यता आहे. तर औरंगाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीनं यश मिळवलं आहे. यावर रात्री उशिरा प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालांचं चिंतन करणार असल्याचं सांगितलंय. काही ठिकाणी अपेक्षित यश मिळालं तर काही ठिकाणी अपेक्षित यश मिळालं नाही, असं सांगत, झालेल्या निकालांचं चिंतन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
ज्या विधान परिसधेच्या निवडणुका झाल्या, त्यात कोकणची जागा भाजपानं बऱ्याच कालांतरानं निवडून आली, याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. तर नागपूरची जागा शिक्षक परिषदेनं लढली, असं सांगत त्यात भाजपा नसल्याची सारवासारव केलीय. कोकण आणि नागपूर या दोन्ही जागा भाजपानं लढवाव्यात अशी आमची इच्छा होती. मात्र नागपुरात त्यांनी जागा लढवली. त्यामुळं तिथं पराभव झाला. ती जागा भाजपानं जागा लढली नाही, असं त्यांनी सांगंतिलंय. अमरावतीत दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी होईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केलीय. झालेल्या निवडणुकांत अपेक्षित मतं मिळालेली नाहीत, याचा विचार करु, अमरावतीत अवैध मतांची संख्या जास्त आहे. असंही त्यांनी साांगितलंय.
मराठवाड्यातही भाजपाच्या उमेदवारानं चांगली लढत दिली.
असं ते म्हणाले. तर सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीला दूर राखत चांगलं यश मिळवलं. याबाबत त्यांनी तांबे यांचं कौतुक केलंय. मविआनं त्यांना टार्गेट करण्याचा पर्यत्न केला होता. तरी ताांबे यांचं यश चांगलं असल्याचं फडणवीस म्हणाले.
या विधान परिषद निकालात मिळालेल्या अपयशानं खचलेलो नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याच मिहन्यात होणाऱ्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.