Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

BRICS Summit 2026 New Delhi: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहत मनोज जरांगे पाटील यांनी समर्थकांसह मुंबईकडे कूच करण्याची तयारी दर्शवल्याने राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे

  • By anuradha sagar
Updated On: Sep 12, 2026 | 10:50 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 12. 09.2026

Maharashtra Breaking News Today 12. 09.2026

Follow Us
Follow Us:
  • 12 Sep 2026 10:50 AM (IST)

    12 Sep 2026 10:50 AM (IST)

    नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर प्रशिक्षणार्थीचा बॅरेकमध्ये मृत्यू

    नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय प्रशिक्षणार्थीचा बॅरेकमध्ये मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली. अश्विन एम. असे मृत प्रशिक्षणार्थीचे नाव असल्याची माहिती आहे. बॅरेकमध्ये तो गंभीर अवस्थेत आढळल्यानंतर त्याला तातडीने देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

  • 12 Sep 2026 10:40 AM (IST)

    12 Sep 2026 10:40 AM (IST)

    ती पुन्हा आली…! 13 महिन्यांच्या लढ्यानंतर माधुरी हत्तीणीचे नांदणीत पुनरागमन

    कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील प्रसिद्ध नांदणी मठातील महादेवी आणि  माधुरी नावाने ओळखली जाणारी हत्तीणीचे अखेर  कोल्हापुरात पुनरागमन झाले.  १३ महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर तिला कोल्हापुरात आणण्यात यश आले.  गुजरात येथील ‘वनतारा’ पुनर्वसन केंद्रात असलेली माधुरी हत्ती न्यायालयीन प्रक्रिया आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानंतर पुन्हा कोल्हापुरात परतली आहे. माधुरी कोल्हापुरात दाखल होत असताना संपूर्ण नांदणी गाव तिच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. नांदणीसह सर्व ग्रामस्थानी तिचे जल्लोषात स्वागत केले.

  • 12 Sep 2026 10:30 AM (IST)

    12 Sep 2026 10:30 AM (IST)

    रुग्णभाराशी मेळ घालण्याचे आव्हान! राज्यातील रुग्णालयांत ओपीडी तिप्पट; डॉक्टर, मनुष्यबळही तिप्पट झाल्याबाबत सवाल

    राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्यसेवेचा विस्तारही त्याच वेगाने झाला आहे का, असा महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सरकारी रुग्णालयांतील ओपीडी तिप्पट वाढणे ही एका बाजूला नागरिकांचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील वाढता विश्वास दर्शविणारी बाब असली, तरी दुसऱ्या बाजूला उपलब्ध डॉक्टर, परिचारिका, इतर आरोग्य कर्मचारी, खाटा आणि पायाभूत सुविधांवरील वाढता ताणही यातून स्पष्ट होतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात आरोग्य सेवा संचालनालयाच्या अखत्यारित जिल्हा रुग्णालये, संदर्भ सेवा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि ट्रॉमा केअर सेंटर अशी एकूण ६११ रुग्णालये व केंद्रे असून, त्यामध्ये एकूण २९ हजार ५३४ खाटा उपलब्ध आहेत.

  • 12 Sep 2026 10:20 AM (IST)

    12 Sep 2026 10:20 AM (IST)

    पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह

    सप्टेंबर महिना सुरु झाल्यापासून पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. ऑगस्ट महिन्यातही पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र पूरक ठरल्याने पुढील दोन दिवस राज्यात जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात शनिवारी (दि.12) वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

  • 12 Sep 2026 10:10 AM (IST)

    12 Sep 2026 10:10 AM (IST)

    डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ

    गणेशोत्सवासाठी कोकणासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या गावाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण लोकसभा मतदारसंघातून यंदाही मोठ्या प्रमाणावर मोफत एसटी बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण लोकसभेतून यंदा तब्बल ११०० हून अधिक एसटी बसेस विविध जिल्ह्यांकडे रवाना होणार असून, सुमारे ४५ ते ५० हजार गणेशभक्तांना मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे. गुरुवारपासून कल्याण-शीळ रोडवरील प्रीमियर कंपनी मैदान, संदप येथे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन  करण्यात आले आहे. डोंबिवली, कल्याण पूर्व, दिवा यासह अंबरनाथ, उल्हासनगर आणि कळवा परिसरातून बसेस रवाना होणार आहेत. यामध्ये डोंबिवलीतून सुमारे ३५०, कल्याण पूर्वेतून २१०, तर दिव्यातून १५० हून अधिक बसेस जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • 12 Sep 2026 09:55 AM (IST)

    12 Sep 2026 09:55 AM (IST)

    Kokan GaneshotsavSpecial Trains: मुंबई-सावंतवाडीदरम्यान चार अनारक्षित विशेष गाड्या धावणार

    Kokan GaneshotsavSpecial Trains:  कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर व आरामदायी व्हावा, यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने चार अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत या विशेष गाड्या धावणार आहेत.

    सीएसएमटी-सावंतवाडी रोड (गाडी क्र. ०१००९) ही अनारक्षित विशेष गाडी १२ आणि १३ सप्टेंबरला दुपारी १.४५ वाजता सीएसएमटीहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. सावंतवाडी रोड-सीएसएमटी (गाडी क्र. ०१०१०) ही गाडी १३ आणि १४ सप्टेंबरला पहाटे ४.०५ वाजता सावंतवाडीहून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

  • 12 Sep 2026 09:45 AM (IST)

    12 Sep 2026 09:45 AM (IST)

    Baramati Missing Girl Safe Return:बेपत्ता तरुणीचा बारामती पोलिसांकडून सुरक्षित शोध 

    Baramati  Missing Girl Safe Return: घरगुती कारणांमुळे आई-वडिलांसोबत न राहता मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली तरुणी अखेर सुरक्षितपणे घरी परतली आहे. बारामती शहर पोलिसांच्या विशेष मिसिंग पथकाने तातडीने तपास करत तिचा शोध घेतला.

    १० सप्टेंबर रोजी तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर बारामती शहर पोलिसांच्या विशेष पथकाने तांत्रिक आणि मानवी माहितीच्या आधारे तिचा शोध घेतला.महिला पोलिसांनी तरुणीला विश्वासात घेऊन तिचे संवेदनशील समुपदेशन केले असता, तिला कुटुंबापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तिच्या वैयक्तिक छायाचित्रांचा (फोटो) गैरवापर करण्याची धमकी दिल्याची गंभीर बाब समोर आली.

  • 12 Sep 2026 09:35 AM (IST)

    12 Sep 2026 09:35 AM (IST)

    Manoj Jarange Patil Hunger Strike: आंतरवाली सराटीत आज मराठा समाजाची निर्णायक बैठक, मुंबई कूचबाबत सस्पेन्स कायम

    Manoj Jarange Patil Hunger Strike:   मराठा आरक्षणातील कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात पुन्हा एकदा तीव्र एल्गार पुकारला आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आज १५ वा दिवस असून सरकारच्या शिष्टमंडळाने अद्याप त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.

    कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण १५ व्या दिवशीही सुरूच आहे. मुंबईत परवानगीशिवाय आंदोलन न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू सणांचे औचित्य साधून आंदोलकांना भावनिक साद घातली आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आपल्याला असल्याचे ठणकावत जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

  • 12 Sep 2026 09:25 AM (IST)

    12 Sep 2026 09:25 AM (IST)

    Baba Ramdev Ayurvedic Hookah E-Cigarette: बाबा रामदेव यांचा 'आयुर्वेदिक हुक्का' चर्चेत

    Baba Ramdev Ayurvedic Hookah E-Cigarette:  आजकाल तरुणांमध्ये ई-सिगारेट आणि फ्लेवर्ड हुक्काची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या मते हे प्रकार आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत.  ई-सिगारेट आणि हुक्क्यामुळे फुफ्फुसांचे विकार व कर्करोगाचा धोका वाढतो, असा आरोग्य तज्ज्ञांचा इशारा आहे. या धोकादायक ट्रेंडदरम्यान योगगुरू बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ते 'आयुर्वेदिक हुक्क्या'बाबत सांगताना दिसत आहेत.  हा आयुर्वेदिक हुक्का आरोग्यासाठी घातक नसून फायदेशीर ठरू शकतो, असा दावा बाबा रामदेव यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे.

  • 12 Sep 2026 09:15 AM (IST)

    12 Sep 2026 09:15 AM (IST)

    Madhuri Elephant Returns: १३ महिन्यांनंतर 'माधुरी' हत्तीण नांदणी मठात, मध्यरात्री नागरिकांची गर्दी

    Madhuri Elephant Returns: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील प्रसिद्ध नांदणी मठात अखेर १३ महिन्यांनंतर 'माधुरी' हत्तीचे पुनरागमन झाले आहे. मागील काही महिन्यांपासून गुजरात येथील 'वनतारा' पुनर्वसन केंद्रात असलेली माधुरी हत्ती न्यायालयीन प्रक्रिया आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानंतर पुन्हा कोल्हापुरात परतली आहे.

    वनताराचे सीईओ विवान कर्णिक व त्यांच्या टीमने माधुरीला नांदणी मठात आणल्यानंतर तिच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि स्वागतासाठी सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास माधुरी मठात पोहोचली, तरी तिच्या स्वागतासाठी नागरिकांनी नांदणी मठाजवळ प्रचंड गर्दी केली होती.

  • 12 Sep 2026 09:05 AM (IST)

    12 Sep 2026 09:05 AM (IST)

    BRICS SUMMIT : इंडोनेशिया, फिलीपिन्ससह अनेक देशांतील सर्वोच्च नेते भारतात दाखल

    नवी दिल्ली : भारताने आयोजित केलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शनिवारी (दि.12) दुपारी दिल्लीत दाखल होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, शी जिनपिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहे. यापूर्वी, इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि आफ्रिकन देश नायजेरिया येथील इतर अनेक पाहुणेही भारतात दाखल झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेतील मोठे बदल, बदलत्या व्यापार पद्धती, जलद तांत्रिक प्रगती आणि हवामान संकटाच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स गट आज एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे.

Maharashtra to National And International Breaking News: 

आज १२ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे दिमाखात उद्घाटन, महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणानंतर मुंबईकडे कूच आणि आशियाई बाजारातील संमिश्र संकेतांमुळे शेअर बाजारातील व्यवहार  याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आजपासून २ दिवसीय १८ व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून दिल्लीत विशेष सुरक्षा व वाहतूक मार्ग बदल लागू करण्यात आले आहेत.

मराठा आरक्षणाच्या तीव्र मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे बैठकीनंतर मुंबईकडे जाण्याची घोषणा केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

मुंबईतील गुरु तेग बहादुर नगर मोनोरेल स्टेशनवर रात्री लागलेल्या आगीवर अग्निशामक दलाने नियंत्रण मिळवले असून राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

Web Title: Maharashtra national to international political breaking live news in marathi 12 september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • India news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

Mumbai News: रुग्णभाराशी मेळ घालण्याचे आव्हान! राज्यातील रुग्णालयांत ओपीडी तिप्पट; डॉक्टर, मनुष्यबळही तिप्पट झाल्याबाबत सवाल
1

Mumbai News: रुग्णभाराशी मेळ घालण्याचे आव्हान! राज्यातील रुग्णालयांत ओपीडी तिप्पट; डॉक्टर, मनुष्यबळही तिप्पट झाल्याबाबत सवाल

Mumbai News : परीक्षेतील गोंधळाला आळा बसणार? अभाविपच्या परिषदेत प्रश्नपत्रिका, AI आणि निकालावर मोठं मंथन
2

Mumbai News : परीक्षेतील गोंधळाला आळा बसणार? अभाविपच्या परिषदेत प्रश्नपत्रिका, AI आणि निकालावर मोठं मंथन

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार! बेल्फिन्स टायगर्स, वन लिटिल फार्म संघांची विजयी आगेकूच
3

Badminton: पुण्यात बॅडमिंटनचा थरार! बेल्फिन्स टायगर्स, वन लिटिल फार्म संघांची विजयी आगेकूच

Cricket: मुंबईत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ची घोषणा; पुण्यात रंगणार क्रिकेटचा थरार
4

Cricket: मुंबईत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ची घोषणा; पुण्यात रंगणार क्रिकेटचा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.