फोटो सौजन्य: @tvsiqube (X.com)
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. पूर्वी ज्या रस्त्यांवर फक्त इंधनावर चालणारी वाहनं दिसायची. आज त्याच रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनं धावत आहेत. मार्केटमध्ये EVs ला मिळणारी मागणी पाहून आता अनेक इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्या देशात कार्यरत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे Ola Electric.
इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये ओलाने दमदार इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक ऑफर केल्या आहेत, ज्यांना ग्राहकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. पण याच ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला TVS च्या इलेक्ट्रिक स्कूटरने टक्कर दिली आहे.
एप्रिल महिन्यात, संपूर्ण भारतात 91,791 वाहने खरेदी करण्यात आली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा 40 टक्क्याने जास्त आहे. एप्रिल 2024 मध्ये ईव्ही टू व्हिलर्सची विक्री 65,555 युनिट्स होती. टीव्हीएसने एकूण 19,736 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या, तर ओलाने 19,709 युनिट्स आणि बजाजने 19,001 युनिट्स विकल्या.
‘या’ इलेक्ट्रिक कारमुळे कंपनीची मान उंचावली ! भारतीय मार्केटमध्ये लाँच होताच आले भरभराटीचे दिवस
मजेदार बाब म्हणजे TVS भारतात फक्त एकच इलेक्ट्रिक स्कूटर विकते, ते म्हणजे TVS iQube. आयक्यूब ही एक उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी पूर्णपणे नवीन डिझाइनसह आहे, जी 2 बॅटरी आणि विविध कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरची किंमत 94,434 रुपयांपासून सुरू होते आणि ती 1.20 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमपर्यंत जाते. आयक्यूब 5 व्हेरियंटमध्ये आणि 12 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
TVS iQube चे 2.2kWh मॉडेल 75km ची रेंज देते. तर 3.4kWh मॉडेल 100km ची रेंज देते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की स्कूटर ही रेंज इको मोडमध्ये देते. हे रेंजचे आकडे बदलू देखील शकतात. आयक्यूबचे दोन्ही व्हेरियंट एकाच 4. 4 किलोवॅट प्रति तास मोटरद्वारे चालवले जातात आणि त्यांचा टॉप स्पीड 78 किमी प्रति तास आहे. चार्जिंग वेळेच्या बाबतीत, TVS iQube चा बेस 2.2kWh व्हेरियंट 950W चार्जर वापरून 0-80 टक्के चार्ज होण्यासाठी 2 तास लागतात.
या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्सचा विचार केला तर, यामध्ये बरेच फीचर्स आहेत. सर्व व्हेरियंटमध्ये पूर्ण एलईडी लाइटिंग आणि टीएफटी इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. आयक्यूबच्या स्टॅंडर्ड व्हेरियंटमध्ये 5-इंचाचा टीएफटी डिस्प्ले आहे. तसेच त्यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल/एसएमएस अलर्ट, जिओ-फेन्सिंग आणि ओव्हरस्पीडिंग अलर्ट सारखे सेफ्टी फीचर्स देखील आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या इतर फीचर्समध्ये एप्रनजवळ एक यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि 30 लिटरची बूट स्पेस समाविष्ट आहे.