शिवसेना-भाजप महायुतीचे प्रभाग क्र. ४ ब चे उमेदवार मयूर पाटील यांचा डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत ते समस्या जाणून घेत आहेत.
प्रशासक राजवटीच्या काळातही आम्ही प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात ठाण्याच्या विकासात सक्रिय योगदान देणार असल्याचा निर्धार ठाणे प्रभाग...
शिवसेना भाजप महायुतीचे प्रभाग क्रमांक ४ ब चे उमेदवार मयूर पाटील यांचा उंबराळी परिसरात डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे. मीटर आणि गटारापलीकडे जाऊन नागरिकांना प्रत्यक्ष सुविधा दिल्याचा दावा मयूर…
कसारा येथील सार्वजनिक जागेवरील अनधिकृत बांधकामाच्या आरोपावरून रेल्वे प्रशासनाने दुकानदार व घरमालकांना नोटीसा दिल्या आहेत. दुकानं हटवण्याच्या निर्णयामुळे शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे.
वसईत जामिनासाठी दिलेल्या पैशांच्या वादातून भावाने बहिणीवर गोळीबार केला. काचेमुळे जीव वाचला. आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त झाले.
नगरपरिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणूकीचा रणसंग्राम राज्यभरात सुरु आहे. या निवडणूकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत यांच्यात चुरशीची लढत सुरु असताना आता ठाकरे गटासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
Minakshi Shinde: ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या कट्टर समर्थक आणि ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
ॲड.आशीष गिरी यांचा नजीब मुल्ला यांच्या उपस्थितीत जाहिर पक्ष प्रवेश ठाणे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच ठाण्यातील काँग्रेसला भले मोठे खिंडार पडले आहे.
MHADA House Sales News: म्हाडाच्या कोकण मंडळाकडून नवीन वर्षात २ हजारहून अधिक घरांची सोडत काढली जाणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये ही लॉटरी निघण्याची शक्यता असून ठाणे परिसरात हक्काचे घर घेण्याची…
ठाणेमध्ये लवकरच रिंग मेट्रो सुरू होईल. हा २९ किलोमीटरचा मार्ग अंतर्गत प्रवासाला गती देईल. तो मुंबई मेट्रो लाईन्स ४ आणि ५ ला जोडेल, ज्यामुळे मुंबई, ठाणे आणि कल्याण दरम्यान थेट…
ठाण्यातील कळव्यात पत्नी नांदायला येत नाही म्हणून दारुड्या जावयाने सासू-सासऱ्यांवर लाकडी फळीने हल्ला केला. वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी असून जावयावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९ जानेवारीपासून मुंबई आणि ठाण्यात २२वा 'थर्ड आय' आशियाई चित्रपट महोत्सव सुरू होत आहे. ५६ चित्रपट, सई परांजपे यांचा सन्मान आणि डॉ. व्ही. शांताराम यांच्या अजरामर चित्रपटांची पर्वणी रसिकांना मिळणार…
मुंबई महानगरपालिकेने सायन उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करून त्याला समांतर दोन पदरी उड्डाणपुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे आणि सीएसएमटी दरम्यान प्रवास सुलभ करण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातल्या महापालिकांमधील इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शनिवारपासून सुरु होणार आहे. महापालिकांमधील सदस्य संख्येच्या चार ते पाचपट इच्छुक असल्याने उमेदवारांचा कस लागणार आहे.
Thane Mulund New Railway Station: ठाणे ते मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे रखडलेले काम आता रेल्वे स्वखर्चाने पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
तुम्ही जर मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाण्यातील या मार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण ठाण्यातील महत्त्वाचे रस्ते वाहतूकीसाठी चार महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आले.
महालक्ष्मी रेसकोर्सवरील १२५ एकरवर जागतिक दर्जाच्या सेंट्रल पार्कची उभारणी होतेय. कोस्टल रोडची १७० एकर जागा असे एकूण २९५ एकरचे भवदिव्य सेंट्रल पार्क तयार केले जाणार आहे.
रस्त्यांवरील वाढते अपघात लक्षात घेता राज्यातील ६० ठिकाणी स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क उभारण्यात येणार आहे, असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला.
ठाण्यातील घोडबंदरमधील गायमुख रोडच्या सतत बिघडणाऱ्या स्थितीमुळे, दुरुस्ती मोहीम सुरू करण्यात आली आहे. शुक्रवार, १२ ते १४ डिसेंबर दरम्यान या ठिकाणी दुरुस्तीचे काम केले जाईल.