Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दिली इराणला धमकी

Marathi Breaking Live Updates : राजकारण, समाजकारण, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बातम्यांसह स्थानिक घडामोडींची माहिती घेण्यासाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 24, 2026 | 06:09 PM
Top Marathi News Today Live

Top Marathi News Today Live

Follow Us
Follow Us:

Marathi Breaking News Updates : अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. इराणवर इस्त्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून जोरदार हल्ले केले जात होते. मात्र, सध्या शांतिकरार झाल्याने हल्ले कमी झाल्याचे दिसून येत आहे. असे असताना आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. ‘जर इराणने अणुनिरीक्षणास परवानगी देण्यास नकार दिला, तर दोन्ही देशांमधील सुरू असलेली तांत्रिक चर्चा थांबवली जाईल’, असे म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, तेहरानने त्यांना वैयक्तिकरित्या निरीक्षणाचे आश्वासन दिले आहे आणि चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात आहे. इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखणे हे अमेरिकेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. अमेरिका-इराण करारानुसार तीन महिन्यांहून अधिक काळानंतर पश्चिम आशियामध्ये प्रस्थापित झालेली शांतता पुन्हा धोक्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, जर इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला (IAEA) आपल्या अणुकार्यक्रमाची तपासणी करण्यास परवानगी दिली नाही, तर ते तेहरानसोबत सुरू असलेल्या तांत्रिक चर्चेसंबंधित बैठका रद्द करतील.

The liveblog has ended.
  • 24 Jun 2026 06:00 PM (IST)

    24 Jun 2026 06:00 PM (IST)

    CUET UG 2026: ‘सीयूईटी यूजी’ परीक्षेत देविना गहलोत देशात पहिली!

    CUET UG Topper Success Story: कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच ‘सीयूईटी यूजी २०२६’ (CUET UG 2026) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत संपूर्ण देशात पहिला क्रमांक देविना गहलोत हिने पटकावला आहे. तिने परीक्षेत सर्वाधिक एनटीए (NTA) स्कोअर मिळवून ‘ऑल इंडिया रँक-१’ (AIR 1) हासिल केला आहे.

  • 24 Jun 2026 05:47 PM (IST)

    24 Jun 2026 05:47 PM (IST)

    Arvind Vekaria Death News : गुजराती रंगमंचावरील सितारा हरपला!

    गुजराती रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अरविंद वेकारिया यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत बाघा ही लोकप्रिय भूमिका साकारणारे अभिनेता तन्मय वेकारिया हे त्यांचे सुपुत्र आहेत. काही महिन्यांपूर्वीच तन्मय यांच्या आईचे निधन झाले होते. अशात आता वडिलांचेही निधन झाल्याने वेकारिया कुटुंबावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या बातमीनंतर चाहते आणि कलाविश्वातील अनेक मान्यवरांकडून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

  • 24 Jun 2026 05:37 PM (IST)

    24 Jun 2026 05:37 PM (IST)

    समर्थ रामदासांच्या विचारांचा जागर, ‘समर्थ’चा फर्स्ट लुक चर्चेत

    समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची नव्या पिढीशी सांगड घालण्याचा अनोखा प्रयत्न म्हणून आगामी ‘समर्थ’ चित्रपटाच्या पोस्टरचे भव्य अनावरण पुण्यात करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत पार पडलेल्या या कार्यक्रमात तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत समर्थ विचारांना मानवंदना दिली.

    कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनोपासना आणि बलोपासनेच्या प्रात्यक्षिकांनी झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालत समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीचा गौरव केला. ‘मनाचे श्लोक’मधील निवडक श्लोकांचे सामूहिक पठण झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला.

  • 24 Jun 2026 05:17 PM (IST)

    24 Jun 2026 05:17 PM (IST)

    Ketan Agrawal Case: एवढं जीवापाड प्रेम करूनही होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला

    Ketan Agrawal Murder Case: ‘प्रेमात कोण जिंकत तर कोण मरतं…” या उक्तीचा अत्यंत थरकाप उडवणारा आणि क्रूर प्रत्यय महाराष्ट्रात आला आहे. लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या २५ वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवालच्या (Ketan Agarwal) मृत्यूचे गूढ उकलले असून, ही दुर्घटना नसून एक सुनियोजित हत्या असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. केतनच्या हत्येप्रकरणी त्याची होणारी पत्नी सिया गोयल (Siya Goel) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Choudhary) यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर सोशल मीडियावर केतन आणि सियाचे काही जुने व्हिडिओ आणि रोमँटिक पोस्ट्स व्हायरल होत आहेत, ज्या पाहिल्यानंतर कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. केतन ज्या तरुणीवर जीवापाड प्रेम करत होता, तिच्याच आनंदासाठी लाखो रुपये खर्च करत होता, तीच तरुणी त्याच्या पाठीमागे मृत्यूचा सापळा रचत होती.

  • 24 Jun 2026 05:07 PM (IST)

    24 Jun 2026 05:07 PM (IST)

    जागतिक नेतृत्वात पंतप्रधान मोदी अव्वल!

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगाच्या राजकीय, आर्थिक आणि सामरिक पटावर अशी मुसंडी मारली आहे की, आता महासत्तांनाही भारताच्या वाढत्या प्रभावाची दखल घ्यावी लागत आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘लोवी इन्स्टिट्यूट’च्या ताज्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणाने यावर शिक्कामोर्तब केले असून, जागतिक नेतृत्वाच्या शर्यतीत नरेंद्र मोदी यांनी अव्वल स्थान पटकावत नवा इतिहास रचला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन करत, “हा केवळ मोदींचा विजय नसून नव्या भारताच्या सामर्थ्याचा जागतिक स्वीकार आहे,” असे म्हटले आहे.

  • 24 Jun 2026 05:01 PM (IST)

    24 Jun 2026 05:01 PM (IST)

    पाकिस्तानची बोलती बंद! UNSC मध्ये काश्मीर मुद्याचा उल्लेख करताचा भारताने दाखवला आरसा

    भारत पाकिस्तानमध्ये पुन्हा शाब्दिक संघर्ष पेटला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याने वाद पेटला. यावर प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानचा समाचार घेतला आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि चीनच्या स्थीय मिशनतर्फे एरिया-फॉर्म्युला बैठकाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. यावर परिषदेचे प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले.

  • 24 Jun 2026 04:55 PM (IST)

    24 Jun 2026 04:55 PM (IST)

    लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया

    आयपीएल 2027 ची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. पुढील वर्षी आयपीएलमध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. त्याने लखनौच्या संघाला रामराम ठोकला आहे. त्याने काही दिवस आधी लखनौचे कर्णधारपद देखील सोडले होते. त्याने आता लखनौचा संघ सोडल्यावर तीन शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऋषभ पंतने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्याने थॅंक यू टीम असे म्हटले आहे.

  • 24 Jun 2026 04:45 PM (IST)

    24 Jun 2026 04:45 PM (IST)

    टोमॅटोचे भाव 70 रुपयांच्या पार, भाव कमी करण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय?

    टोमॅटोचे भाव गगनाला भिडत आहेत. या लालेलाल टोमॅटोंमुळे सगळ्यांच्या खिशावर ताण आणला आहे.  सर्वसामान्यांच्या खर्चाचं गणितच बदलून टाकलंय. अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा भाव ७० रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे, तर काही भागांमध्ये किरकोळ दर त्याहूनही जास्त वाढला आहे. त्यामुळे वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने जनतेला दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अनुदानित टोमॅटो विकण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत, सरकार कमी किमतीत टोमॅटो उपलब्ध करून देऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा देईल.

  • 24 Jun 2026 04:33 PM (IST)

    24 Jun 2026 04:33 PM (IST)

    अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार

    कल्याण पुर्वेत कोळशेवाडी पोलिसांच्या हद्दीत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. एका ५५ वर्षीय नराधमाने ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली. या घटनेत तीव्र संताप व्यक्त करत, पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ५५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

  • 24 Jun 2026 04:22 PM (IST)

    24 Jun 2026 04:22 PM (IST)

    परीक्षा केंद्रावर सापडला मोबाईल; विद्यार्थिनीचा उडी मारून पळण्याचा प्रयत्न

    राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेवेळी (NEET-२०२६) हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय परीक्षा केंद्रावर एक नाट्यमय प्रकार घडला. परीक्षेदरम्यान एका विद्यार्थिनीच्या बाकावर मोबाईल फोन आढळून आल्यानंतर तिला चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनीने जिन्यालगतच्या व्हरांड्यातून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ परीक्षा केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

  • 24 Jun 2026 04:11 PM (IST)

    24 Jun 2026 04:11 PM (IST)

    उझबेकिस्तानविरुद्ध गोल करत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा FIFA World Cup 2026 मध्ये नवा जागतिक विक्रम

    पोर्तुगालचा संघ फिफा विश्वचषकात ( FIFA World Cup 2026) कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलांच्या जोरावर पोर्तुगालने उझबेकिस्तानचा ५-० असा पराभव केला. या सामन्यात रोनाल्डोने अगदी सुरुवातीच्या मिनिटांतच पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली आहे. रोनाल्डोने (Cristiano ronaldo) सहाव्या मिनिटाला गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. फिफा विश्वचषकातील रोनाल्डोचा हा १०वा गोल होता. ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी हा एक ऐतिहासिक गोल असून, यासोबतच त्याने आपल्या नावावर एक विश्वविक्रमही नोंदवला आहे. सहा विश्वचषकांमध्ये गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

  • 24 Jun 2026 04:00 PM (IST)

    24 Jun 2026 04:00 PM (IST)

    पंतप्रधान मोदी खामेनींच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार? इराणच्या निमंत्रणाने वाढले जागतिक राजकारणातील तापमान

    PM Modi to attend Ayatollah Khamenei funeral 2026 : जागतिक राजकारणातून सध्या एक अत्यंत मोठी आणि राजनैतिकदृष्ट्या (Diplomatically) संवेदनशील बातमी समोर येत आहे. इराणचे सर्वोच्च नेते (Supreme Leader) अयातुल्ला अली खामेनी यांच्या आगामी अंत्यविधीसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृतपणे आमंत्रित केले आहे. गेल्या २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या एका भीषण संयुक्त लष्करी हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी मारले गेले होते. या घटनेनंतर पश्चिम आशियात मोठा तणाव निर्माण झाला होता. आता त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल चार महिन्यांनी इराणमध्ये त्यांच्या भव्य अंत्यविधीचे नियोजन करण्यात आले आहे. या अत्यंत संवेदनशील प्रसंगी भारताचे पंतप्रधान तिथे उपस्थित राहणार का, याकडे आता संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. वाचा सविस्तर

  • 24 Jun 2026 03:55 PM (IST)

    24 Jun 2026 03:55 PM (IST)

    ‘मराठीचा अभिमान अन् आशाताईंचा…’, वाचनात झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची सभागृहात दिलगिरी

    मुंबई: सोमवारी शोकप्रस्ताव वाचताना उच्चार आणि वाचनात झालेल्या चुकांबद्दल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी सभागृहात तीव्र खेद व्यक्त केला. सोशल मीडियावरील तीव्र टीका आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या टिप्पणीनंतर, नार्वेकर यांनी स्पष्ट केले की या चुका पूर्णपणे अनवधानाने झाल्या होत्या. विधानसभेत निवेदन करताना नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, त्यांना देण्यात आलेल्या शोकप्रस्तावांच्या मजकुरात तांत्रिक आणि टायपोग्राफिकल चुका होत्या, ज्या त्यांनी नकळतपणे वाचल्या. त्यांनी नमूद केले की एकूण १२ शोकप्रस्ताव होते आणि त्यांना दिलेल्या प्रिंटआउटमधील मजकूर अस्पष्ट होता, फॉन्टचा आकार खूप लहान होता आणि त्यात काही तांत्रिक त्रुटी होत्या. वाचा सविस्तर

  • 24 Jun 2026 03:45 PM (IST)

    24 Jun 2026 03:45 PM (IST)

    कोलकात्यात भीषण अपघात

    Kolkata Warehouse Collapse News Marathi : पश्चिम कोलकातामधील ताराताला पोलीस ठाण्याच्या हद्दीत, ब्रेस ब्रिजजवळ ट्रान्सपोर्ट डेपो रोडवर बांधकाम सुरू असलेल्या एका गोदामाचे छत बुधवारी (24 जून 2026) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळले, त्यामुळे अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोलकाता पोलीस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन गट (DMG), नागरी संरक्षण दल आणि अग्निशमन दलाची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. आतापर्यंत चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. वाचा सविस्तर

  • 24 Jun 2026 03:40 PM (IST)

    24 Jun 2026 03:40 PM (IST)

    भारतातील पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार ?

    अमेरिका-इराण यांच्यातील युद्ध संपलं आहे. शांतता करार झाल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने घसरत आहेत. ताज्या अपडेटनुसार कच्च्या तेलाच्या किमती चार महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. युद्धादरम्यान प्रति बॅरल सुमारे १२० डॉलरपर्यंत पोहोचून जगाला घाबरवणारे तेल आता ७७ डॉलरपर्यंत खाली घसरले आहे. पण यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर त्याचा किती फायदा होणार? वाचा सविस्तर

  • 24 Jun 2026 03:35 PM (IST)

    24 Jun 2026 03:35 PM (IST)

    अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा F-1 व्हिसा अचानक रद्द

    US Visa Revocation : एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी परत चाललेल्या भारतीय विद्यार्थ्याला मोठा धक्का बसला आहे. या विद्यार्थ्याला ॲमस्टरडॅममधून परत मायदेशी परतावे लागले आहे. अमेरिकेने त्याचा F-1 Visa रद्द केला आहे. यामागचे कारण अस्पष्ट असून विद्यार्थ्याला याची पूर्वसुचनाही देण्यात आली नव्हती. नेमकं काय घडलं? आणि हा F-1 व्हिसा काय आहे? जाणून घेऊयात.

  • 24 Jun 2026 03:30 PM (IST)

    24 Jun 2026 03:30 PM (IST)

    Deool Band 2 : ‘माझ्या सिनेमाने ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं रेकॉर्ड…’ हे काय म्हणाला प्रवीण तरडे? रितेशचंही घेतलं नाव

    देऊळ बंद 2 च्या यशानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे सध्या चर्चेत आहे. देऊळबंद 2 सिनेमाने 90 कोटींचा आकडा पार केला आहे. लवकरच सिनेमा 100 कोटींच्या घरात एंट्री करणार आहे. असा विश्वास स्वतः सिनेमाचा दिग्दर्शक प्रवीण तरडे याने एका मुलाखतीत दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या वाहिन्यांनी दिगर्शक प्रवीण तरडेची मुलाखत घेतली, त्यामध्ये दिग्दर्शकाने त्याच्या सिनेमांच्या अनेक पैलूंवर चर्चा केली. या काही मुलाखतींमध्ये त्याने त्याचा आगामी सिनेमा ‘मुळशी पॅटर्न 2’ या सिनेमाविषयीही जाहीररीत्या सांगितले. वाचा सविस्तर

  • 24 Jun 2026 03:25 PM (IST)

    24 Jun 2026 03:25 PM (IST)

    स्टायलिश लूकसह नवा Realme स्मार्टफोन लाँच

    स्मार्टफोन कंपनी Realme ने निवडक जागतिक बाजारात Realme P4x 4G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने स्मार्टफोन दोन रंगांच्या पर्यायांत लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 20 हजारांहून कमी आहे. बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये 8,000mAh बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहे. नव्या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

  • 24 Jun 2026 03:20 PM (IST)

    24 Jun 2026 03:20 PM (IST)

    परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल

    अलिकडे सोशल मिडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यात परदेशातील एका रेस्टाॅरंटमध्ये महिला आणि वेटरमध्ये जोरदार भांडण झाल्याचे दिसून आले. वेटर हा बांग्लादेशी होता तर महिला भारतीय होती अशात दोघांंमध्ये देशावरुन वाद निर्माण झाला. दावा केला जात आहे की, मूळचा बांग्लादेशी असणाऱ्या या वेटरने भारत आणि भारतीयांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. यामुळे तिथे उपस्थित असलेल्या भारतीय महिलांनी त्याच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आणि त्याच्याकडे माफीची मागणी केली. वाचा सविस्तर

  • 24 Jun 2026 03:15 PM (IST)

    24 Jun 2026 03:15 PM (IST)

    उत्तर कोरियाच्या नौदलात ५,००० टन वजनाची शक्तिशाली आणि प्रगत विनाशिका सामील

    North Korea Choe Hyon warship 2026 : जागतिक पातळीवर लष्करी आणि अण्वस्त्रांच्या स्पर्धेत उत्तर कोरियाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. उत्तर कोरियाने आपल्या नौदलात ५,००० टन वजनाची ‘चोए ह्योन’ (Choe Hyon) नावाची एक अत्यंत शक्तिशाली आणि प्रगत विनाशिका सामील केली आहे. या ऐतिहासिक प्रसंगी देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग-उन यांनी अत्यंत आक्रमक घोषणा केली. त्यांच्या मते, हे नवीन युद्धजहाज अण्वस्त्रांनी सुसज्ज असून याच्या आगमनाने उत्तर कोरियाच्या नौदलाची लढाऊ क्षमता ‘कल्पनेपलीकडच्या’ पातळीवर पोहोचली आहे. उत्तर कोरियाची अधिकृत सरकारी वृत्तसंस्था ‘केसीएनए’ (KCNA) च्या अहवालानुसार, हे पाऊल देशाच्या सागरी लष्करी रणनीतीमधील एक अत्यंत मोठे आणि ऐतिहासिक स्थित्यंतर मानले जात आहे. वाचा सविस्तर

     

  • 24 Jun 2026 03:10 PM (IST)

    24 Jun 2026 03:10 PM (IST)

    क्रिकेटपटू Abhishek Porel कायद्याच्या कचाट्यात, गंभीर प्रकरण काय?

    Abhishek Porel: दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज आणि विकेटकिपर अभिषेक पोरेल हा एका मोठ्या कायदेशीर अडचणी सापडला आहे. त्याच्यावर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन मारहाण आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील एका महिलेने त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. नेमकं प्रकरण काय?

  • 24 Jun 2026 03:05 PM (IST)

    24 Jun 2026 03:05 PM (IST)

    उघड्या मॅनहोलचे वास्तव महापौरांसमोरच उघड! पाहणीदरम्यान एकजण गटारात पडला

    Mumbai Mayor Ritu Tawde News Marathi : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या आणि नागरी सुविधांतील त्रुटींच्या घटना समोर येत आहेत. अशातच माटुंगा परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. मुंबईच्या महापौर रितू तावडे या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माटुंग्यात गेल्या असताना त्यांच्या समोरच एकजण उघड्या मॅनहोलमध्ये पडला. नेमकं काय घडलं?

  • 24 Jun 2026 02:58 PM (IST)

    24 Jun 2026 02:58 PM (IST)

    ठाणे आनंदनगर भागात झाड कोसळलं

    ठाण्यातील आनंद नगर भागात पावसामुळे एक भलं मोठं झाड कोसळलंय.. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक मंदावलीय. हे झाड कोसळून 5 वाहनांचं नुकसान झालंय. दरम्यान अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं असून हे झाड हटवण्याचे काम सुरु करण्यात आलंय.

  • 24 Jun 2026 02:50 PM (IST)

    24 Jun 2026 02:50 PM (IST)

    वादळी वा-यामुळे पपईच्या बागांचं नुकसान

    वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे रात्री वादळी वाऱ्यासह पावसामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेली पपईची झाडे उलमडली गेल्याने फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

  • 24 Jun 2026 02:41 PM (IST)

    24 Jun 2026 02:41 PM (IST)

    लग्न ठरल्यापासून सिया-चेतनचं 238 तास संभाषण

    सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांचे मोबाईल रेकॉर्ड्स (CDR) तपासले, तेव्हा त्यांच्यातील गुप्त प्रेमसंबंधांचा उघड पर्दाफाश झाला. तपासात समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते १८ जून या अवघ्या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २००४ वेळा फोनवर संभाषण झाले होते. या ६ महिन्यांत त्यांनी एकूण २३८ तास एकमेकांशी संवाद साधला होता. यावरून या दोघांनी किती योजनाबद्ध पद्धतीने केतनचा काटा काढण्याचा कट रचला होता, हे स्पष्ट होते.

  • 24 Jun 2026 02:31 PM (IST)

    24 Jun 2026 02:31 PM (IST)

    विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; जामखेड इथल्या 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 26.84 कोटींचा निधी मंजूर

    विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याने जामखेड (जि. अहिल्यानगर) येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करुन ते आता 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाले असून रुग्णालय संलग्न कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकामासाठी पुरवणी मागणीद्वारे 26.84 कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या पहिल्या दिवशी सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये ही तरतूद करण्यात आल्याने जामखेड आणि परिसरातील रहिवाशांसाठी 100 खाटांच्या सुसज्ज उपजिल्हा रूग्णालय उभारणीच्या कामास गती मिळाली आहे.

  • 24 Jun 2026 02:20 PM (IST)

    24 Jun 2026 02:20 PM (IST)

    जालन्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक; फुटलेल्या सहा खासदारांविरोधात भीक मांगो आंदोलन...

    उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या विरोधात आज जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. जालना शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या प्रवाशांकडून आणि सामान्य नागरिकांकडून जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुखांनी एक-एक रुपयांची भीक मागत हे अनोख आंदोलन करण्यात आलं. शिवाय या सहाही खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेधही नोंदवला. दरम्यान संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे ऑपरेशन तुडवा आम्ही राबवणार असल्यासही पदाधिकाऱ्यांनी म्हटले.

  • 24 Jun 2026 02:08 PM (IST)

    24 Jun 2026 02:08 PM (IST)

    भाजप आमदार महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांचे नवी मुंबई विमानतळावर लक्षवेधी आंदोलन

    लोकनेते माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज नवी मुंबई विमानतळावर भाजपने लक्षवेधी आंदोलन केले. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, म्हणून हे लक्षवेधी आंदोलन असल्याचे सांगण्यात आले. या वेळी आम्हाला आमच्या नेत्यांवर विश्वास आहे. त्यांनी दिलेला शब्द मोडला जाणार नाही. कोणत्याही स्थितीत आमचा आग्रह कायम आहे आणि राहील. मात्र आपल्याच सरकार विरोधात आपल्याला आंदोलन करण्याची वेळ का आली याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देताना आम्ही लक्ष वेधत आहोत.

  • 24 Jun 2026 02:00 PM (IST)

    24 Jun 2026 02:00 PM (IST)

    आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’

    आदित्य बिर्ला ग्रुपने ‘आयएनटी (INT) आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’ सुरू केली आहे. या उपक्रमामुळे एका ऐतिहासिक भारतीय सांस्कृतिक संस्थेला नवी ओळख आणि नवा उद्देश प्राप्त झाला आहे. या अकादमीच्या स्थापनेसह ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (INT) या संस्थेच्या प्रवासातील एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे; ही संस्था स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून कलाकार आणि प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांचे जतन व संवर्धन करत आली आहे.

  • 24 Jun 2026 01:55 PM (IST)

    24 Jun 2026 01:55 PM (IST)

    ‘…हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला

    महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सभागृहात दिवंगत गायिका आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावाचा मराठी मजकूर वाचला गेला. हा प्रस्ताव वाचताना झालेल्या सलग उच्चार चुकांमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. असे असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. ‘महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही, मराठी वाचता येत नाही, मराठी लिहिता येत नाही आणि मराठीत विचार करता येत नाही. हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’ आहेत, याचा शोध घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.

  • 24 Jun 2026 01:45 PM (IST)

    24 Jun 2026 01:45 PM (IST)

    निधीअभावी कामे रखडल्याचा कांगावा करणाऱ्या ‘त्या’ ६ लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे

    मतदारसंघात विकास कामांसाठी निधी मिळत नाही, त्यामुळे कामे खोळंबली आहेत आणि जनतेची कामे करण्यासाठीच आम्ही सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहोत, असा दावा करत काल ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ शिवसेनेच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मात्र, या खासदारांचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे अधिकृत आकडेवारीवरून समोर आले आहे. खाजगी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या खासदारांना केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, परंतु त्याचा योग्य वापर करण्यात हे खासदार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.

  • 24 Jun 2026 01:35 PM (IST)

    24 Jun 2026 01:35 PM (IST)

    पत्नीच्या छळामुळे उद्ध्वस्त झाले पतीचे आयुष्य; OTT वरील हे ५ चित्रपट नक्की पाहा

    पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची नावे समोर आल्यानंतर या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. नात्यातील विश्वासघात, फसवणूक आणि गुन्हेगारीचे हे प्रकरण समोर आल्यानंतर अशाच धक्कादायक कथानकांवर आधारित काही चित्रपट पुन्हा चर्चेत आले आहेत. चला जाणून घेऊया OTT वर उपलब्ध असलेल्या अशाच ५ थरारक चित्रपटांविषयी.

  • 24 Jun 2026 01:25 PM (IST)

    24 Jun 2026 01:25 PM (IST)

    खराडीत किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात मारला सिलेंडर; महिलेचा जागीच मृत्यू

    पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून पतीने पत्नीच्या डोक्यात घरातील छोटा गॅस सिलेंडर मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घडलेली घटना खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.किरण जयराम बाबर (वय अंदाजे ३० ते ३२ वर्षे) असे आहे. तर तिच्या पतीचे नाव जयराम तोताराम बाबर असे आहे. हे दोघेही पती-पत्नी मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असून ते खराडी परिसरातील एका लेबर कॅम्पमध्ये राहतात. उदरनिर्वाहासाठी ते कचरा गोळा करणाऱ्या गाडीवर काम करत होते. मंगळवारी मध्यरात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याच संतापाच्या भरात जयराम बाबर याने घरातील छोटा गॅस सिलेंडर उचलून पत्नी किरण हिच्या डोक्यात जोरदार मारला.

  • 24 Jun 2026 01:15 PM (IST)

    24 Jun 2026 01:15 PM (IST)

    Mumbai Local पुन्हा हादरली! दरवाजा बंद करण्यास सांगितलं अन् जीव गेला

    मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने खळबळ उडाली आहे. मुसळधार पावसात लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हत्येत झाले. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते नालासोपारा दरम्यान धावणाऱ्या फास्ट लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात एका सहप्रवाशाने २२ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार मारले. धावत्या ट्रेनमधील या भीषण घटनेमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • 24 Jun 2026 01:05 PM (IST)

    24 Jun 2026 01:05 PM (IST)

    …आणि एअर इंडियाचं विमान थेट पाकिस्तानात घुसलं! प्रवाशांचा जीव टांगणीला

    तुम्ही विमानात बसून निघालाय आणि तुम्हाला कळलं की तुमचं विमान पाकिस्तानात पोहोचलं तर… असाच प्रकार नुकताच घडलाय. एअर इंडिया पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सोमवारी रात्री म्हणजेच २२ जूनला २०० हून अधिक प्रवाशांना घेऊन एक विमान दिल्लीहून अमृतसरसाठी निघाले होतं. मात्र, हे विमान अमृतसरला पोहोचण्याऐवजी विमान लाहोरला गेलं. थेट पाकिस्तानात पोहोचल्याचं कळताच पुढे काय घडलं? सविस्तर जाणून घेऊयात.

  • 24 Jun 2026 12:48 PM (IST)

    24 Jun 2026 12:48 PM (IST)

    ‘…हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला

    महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सभागृहात दिवंगत गायिका आशा भोसले यांच्या शोकप्रस्तावाचा मराठी मजकूर वाचला गेला. हा प्रस्ताव वाचताना झालेल्या सलग उच्चार चुकांमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. असे असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. ‘महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही, मराठी वाचता येत नाही, मराठी लिहिता येत नाही आणि मराठीत विचार करता येत नाही. हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’ आहेत, याचा शोध घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.

  • 24 Jun 2026 12:47 PM (IST)

    24 Jun 2026 12:47 PM (IST)

    Mumbai Local पुन्हा हादरली! दरवाजा बंद करण्यास सांगितलं अन् जीव गेला; अंधेरी-बोरिवलीदरम्यान २२ वर्षीय तरुणावर चाकू हल्ला

    मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने खळबळ उडाली आहे. मुसळधार पावसात लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हत्येत झाले. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते नालासोपारा दरम्यान धावणाऱ्या फास्ट लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात एका सहप्रवाशाने २२ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला ठार मारले. धावत्या ट्रेनमधील या भीषण घटनेमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • 24 Jun 2026 12:45 PM (IST)

    24 Jun 2026 12:45 PM (IST)

    आधी ५० कोटींची खंडणी, नंतर थेट गोळीबार! पुण्यात लॉरेन्स बिष्णोई गँगची दहशत?

    गैंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीचे पुणे कनेक्शन दोन वेगवेगळ्या घटनांमधून समोर आल्यानंतर आता या टोळीने पुण्यात पाय रोवण्यास सुरूवात केली असून, प्रसिद्ध व्यावसायिकांना ५० कोटींच्या खंडणीसाठी आधी फोनद्वारे धमकी देऊन नंतर काही तासातच त्यांच्या दुकानावर गोळीबार घडवून आणल्याची धक्कादायक घटना रात्री घडली. याघटनेमुळे पुर्ण शहरात खळबळ तर उडाली आहेच पण बिष्णोई टोळीच्या या गोळीबाराने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण देखील निर्माण केले आहे.

  • 24 Jun 2026 12:42 PM (IST)

    24 Jun 2026 12:42 PM (IST)

    स्वार्थासाठी पक्षांतर? निधीअभावी कामे रखडल्याचा कांगावा करणाऱ्या ‘त्या’ ६ लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे

    मतदारसंघात विकास कामांसाठी निधी मिळत नाही, त्यामुळे कामे खोळंबली आहेत आणि जनतेची कामे करण्यासाठीच आम्ही सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहोत, असा दावा करत काल ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ शिवसेनेच्या सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मात्र, या खासदारांचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे अधिकृत आकडेवारीवरून समोर आले आहे. खाजगी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या खासदारांना केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला होता, परंतु त्याचा योग्य वापर करण्यात हे खासदार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.

  • 24 Jun 2026 12:00 PM (IST)

    24 Jun 2026 12:00 PM (IST)

    धर्मेंद्र प्रधान यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला म्हटलं देशद्रोही; आता पुन्हा वादळ उठणार?

    कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आलेल्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा आहे. नीट पेपरफुटी आणि सीबीएसई पुनर्मूल्यांकन प्रकरणांमुळे वादात सापडलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला देशद्रोही म्हटले आहे. सीजेपी ही विघटनकारी घटकांची ‘बी-टीम’ असल्याचा आरोप प्रधान यांनी केला. ‘ज्यांना लोकशाहीत जनतेने नाकारले, ते आता वेष बदलून आले असून व्यवस्थेला लक्ष्य करत आहेत’, असे ते म्हणाले.

  • 24 Jun 2026 11:40 AM (IST)

    24 Jun 2026 11:40 AM (IST)

    मोदींच्या कॅबिनेटमध्ये लवकरच फेरबदल

    दिल्लीतील राजकारण शिगेला पोहोचले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ आणि भाजप संघटनेत मोठ्या फेरबदलाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मंगळवारी (२३ जून, २०२६) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. २०२७ च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. परिणामी, या राज्यांमध्ये आपले स्थान मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून भाजप संभाव्य फेरबदलाचा विचार करत असल्याचे मानले जात आहे.

  • 24 Jun 2026 11:30 AM (IST)

    24 Jun 2026 11:30 AM (IST)

    फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन कोर्टाचा दणका; कर्जप्रकरणी १०० कोटींची थकबाकी भरण्याचा आदेश

    पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला मोठा झटका मिळाला आहे. लंडनच्या उच्च न्यायालयाने कर्जवसुलीशी संबंधित प्रकरणात कोटींचा दंड ठोठावला आहे. बँक ऑफ इंडियाच्या बाजूने निकाल देत नीरव मोदीला सुमारे १०.७ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे १०० कोटी रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • 24 Jun 2026 11:20 AM (IST)

    24 Jun 2026 11:20 AM (IST)

    नोकरीची ऑफर रद्द करणाऱ्या कंपन्यांना आयआयटीचा दणका; ३ महिन्यांचा पगार द्या, नाहीतर थेट ‘बॅन’

    देशातील प्रमुख भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी (IITs) कॅम्पस प्लेसमेंटदरम्यान विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर देऊन ती नंतर मागे घेणाऱ्या कंपन्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. ‘ऑल आयआयटी प्लेसमेंट कमिटी’ने (AIPC) १० हून अधिक कंपन्यांना चेतावणी जारी केली आहे की, त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या ऑफर्सचा आदर करावा किंवा बाधित विद्यार्थ्यांना योग्य ती भरपाई द्यावी. विद्यार्थ्यांचे करिअर आणि रोजगार सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

  • 24 Jun 2026 11:15 AM (IST)

    24 Jun 2026 11:15 AM (IST)

    टास्क पूर्ण करा अन् जिंका 1600 गोल्ड! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

    फ्री फायर मॅक्समध्ये एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक मजेदार रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी काही टास्क पूर्ण करावे लागणार आहे. टास्क पूर्ण केल्यानंतर रिवॉर्ड्स क्लेम केले जाऊ शकतात. फ्री फायर खेळणाऱ्या प्लेअर्सना वेपन स्किन, इमोट, बंडल, पेट आणि कॅरेक्टरसह इत्यादी वस्तू अतिशय फायद्याच्या ठरतात. पण गेममधील या वस्तू खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड्स खर्च करावे लागतात. आता गेममधील नवीन ईव्हेंटमध्ये तुम्हाला या वस्तू डायमंड्स खर्च न करता क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

  • 24 Jun 2026 11:05 AM (IST)

    24 Jun 2026 11:05 AM (IST)

    विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी

    बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. हत्येच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणात 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

  • 24 Jun 2026 10:50 AM (IST)

    24 Jun 2026 10:50 AM (IST)

    कानावर पडताच पाय थिरकतील! ‘भूतम भयम’च्या ‘गोमु सासरला जाते’ ने सोशल मीडियावर

    आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूतम भयम’ प्रदर्शित होण्याआधीच त्यातील ‘गोमु सासरला जाते’ हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. हळदी समारंभाचा जल्लोष, उत्साहाने भरलेली नृत्यरचना आणि जोशपूर्ण संगीत यामुळे हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड होत असून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

    लग्नसोहळ्यातील धमाल, मित्रमंडळींची मस्ती आणि एका सुंदर तरुणीभोवती रंगणारी गंमतीशीर चुरस अशा विविध रंगांनी सजलेले हे गाणे प्रेक्षकांना खिळवून ठेवते. पारंपरिक लग्नसोहळ्याचा माहोल आणि आधुनिक सादरीकरण यांचा सुरेख संगम या गाण्यात पाहायला मिळतो.

  • 24 Jun 2026 10:40 AM (IST)

    24 Jun 2026 10:40 AM (IST)

    भारताला घेरण्याची नवी खेळी? बांगलादेशच्या ‘या’ हालचालीने वाढवली चिंता,

    बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. मात्र, रहमान यांच्या या दौऱ्याने भारताची चिंता वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात दोन्ही देशांत गुंतवणूक, व्यापार, पायाभूत सुविधा आणि तिस्ता नदी व्यवस्थापनाच्या प्रकल्पावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • 24 Jun 2026 10:30 AM (IST)

    24 Jun 2026 10:30 AM (IST)

    भारतीय नर्ससाठी अमेरिकेत नोकरीची मोठी संधी! जाणून घ्या पात्रता निकष आणि अटी

    भारतात बीएससी नर्सिंगची (BSc Nursing) पदवी आरोग्य क्षेत्रात (Health Care Sector) करिअर करण्यासाठी महत्त्वाची  मानली जाते. मात्र, आता मोठ्या संख्येने भारतीय नर्स परदेशातही आपले करिअर करण्याचे स्वप्न पाहतात. अमेरिका हा अशा देशांपैकी एक आहे, जिथे नर्सना सातत्याने मोठी मागणी असते. वाढती लोकसंख्या, आधुनिक आरोग्य सेवा आणि अनुभवी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज यामुळे अमेरिकेतील हॉस्पिटल्स परदेशी नर्सना उत्तम संधी देत आहेत.

  • 24 Jun 2026 10:20 AM (IST)

    24 Jun 2026 10:20 AM (IST)

    शेअर बाजारात आज काय घडणार? कोणते शेअर्स देणार नफा कमावण्याची संधी

    जागतिक बाजारांमधील संमिश्र संकेतांचा विचार करता आज बुधवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, बुधवारी सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात संथ असल्याचे दर्शवतात. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १५ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २३,८६८ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

  • 24 Jun 2026 10:10 AM (IST)

    24 Jun 2026 10:10 AM (IST)

    वय विसरा, कल्पनेत रमा! ‘आंतरराष्ट्रीय परी दिन’ का देतोय मोठ्यांनाही बालपणात

    आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांना जेव्हा कल्पनेचे पंख फुटतात, तेव्हा जन्म होतो एका सुंदर परीचा. बालपणी आजीच्या कुशीत निजून ऐकलेली पांढऱ्याशुभ्र पंखांची, हातात जादूची काडी असणारी आणि एका सेकंदात दुःखाचे सुखात रूपांतर करणारी परी आपल्या प्रत्येकाच्याच मनात कायमची घर करून राहते. याच जादुई विश्वाचा आणि मानवी कल्पकतेचा गौरव करण्यासाठी दरवर्षी २४ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय परी दिन’ (International Fairy Day) साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे केवळ एक सण नाही, तर तो मानवी मनात दडलेल्या निरागसतेचा आणि जादुई विचारांचा एक मोठा सोहळा आहे.

Web Title: Marathi breaking news national and international updates live news coverage marathi live blog

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • navarashtra breaking news
  • Navarashtra Live Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.