Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Top Live Stories India- मंत्रिमंडळ फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना वगळले जाऊ शकते, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 20, 2026 | 05:38 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:

प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच 10 राज्यांतील ३७ जागांसाठी राज्यसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार गटातील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे किंवा श्रीरंग बारणे यापैकी एका नावावर विचार सुरू असल्याची माहिती आहे.

 

 

The liveblog has ended.
  • 20 Mar 2026 05:36 PM (IST)

    20 Mar 2026 05:36 PM (IST)

    PM Kisan Scheme: रत्नागिरीतील दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ‘पीएम किसान’चा २२ वा हप्ता जमा

    PM Kisan Scheme: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २२ हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार १७७ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति दोन हजारप्रमाणे ३१ कोटी ४३ लाख ५४ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. देशातील लहान व सीमान्त शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारतर्फे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येते. या योजनेतून जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रति २ हजार रुपये जमा करण्यात येतात. पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांची मदत करण्यात येते. तीन हप्त्यात ही रक्कम जमा होते.

  • 20 Mar 2026 05:33 PM (IST)

    20 Mar 2026 05:33 PM (IST)

    पेट्रोल महागले! कोणत्या पेट्रोलचे दर वाढले?

    जर तुम्हीसुद्धा तुमच्या कार किंवा बाईकसाठी हे विशेष इंधन वापरत असाल, तर या बातमीचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होतो. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) २० मार्च २०२६ पासून प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ करून एक मोठे पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या इंधनाच्या दरात प्रति लिटर ₹2 ने वाढ करून ते ₹2.30 करण्यात आले आहे. हा बदल आज सकाळी ६ वाजल्यापासून देशभरात लागू झाला आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 20 Mar 2026 05:28 PM (IST)

    20 Mar 2026 05:28 PM (IST)

    Samsung ची मोठी खेळी! 'हे' दोन शक्तिशाली फोन्स होणार लाँच; पाहा काय असेल खास?

    मुंबई: सॅमसंग भारतात आपले नेक्‍स्‍ट-जनरेशन गॅलेक्‍सी ए सिरीज स्‍मार्टफोन्‍स लाँच करण्‍यासाठी सज्‍ज आहे. नवीन स्‍मार्टफोन्‍स गॅलेक्‍सी ए 57 5जी आणि गॅलेक्‍सी ए37 5जी पुढील आठवड्यात लाँच होण्‍याची शक्‍यता आहे. या नवीन स्मार्टफोन्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍टपणे फोटो व व्हिडिओज कॅप्‍चर करण्‍याची कॅमेरा क्षमता असेल. या दोन स्मार्टफोन्समध्ये नवीन एआय वैशिष्‍ट्यांची भर होण्‍याची देखील शक्यता आहे, ज्याला सॅमसंग 'ऑसम इंटेलिजन्स' म्हणते.

  • 20 Mar 2026 05:19 PM (IST)

    20 Mar 2026 05:19 PM (IST)

    Iran US War: श्रीलंकेने अमेरिकेला दाखवले ‘तेवर’! अमेरिकन फायटर जेटला लँडिंग नाकारले; राष्ट्राध्यक्षांनी ठणकावून सांगितले…

    सध्या मुस्लिम जगात एकाकी पडलेल्या इराणला श्रीलंकेकडून महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी संसदेत माहिती दिली की, त्यांच्या प्रशासनाने दोन अमेरिकन लढाऊ विमानांना आपल्या हद्दीत उतरण्याची परवानगी नाकारली आहे. अमेरिकेने या परवानगीसाठी वारंवार विनंती केली होती, परंतु श्रीलंकेने ती ठामपणे फेटाळून लावली. जर या दोन लढाऊ विमानांना श्रीलंकेत तळ मिळाला असता, तर अमेरिकेने इराणवर कदाचित मोठा हल्ला चढवला असता. संसदेत बोलताना दिसानायके म्हणाले, “आम्ही युद्धाचे पुरस्कर्ते नाही. तसेच, श्रीलंकेला या संघर्षात ओढले जाण्याची परवानगीही आम्ही देणार नाही. आमच्या दृष्टीने अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश समान पातळीवर आहेत. जर आम्ही या युद्धात इराणला कोणतीही मदत करत नसू, तर मग आम्ही अमेरिकेला का मदत करावी?”

  • 20 Mar 2026 05:10 PM (IST)

    20 Mar 2026 05:10 PM (IST)

    आखातातील युद्धाचा टरबुजालाही फटका!

    येवला : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता कृषी क्षेत्रावरही जाणवू लागला आहे. टरबूजाच्या निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम झाल्याने स्थानिक बाजारपेठेत टरबूजाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने मागणीत सातत्याने घट होत आहे मागणी घटल्यामुळे टरबूजाचे चाजारभाव घसरले असून शेतकऱ्यांना कवडीमोल दरात माल विकण्याची वेळ आली आहे. परिणामी येवला तालुक्यातील टरबूज उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

  • 20 Mar 2026 05:04 PM (IST)

    20 Mar 2026 05:04 PM (IST)

    Foreign Policy: S Jaishankar आणि बांगलादेशच्या उच्चायुक्तांची भेट; Tarique Rahman Govt सोबत भारताची ‘बॅटिंग’ जोरातForeign Policy: S Jaishankar आणि बांगलादेशच्या उच्चायुक्तांची भेट; Tarique Rahman Govt सोबत भारताची ‘बॅटिंग’ जोरात

    S Jaishankar meets Bangladesh High Commissioner : दक्षिण आशियातील भू-राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना, भारत आणि बांगलादेश (Bangladesh) या दोन शेजारील देशांनी आपल्या मैत्रीचा नवा अध्याय लिहिण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशातील अलीकडील सत्तांतरानंतर निर्माण झालेली अस्थिरता आता संपुष्टात आली असून, तारिक रहमान (Tariq Rahman) यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारसोबत भारताने सकारात्मक पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी, २० मार्च २०२६ रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Indian Foreign Minister S. Jaishankar) यांनी बांगलादेशचे उच्चायुक्त रियाझ हमीदुल्ला यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

  • 20 Mar 2026 04:50 PM (IST)

    20 Mar 2026 04:50 PM (IST)

    डोंबिवलीकरांना एमआयडीसीचा पाणी बिलावर ‘डिपॉझिट’ धक्का!.

    डोंबिवली एमआयडीसी क्षेत्रातील निवासी, औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांना पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीकडून दर महिन्याला पाण्याची बिले पाठवली जातात. वर्षभरापूर्वीच पाणी दरात वाढ करण्यात आली होती. सध्या निवासी ग्राहकांसाठी ९.२५ रुपये प्रति क्यूबिक मीटर तर औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांसाठी २५.२५ रुपये प्रति क्यूबिक मीटर दर आकारला जात आहे. त्याशिवाय ड्रेनेज चार्जेस आणि त्यावर १८ टक्के जीएसटीही आकारला जात असल्याने बिलाचा आकडा मोठा होत आहे.आता या बिलांमध्ये अतिरिक्त अनामत रक्कम (डिपॉझिट) समाविष्ट करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत वितरित झालेल्या बिलांमध्ये अनेक ग्राहकांना ५०० रुपयांपासून ९४५० रुपयांपर्यंत तर काहींना १० ते १२ हजार रुपयांपर्यंत डिपॉझिट भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही रक्कम २३ मार्च २०२६ पर्यंत एकरकमी भरण्याची अट घालण्यात आली आहे.एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, मागील दहा महिन्यांच्या सरासरी बिलाच्या आधारावर तीन महिन्यांचे बिल डिपॉझिट म्हणून घेतले जाते. पूर्वी भरलेली अनामत रक्कम कमी असल्यास उर्वरित रक्कम ‘अतिरिक्त डिपॉझिट’ म्हणून ग्राहकांना आकारली जात आहे.

  • 20 Mar 2026 04:45 PM (IST)

    20 Mar 2026 04:45 PM (IST)

    स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भाविकांची मोठी गर्दी

    अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमि त्त पेण तालुक्यातील सावरसई येथील स्वामी समर्थ मठात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. 20 मार्च 2026 रोजी साजऱ्या झालेल्या या उत्सवात भक्तांनी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने सहभाग घेतला.
    “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” या दिलासादायक वचनांनी लाखो भक्तांच्या जीवनात आधार निर्माण करणाऱ्या स्वामी समर्थांच्या 170 व्या प्रकट दिनानिमित्त मठात दिवसभर धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. सकाळपासूनच स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.यावेळी अभिषेक, आरती, पालखी सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मठ परिसर भक्तिगीत, नामस्मरण आणि उत्साहाने दुमदुमून गेला होता.चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ अक्कलकोट येथे प्रकट झाल्याची मान्यता आहे. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर भगवान दत्तात्रेयांचा तिसरा अवतार म्हणून स्वामी समर्थांना मानले जाते. अक्कलकोट येथे त्यांनी प्रदीर्घ काळ वास्तव्य करून लाखो भक्तांना मार्गदर्शन केले.

  • 20 Mar 2026 04:40 PM (IST)

    20 Mar 2026 04:40 PM (IST)

    .बदलापूर-अंबरनाथकरांचा प्रवास गतिमान होणार

    येत्या काळात बदलापूर-अंबरनाथकरांचा प्रवास गतिमान होणारंय.. कासगाव-कामोठे नव्या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेला रेल्वे मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवलाय. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत नव्या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाला मंजुरी देण्यात आलीय. या नव्या रेल्वे मार्गामुळे बदलापूरहून नवी मुंबईला अवघ्या 30 मिनिटांत जाता येईल. याशिवाय नव्या कनेक्टिव्हिटीमुळे वांगणी-बदलापूर परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.

  • 20 Mar 2026 04:35 PM (IST)

    20 Mar 2026 04:35 PM (IST)

    वसई विरार महानगरपालिका ची महासभा

    आज वसई-विरारकरांसाठी महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. वसई विरार महानगरपालिका ची महासभा  मुख्यालयात पार पडणार असून, शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही सभा निर्णायक मानली जात आहे. या महासभेत तब्बल ३९ मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच विकास आराखड्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मांडले जाण्याची शक्यता आहे.वसई आणि विरार परिसरातील नागरिकांचे लक्ष या सभेकडे लागले असून, शहराला नेमकं काय नवीन मिळणार, कोणते प्रकल्प मंजूर होणार आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

     

  • 20 Mar 2026 04:30 PM (IST)

    20 Mar 2026 04:30 PM (IST)

    केडीएमसीचा ३ हजार १८६ कोटी रुपयांचा अर्थ संकल्प सादर

    कल्याण डोंबिवली महापालिकेचा २०२६-२७ सालाकरीता ३ हजार १८६ कोटी ६० लाख रुपयांचा अर्थ संकल्प महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी शुक्रवारी पार पडलेल्या महासभेत सादर केला. यामध्ये जमा आणि खर्चाच्या बाजूसह मागच्या वर्षीच्या सुधारीत अर्थ संकल्पानुसार आरंभिची शिल्लक ५७२ कोटी ७६ लाख रुपये दाखविण्यात आली आहे. कोणतीही करवाढ दरवाढ नसलेल्या यंदाच्या अर्थ संकल्पात नागरीकांसाठी पूरविण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधांसह विकास प्रकल्पाकरीता ३ हजार १८६ काेटी ४९ लाखाचा खर्च अपेक्षित आहे.

  • 20 Mar 2026 04:25 PM (IST)

    20 Mar 2026 04:25 PM (IST)

    कासगाव-कामोठे नव्या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेला मंजुरी

    येत्या काळात बदलापूर-अंबरनाथकरांचा प्रवास गतिमान होणारंय.. कासगाव-कामोठे नव्या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेला रेल्वे मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवलाय. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत नव्या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाला मंजुरी देण्यात आलीय. या नव्या रेल्वे मार्गामुळे बदलापूरहून नवी मुंबईला अवघ्या 30 मिनिटांत जाता येईल. याशिवाय नव्या कनेक्टिव्हिटीमुळे वांगणी-बदलापूर परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.

  • 20 Mar 2026 04:20 PM (IST)

    20 Mar 2026 04:20 PM (IST)

    “महासभेत एक्सपायर औषधांचा मुद्दा तापला!”

    वसई-पश्चिम येथील Sir D. M. Petit Hospital येथे रुग्णाला एक्सपायर झालेली औषध देण्यात आल्याच्या प्रकरणावरून आज राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर महासभा सुरू होताच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विशाल जाधव व अभय कक्कड यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.दोन्ही नगरसेवकांनी “एक्सपायर औषध प्रकरणात अद्याप दोषींवर कारवाई नाही” असा मजकूर असलेला पोशाख परिधान करून सभागृहात प्रवेश केला. या कृतीमुळे सभागृहात एकच खळबळ उडाली.

  • 20 Mar 2026 04:15 PM (IST)

    20 Mar 2026 04:15 PM (IST)

    ऐरोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रांचे आकर्षक प्रदर्शन

    ऐरोलीत ममित चौगुले युवा प्रतिष्ठानच्या वतीने व आपला कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळच्या वेळी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रा मध्ये मोठ्या संख्येने महिलांनी वेशभूषा करून शोभा यात्रेत सहभागी झालेल्या तसेच लहान मुलांनी छत्रपती शिवाजी काळात वापरण्यात आलेली शस्त्र या शस्त्र कशी वापरली जातात याचे त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले

  • 20 Mar 2026 04:10 PM (IST)

    20 Mar 2026 04:10 PM (IST)

    स्वच्छ समृद्ध मिशन”साठी गोळेगणी सज्ज; ग्रामस्थांच्या सहभागातून यश

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी ग्रामपंचायतीने विकासाची उल्लेखनीय भरारी घेतली असून, “स्वच्छ समृद्ध मिशन”साठी गावाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. गावात रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला असून पाणी साठवणूक आणि संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. तसेच गोळेगणी गावाने हागणदारी मुक्त गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य देत संपूर्ण गावात स्वच्छ व सुंदर परिसर निर्माण करण्यात ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदवला आहे.

  • 20 Mar 2026 04:01 PM (IST)

    20 Mar 2026 04:01 PM (IST)

    APMC बाजारात लालसोबत पिवळ्या कलिंगडाची एंट्री, दरात 15 ते 20 रुपयांची मोठी घसरण

    गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लाल कलिंगडसोबत पिवळा कलिंगड दाखल झाला आहे.अगदी आरोग्य वर्धक आणि खाण्यास गोड,रुचकर असलेल्या कालींगडाला परदेशातही मोठी मागणी असते मात्र युद्धामुळे दळणवळण बंद असल्याने आखाती देशात जाणारा माल एपीएमसी बाजारात आल्याने आवक मोठी झाली आहे. त्यामुळे मागच्या तुलनेमध्ये दरांमध्ये जवळपास 15 ते 20 रुपयांची घट झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.पिवळ्या कलिंगडाला केवळ 9 ते 10 रुपये तर पिवळ्या कलिंगडाला 20 ते 25 रुपयांचा दर मिळत असून,हे अल्प दर असून यात आमच्यासह शेतकऱ्यांचे ही मोठे नुकसान आहे. त्यामुळे युद्धविराम लवकर मिळवा.अशी आशाही यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

  • 20 Mar 2026 04:00 PM (IST)

    20 Mar 2026 04:00 PM (IST)

    अकोल्यात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक संपावर!

    Akola : राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांकडून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत राज्यभरातील सुमारे १७ लाख कर्मचारी व शिक्षक २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अकोला येथून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत हा इशारा देण्यात आला आहे. कर्मचारी संघटनांच्या मते, गेल्या वर्षभरापासून विविध मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. नव्या युती सरकारकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकशाही मार्गाने अनेक आंदोलनात्मक कृती केल्या आहेत.

  • 20 Mar 2026 03:45 PM (IST)

    20 Mar 2026 03:45 PM (IST)

    चवदारही खायचंय? मग आजच घरी बनवा मसालेदार ‘Quinoa Khichdi ‘

    क्विनोआ खिचडी ही आजच्या आरोग्यदायी जीवनशैलीत झपाट्याने लोकप्रिय होत असलेली एक पौष्टिक आणि हलकी डिश आहे. पारंपरिक खिचडीमध्ये आपण तांदूळ आणि डाळ वापरतो, पण क्विनोआ हा एक सुपरफूड असल्यामुळे त्यात प्रथिने, फायबर, लोह आणि अनेक आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ही खिचडी वजन कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

  • 20 Mar 2026 03:30 PM (IST)

    20 Mar 2026 03:30 PM (IST)

    Mangal Gochar: मंगळाच्या तिहेरी बदलामुळे या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब

    एप्रिलमध्ये मंगळाची हालचाल विशेष लक्षणीय असेल, कारण या महिन्यात तो तीन वेळा आपली स्थिती बदलेल. मंगळ गुरुवार, २ एप्रिल रोजी दुपारी ३:३७ वाजता मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर मंगळ सोमवार, ६ एप्रिल रोजी रात्री १०:०४ वाजता उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करेल. अखेरीस, शुक्रवार, २४ एप्रिल रोजी पहाटे २:३० वाजता मंगळ रेवती नक्षत्रात प्रवेश करेल, जे त्या नक्षत्रातील २७ वे नक्षत्र आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाच्या या तीन संक्रमणामुळे तुमचे धन, वाहने, घर आणि मालमत्ता यांसंबंधीचे सुख वाढण्याची शक्यता आहे. हा काळ प्रयत्न आणि गुंतवणुकीसाठीही अनुकूल मानला जातो. मंगळाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, ते जाणून घ्या

  • 20 Mar 2026 03:20 PM (IST)

    20 Mar 2026 03:20 PM (IST)

    श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधत ‘स्वामी गुरुमाऊली’ गाणं प्रदर्शित

    श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त ‘स्वामी गुरुमाऊली’ हे भक्तीमय गाणं नुकतंच प्रेक्षकांसमोर आले आहे. स्वामींचा महिमा अपरंपार असून त्यांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो.अभिनेता सनी कांबळे आणि तेजस पानसरे यांनी ‘टाइमलेस स्लेट्स’ नावाचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. या बॅनरअंतर्गत गाणी, शॉर्ट फिल्म्स, फीचर फिल्म्स आणि जाहिराती बनवण्याचा त्यांनी मानस दर्शवला आहे.‘स्वामी गुरुमाऊली’ हे गाणं या बॅनरखाली प्रदर्शित झालं असून, त्याचे दिग्दर्शन अभिनेता सनी कांबळे यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘विशू’, ‘एका ब्रेकअपची गोष्ट’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

  • 20 Mar 2026 03:10 PM (IST)

    20 Mar 2026 03:10 PM (IST)

    Global Security: UAEचा दुबईत 'सर्जिकल स्ट्राईक'!

    UAE Iran Conflict March 2026 : मध्य-पूर्वेतील रणसंग्राम आता केवळपणास्त्रे आणि ड्रोनपुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक युद्धाचा नवा चेहरा आता ‘आर्थिक नाकेबंदी’ (Economic Warfare) म्हणून समोर येत आहे. शुक्रवारी, २० मार्च रोजी संयुक्त अरब अमिरातीने (UAE) घेतलेल्या एका धाडसी निर्णयाने इराणच्या (Iran) गोटात मोठी खळबळ उडाली आहे. यूएईने कोणतीही लष्करी घोषणा न करता इराणची सहयोगी संघटना ‘हिजबुल्लाह’च्या पाच प्रमुख सदस्यांना अटक करून त्यांचे जागतिक स्तरावर पसरलेले आर्थिक जाळे कापून टाकले आहे.

  • 20 Mar 2026 03:05 PM (IST)

    20 Mar 2026 03:05 PM (IST)

    प्रथमच CET ची दोन प्रवेशपत्रे! परीक्षा केंद्राची माहिती अंतिम प्रवेशपत्रात

    राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदवीपूर्व आणि पदव्युत्तर १७ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा २४ मार्च २०२६ ते १६ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. यंदाच्या प्रक्रियेत प्रथमच मोठा बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांना दोन प्रकारची प्रवेशपत्रे देण्यात येणार आहेत.

  • 20 Mar 2026 02:50 PM (IST)

    20 Mar 2026 02:50 PM (IST)

    200 मृत्यूंनंतरही ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजना कागदावरच

    चंद्रपूर: मानव-बिबट्या संघर्षांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून तयार करण्यात आलेली ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजना चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. गत पाच वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यांत सुमारे २०० नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद असताना, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर आधारित ही योजना तातडीने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

  • 20 Mar 2026 02:45 PM (IST)

    20 Mar 2026 02:45 PM (IST)

    होर्मुझवर इराणची ‘वसुली’! युद्धाच्या आडोशाने कमावणार 73 अब्ज डॉलर्स

    इस्रायल आणि अमेरिका (US-Israel Iran War) यांच्याशी सुरू असलेल्या संघर्षाच्या धुराळ्यात इराणने एक अशी खेळी खेळली आहे, ज्याने जागतिक व्यापार जगतात खळबळ उडाली आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’वर (Strait of Hormuz) आता इराणने आपला मालकी हक्क सांगत चक्क ‘टोल’ आकारायला सुरुवात केली आहे. हा केवळ कर नसून, युद्धाच्या काळात पैसा कमावण्याचा आणि लष्करी कवच मिळवण्याचा इराणचा एक मोठा डाव मानला जात आहे.

  • 20 Mar 2026 02:40 PM (IST)

    20 Mar 2026 02:40 PM (IST)

    पालिका रुग्णालयांत लवकरच सुरू होणार MRI सेवा

    मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये लवकरच एमआरआय सेवा उपलब्ध होणार असून यासाठी आवश्यक टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संबंधित कंत्राटदाराला (सर्वात कमी दर) आधारावर काम देण्यात आले असून प्रत्येक रुग्णालयासाठी स्वतंत्र वर्क ऑर्डर जारी करण्यात आली आहे, अशी माहिती प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली. यामुळे मुंबईतील सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, महानगरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • 20 Mar 2026 02:40 PM (IST)

    20 Mar 2026 02:40 PM (IST)

    शेतकऱ्यांसमोर सालगडी मिळविण्याचे आव्हान; शेती बटाईने देण्याचे कल

    देहूगांव : गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा महाराष्ट्रातील प्रमुख सण असून शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस मानला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवशी शेतकऱ्यांकडून शेतात नवीन तास काढणे तसेच शेतीकामासाठी सालगडी ठेवण्याची परंपरा पाळली जाते. मात्र यंदा गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर सालगडी मिळविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

  • 20 Mar 2026 02:35 PM (IST)

    20 Mar 2026 02:35 PM (IST)

    अमेरिका-इस्रायलला 6 महिने नडण्याची भाषा करणारे General Naeini ठार

    Ali Mohammad Naeini IRGC Death : मध्य-पूर्वेतील धगधगत्या युद्धात (US-Israel Iran War) इराणला आतापर्यंतचा सर्वात मोठा मानसिक धक्का बसला आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे मुख्य प्रवक्ते आणि इराणच्या मानसिक युद्धाचे (Psychological Warfare) अधिपती मानले जाणारे ब्रिगेडियर जनरल अली मोहम्मद नाईनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणवरील ताज्या हल्ल्यांमध्ये ते ठार झाल्याचे वृत्त आहे. नाईनी हे केवळ प्रवक्ते नव्हते, तर इराणच्या प्रत्येक लष्करी हालचालीला जगासमोर ‘अजेय’ म्हणून मांडणारे ते मुख्य सूत्रधार होते.

  • 20 Mar 2026 02:27 PM (IST)

    20 Mar 2026 02:27 PM (IST)

    ‘राजा शिवाजी’ टीझरला प्रेक्षकांची पसंती; Riteish Deshmukh चा शिवराय अवतार पाहून प्रेक्षक भावूक

    मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा भव्य टीझर नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून, प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सणाचा दिवस असूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक थिएटरमध्ये दाखल झाले होते. विशेष म्हणजे 'धुरंधर द रिव्हेंज' हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना ‘राजा शिवाजी’च्या टीझरची खास झलक अनुभवायला मिळाली आणि थिएटरमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली.

  • 20 Mar 2026 02:15 PM (IST)

    20 Mar 2026 02:15 PM (IST)

    युद्धाच्या आडोशाने कमावणार 73 अब्ज डॉलर्स

    इस्रायल आणि अमेरिका (US-Israel Iran War) यांच्याशी सुरू असलेल्या संघर्षाच्या धुराळ्यात इराणने एक अशी खेळी खेळली आहे, ज्याने जागतिक व्यापार जगतात खळबळ उडाली आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’वर (Strait of Hormuz) आता इराणने आपला मालकी हक्क सांगत चक्क ‘टोल’ आकारायला सुरुवात केली आहे. हा केवळ कर नसून, युद्धाच्या काळात पैसा कमावण्याचा आणि लष्करी कवच मिळवण्याचा इराणचा एक मोठा डाव मानला जात आहे.

  • 20 Mar 2026 02:00 PM (IST)

    20 Mar 2026 02:00 PM (IST)

    200 मृत्यूंनंतरही ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजना कागदावरच

    चंद्रपूर: मानव-बिबट्या संघर्षांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून तयार करण्यात आलेली ‘बिबट समस्यामुक्त ग्राम’ योजना चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. गत पाच वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यांत सुमारे २०० नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद असताना, प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर आधारित ही योजना तातडीने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

  • 20 Mar 2026 01:55 PM (IST)

    20 Mar 2026 01:55 PM (IST)

    मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी, एका ईमेलमुळे मोठी खळबळ

    गेल्या काही दिवसापासून धमकीचे सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा ईमेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये क्लबच्या आवारात गॅस बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे. गुरुवारी (19 मार्च) सकाळी 7.33 वाजता प्रेस कल्बच्या ईमेलवर स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती.

    या घटनेची माहिती मिळताच, मुंबई पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बॉम्ब शोधक आणि निवारण पथक (BDDS) आणि श्वान पथकाला तैनात करून संपूर्ण परिसरात सखोल तपास मोहीम राबवली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, कॅम्पसमधील हालचाल मर्यादित ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

  • 20 Mar 2026 01:45 PM (IST)

    20 Mar 2026 01:45 PM (IST)

    Oppo ने गुपचूप लाँच केला 6,500mAh बॅटरीवाला स्वस्त 5G फोन

    मिळालेल्या माहितीनुसार, ओप्पो कंपनीचा नवीन Oppo A6s 5G स्मार्टफोन दोन रॅम+ स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपयांपासून सुरु होते आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज या व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस ऑरोरा गोल्ड आणि प्लम पर्पल या रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. यास्मार्टफोनच्या खरेदीवर 1 हजार रुपयांचे इंस्टेंट कॅशबॅक देखील ऑफर केले जाणार आहे. कंपनी एसबीआय कार्ड्स, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, बीओबी कार्ड्स, येस बँक, फेडरल बँक, डीबीएस आणि इतर बँकांच्या क्रेडिट कार्डवर 3 महिन्यांची नो कॉस्ट ईएमआय सुविधा देखील देत आहे. हे नवीन डिव्हाइस ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ओप्पो इंडियाच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.  

  • 20 Mar 2026 01:35 PM (IST)

    20 Mar 2026 01:35 PM (IST)

    Nora Fatehi च्या ‘सरके चुनर’ गाण्याची गायिका कोण?

    गायिकेचे खरे नाव सत्यवती राठोड असून, तिचा जन्म १० जून १९९४ रोजी आंध्र प्रदेशातील गुटी येथे झाला. तिने २०१७ मध्ये एक सार्वजनिक/रेकॉर्डेड कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हापासून दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टी तसेच लोकसंगीतात आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत तिने किमान ८० गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

     

  • 20 Mar 2026 01:25 PM (IST)

    20 Mar 2026 01:25 PM (IST)

    IPL 2026 च्या सलामीच्या सामन्यांमधून मिचेल स्टार्क बाहेर

    नॅथन एलिस, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड जखमी झाल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढत आहेत. हे तिघेही ऑस्ट्रेलियाचे प्रमुख गोलंदाज आहेत. मिचेल स्टार्कची तंदुरुस्ती लक्षात घेऊन, त्यांनी ठरवले आहे की हेझलवूड आणि कमिन्सप्रमाणेच तोही आयपीएलचे सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही.

  • 20 Mar 2026 01:15 PM (IST)

    20 Mar 2026 01:15 PM (IST)

    आज घरातच थांबा; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस धुवून काढणार

    सोलापूर, चंद्रपूर , नांदेड, पुणे, कोल्हापूर आणि अन्य जिल्ह्यात वीजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.  राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. कालदेखील राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

    गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या खराब हवामानाचा शेतीपिकांवर मोठा परिणाम होत आहे. रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.

     

  • 20 Mar 2026 01:05 PM (IST)

    20 Mar 2026 01:05 PM (IST)

    ‘बेवारस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस!

    हरिणी प्रॉडक्शन्स निर्मित आणि शिव आर्यन फिल्म्स प्रस्तुत ‘बेवारस’ या चित्रपटाची निर्मिती रिया कुमार आणि नितीन विचारे यांनी केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन विजय राणे यांनी सांभाळले असून, पटकथा आणि संवाद लेखन शिरीष लाटकर यांचे आहे. गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन विवेक आपटे, यूजीन डिसोझा आणि महेश कोळी यांनी केले आहे. छायांकन अमीर हडकर, पार्श्वसंगीत आणि संकलनाची जबाबदारी अनुक्रमे संबंधित तंत्रज्ञांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.

  • 20 Mar 2026 01:00 PM (IST)

    20 Mar 2026 01:00 PM (IST)

    गुजरातमध्ये समान नागरी संहिता लागू करण्याची तयारी; एकापेक्षा जास्त विवाहाला 7 वर्षांची शिक्षा

    गुजरातने समान नागरी संहिता लागू करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उच्चारले आहे. राज्य मंत्रिमंडळाने गुजरात समान नागरी संहिता २०२६ विधेयकाला मंजुरी दिली आहे. ते विधानसभा सचिवालयाकडे पाठवण्यात आले आहे. हे विधेयक या अधिवेशनात सादर केले जाईल, यापूर्वी, उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता लागू करण्यात आली होती. या विधेयकात अनुसूचित जमाती समुदाय वगळता इत्तर सर्व समुदायांसाठी विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह-इन रिलेशनशिप (सहजीवन) यासंबंधी सर्वसमावेशक नियम आणि कायदे नमूद केले आहेत, हे विधेषक सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशींच्या आधारे तयार करण्यात आले होते. गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी राज्य सरकारने ही समिती स्थापन केली होती. समितीने मंगळवारी आपला अंतिम अहवाल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना सादर केल्ला, त्यानंतर मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली.

  • 20 Mar 2026 12:55 PM (IST)

    20 Mar 2026 12:55 PM (IST)

    इतिहासात पहिल्यांदाच एका डॉलरचे मूल्य 93 पार, भारतीय चलनाला मोठा फटका

    मध्य आशियातील वाढता युद्धजन्य तणाव आणि कच्चा तेलाच्या किमतीत झालेली अनपेक्षित वाढ झाली आहे. शुक्रवारी (20 मार्च 2026) भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा इशारा मिळाला. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत प्रथमच ९३ रुपयांच्या पातळीजवळ पोहोचला. ही घसरण केवळ एक आकडा नसून, जागतिक तणाव आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा थेट परिणाम आहे. ज्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसू शकतो.

  • 20 Mar 2026 12:50 PM (IST)

    20 Mar 2026 12:50 PM (IST)

    अमेरिकेने हल्ला केला तर ग्रीनलँडमध्ये 'विनाश' घडवणार; डेन्मार्कचा गुप्त प्लॅन

    Trump Greenland Purchase Conflict : जागतिक राजकारणात कधी कोण कोणाचा शत्रू बनेल हे सांगता येत नाही. पण जेव्हा नाटो (NATO) सारख्या बलाढ्य संघटनेचे दोन सदस्य देश एकमेकांविरुद्ध शस्त्र उपसण्याची भाषा करतात, तेव्हा जग हादरून जातं. असाच काहीसा प्रकार सध्या अमेरिका आणि डेन्मार्क यांच्यात पाहायला मिळत आहे. निमित्त आहे जगातील सर्वात मोठे बेट 'ग्रीनलँड'. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा ग्रीनलँडवर असलेला डोळा आणि डेन्मार्कचा आपल्या सार्वभौमत्वासाठी असलेला बाणा यामुळे हे दोन मित्र युद्धाच्या उंबरठ्यावर आले आहेत.

  • 20 Mar 2026 12:45 PM (IST)

    20 Mar 2026 12:45 PM (IST)

    US-Israel-Iran War Impact: शेतकऱ्यांना आर्थिक फटका

    ठाणे: आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धस्थितीचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवरही दिसून येऊ लागला आहे. ठाण्यातील जांभळी नाका येथील मुख्य भाजी बाजारात याचे स्पष्ट परिणाम जाणवत असून काही भाज्यांच्या दरांमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. निर्यातीसाठी जाणारा भाजीपाल्याचा माल सध्या मोठ्या प्रमाणात थांबला असल्याने काकडी, दुधी भोपळा, कारली यांसारख्या भाज्यांचा साठा स्थानिक बाजारात वाढला आहे. परिणामी या भाज्यांचे दर साधारण दहा ते पंधरा रुपयांनी कमी झाले आहेत.

    बाजारात पुरवठा वाढल्यामुळे व्यापाऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. निर्यात थांबल्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे. निर्यातीसाठी पिकवलेला माल स्थानिक बाजारातच विकावा लागत असल्याने त्यांना कमी दरात व्यवहार करावे लागत आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि व्यापारी दोघेही सध्या चिंतेत असल्याचे बाजारातील चित्र आहे.

  • 20 Mar 2026 12:40 PM (IST)

    20 Mar 2026 12:40 PM (IST)

    Satara ZP Budget 2026-27 : ४५ कोटींच्या बजेटला प्रशासकीय हिरवा कंदील

    Satara ZP Budget 2026-27: जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नोटीस कालावधी उपलब्ध न झाल्याने, सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या ४५ कोटी ४० लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास बुधवारी (दि. १८) प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत या अर्थसंकल्पाला अंतिम मंजूरी दिली जाणार आहे. सातारा जिल्हा परिषदेचे सदरचे बजेट मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानतंर त्यांनी ते सभागृहासमोर सादर केले.

  • 20 Mar 2026 12:35 PM (IST)

    20 Mar 2026 12:35 PM (IST)

    सांगोल्यात दहावीच्या पेपर चोरीचा छडा

    सांगोला : सांगोला येथील सांगोला विद्यामंदिर शाळेतून दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या दहावीच्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका शोधण्यात पोलिसांना अखेर यश आले. याप्रकरणी त्याच केंद्रावर परीक्षा देणाऱ्या एका विधी संघर्षित अल्पवयीन विद्यार्थ्यांचा सहभाग उघड झाला आहे. विशेष म्हणजे, हे कृत्य करणारा विद्यार्थी स्वतः दहावीत शिकत असून, भूगोलाचा पेपर दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या शोधमोहिमेचा असा नाट्यमयरित्या शेवट झाला आहे.

  • 20 Mar 2026 12:30 PM (IST)

    20 Mar 2026 12:30 PM (IST)

    खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? काँग्रेसचा सवाल

    मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम बापू आहे. आसाराम बापू, राम रहिम यांनी जे केले तेच या अशोक खरातने केले असून ५८ व्हिडिओ नाही तर सखोल चौकशी केली तर शेकडो व्हिडिओ उघड होतील. महिलांचे शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाला कठोर शिक्षा तर झाली पाहिजे अशी मागणी करून आजपर्यंतचे त्याचे कारनामे पाहता त्याला कोणाचा तरी राजकीय आशिर्वाद असला पाहिजे, त्याच्या मागे ही कोणती राजकीय शक्ती आहे, ते महाराष्ट्राच्या जनतेला समजले पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

  • 20 Mar 2026 12:25 PM (IST)

    20 Mar 2026 12:25 PM (IST)

    निसर्ग कोपला अन् कर्ज नडलं; मळणगावच्या कष्टकरी शेतकऱ्याचा विदारक अंत

    Kavathe Mahankal: शेतकऱ्याच्या घामाने हिरवीगार झालेली द्राक्षबाग… आणि त्याच बागेशेजारी अखेर गळफास घेतलेला मालक… हे दृश्य पाहून मळणगाव आज अक्षरशः सुन्न झाले आहे. कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या एका कष्टकरी शेतकऱ्याने जगण्याचा धागाच तोडून टाकला आणि संपूर्ण गावावर दुःखाची काळी छाया पसरली. प्रतापराव श्रीपतराव शिंदे (वय ५४) या मेहनती द्राक्षबागायतदाराने आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.

     

  • 20 Mar 2026 12:20 PM (IST)

    20 Mar 2026 12:20 PM (IST)

    IPL 2026 : संजू सॅमसन आणि एमएस धोनी यांच्या संभाषणाचा Video Viral

    Sanju Samson M.S. Dhoni video viral : आयपीएल २०२६ अवघ्या काही दिवसांवर आहे. १९वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. यावर्षी अनेक खेळाडू नवीन फ्रँचायझींसाठी खेळताना दिसतील. संजू सॅमसन सीएसकेकडून, तर रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. आयपीएलच्या आधी संजू सॅमसन सीएसकेच्या कॅम्पमध्ये सामील झाला आहे. तो एम.एस. धोनीसोबत गप्पा मारतानाही दिसला.

    credit - social media and Twitter

  • 20 Mar 2026 12:15 PM (IST)

    20 Mar 2026 12:15 PM (IST)

    पाटण तालुक्यात 23 ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 28 एप्रिलला मतदान

    तालुक्यातील थेट सरपंच, सदस्य यांचे निधन, राजीनामा, अनर्हता अथवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार पाटण तालुक्यातील ६ ठिकाणी थेट सरपंच व १७ ग्रामपंचायतींमधील सदस्य अशा एकूण २३ ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांची पोट निवडणूक होणार आहे. यासाठी २८ एप्रिल प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा निवडणूक रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे.

  • 20 Mar 2026 12:04 PM (IST)

    20 Mar 2026 12:04 PM (IST)

    होर्मुझचं संकट टळणार? नेतान्याहू यांचा इराणला सज्जड इशारा

    Benjamin Netanyahu Iran War Statement : गेल्या अनेक दिवसांपासून धगधगत असलेल्या इराण-इस्रायल युद्धाच्या (US-Israel Iran War) पार्श्वभूमीवर आज एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. २० मार्च २०२६ रोजी घेतलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जागतिक शांततेच्या दृष्टीने मोठी विधाने केली. "इराणसोबतचे युद्ध लोकांच्या अपेक्षेपेक्षा लवकर संपेल," हा त्यांचा दावा आता जगभरातील चर्चेचा विषय ठरला आहे.

  • 20 Mar 2026 11:57 AM (IST)

    20 Mar 2026 11:57 AM (IST)

    प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात रोलआऊट झाले नवे अपडेट

    ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म BGMI ने त्यांचे 4.3 वर्जन अपडेट भारतात रोलआऊट केले आहे. BGMI प्लेअर्ससाठी जारी करण्यात आलेले हे नवीन अपडेट गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला प्ले स्टोअरवरून हे अपडेट डाऊनलोड करण्यात अडचण येत असेल किंवा कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत असेल प्लेअर्स अधिकृत वेबसाईटवरून APK फाइल डाऊनलोड करू शकणार आहेत. नवीन अपडेट प्लेअर्सचा अनुभव सुधारण्यासाठी, परफॉर्मंस सुधारण्यासाठी, नवीन कंटेट जोडण्यासाठी आणि गेम अधिक स्मूथ होण्यासाठी जारी करण्यात आले आहे. या नवीन अपडेटमध्ये प्लेअर्स अधिक चांगले कनेक्शन, कमी लॅग आणि नवीन थीमचा अनुभव करू शकणार आहेत.

  • 20 Mar 2026 11:47 AM (IST)

    20 Mar 2026 11:47 AM (IST)

    धक्कादायक…! इराणने एका 19 वर्षीय खेळाडूला दिली फाशी, या गुन्ह्यासाठी दिली शिक्षा

    सालेह मोहम्मदीला फाशी: इराणच्या इस्लामिक सरकारने कुस्तीपटू सालेह मोहम्मदीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. सईद दाऊदी आणि मेहदी घासेमी या इतर दोन व्यक्तींनाही फाशी देण्यात आली. सरकारविरोधी आंदोलनादरम्यान दोन पोलिसांच्या हत्येचा आरोप या तिघांवर होता. या प्रकरणात त्यांना ८ जानेवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली होती. सालेह मोहम्मदीसह या तिघांनाही १९ मार्च २०२६ रोजी कोम येथे फाशी देण्यात आली.

  • 20 Mar 2026 11:37 AM (IST)

    20 Mar 2026 11:37 AM (IST)

    गाडीचा कंट्रोल सुटला अन् थेट जगबुडीच्या…; खेडमध्ये घडला विचित्र अपघात

    मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नजीकच्या नव्या जगबुडी पुलावर रत्नागिरीकडे जाणाच्या कार चालकाचे अचानक नियंत्रण सुटून कार कार थेट जगबुडी नदीच्या कठड्यावर जाऊन चढली. मात्र या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. अपघात इतका भीषण होता की, कार थेट नदीकाठी असलेल्या कठड्यावर जाऊन अडकली. कारचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला असून गाडीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोणालाही दुखापत झाली सुदैवाने नाही.

Web Title: Maharashtra breaking news 20th march live updates maharashtra politics national international crime viral video sports world war3 us israel iran war breaking updates in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • India news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात काय बी घडू शकतंय! ना पूर, ना पाऊस तरीही शहरात पाणीच पाणी; नेमका विषय तरी काय?
1

पुण्यात काय बी घडू शकतंय! ना पूर, ना पाऊस तरीही शहरात पाणीच पाणी; नेमका विषय तरी काय?

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात
2

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात

उन्हाळ्यात गावी जायचंय? Central Railway ने प्रवाशांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा
3

उन्हाळ्यात गावी जायचंय? Central Railway ने प्रवाशांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

Ram Navami: रथयात्रा, भंडारा आणि भक्तीमय वातावरण; चिंचपोकळीत श्रीराम जन्मोत्सवाचा भव्य उत्सव
4

Ram Navami: रथयात्रा, भंडारा आणि भक्तीमय वातावरण; चिंचपोकळीत श्रीराम जन्मोत्सवाचा भव्य उत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.