Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : भोसरी जमीन खरेदीप्रकरणी एकनाथ खडसेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Marathi Breaking Live Updates : देशातीलच नाहीतर देशाबाहेरील अनेक महत्त्वाच्या घडामोडींसह क्रीडा, गुन्हे, राजकारण, समाजकारण यांसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 11, 2025 | 06:29 PM
LIVE
भोसरी जमीन खरेदीप्रकरणी एकनाथ खडसेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

भोसरी जमीन खरेदीप्रकरणी एकनाथ खडसेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Follow Us
Close
Follow Us:
  • 11 Dec 2025 06:29 PM (IST)

    11 Dec 2025 06:29 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या प्रचारापासून अग्निशमन वाहन हेलिपॅडवरच; लोहा नगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार आला चर्चेत

    Nanded News : लोहा :  नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री आणि इतर राजकीय नेते २७ नोव्हेंबर रोजी लोहा शहरात आले होते. मुख्यमंत्री यांच्या हेलिकॉप्टरसाठी कंधार रस्त्यालागत शहरापासून जवळपास तीन किमी अंतरावर असलेल्या चव्हाण यांच्या शेतात हेलिपॅड तयार करण्यात आले होते. मात्र त्यादरम्यान हेलिपॅड मैदानावर पाणी टाकण्यासाठी गेलेले अग्निशमन वाहन तांत्रिक बिघाडामुळे तेथेच मागील तेरा दिवसांपासून बंद अवस्थेत उभे आहे.

  • 11 Dec 2025 06:18 PM (IST)

    11 Dec 2025 06:18 PM (IST)

    रिक्स नकोच रे बाबा! निकालापर्यंत EVM स्ट्राँगरूमला काँग्रेसचा २४ तास कडक पहारा

    Local Body Elections : देगलूर : देगलूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक दि. २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडली. मतदान प्रक्रियेनंतर सर्व उमेदवार व मतदार आता मतमोजणीची आतुरतेने वाट पाहात आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने मात्र ईव्हीएम सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतली आहे. शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम स्ट्रॉगरूमच्या बाहेर काँग्रेस पदाधिकारी दिवस-रात्र पहारा देताना दिसत आहेत.

  • 11 Dec 2025 06:02 PM (IST)

    11 Dec 2025 06:02 PM (IST)

    "PMRDA मधील 1209.08 कोटींच्या कामांना..."; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली मान्यता

    नागपूर, दि. 11 : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात मलनिसा:रण योजनांच्या 27 गावांमधील 1209.8 कोटींच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामांमुळे संबंधित गावातील 39 लाख 42 हजार लोकसंख्येला लाभ होणार आहे.

  • 11 Dec 2025 05:53 PM (IST)

    11 Dec 2025 05:53 PM (IST)

    पाकिस्तानला मागे टाकून विश्वविक्रमाची भारताला संधी!

    भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर १०१ धावांनी विजय मिळवून मालकीत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता भारताचे लक्ष्य हे दूसरा सामना जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेणे हे असणार आहे. भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असा पराक्रम रचला जाईल, जो आतापर्यंत कोणत्याही संघाला करता आलेला नाही.

  • 11 Dec 2025 05:41 PM (IST)

    11 Dec 2025 05:41 PM (IST)

    Drishyam 3 चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज

    दृश्यम ३ चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे आणि दिग्दर्शकाने एक मोठी अपडेट दिली आहे. दृश्यम ३ चे हिंदी आणि मल्याळम दोन्ही आवृत्त्या पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. अजय देवगण अभिनीत हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झालेले नसले तरी, अभिनेता मोहनलाल अभिनीत दृश्यम ३ चे मल्याळम आवृत्ती निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहे. याचा अर्थ मल्याळम आवृत्ती पहिला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

  • 11 Dec 2025 05:11 PM (IST)

    11 Dec 2025 05:11 PM (IST)

    सावळज स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार

    तासगाव तालुक्यात अंधश्रद्धेचे सावट भयावहपणे वाढत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. सावळज येथील स्मशानभूमीत लिंबू, काळे दोरे, काळे कापड, कुंकू, अंडी आणि विविध प्रकारच्या पुड्या यांसारखी जादूटोणासाठी वापरली जाणारी सामग्री आढळून आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांच्या स्मशानभूमीचा अशा अनिष्ट कृत्यांसाठी गैरवापर होत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

  • 11 Dec 2025 04:50 PM (IST)

    11 Dec 2025 04:50 PM (IST)

    यंत्रणा असूनही अन्याय! डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न मिळाल्याने नाराजी; आंदोलन करण्याचा इशारा

    मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टरांना नॉन प्रॅक्टिसिंग अलाऊन्स (NPA) म्हणजेच व्यवसायरोध भत्ता २०१९ पासून देण्यात आलेला नाही. राज्य सरकारकडील डॉक्टरांना हा भत्ता नियमित मिळत असताना, पालिकेतील सुमारे २,३०० डॉक्टर गेली सहा वर्षे या महत्त्वाच्या निर्णयापासून वंचित आहेत. परिस्थिती अशी आहे की, पुणे महानगरपालिकेने आपल्या डॉक्टरांना हा भत्ता देण्यास सुरुवात केली आहे, परंतु मुंबईसारखी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मात्र हा भत्ता देण्याच्या निर्णयाला केवळ ‘तपासणी’च्या नावाखाली अडवून बसली आहे.

  • 11 Dec 2025 04:40 PM (IST)

    11 Dec 2025 04:40 PM (IST)

    ‘जर मी माझ्या बहिणीशी लग्न केले असते तर…’डोनाल्ड ट्रम्प इल्हान ओमरवर डाफरले; म्हटले, अमेरिका सोडून जा

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख काँग्रेस महिला इल्हान ओमर (Ilhan Omar) यांच्यातील राजकीय वाद (Political Feud) आता वैयक्तिक हल्ल्यांच्या (Personal Attacks) अगदी खालच्या पातळीवर पोहोचला आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इल्हान ओमर यांच्या लग्नाबाबतचा गंभीर आरोप करत त्यांना अमेरिका सोडून जाण्याची (Leave US) मागणी केली आहे. पेनसिल्व्हेनिया येथील एका रॅलीदरम्यान ट्रम्प यांनी इल्हान ओमरवर थेट हल्ला चढवला.

  • 11 Dec 2025 04:35 PM (IST)

    11 Dec 2025 04:35 PM (IST)

    वारंवार पाय हलवण्याची सवय तुम्हाला आहे का? जाणून घ्या आरोग्यावर होणारे परिणाम

    आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाचा संबंध एखाद्या ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. विशेषतः पाय हे जीवनातील स्थिरता, पुढे जाण्याची क्षमता आणि मानसिक संतुलनाशी जोडलेले आहेत. ज्योतिषशास्त्रात पायांशी संबंधित काही सवयी आपल्या ग्रहांच्या कमकुवतपणाचे प्रतिबिंबित करतात. या सवयी बहुतेकदा आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग असतात, परंतु त्यांचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात. चालताना पाय घासत चालणे, बसल्यावर सतत पाय हलवणे, घाणेरडे पाय ठेवणे इत्यादी सवयीमुळे शारीरिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर ग्रहांच्या प्रभावानुसार देखील नुकसान करतात.

  • 11 Dec 2025 04:30 PM (IST)

    11 Dec 2025 04:30 PM (IST)

    IndiGo चं उड्डाण रद्द झालं तर मिळणार 10,000 रुपये, इंडिगोची मोठी घोषणा

    देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने अलीकडील संकटामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना परतफेड केल्यानंतर अतिरिक्त भरपाईची घोषणा केली आहे. ही सवलत फक्त काही निवडक प्रवाशांनाच उपलब्ध असेल.

    प्रवासी संकटानंतर इंडिगोने प्रवाशांसाठी १०,००० रुपयांचे ट्रॅव्हल व्हाउचर जाहीर केले आहे. इंडिगोने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “प्रवाशांची काळजी घेणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कामकाजात व्यत्यय आल्यानंतर, रद्द केलेल्या विमानांसाठी आवश्यक असलेले सर्व परतफेड सुरू करण्यात आली आहे, याची आम्ही खात्री केली आहे. बहुतेक ग्राहकांच्या खात्यांमध्ये परतफेड जमा झाली आहे आणि ज्यांना परतफेड मिळाली नाही त्यांना लवकरच ती मिळेल.” याव्यतिरिक्त, प्रभावित झालेल्यांना ५,००० ते १०,००० रुपयांपर्यंतचे व्हाउचर आणि भरपाई मिळेल.

  • 11 Dec 2025 04:25 PM (IST)

    11 Dec 2025 04:25 PM (IST)

    हिवाळ्यात घरी बनवा शेवग्याच्या शेंगाचं पौष्टिक सूप; थंडीत शरीराला मिळवून देईल अनेक फायदे

    थंड हवेची चाहूल लागताच शरीराला उब देणारे सूप आठवू लागतात. त्यातही ड्रमस्टिक म्हणजेच शेंगांचे सूप हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. पारंपरिक भारतीय स्वयंपाकात शेंगांचा वापर विविध प्रकारे केला जातो जसे की, सांबार, कढी, सुकं, रस्सा अशा अनेक पदार्थांमध्ये त्याची चव खुलून येते. पण शेंगांपासून बनणारे सूप हे केवळ चविष्टच नाही तर हिरव्या भाज्यांतील पोषक तत्त्वांनी भरलेले असते. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C, कॅल्शियम, आयरन, तसेच अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. पचन सुधारण्यापासून ते हाडांना बळकटी देण्यापर्यंत अनेक फायदे देणारे हे सूप मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी योग्य आहे.

  • 11 Dec 2025 04:20 PM (IST)

    11 Dec 2025 04:20 PM (IST)

    कॉनवे आणि मिशेलचे अर्धशतक… टिकनरच्या अनुपस्थितीत मायकेल चमकला; न्यूझीलंडने राखले वर्चस्व

    वेलिंग्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवे आणि पदार्पण करणाऱ्या मिशेल हे यांनी शानदार अर्धशतके झळकावून त्यांच्या संघाला सामन्यात आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडने पहिल्या डावात ७३ धावांची आघाडी घेतली होती आणि दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस वेस्ट इंडिजला मोठा धक्का दिला, दुसऱ्या डावात सुरुवातीच्या दोन विकेट घेतल्या.

  • 11 Dec 2025 04:15 PM (IST)

    11 Dec 2025 04:15 PM (IST)

    ‘आता वेळ आली आहे…’ Sonu Sood चे सरकारकडे आवाहन; १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची मागणी

    बॉलीवूड अभिनेता सोनू सूद हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामाव्यतिरिक्त, त्याने त्याच्या सामाजिक कार्याद्वारे राष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळवली आहे. दरम्यान, सोनू सूदने ऑस्ट्रेलियाच्या उदाहरणाचे अनुकरण करून १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाबाबत आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन सरकारला केले आहे.

  • 11 Dec 2025 04:10 PM (IST)

    11 Dec 2025 04:10 PM (IST)

    एकाच जिल्ह्यामध्ये HIV चा कहर; तब्बल 7400 लोकांना झाली बाधा, लग्नाबाबत डॉक्टरांचा कडक इशारा

    बिहारमधील एका जिल्ह्यामध्ये एचआयव्ही आजाराने कहर माजवला आहे. एकाच जिल्ह्यामध्ये हजारो रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. बिहारच्या सीतामढी गावामध्ये हा प्रकार घडला आहे. सीतामढीमध्ये एचआयव्हीचे ७ हजारहून अधिक रुग्ण वाढले आहे. दर महिन्याला 40 ते 50 HIV नवे रुग्ण आढळून येत आहेत. ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर एकाच जिल्ह्यामध्ये आकडेवारी वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

  • 11 Dec 2025 04:05 PM (IST)

    11 Dec 2025 04:05 PM (IST)

    शहरात अपघातांचे सत्र कायम! १० महिन्यांत १५७ जणांचा मृत्यू; वाढत्या ‘हिट अँड रन’ घटनांनी चिंता वाढवली

    अकोला शहरात अपघाताच्या संख्येत गत काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडल्याची घटना उघडकीस येते. अनेकांचा यात प्राण जातो. काहींना कायमचे अपंगत्व येते. अकोला जिल्ह्यातही अपघाताच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी २०२५ ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत एकूण ३७३ अपघात झाले असून यामध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकूण ११८ प्राणांतीक अपघातांचा समावेश आहे. या अपघातात अनेकांना प्राण जातो. काहींना कायमचे अपंगत्त्व येते.

  • 11 Dec 2025 04:00 PM (IST)

    11 Dec 2025 04:00 PM (IST)

    Dhurandhar चित्रपटातून Akshaye khannaचा कमबॅक

    देशातील सर्वात चर्चेत आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेला अक्षय खन्ना सध्या चर्चेत आहे. आदित्य धर यांच्या “धुरंधर” चित्रपटात त्याने साकारलेल्या रहमान डकैतीच्या बहुमुखी आणि तीव्र भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचा व्हायरल डान्स सीन ऑनलाइनही धुमाकूळ घालत आहे. बहरीन रॅपर फ्लिपार्चीच्या “FA9LA” यात अक्षयची ऊर्जा आणि स्वॅगने नेटिझन्सना इतके प्रभावित केले की हा सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या खास प्रसंगी, त्याची जुनी मैत्रीण आणि एक्स गर्लफ्रेंड, अभिनेत्री तारा शर्मा हिने अक्षयचा एक अदृश्य थ्रोबॅक फोटो शेअर करून त्याचे अभिनंदन केले आणि त्याचे कौतुक करणारी एक लांबलचक पोस्टही लिहिली.

    वाचा सविस्तर 

  • 11 Dec 2025 03:50 PM (IST)

    11 Dec 2025 03:50 PM (IST)

    IND vs SA 2nd T20 : प्रिन्स गिलवर असणार नजरा!

    IND vs SA 2nd  T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना आज महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, न्यू चंदीगड येथे खेळला जाणार आहे.  कटकमधील पहिला सामना भारताने १०१ धावांनी जिंकला. दरम्यान लहान फॉर्मेटमध्ये आतापर्यंत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेला शुभमन गिल गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याच्या घरच्या मैदानावर फॉर्ममध्ये परतण्यासाठी दृढनिश्चयी असंर आहे.

    वाचा सविस्तर 

  • 11 Dec 2025 03:40 PM (IST)

    11 Dec 2025 03:40 PM (IST)

    हवेत गरुडांचा थरारक खेळ, आकाशातच एकमेकांना शिकार हँडओव्हर करताना दिसले…

    निसर्ग नवनवीन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आणत असतो, ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. सोशल मिडियावर अशा घटनांचे व्हिडिओज आपल्याला नेहमीच शेअर केले जातात. अशीच एक अनोखी घटना आता इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात हवेच्या राक्षसांचा अनोखा थरार दिसून आला. व्हिडिओमध्ये गरुड आपल्या शिकाऱ्याला दुसऱ्या गरुडाला देताना दिसून आला. शिकार हँडओव्हर करण्याची ही प्रक्रिया आकाशात पार पडली जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चला व्हिडिओतील या दृश्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

    वाचा सविस्तर 

  • 11 Dec 2025 03:30 PM (IST)

    11 Dec 2025 03:30 PM (IST)

    Alia Bhatt रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामील

    बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट कारकिर्दीत आणखी एक मोठे काम केले आहे. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या अभिनेत्रीला गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ट्युनिशियातील अभिनेत्री हेंड साबरी हिच्यासोबत एका समारंभात आलियाचा सन्मान करण्यात आला आहे. अभिनेत्रीला ओमर शरीफ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलची पाचवी आवृत्ती सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आयोजित करण्यात आली आहे.

    वाचा सविस्तर 

  • 11 Dec 2025 03:20 PM (IST)

    11 Dec 2025 03:20 PM (IST)

    L वॉर्ड विज्ञान प्रदर्शनात गांधी शाळेची चमकदार कामगिरी!

    एल वॉर्ड विभागात आयोजित विज्ञान प्रदर्शन तसेच विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये गांधी बाल मंदिर शाळेने यंदा लक्षणीय यश मिळवत आपले वर्चस्व ठसवले आहे. विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर, निबंध लेखन, प्रश्नमंजुषा, जाहिरात निर्मिती, अभिवाचन आणि विज्ञान प्रदर्शन अशा विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शाळेला उत्तुंग यश मिळवून दिले. या विद्यार्थ्यांचे मान शालेय परिसरात फार गाजतही आहे तसेच या मुलांचा अभिमान असल्याचे शालेय मुख्याध्यपकांचे म्हणणे आहे.

    वाचा सविस्तर 

  • 11 Dec 2025 03:13 PM (IST)

    11 Dec 2025 03:13 PM (IST)

    Yemen Conflict : लाल समुद्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी रस्सीखेच

    UAE Seizes Yemen Oil Fields : मध्य पूर्वेत (Middle East) शक्ती आणि वर्चस्वासाठी सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात शांतपणे चेकमेटचा खेळ (Game of Checkmate) सुरू आहे. एकेकाळी हुथी बंडखोरांविरुद्ध (Houthi Rebels) एकत्र लढणारे हे दोन्ही देश आता येमेनमध्ये एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. सौदी अरेबियाने सुदानमधील (Sudan) गृहयुद्धात अमेरिकेचा सहभाग वाढवून युएईवर आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आता युएईने सौदी अरेबियाच्या शेजारी असलेल्या येमेनमध्ये तेलाच्या बाबतीत मोठी खेळी केली आहे.

    वाचा सविस्तर 

  • 11 Dec 2025 02:55 PM (IST)

    11 Dec 2025 02:55 PM (IST)

    वैभव सुर्यवंशी की आयुष म्हात्रे कोणाची चालणार बॅट?

    Under-19 Asia Cup 2025 : टीम इंडियाने यावर्षी वरिष्ठ आशिया कप २०२५ चे विजेतेपद जिंकले. तथापि, अद्याप भारताला ट्रॉफी देण्यात आलेली नाही. आता, ज्युनियर खेळाडू २०२५ च्या आशिया कपचे विजेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरण्यास उत्सुक आहेत. अंडर-१९ आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान देखील आमनेसामने येतील आणि संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारत आणि पाकिस्तानसह एकूण आठ संघ १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये सहभागी होत आहेत.

  • 11 Dec 2025 02:50 PM (IST)

    11 Dec 2025 02:50 PM (IST)

    शिक्षकांच्या जबाबदारीत आणखीन भर! आता ठेवावे लागणार साप-विंचूंवरही लक्ष, शिक्षक नाराज

    छत्तीसगडमध्ये नवीन शैक्षणिक नियम लागू करण्यात आला आहे. मुळात, हा निर्णय शिक्षण आणि विषारी प्राण्यांसंदर्भात आहे. शिक्षकांना आता विषारी प्राण्यांवरही विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. जर कोणत्या विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून इजा झाली तर जबाबदार शिक्षकावर कारवाई करण्यात येईल. मुळात, या नियमाचा हेतू विद्यार्थ्यांची सुरक्षाच आहे पण या निर्णयामुळे स्थानिक शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

  • 11 Dec 2025 02:45 PM (IST)

    11 Dec 2025 02:45 PM (IST)

    कधी काळी बलात्काराचा आरोप! आता ‘त्या’ खेळाडूवरील निलंबन मागे

    पाकिस्तान क्रिकेट संघांमधील अनेक खेळाडू २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश प्रीमियर लीग (बीपीएल) २०२५ मध्ये खेळताना दिसणार आहेत. या दरम्यान, पाकिस्तानी खेळाडू हैदर अली ज्याच्यावर इंग्लंडमध्ये बलात्काराचा आरोप करण्यात आला  आहे. ज्यामुळे तो काही महिन्यांपासून चांगलाच वादात अडकला आहे. सप्टेंबरमध्ये इंग्लंड दौऱ्यादरम्यान हैदर अलीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) त्याला बंदी घातली आणि तो बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला आहे.

  • 11 Dec 2025 02:40 PM (IST)

    11 Dec 2025 02:40 PM (IST)

    कालाष्टमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, सर्व त्रास होतील दूर

    मासिक कालष्टमी ही तंत्र आणि मंत्रांचा सराव करणाऱ्यांसाठी विशेष मानली जाते. शिवाय, या दिवशी कालभैरव देवाची पूजा केल्याने तुम्हाला अपेक्षित फायदा देखील होतो. तसेच या दिवशी काही उपाय केल्याने समस्येतून सुटका देखील होते. यावेळी मासिक कालाष्टमी गुरुवार, 11 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी विधीवत कालभैरवाची पूजा देखील केली जाईल.

  • 11 Dec 2025 02:35 PM (IST)

    11 Dec 2025 02:35 PM (IST)

    भारताने अमेरिकेला दिली ‘सर्वोत्तम ऑफर’! ट्रम्पच्या अधिकाऱ्याने केले ‘कौतुक’

    भारत (India) आणि अमेरिका (America) यांच्यातील व्यापार करारावरील दीर्घकाळापासून सुरू असलेला अडथळा (Long-standing Stalemate) आता दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी १० आणि ११ डिसेंबर रोजी द्विपक्षीय व्यापार करारावर सुरू असलेल्या वाटाघाटींचा सकारात्मक आढावा घेतला आहे. अमेरिकेच्या बाजूने भारताकडून मिळालेल्या ‘उत्कृष्ट ऑफर’मुळे या संबंधांना नवी दिशा मिळाली आहे. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी (USTR) जेमसन ग्रीर (Jameson Greer) यांनी वॉशिंग्टनमध्ये सिनेट उपसमितीच्या सुनावणीत भारताचे खुलेपणाने कौतुक केले आहे.

  • 11 Dec 2025 02:30 PM (IST)

    11 Dec 2025 02:30 PM (IST)

    ‘गोलमाल 5’ मध्ये Kareena आणि Sara एकत्र? Rohit Shettyने दिली हिंट

    रोहित शेट्टीचा चित्रपट “गोलमाल ५” बऱ्याच काळापासून चर्चेत आहे आणि आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित शेट्टीने पुष्टी केली आहे की त्याने “गोलमाल ५” मध्ये काम करण्यासाठी करीना कपूर आणि सारा अली खानशी संपर्क साधला आहे आणि कुणाल खेमू हा चित्रपटाचा क्रिएटिव्ह कन्सल्टंट आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये केलेल्या इंस्टाग्राम पोस्टवर रोहित शेट्टीच्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे आणि “गोलमाल ५” साठी उत्सुकता वाढवली आहे.

  • 11 Dec 2025 02:25 PM (IST)

    11 Dec 2025 02:25 PM (IST)

    वल्लरी पिंगा गर्ल्सच्या मदतीने घेणार मिनाक्षीचा शोध! 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेचा विशेष भाग

    स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'पिंगा गं पोरी पिंगा' वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेत वल्लरीची चाहती म्हणून बेळगावहून मुंबईत आलेली मीनाक्षी हरवली आहे. आणि तिला शोधण्यासाठी वल्लरी काय काय करते हे सगळं आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच प्रेक्षकांना पाहायला मिळणार भाग हा १ तासांचा विशेष भाग असणार आहे.

  • 11 Dec 2025 02:20 PM (IST)

    11 Dec 2025 02:20 PM (IST)

    उस्मान ख्वाजा तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटीत खेळेल की पाच दिवस बेंचवर?

    ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कला असे वाटत नाही की अॅडलेड कसोटीसाठी उस्मान ख्वाजाला परत बोलावण्याची गरज आहे. तथापि, निवड समिती त्याला तिसऱ्या कसोटीसाठी परत बोलावेल असा त्यांचा विश्वास आहे. पर्थमध्ये झालेल्या पाठीच्या दुखापतीतून बरे न झाल्यामुळे ख्वाजाला गाबा कसोटीतून बाहेर काढण्यात आले होते, जिथे त्याला पहिल्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली होती.

  • 11 Dec 2025 02:15 PM (IST)

    11 Dec 2025 02:15 PM (IST)

    तुम्ही ‘या’ कंपनीचा मोबाईल वापरत असाल तर कॅमेरा अपग्रेड होणार नाही, काय आहे नेमकं कारण?

    तुम्ही जर सॅमसंगचा फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. Samsung Galaxy S25 नंतर, Samsung Galaxy S26 ची आतुरतेने वाट पाहत आहे. Samsung च्या येणाऱ्या सीरिजमध्ये कंपनी कोणते अपग्रेड करेल हे जाणून सर्वांना उत्सुकता आहे. Samsung स्मार्टफोनच्या चाहत्यांना हे जाणून धक्का बसू शकतो की Samsung S26 मागील मॉडेलप्रमाणेच कॅमेरा हार्डवेअर वापरेल. एका नवीन उद्योग अहवालात असे उघड झाले आहे की, वाढत्या उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि फोनच्या किरकोळ किमतीत वाढ टाळण्यासाठी कंपनी कॅमेरा अपग्रेड करणार नाही.

  • 11 Dec 2025 02:10 PM (IST)

    11 Dec 2025 02:10 PM (IST)

    Modi Putin यांच्या Car Photoने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले

    ४ डिसेंबर रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वतः प्रोटोकॉल तोडून त्यांचे स्वागत केले. पालम विमानतळावरून पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे (७ लोक कल्याण मार्ग) परतत असताना, मोदी आणि पुतिन यांनी कारमध्ये एकत्र फोटो (Car Photo) काढला. हा एक साधा फोटो आता अमेरिकेच्या राजकारणात मोठा वाद (Big Controversy) निर्माण करत आहे. हाच फोटो आता अमेरिकन संसदेत (US Parliament) सादर करण्यात आला असून, डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी त्याचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणावर हल्लाबोल केला आहे.

  • 11 Dec 2025 02:01 PM (IST)

    11 Dec 2025 02:01 PM (IST)

    करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपवर अखेर आता कृतिका कामराने सोडले मौन

    कृतिका कामराने काल इन्स्टाग्रामवर क्रिकेट होस्ट गौरव कपूरसोबतच्या तिच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. अभिनेत्रीने काही फोटो देखील शेअर करून गौरवला डेट करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. क्रिकेट होस्टसोबतच्या नात्यापूर्वी अभिनेता करण कुंद्रासोबतच्या तिच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. दोघांची भेट “कितनी मोहब्बत है” या मालिकेच्या सेटवर झाली होती आणि मालिकेत एकत्र काम करत असताना, ते जवळ आले आणि अनेक वर्षे डेट करत राहिले. आता अभिनेत्रीने तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. या दोघांचा ब्रेकअप का झाला? याचे कारण आता कृतिकाने सांगितले आहे.

  • 11 Dec 2025 01:55 PM (IST)

    11 Dec 2025 01:55 PM (IST)

    U19 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा! भारतीय वंशाच्या 2 खेळाडूंचा समावेश

    भारताचा पुरुषांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आशिया कप विश्वचषकाआधी खेळणार आहे. आयुष म्हात्रे हा आशिया कपमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. वैभव सुर्यवंशी देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे होणाऱ्या पुरुषांच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या १५ सदस्यीय संघात आर्यन शर्मा आणि जॉन जेम्स या दोन भारतीय वंशाच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

  • 11 Dec 2025 01:45 PM (IST)

    11 Dec 2025 01:45 PM (IST)

    आयसीआयसीआय प्रुडेंशियल लवकरच शेअर बाजारात!

    आयसीआयसीआय प्रुडेंशियल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी ही सक्रिय म्युच्युअल फंड तिमाही सरासरी अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंटच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे, जिचा बाजार हिस्सा ३१ मार्च २०२५ पर्यंत १३.३ टक्के होता. (स्रोत- क्रिसिल रिपोर्ट) या कंपनीचा ३१ मार्च २०२५ पर्यंत एकूण म्युच्युअल फंड क्यूएएयूएम ८.७९ लाख कोटी रु. होता आणि भारतातील सर्व मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांमध्ये इक्विटी आणि इक्विटी-ओरिएंटेड स्कीम्स ‘क्यूएएयूएम’चा सर्वाधिक बाजार हिस्सा होता, जो १३.४ टक्के होता.

  • 11 Dec 2025 01:35 PM (IST)

    11 Dec 2025 01:35 PM (IST)

    म्यानमारमध्ये गृहयुद्धाचा कहर! रुग्णालयात हवाई हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू

    म्यानमार (Myanmar) सध्या क्रूर गृहयुद्धाच्या (Civil War) विळख्यात अडकला आहे. १० डिसेंबरच्या रात्री येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. देशाच्या राखीन राज्यातील (Rakhine State) एका रुग्णालयावर झालेल्या अमानुष हवाई हल्ल्यात (Airstrike) ३० जण ठार झाले, तर सुमारे ७० जण जखमी झाले. या हल्ल्याबद्दल लष्कराने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही, परंतु सूत्रांनुसार, बंडखोर गट अरकान आर्मीचे (Arakan Army) सैनिक रुग्णालयात उपचार घेत होते किंवा लपून बसले होते, असा अंदाज आहे.

  • 11 Dec 2025 01:25 PM (IST)

    11 Dec 2025 01:25 PM (IST)

    पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याचा निर्लज्जपणा; महिला पत्रकाराला थेट मारला डोळा, VIDEO VIRAL

    पाकिस्तान पुन्हा एकदा अपमानित झाला आहे. आधीच दहशतवाद आणि खोटेणपणामुळे अपमानित झालेल्या पाकिस्तानचा निलर्ज्जपणा पुन्हा समोर आला आहे. एका लष्करी अधिकाऱ्याने पत्रकार परिषदेदरम्यान एका महिला पत्रकारासोबत गैरवर्तन केले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाकिस्तानी लष्करी अधिकार आणि पाकिस्तानला पुन्हा ट्रोल केले जात आहे.

  • 11 Dec 2025 01:15 PM (IST)

    11 Dec 2025 01:15 PM (IST)

    प्रकाश महाजन करणार भाजप प्रवेश? म्हणाले, “मी राज ठाकरेंना घाबरत नाही अन्…

    राज्याच्या विधीमंडळाचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. अधिवेशनाच्या पूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेले वैभव खेडेकर आणि मनसेचे माजी ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावर ही भेट झाली. मात्र त्यापूर्वी प्रकाश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे.

  • 11 Dec 2025 01:08 PM (IST)

    11 Dec 2025 01:08 PM (IST)

    अमेरिकेनंतर आता ‘या’ देशानेही लावला भारतावर 50% Tariff

    जागतिक व्यापार (Global Trade) धोरणात मोठा बदल घडवणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या संरक्षणवादी धोरणाचे पालन करत, आता मेक्सिकोने (Mexico) भारतासह आशियाई देशांवर ५०% पर्यंत कर (Tariff) लादण्याचा निर्णय घेतला आहे. १० डिसेंबर रोजी मेक्सिकन सिनेटने चीन, भारत, दक्षिण कोरिया, थायलंड आणि इंडोनेशिया यांसारख्या आशियाई देशांवर हे शुल्क लादणारे महत्त्वाचे विधेयक मंजूर केले आहे.

  • 11 Dec 2025 12:55 PM (IST)

    11 Dec 2025 12:55 PM (IST)

    कोकणातील ‘या’ नदीतून अवैध वाळू उपसा; पोलिसांनी तिघांना थेट…

    संगमेश्वर तालुक्यातील करजुवे वातवाडी परिसरामध्ये कापशी नदीतून सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करीत असलेल्या टोळीवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंडळ अधिकारी सागर अनंत करंबेळे (वय ४२, रा. देवरुख) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास सुरज नलावडे (रा. करजुवे) याने कापशी नदीतून बेकायदेशीररीत्या सुमारे २५ ब्रास, किंमत अंदाजे २.५० लाख रुपये किंमतीची वाळू उपसून ठेवली होती.

  • 11 Dec 2025 12:50 PM (IST)

    11 Dec 2025 12:50 PM (IST)

    अकोल्यातील बेपत्ता 3 अल्पवयीन मुलं सापडले

    अकोल्यातील बेपत्ता तीन अल्पवयीन मुलांचा अखेर शोध लागला. मित्राच्या वाढदिवसानिमित्त घरातून बाहेर पडलेले हे तिघे झोप लागल्याने ट्रेनने मुंबईपर्यंत पोहोचले. तांत्रिक तपासातून त्यांना भुसावळ स्टेशनवरून सुरक्षित ताब्यात घेतले

  • 11 Dec 2025 12:40 PM (IST)

    11 Dec 2025 12:40 PM (IST)

    प्रेयसीवरून वाद आणि मित्रानेच केले मित्राच्या शरीराचे तुकडे

    कच्छच्या नखत्राणा येथे 20 वर्षीय तरुणाची त्याच्या जिगरी मित्राकडून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेमसंबंधातील वादातून आरोपीने मित्राचे शरीर तुकडे करून बोअरवेलमध्ये फेकले. पोलिसांनी तपासात गुन्ह्याचा उलगडा केला.

  • 11 Dec 2025 12:40 PM (IST)

    11 Dec 2025 12:40 PM (IST)

    कंत्राटी परिचारिकेकडून ‘शारीरिक सुखा’ची मागणी; आत्महत्याप्रयत्नानंतर तालुका आरोग्य अधिकारी निलंबित

    मुलचेरा येथील कंत्राटी परिचारिकेकडून व्हॉट्सअ‍ॅपवर ‘शारीरिक सुखा’ची मागणी केल्याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हाशाखेत्री यांना तात्काळ निलंबित करण्यात आले.

  • 11 Dec 2025 12:32 PM (IST)

    11 Dec 2025 12:32 PM (IST)

    Goa Nightclub Fire प्रकरणात मोठी अपडेट, क्लबचे मालक लुथरा बंधू थायलंड मधून ताब्यात

     

    गोवा नाईट क्लबसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील २५ जणांचा बळी घेणाऱ्या गोवा नाईटक्लब आगीचा आरोपी लुथरा बंधूंना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे पासपोर्ट भारत सरकारने निलंबित केले होते.

  • 11 Dec 2025 11:55 AM (IST)

    11 Dec 2025 11:55 AM (IST)

    राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

    राज्यातील इलेक्ट्रिक वाहन धारकांना लॉटरी लागली आहे. त्यांना आता टोल नाक्यावर टोल द्यावा लागणार नाही. तर यापूर्वी त्यांच्याकडून वसूल केलेली रक्कमही परत मिळणार आहे. इतरही अनेक सवलतींचा पाऊस त्यांच्यावर पडला आहे. ई-वाहनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली.

  • 11 Dec 2025 11:45 AM (IST)

    11 Dec 2025 11:45 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस हे राज्याचे कंजूष प्रमुख - अंबादास दानवे

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूष प्रमुख ठरले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले. पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र ७५ हजार रुपये. हा पैसा अडचणीतील लोकांना मदत देण्यासाठी आहे. सरकारला बहुदा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतो आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

  • 11 Dec 2025 11:35 AM (IST)

    11 Dec 2025 11:35 AM (IST)

    PM मोदींनी वाहिली प्रणव मुखर्जींना आदरांजली

    प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. एक्सवर पोस्ट करत पंतप्रधानांनी लिहिले आहे की, "एक उत्तुंग राजकारणी आणि असाधारण सखोल अभ्यासक, त्यांनी दशकांच्या सार्वजनिक जीवनात अढळ समर्पणाने भारताची सेवा केली. प्रणव बाबूंची बुद्धिमत्ता आणि विचारांची स्पष्टता यांनी प्रत्येक पावलावर आपल्या लोकशाहीला समृद्ध केले. आम्ही ज्या अनेक वर्षांपासून संवाद साधत होतो त्या काळात त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे." असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे.

    Tributes to Shri Pranab Mukherjee on his birth anniversary. A towering statesman and a scholar of exceptional depth, he served India with unwavering dedication across decades of public life. Pranab Babu’s intellect and clarity of thought enriched our democracy at every step. It’s… pic.twitter.com/CSUctgZAmm

    — Narendra Modi (@narendramodi) December 11, 2025

  • 11 Dec 2025 11:25 AM (IST)

    11 Dec 2025 11:25 AM (IST)

    वाढदिवसापूर्वी शरद पवार यांच्या घरी डिनर पार्टी

    राजधानी दिल्लीत बुधवारची संध्याकाळ राजकीय दृष्टया खूप खास होती. राष्ट्रवादी SP पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षीय विचारधारा बाजूला ठेऊन अनेक नेते डिनरसाठी जमले होते. या डिनर कार्यक्रमात देशातील प्रमुख उद्योगपती सुद्धा दिसले. शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसाच्या बरोबर एकदिवस आधी हा डिनर कार्यक्रम झाला. हा पूर्णपणे खासगी सोहळा होता.

  • 11 Dec 2025 11:15 AM (IST)

    11 Dec 2025 11:15 AM (IST)

    सुषमा अंधारे करणार गौप्यस्फोट, 1400 कोटींचा घोटाळा आणणार समोर

    शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या  राजकारणामधील एका मोठा गौप्यस्फोट करुन घोटाळा बाहेर आणणार आहे. याबाबत घोषणा करत सुषमा अंधारे यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले आहे की, आज सकाळी ठीक 11.30 ला नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे 1400 कोटीचा घोटाळा महाराष्ट्रासमोर उघड करायचा आहे, असे सुषमा अंधारे यांनी लिहिले आहे.

  • 11 Dec 2025 11:02 AM (IST)

    11 Dec 2025 11:02 AM (IST)

    माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची जयंती

    प्रणव मुखर्जी हे भारताचे १३वे राष्ट्रपती (२०१२-२०१7) होते. प्रणव मुखर्जी हे कॉंग्रेस पक्षामधून राजकारण करत होते मात्र विरोधकांसोबत त्यांची उत्तम मैत्री होती. त्यांनी 50 वर्षाहून अधिक काळ कॉंग्रेस पक्षामध्ये काम केले. यावेळी त्यांनी पक्ष आणि सरकारमधील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी अनेक केंद्रीय मंत्रीपदे सांभाळली आणि नंतर राष्ट्रपती म्हणून काम केले. ११ डिसेंबर, १९३५ रोजी  त्यांचा जन्म झाला. राजकारणात येण्यापूर्वी प्राध्यापक आणि पत्रकार म्हणूनही काम केले. त्यानंतर प्रणव मुखर्जी हे पश्चिम बंगालमधील पहिले राष्ट्रपती होते आणि ११ डिसेंबर १९३५ रोजी जन्म घेऊन ३१ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचे निधन झाले.

  • 11 Dec 2025 10:59 AM (IST)

    11 Dec 2025 10:59 AM (IST)

    जसप्रीत बुमराहची अर्शदीप सिंहने उडवली खिल्ली!

    दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बुमराहने पहिला बळी घेत आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०० बळी पूर्ण केले. हा विक्रम करणारा तो अर्शदीप सिंगनंतर दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. जेव्हा ब्रॉडकास्टरने अर्शदीप सिंगला बुमराहच्या १०० व्या विकेटबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, “आमच्या क्लबमध्ये आपले स्वागत आहे.” त्यानंतर अर्शदीप सिंगला विचारण्यात आले की बुमराह आता विराट कोहलीसारखा त्याच्या रीलचा भाग बनू शकतो का? अर्शदीप सिंगने विनोदाने म्हटले की त्यासाठी त्याला अजून जास्त विकेट्स घ्याव्या लागतील, म्हणजेच तो अजून त्या पातळीवर पोहोचलेला नाही. यापूर्वी, विझागमधील शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर अर्शदीपने विराटसोबत बनवलेला एक रील व्हायरल झाला होता.

    "Jassi bhai still needs to get some more wickets to feature on my Instagram." 😂😂#ArshdeepSingh and sarcasm: a match made in heaven. 🤪#INDvSA | 2nd T20I 👉 THU, 11th DEC, 6:00 PM pic.twitter.com/Ofle8xIo40

    — Star Sports (@StarSportsIndia) December 10, 2025

Marathi Breaking News Updates : पुण्यातील भोसरी जमीन खरेदीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांना पत्नी जावयावसह १८ डिसेंबर २०१५ रोजी मुंबई येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा विशेष न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खडसेंचा अर्ज फेटाळून लावत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १३ (१) ड, १३ (२), १५ भारतीय दंड संहिता कलम १०९ प्रमाणे खटला चालविण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात ३० मे २०१६ ला तक्रार दाखल केली होती. गवंडे यांच्या तक्रारीवर पोलिसांनी पुढील कारवाई न केल्याने गवंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने गवंडे यांच्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश लाचलुचपत विभागाला दिले होते. एप्रिल २०१७ मध्ये लाचलुचपत विभागाने खडसे, त्यांची पत्नी, जावई आणि उकानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली.

Web Title: Marathi breaking news live updates marathi top news live updates crime news international news national news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 09:07 AM

Topics:  

  • Breaking News
  • crime news
  • national news

संबंधित बातम्या

दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
1

दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

कराडमध्ये मोठ्या रॅकेटचा भांडाफोड; तज्ज्ञ डॉक्टरांच्या बनावट सहीचा दिला जायचा रिपोर्ट
2

कराडमध्ये मोठ्या रॅकेटचा भांडाफोड; तज्ज्ञ डॉक्टरांच्या बनावट सहीचा दिला जायचा रिपोर्ट

सोनगाव मंदिरातील खून प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
3

सोनगाव मंदिरातील खून प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

लेकाने केली बापाची निर्घृण हत्या, झोपेत असताना डंबेल्स घातले डोक्यात; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा
4

लेकाने केली बापाची निर्घृण हत्या, झोपेत असताना डंबेल्स घातले डोक्यात; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.