Maharashtra Breaking News
01 Dec 2025 08:55 AM (IST)
भारतीय क्रिकेटचा तरुण उदयोन्मुख फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत शानदार खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दोहा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने नोंदवलेले दमदार शतक आणि स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज म्हणून केलेली कामगिरी विशेष ठरली. मात्र, भारतात परतल्यानंतर त्याचा फॉर्म मोठ्या प्रमाणात घसरलेला दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५मध्ये वैभव सूर्यवंशीला सातत्याने धावा काढण्यात अडचणी येत आहेत. ३० नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात बिहारचा संघ जम्मू आणि काश्मीरकडून पराभूत झाला. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बिहारला अपेक्षित भागीदारी मिळाली नाही
01 Dec 2025 08:51 AM (IST)
World AIDS Day 2025 : 1 डिसेंबर हा दिवस डोक्यावर लाल रिबन बांधलेल्या लाखो लोकांसाठी, सामुदायिक आरोग्य कार्यकर्त्यांसाठी, आणि अफाट जागरूकता मोहिमांमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी केवळ एक तारीख नाही, तर आशा, स्मरण, आणि बदलासाठीचा संकल्प आहे. दरवर्षी साजरा केला जाणारा World AIDS Day म्हणजे फक्त एड्स विरोधी लढ्याचा दिवस नसून, जगभरातील लोकांना एकत्र येऊन सामाजिक समज, सहानुभूती, आणि मानवता जागवणारा प्लॅटफॉर्म आहे.
वाचा सविस्तर- दरवर्षी 1 डिसेंबरलाच जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो
Marathi Breaking news live updates- भारताच्या शेजारी देश नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रविवारी (30 नोव्हेंबर) नेपाळच्या सुदूर पश्चिम प्रांत बझांगमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे लोक भीतीने घराबाहेर पडले होते. सध्या या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेली नाही.






