मुंबई : : रविवारी सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup maitree house) छापेमारी मारत तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांनी आपण स्वत:हून अटक होण्याचे म्हटलं होतं. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा राऊत यांना ईडीनं अटक (ED Arrest) केल्यानंतर सोमवारी कोर्टात (Court) हजर केलं. यावेळी पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याआधी मविआतील अनिल देशमुख, नवाब मलिक (Anil deshmukh and nawab Malik) आणि आता संजय राऊतांना (Sanjay Raut) अटक झालेय, त्यामुळं भाजपा बळाचा व सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना नामोहरम करत आहे, असा सूर जनतेतून येतोय. त्यामुळं आता पुढील नंबर कोणाचा? अशी सध्या सध्या चर्चा सुरु असताना, पुढील नंबर शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांचा (Shivsena Leader) लागू शकतो असं भाजपा म्हणत आहे.
[read_also content=”सौदागरपुरा येथे सौम्य लाठीचार्ज, मनपाची अतिक्रमण कारवाई रोखण्याचा प्रयत्न https://www.navarashtra.com/maharashtra/mild-lathi-charge-in-saudagarpura-an-attempt-to-stop-the-municipal-encroachment-action-nraa-310914.html”]
दरम्यान, दिपोलीत साई रिसॉर्टची (Dapoli sai resort) अनाधिकृत बांधकाम प्रकरणी ईडीने माजी परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब (Anil parab) यांना नोटीस पाठवली होती. तसेच परब यांची ईडी कार्यालयात चौकशी सुद्धा करण्यात आलेय. मात्र ही चौकशी पूर्ण झाली नसल्याचे ईडीने म्हटले आहे. तसेच मनी लॉन्ड्रींगचा पैसा या रिसॉर्टमध्ये वळविल्याचा आरोप भाजपा नेते किरिट सोमय्यांनी केलाय. त्यामुळं हे साई रिसॉर्टची बांधकाम गैरप्रकारे केले आहे. त्यामुळं अनिल परब यांना अटक होणार असं याआधी किरिट सोमय्यांनी दावा केला आहे. तसेच आता ईडी सुद्धा अँक्शन मोडमध्ये असल्यामुळं अनिल परबांवर ईडी आपला मोर्चा वळविणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं राऊतांनंतर ईडी अनिल परबांवर सुद्धा कारवाई करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.