Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 23.11.2026 
महाराष्ट्र

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

१० ऑक्टोबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. दिल्लीतील विरोधी पक्षांच्या आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश, पुण्यात MPSC विद्यार्थ्यांवर एफआयआर, महाराष्ट्रातील शासकीय रिक्त पदांवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका आणि वेस्ट इंडिजकडून भारतीय संघाचा पराभव; वाचा आजचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी

anuradha sagar

Maharashtra to World Breaking News : 

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष आणि कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीला छावणीचे रूप आले आहे.  केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनाने  मेट्रो आणि रेल्वे प्रवासावर निर्बंध लादले असतानाही हळूहळू विद्यार्थी जंतरमंतर परिसरात दाखल होऊ लागले आहेत.

 दिल्लीतील वाहतूक आणि सार्वजनिक निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत नागरिकांना दिलासा देण्यासाठी मेट्रो पूर्णपणे बंद न करण्याचे आणि नियम सौम्य करण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्रातील MPSC आणि मानवाधिकार आयोगासह १४ महत्त्वाच्या शासकीय संस्थांमधील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात जनहित याचिका (PIL) दाखल  करण्यात आली आहे. 

पुण्यातील शास्त्री रस्ता (नवी पेठ) येथे परवानगीशिवाय रस्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी १५ MPSC विद्यार्थी प्रतिनिधींवर एफआयआर (FIR) नोंदवला. मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय शांततेतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार नवी पिल्ले (Navi Pillay) यांना जाहीर झाला.

‘इनर रिंग रोड’च्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांची संमती; पीएमआरडीएकडून योग्य मोबदल्याची ग्वाही

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पाच्या भूसंपादनाला गती मिळाली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आयोजित केलेल्या मोजणीपूर्व ग्रामबैठकांना मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रत्यक्ष जमीन मोजणीचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करून चालू बाजारभावानुसार योग्य मोबदला देण्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे. प्रस्तावित ६५ मीटर रुंदीचा मुख्य रस्ता आणि दोन्ही बाजूंस प्रत्येकी ९ मीटरचे सेवा रस्ते असलेल्या या प्रकल्पासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याचे धोरण अवलंबले आहे. संवादामुळे शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन झाल्याने मोजणी प्रक्रियेला सहमती मिळाली आहे.

दिल्लीत धरपकड सुरूच; केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी, दिपके सगळ्यांनाच उचललं, 1,700 हुन जास्त आंदोलक ताब्यात

राजधानी दिल्लीत SIR प्रक्रियेविरोधातील आंदोलनावरून वातावरण तापलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने (CJP) जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, आंदोलनापूर्वीच पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

15 वर्षानंतर ‘या’ दिग्गजाने घेतली एक्झिट; IPL 2027 आधी CSK चा मोठा डाव

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2027) २० वा हंगाम २०२७ मध्ये खेळला जाईल. यासाठी खेळाडूंचा लिलाव या वर्षाच्या अखेरीस गोव्यात होणार आहे. अनेक फ्रँचायझींनी यासाठी आपली तयारी आधीच सुरू केली आहे. आयपीएल २०२७ च्या आधी, चेन्नई सुपर किंग्सने संघात मोठे बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वीच, भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची सीएसकेच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर, प्रशिक्षण मंडळात काही मोठे बदल होऊ शकतात, असे वृत्त समोर आले होते.

जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने, नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. पानी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

‘अघोषित आणीबाणी’चा बॉम्बे लॉयर्स असोसिएशनचा आरोप

राजधानी दिल्लीतही SIR प्रक्रियेविरोधातील आंदोलनावरून वातावरण तापलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने (CJP) जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, आंदोलनापूर्वीच पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनांवर लादण्यात येणाऱ्या निर्बंधांवरून बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. सरकारकडून आंदोलनांवर ज्या पद्धतीने निर्बंध घातले जात आहेत, त्याला ‘अघोषित आणीबाणी’ असं संबोधत असोसिएशनने निषेध नोंदवला आहे.

SIR प्रक्रियेवरील आक्षेप, निवडणूक आयोगाच्या प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी आणि आंदोलकांवरील कारवाई यामुळे हा मुद्दा आता अधिकच तापण्याची चिन्हं आहेत. आगामी काळात या आंदोलनाला कोणतं वळण मिळतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

दिल्लीमध्ये 1700 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती; SIR वरून वातावरण तापलं

CJP च्या आंदोलनाला विद्यार्थी संघटना, जेन-झी आणि विरोधी पक्षांमधील कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याचं वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. अभिजीत दीपके यांच्यासोबत आयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही IGI विमानतळावर विमान उतरल्यानंतर ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि ध्रुव राठी यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतल्याचा दावा संबंधित वृत्तात करण्यात आला आहे. मुंबईत तुषार गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी 1,700 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं वृत्तही समोर आलं आहे.

पहिल्याच प्रयत्नात नेट-जेआरएफ परीक्षा क्रॅक करायचीय? वापरा ‘या’ ५ सोप्या ट्रिक्स!

विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट (NET) आणि जेआरएफ (JRF) परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. प्राध्यापक होण्याचे किंवा संशोधनाच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उघडून दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेत सहभागी होतात. सहसा विद्यार्थ्यांना असे वाटते की जेआरएफ क्रक करण्यासाठी अनेक वर्षांच्या मेहनतीची आवश्यकता असते, परंतु योग्य धोरण, अचूक वेळापत्रक आणि शिस्तीसह ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करणे पूर्णपणे शक्य आहे.

व्हिस्की शौकीनांसाठी दिवाळीची खास भेट! Indri चे दुर्मिळ Ruby Port Cask व्हर्जन लाँच

लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर झाल्यानंतर, ‘पिकाडिली डिस्टिलरीज’ची भारतातील सर्वाधिक खप असलेली लक्झरी सिंगल माल्ट व्हिस्की ‘इंद्री’ने भारतात बहुप्रतिक्षित ‘दिवाळी कलेक्टर एडिशन २०२६’ सादर केली आहे. मास्टर ब्लेंडर सुरिंदर कुमार यांनी तयार केलेली ही ‘रुबी पोर्ट कास्क’मधील एक दुर्मिळ आवृत्ती आहे.

गाडीवरील स्टिकरवरून माग काढला; दिव्यांग मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या

अधिक लाकडे गोळा करून देण्याचे आमिष दाखवून आणि हातावर शंभर रुपये टेकवून १४ वर्षीय बौद्धिक दिव्यांग मुलीला मोटारीत बसवले. त्यानंतर निर्जन डोंगराळ भागात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नांदे परिसरात उघडकीस आला आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुसट दिसणाऱ्या मोटारीवरील खासगी ‘स्टिकर’चा धागा पकडत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गुरुवारी (दि. ८) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. हाशिम अश्रफ शेख (वय २३, रा. हनुमान चौक, शेळकेवाडी फाटा, घोटावडे, पुणे; मूळ रा. बनिहाल, जम्मू-काश्मीर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

राज्यस्तरीय Kabaddi Tournament वादाच्या भोवऱ्यात!

नाट्यगृह आणि क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळयातील वाद ताजा असतानाच गुरुवारी संध्याकाळी राज्यस्तरीय महापौर कबड्डी स्पर्धचे उद्घाटन वादाच्या भोवऱ्यात सापडले. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूरी दिलेल्या निमंत्रण पत्रिकेऐवजी वेगळी निमंत्रण पत्रिका जाहिर करून त्यानुसारच स्पर्धेचे उद्घाटन केले. त्यामुळे यास्पर्धेला भाजपने बहिष्कार टाकला. तर महापालिका अधिकाऱ्यांनीही गैरहजर राहणे पसंत केले.

‘भारत पाकिस्तानच्या आण्विक धमकीला भीक नाही घालत…’, जिनिव्हा परिषदेत भारताची ठाम भूमिका

आंतरराष्ट्रीय स्तरावर (India at UN ) भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांना अत्यंत चोख प्रत्युत्तर दिले आहे. “भारत पाकिस्तानच्या आण्विक धमकीला कधीही घाबरणार नाही,” असे संयुक्त राष्ट्रातील भारतीय राजदूतांनी पाकिस्तानच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर जोरदार टीका करत स्पष्ट केले आहे. शुक्रवारी, भारताने संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या समितीच्या बैठकीत पाकिस्तानला लक्ष्य करण्यासाठी आपल्या ‘प्रत्युत्तराच्या अधिकाराचा’ (Right of Reply) खुबीने वापर केला. भारताने यावर तीव्र शब्दांत जोर दिला की, नवी दिल्ली कोणत्याही अणुबॉम्बच्या किंवा युद्धाच्या धमक्यांना बळी पडणार नाही आणि देशाच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सक्षम आहे.

कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार

मुंबईतील पारंपरिक कोळीवाड्यांच्या हद्दी निश्चित करण्याचा गेल्या १२ वर्षांपासून रखडलेला प्रश्न आता मार्गी लागणार आहे. याप्रकरणी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून कोळीवाड्यांच्या सीमांकनाची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील कोळी समाजाच्या पारंपरिक वस्त्यांच्या जमिनींच्या हद्दी निश्चित होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Agniveer Retirement Updates: चार वर्षांच्या सेवाकाळानंतर सरकारकडून पुनर्वसनाची जय्यत तयारी!

Agniveer Retirement Updates: अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात दाखल झालेल्या तरुणांच्या प्रवासाला एक नवीन वळण मिळाले आहे. चार वर्षांपूर्वी या योजनेची घोषणा झाली तेव्हा देशभरात यावर मोठी चर्चा आणि वादविवाद झाला होता. भारतीय नौदलातील अग्निवीरांचा पहिला बँच २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आपली ४ वर्षांची सेवा पूर्ण करून बाहेर येणार आहे. या ऐतिहासिक क्षणासोबतच सैन्यातून परतणाऱ्या या तरुणांच्या भविष्याचे काय होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर!

दिल्लीमध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 आयोजित करण्यात आले आहे. या ईव्हेंटदरम्यान क्वालकॉमने स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 आणि स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 हे दोन चिपसेट भारतात सादर केले आहेत. या ईव्हेंटमध्ये काही स्मार्टफोन ब्रँड्सने या नव्या चिप्सवर आधारित असणाऱ्या त्यांच्या आगामी डिव्हाईसचा प्रीव्ह्यू देखील सादर केला आहे.

NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीत ४,१८९ कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या ३५ ठराव योजनांना मंजुरी देत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. देशभरातील सर्व खंडपीठांनी मिळून या तिमाहीत १०७योजनांना मंजुरी दिली असून, त्यांचे एकूण मूल्य ११,०७१.१७ कोटी रुपये आहे. न्यायाधिकरणाच्या स्थापनेपासून एका तिमाहीत मंजूर झालेल्या योजनांची ही सर्वाधिक संख्या आहे.

Ulhasnagar News : कैलास कॉलनी फायरिंग तपासात ‘खाकी कनेक्शन’

उल्हासनगरच्या कैलास कॉलनीतील फायरिंग आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या तपासात आरोपींचे धागेदोरे शोधताना पोलिसांनाच हादरवणारे ‘खाकी कनेक्शन’ समोर आले आहे. आरोपीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलीस ठाण्यातील गोपनीय माहिती आरोपींपर्यंत पोहोचवल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई सुभाष घाडगे यांना पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी निलंबित केले आहे.

Tilak Varma: 23 वर्षीय तिलक वर्माची ढाँसू खेळी, T20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

Tilak Varma: टी-२० क्रिकेटमध्ये जलद फलंदाजी करणे आणि सातत्याने धावा करणे कधीच सोपे नसते. स्फोटक फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांची सरासरी कमी असते, तर चांगली सरासरी असलेल्यांचा स्ट्राइक रेट कमी असतो. युवा भारतीय फलंदाज तिलक वर्माने टी-२० क्रिकेटमध्ये एक अतुलनीय कामगिरी केली आहे. रांची येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात तिलकने ४४ धावांची नाबाद खेळी केली. त्याने केवळ १८ चेंडूंचा सामना करत तीन चौकारांसह तीन षटकार मारले.

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा

क्यूपर्टिनो बेस्ड टेक दिग्गज ॲपलने सप्टेंबर महिन्यात त्यांच्या मोठ्या लाँच ईव्हेंटचे आयोजन केले होते. त्यानंतर आता कंपनीने पुन्हा एकदा एका नव्या ईव्हेंटची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात दिग्गज टेक कंपनी एक मोठा ईव्हेंट आयोजित करणार आहे. कंपनीने या ईव्हेंटला वेलकम होम असे नाव दिले आहे. आगामी ईव्हेंटचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. कंपनी आपल्या ‘की-नोट’ प्रेजेंटेशनदरम्यान स्मार्ट होम आणि मनोरंजन डिव्हाईसची नवीन श्रेणी सादर करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितलं जात आहे.

इंधनाचे दर विक्रमी वेगाने घटणार? रशिया आणि अमेरिकेने केली एका मोठ्या ‘तेल’ कराराची घोषणा

जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या राजकीय आणि आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा क्षेत्रातून एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US-Russia Oil Deal) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर एका मोठ्या इंधन कराराची अधिकृत घोषणा केली आहे. या करारानुसार, रशिया अमेरिका आणि जागतिक बाजारपेठांमधील इंधनाची टंचाई दूर करण्यासाठी तातडीने लाखो टन डिझेलचा पुरवठा करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जागतिक पातळीवर वाढणाऱ्या महागाईशी लढणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

कोपरखैरणेकर वाहतूककोंडीने हैराण! भुयारी मार्गात टेम्पो अडकतात

नवी मुंबई शहराची शहराची गणना ‘वेल प्लॅन्ड सिटी’ (सुजाण नियोजनबद्ध शहर) म्हणून केली असली, तरी कोपरखैरणेवासीयांना मात्र रोजच्या तुफान वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत कोपरखैरणे स्टेशन परिसरातून गाडी घेऊन जाणे म्हणजे वाहनधारकांसाठी मोठा मनस्ताप ठरत आहे.

पुण्यातील MPSC Protest ला प्रशासनाचा दणका;

पुण्यात एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात कायदेशीर कारवाईचा बडगा उचलण्यात आला असून आंदोलनस्थळ तातडीने रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी आंदोलनाचे प्रतिनिधी प्रमोद दत्तात्रय पाटील यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून, पुढील १२ तासांच्या आत एस. एम. जोशी पूल आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिलेल्या मुदतीत आंदोलन पर्यायी ठिकाणी न हलवल्यास मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका (Contempt of Court) दाखल केली जाईल, असा स्पष्ट इशारा या नोटीसद्वारे देण्यात आला आहे.

नागपुरात बंड थोपवण्यात भाजपला अपयश; पुण्यातून चिवटेंची माघार पण अनिल सोले लढण्यावर ठाम

राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पुण्यात महायुतीतील बंडखोरीला पूर्णविराम मिळाला. तर, नागपुरात अनिल सोले यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने भाजपसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. अनिल सोले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेताच राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातच अनेक भागांतील कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ७ अंश सेल्सिअसने वाढले असून, मुंबई-सांताक्रूझ आणि रत्नागिरीत उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती जाणवली. निरभ्र आकाश, वाढलेला हवेचा दाब आणि उत्तर भारतातून वाहणारे उष्ण व कोरडे वारे यामुळे दुपारची उष्णता अधिक तीव्र झाली आहे.

CJP Protest Live Updates: हा आपला देश परत मिळवण्याचा लढा: सौरव दास यांचे सूचक विधान

CJP Protest Live Updates:  सीजेपी प्रवक्ता सौरव दास यांनी दिल्लीत दाखल होण्यापूर्वी एक सूचक विधान केलं आहे.  "हा आपला देश परत मिळवण्याचा लढा आहे! हा आपली लोकशाही वाचवण्याचा लढा आहे! हा 'जनरेशन-झेड'च्या भविष्यासाठीचा लढा आहे! मला माझ्या पिढीचा खूप अभिमान आहे. जोपर्यंत आपल्याला भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था मिळत नाही, तोपर्यंत आम्ही लढू. काही तासांत जंतर मंतरच्या परिसरात तुम्हा सर्वांना भेटू! हा एक दीर्घकाळ चालणारा लढा आहे." असा संदेश दास यांनी दिला आहे.

CJP Protest Live Updates: दिल्लीतील 56 मेट्रो स्टेशन्स बंद

CJP Protest Live Updates: दिल्लीतील काही भाग छावणी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. आयएएनएसच्या वृत्तानुसार, राजधानीतील अंदाजे 56 मेट्रो स्टेशन्स बंद आहेत. दिल्लीत येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, जंतर मंतरच्या 5 किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे.

CJP Protest Today Live : जंतर मंतर आणि पार्लमेंट स्ट्रीट परिसरात मोठा सुरक्षा दल तैनात

CJP Protest Today Live :आज दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर आणि पार्लमेंट स्ट्रीट परिसरात मोठा सुरक्षा दल तैनात करण्यात आला असून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

Abhijeet Dipke News: अभिजीत दीपके मुंबईहून दिल्लीकडे विमानाने रवाना

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाहून दिल्लीसाठी रवाना झाले. दिल्लीला छावणीचे रुप आले आहे. दिल्ली पोलीस बॉडी कॅमेरे वापरणार आहेत. या कॅमेऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते अंधारातही काम करतात आणि घटनांचे रेकॉर्डिंग करू शकतात. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, "हे बॉडी कॅमेरे आमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी आहेत."

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका