मुंबई : आज सर्वोच्य न्यायालयात (Supreme Court) ओबीसी आरक्षण (OBC Reservation) यावर सुनावणी पार पडली, आणि राज्यातील ओबीसींचे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. ओबीसींना आता राजकीय आरक्षण मिळणार आहे. असा कोर्टानं निर्णय (Court result) दिला आहे. त्यानंतर आता राज्यातून विविध प्रतिक्रिया येत आहेत, दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद (Devendra fadnvis press conference) घेत ओबीसी आरक्षणाबाबत मविआचे धोरण व वेळकाढूपणा यावर टिका केली. तसेच अडीच वर्ष आम्ही केलेल्या प्रयत्नांना व संघर्षाला यश आल्याचे फडणवीसांनी म्हटले. तसेच हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. आमच्या सरकारनं दिलेला अहवाल (Repor) कोर्टानं स्विकारला, त्यामुळं ओबीसी समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचं फडणवीसांनी म्हटले. (Open the way for reservation for OBC community)
[read_also content=”मंत्रिपदासाठी करोडो रुपयांची बोली? भाजप ‘या’ आमदाराला अज्ञातांचा फोन, ४ आरोपींना अटक https://www.navarashtra.com/maharashtra/bjp-mla-called-by-unknown-person-4-accused-arrested-306258.html”]
दरम्यान, आता आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार आहेत, मविआ सरकारनं वेळकाढूपणा केल्याची टिका सुद्धा फडणवीसांनी केलीय. मी प्रत्येक बैठकीत इंम्पेरिकल डेटाचा (Empirical data) आग्रह केला होता, कोर्टाच्या निर्णयामुळं ओबीसी समाज व संघर्षाचा विजय झाला आहे. अजूनपर्यंत मविआने केंद्र सरकारकडे बोट दाखवले होते. पण आता आरक्षण मिळाले आहे. बांठिया आयोगानुसार निवडणुका घेण्याचे कोर्टाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत. तसेच पुढील दोन आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करा, असं कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मविआने 15 महिने टाईमपास केला. पण आम्ही ओबीसी आरक्षणाचा पाठपुरावा करुन शेवटी आमच्या सरकारने ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिले असं फडणवीसांनी म्हटले.