(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तसेच २२ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीत हजारो कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. घरांमध्ये पाणी शिरणे, घरांची पडझड, पशुधनाची हानी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अशा विविध प्रकारच्या आपत्तींनंतर जिल्हा प्रशासनाने महसूल विभागासह सर्व यंत्रणा सज्ज करत मदतकार्याला गती दिली आहे. अतिवृष्टीत मृत्यू झालेल्या २० जणांच्या प्रकरणांपैकी १२ पात्र वारसांना प्रत्येकी शासन नियमानुसार मदत देत ४८ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये वारसांची पडताळणी आणि आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
१५४७२ – पूरग्रस्त कुटुंबियांची नोंद
७४६९ – पात्र कुटुंबांची मदत जमा
२२ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीत तलासा, डहाणू आणि पालघर तालुक्यातील ७ हजार ५०३ घरांमध्ये पाणी शिरले असून त्यापैकी ३ हजार ४५० पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे महसूल यंत्रणेकडून प्राधान्याने सुरू असून, कोणताही पात्र लाभार्थी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासन २४ तास कार्यरत आहे, असे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी स्पष्ट केलं.
घरांच्या नुकसानीच्या प्रकरणांमध्ये पूर्ण आणि अंशतः पडझड झालेल्या घरे, झोपड्या आणि गोठ्यांसाठी आतापर्यंत २४ लाख ९५ हजार, तर पशुधन नुकसानीच्या प्रकरणांमध्ये ३ लाख २२ हजार रुपयांचे देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे प्राथमिक नुकसान सुमारे १४८ कोटी तर जुलैच्या पहिल्या आठवड्यातील एकूण प्राथमिक नुकसान सुमारे
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत १५ हजार ४७२ पूरग्रस्त कुटुंबांची नोंद करण्यात आली त्यापैकी ७ हजार ४६९ पात्र कुटुंबाना शासन नियमानुसार ३ कोटी ६६ लाख ३१ हजार ५७५ इतकी असून आर्थिक मदत थेट बैंक खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे बैंक तपशील आणि आवश्यका कागदपत्रे पूर्ण होताच मदत वितरण केले जाणार आहे.






