सुनिल तटकरेंनी रोहा बदलतोय, रोहा बदललाय असे सूचक वक्तव्य करत विरोधकांचा हिशोब वेळ आल्यावर चुकता करू, असे अप्रत्यक्ष संकेत दिल्याने शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादीतच खरा सामना पाहायला मिळणार आहे.
रायगडच्या कर्जत तालुक्यात बैल चोरीला गेल्यानंतर शेतकरी तक्रार देण्यासाठी गेला असता पोलिसांनी “बैलाचा जन्मदाखला आणा” असा प्रश्न विचारला. या विचित्र वागणुकीमुळे परिसरात संतापाची लाट आहे.
रायगडच्या म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावात वृद्ध दाम्पत्याची हत्या त्यांच्या दोन मुलांनीच केली. घरखर्च व घरात न राहू देण्याच्या वादातून ही घटना घडली. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपींना अटक केली.
जिद्द, मेहनत आणि न थकणारी चिकाटी असेल तर कोणतेही अपयश अंतिम नसते, हे दाखवून दिलं आहे कर्जत तालुक्यातील ऐनाची वाडी या आदिवासी वाडीतील नयन विठ्ठल वाघ या तरुणाने.
दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणरे येथे “रन ऑफ इंटिग्रिटी” मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थी आणि समाजात प्रामाणिकता, राष्ट्रभावना आणि...
12 नापास कुमार शर्मा ते आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा हा खडतर प्रवास 12 Fail या सिनेमातून सगळ्यांपर्यंत पोहोचला.अशीच काहीशी गोष्ट आहे ती म्हणजे कर्जतच्या आदिवासी पाड्यातील एका तरुणाची.
म्हसळा तालुक्यातील मेंडदी येथून एक वृद्ध दाम्पत्यचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
खोल समुद्रात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि उंचच उंच उसळणाऱ्या लाटांमुळे गेल्या आठवडाभर किनारपट्टी भागात भीतीचं वातावरण होतं. या भीषण वादळात अडकलेल्या दोन मासेमारी बोटी बेवारस अवस्थेत होत्या.
पुण्यातील व्यक्तीने भाच्याच्या फी साठी पाठवलेले ८० हजार रुपये चुकीने कर्जतच्या नलिनी कर्डीकर यांच्या खात्यात जमा झाले. मात्र नलिनी यांनी ती रक्कम खर्च न करता पोलिसांच्या उपस्थितीत परत केली.
माजी आमदार पंडित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाकडे तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, काम न करणाऱ्या ठेकेदारांच्या वर्कऑर्डर रद्द करून रिटेंडरिंग प्रक्रिया सुरू करण्याचा…
नवीन अंगणवाड्या बालकांचे पोषण, आरोग्य तपासणी व पूर्व-शिक्षण अधिक परिणामकारकपणे पार पाडतील. तसेच गर्भवती व स्तनदा महिलांना आरोग्य सेवा आणि पोषण मार्गदर्शन सुलभपणे उपलब्ध होईल.
सततच्या पावसामुळे रायगडच्या कर्जत तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून एकरी ५० हजार रुपये भरपाई देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी 'ड्राय डायरेक्ट पेरणी भात' (DDSR) तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहिले. किसान क्राफ्टने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणातून भात लागवडीसाठी ५०% पाणी बचत कशी होते, हे समजावले गेले.
कर्जत तालुक्यात सततच्या पावसामुळे भाताचे ९०% पीक खराब झाले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन तातडीने एकरी ५०,००० रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. प्रशासनाकडून सरसकट पंचनामे करण्याचे आश्वासन.
नगरपरिषदेच्या मालमत्ता करावरील अतिरिक्त मालमत्ता करमाफीच्या अभय योजनेसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी कर्जत शहर शिवसेना यांच्यावतीने करण्यात आली.
रायगडमध्ये पत्नीने प्रियकर व मैत्रिणीसोबत संगनमत करून 23 वर्षीय कृष्णा खंडवीची हत्या केली. इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. पोलिसांनी 24 तासांत तिघांना अटक केली.
खालापुर तालुक्यातील आठ पंचायत समिती प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, चार ठिकाणी महिला उमेदवारांना संधी मिळाली आहे. या आरक्षणामुळे अनेक दिग्गज उमेदवारांचे मनसुबे भंगले असून, त्यांना धक्का बसला आहे.
वासांबे मोहोपाडा येथे सामाजिक संदेश देत आणि स्वच्छतेचा संदेश पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वच्छता रॅली आयोजित करण्यात आली. हा उपक्रम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना खालापूर तालुका, वासांबे ग्रुप ग्रामपंचायत यांनी केला.
राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगण्यास सुरूवात केली. मात्र धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीं मधून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाने विरोध दर्शवला आहे.