
Top Marathi News Today Live
Marathi Breaking News Updates : एकनाथ शिंदे शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून पत्रकारांना शिवीगाळ करण्यात आली आहे. तसेच मारण्याची धमकीही दिली आहे. इज्जत देतोय, इज्जतीत राहा, असेही ते म्हणाले आहेत.
जागतिक पातळीवर एक अत्यंत धक्कादायक आणि निसर्गाच्या कोपाची भीषण घटना समोर आली आहे. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला (Venezuela) देशाला निसर्गाच्या एका महाभयंकर प्रकोपाचा सामना करावा लागला आहे. व्हेनेझुएलाच्या किनारपट्टीवर काही सेकंदांच्या अंतराने एकापाठोपाठ एक अशा दोन प्रचंड शक्तिशाली भूकंपांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे.
रिश्टर स्केलवर या भूकंपांची तीव्रता अनुक्रमे ७.२ आणि ७.५ इतकी मोजली गेली आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, व्हेनेझुएलाच्या गेल्या १०० वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासातील हा सर्वात विनाशकारी आणि मोठा भूकंप आहे. या भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, पॅसिफिक महासागराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या जपानमध्येही ६.९ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, ज्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
25 Jun 2026 05:30 PM (IST)
Eknath Shinde On Sanjay Patil : खासदार संजय दिना पाटील यांनी दोन दिवसापूर्वी बंडखोर करत शिवसेना (उद्धव ठाकरे) सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यांच्यावर पत्रकारांशी असभ्य भाषा वापरून गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या संदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यांच्या कथित वक्तव्यामुळे विविध स्तरांवर संताप आणि तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, खासदार संजय दिना पाटील यांचा पत्रकारांशी अपमानास्पद बोलण्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र, त्यांनी पाटील यांना पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करण्याचा सल्ला दिला.
25 Jun 2026 05:20 PM (IST)
FIFA World Cup 2026 Sports Commentary Career Options: फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक म्हणजेच ‘फिफा वर्ल्ड कप २०२६’ (FIFA World Cup 2026) चा थरार सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. ११ जून २०२६ पासून सुरू झालेली ही स्पर्धा १९ जुलै २०२६ पर्यंत चालणार आहे. जेव्हा फिफा वर्ल्ड कपसारखी मोठी स्पर्धा टीव्हीवर सुरू असते, तेव्हा स्टेडियममधील प्रत्येक हालचाल शब्दांत मांडणारा स्पोर्ट्स कमेंटेटरचा आवाज सामना पाहण्याचा आनंद दुप्पट करतो. यामुळेच अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की, समालोचन (कमेंट्री) करण्याची ही नोकरी कशी मिळते आणि त्यासाठी कोणते शिक्षण आवश्यक असते? चला तर मग जाणून घेऊया
25 Jun 2026 05:10 PM (IST)
23 जून रोजी, मुंबईत हादरवणारा प्रसंग घडला. चालत्या लोकलमध्ये एका विकृत मानसिकतेच्या असुराने एका निष्पाप मुलाच्या पोटात चाकू घोपसून हल्ला केला. मृत मुलाचे नाव मयंक लोहार आहे. तर आरोपी रोशन सुवर्णा आता पोलिसांवच्या ताब्यात आहे. साध्या दार बंद करणे इतक्या लहान मुद्द्यावरून पेटलेल्या या वादाचा समारोप असा होईल याचा कुणी अंदाजही लावू शकत नाही. मुंबईत झालेल्या या अमानुष कृत्यामुळे जगभरातून विटंबना केली जात आहे. आरोपीला फासी व्हावी किंवा त्याचा एन्काउंटर करण्यात यावा अशा मागण्या केल्या जात आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की त्या नराधमालाही आता जगण्याचा अधिकार नाहीये. स्वतः मयंकच्या वडिलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे की आरोपीला लवकरात लवकर फासी देण्यात यावी, तोच आमच्यासाठी खरा न्याय ठरेल.
25 Jun 2026 04:55 PM (IST)
आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. सेन्सेक्स ८०० हून अधिक अंकांनी वधारला. गुरुवार, २५ जून 2026 रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये १% पेक्षा जास्त तेजी होती. कच्च्या तेलाच्या कमजोर किमतींनी बाजाराला आधार दिला. जागतिक बाजारातील सकारात्मक भावनेमुळे बाजारातील उत्साह टिकून राहिला. वाचा सविस्तर...
25 Jun 2026 04:43 PM (IST)
India A Vs Sri Lanka A: सध्या श्रीलंका अ आणि भारत अ या दोन संघांमध्ये कसोटी सामना सुरू आहे. ध्रुव जुरेल भारत अ संघाचे नेतृत्व करत आहेत. या सामन्यात साई सुदर्शन देखील खेळत आहे. साई सुदर्शनने या सामन्यात (Cricket) शतकी खेळी केली आहे. साई सुदर्शनने एकदिवसीय सामन्याप्रमाणे कसोटीमध्ये खेळी केली आहे. वाचा सविस्तर...
25 Jun 2026 04:39 PM (IST)
अनेकांनी फिरण्याची, विविध ठिकाणे पाहण्याची जगभ्रमंती करण्याची प्रचंड आवड असते. असे फिरण्यासाठी संधीची वाट पाहत बसत नाही. तर थेट बॅग-पॅक करुन कुठे तर ट्रेकिंगला-पर्यटनाला निघून जातात. सध्या अशाच एका जगभ्रमंतीची आवड असणाऱ्या भारतीय ट्रॅव्हलरचा अद्भुत कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्रॅव्हरलचे नाव बेन्नी प्रसाद असून त्याच्याकडे तब्बल १६ देशांचे पासपोर्ट असून तो गेली ६ वर्षे ६ महिन्यांपासून फिरत आहे. सध्या त्याची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर...
25 Jun 2026 04:37 PM (IST)
फुरसुंगीतील व्यावसायिकाला ५० कोटींची खंडणी मागितल्यानंतर काही तासांत कार्यालयावर गोळीबार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून आणखी एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका औषध वितरकाला ही धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे मात्र, पुण्यातील व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर...
25 Jun 2026 04:36 PM (IST)
इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात आणीबाणीचा धडा समाविष्ट करण्यात आला आहे. १९७५ मध्ये देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचा इतिहास यापुढे नववीतील विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे. एनसीईआरटीकडून हा बदल करण्यात आला आहे
25 Jun 2026 04:21 PM (IST)
संजय दीना पाटील यांनी जी भाषा वापरली, त्यांच्याकडून जी चूक झाली त्या बद्दल संजय शिरसाट यांनी माफी मागितली आहे. संजय शिरसाट हे शिवसेनेचे मंत्री आणि प्रवक्ते आहेत. संजय पाटील यांच्या बोलण्याच कोणी समर्थन करणार नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय.
25 Jun 2026 04:07 PM (IST)
राज्यात सततच्या वाढत्या गुन्हेगारीबाबत मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. खून, दरोडे, टोळीयुद्ध, अमली पदार्थांचे रॅकेट, हिट-अँड-रन आणि संघटित गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. अश्यातूनच कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून आता यावरून राजकीय नेत्यांनीही राज्य सरकार आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रमाणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...
25 Jun 2026 04:00 PM (IST)
२३ जून रोजी रात्री मोहरमच्या मिरवणूकीदरम्यान एका व्हॅनचा स्फोट करण्यात आला. यावेळी लोकांमध्ये मोठी हाणामारीही सुरु झाली. घटना उज्जैन जिल्ह्यातील बडनगरच्या अदान परिसरातून सुरू झालेल्या मिरवणुकीत घडली ज्यात मोठ्या संख्येने लोक जमा झाली होती. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये व्हॅनला उंचावर लटकवल्याचे दिसते. तर खाली लोकांचा जमाव या घटनेला उत्सुकतेने पाहत असतो, काही लोक यावेळी आपला फोन उंचावर पकडून पुढे काय होणार याचे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करु पाहत असतात आणि तितक्यातच एक मोठा स्फोट होता. हवेतच व्हॅनला आग लावली जाते ज्यानंतर गाडीचे तुकडे होतात आणि उपस्थि लोक खुश होऊन आरडाओरड करु लागतात. मोहरमच्या मिरवणुकीदरम्यानचा हा धोकादायक स्टंट आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर
25 Jun 2026 03:55 PM (IST)
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान मालबार हिल मतदारसंघात निदर्शनास आलेल्या गंभीर अनियमिततांबाबत महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आज विल्सन महाविद्यालय येथे मुख्य निवडणूक अधिकारी, मलबार हिल बाळासाहेब वाघचौरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. वाचा सविस्तर
25 Jun 2026 03:50 PM (IST)
चार वर्षांचा प्रवास अखेर शेवटाकडे निघाला. मालिकेच्या मुख्य कलाकारांनी अश्रुंचे झरे वाहिले आहेत. भावूक पोस्ट करून त्यांच्या तसेच मालिकेच्या चाहत्यांना भावूक केले आहे. काल मालिकेची मुख्य अभिनेत्री शिवानी मुंढेकरने भावूक पोस्ट शेअर केली. आज मालिकेचा मुख्य अभिनेता शशांक केतकर भावूक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या विशेषतः मुरांबा मालिकाचाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. वाचा सविस्तर
25 Jun 2026 03:45 PM (IST)
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरासमोर वाळलेलं नारळाचं झाड अचानकपणे घरावर कोसळलं आणि छतावरील पत्रा फोडून 10 वर्षीय मुलाच्या अंगावर पडला. यामुळे मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घडलेली घटना कोल्हापुरातील कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली गावात घडली. नेमकं प्रकरण काय?
25 Jun 2026 03:35 PM (IST)
NCERT Controversy: अलीकडच्या काळात इयत्ता ६ वीच्या कन्नड भाषेच्या एनसीईआरटी (NCERT) पाठ्यपुस्तकाबाबत सोशल मीडिया आणि काही प्रसारमाध्यमांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. या पुस्तकात शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले असून मांसाहारी जेवणाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा या अहवालांमध्ये करण्यात आला होता. आता या संपूर्ण वादावर ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ (NCERT) ने आपली बाजू स्पष्ट केली आहे. वाचा सविस्तर
25 Jun 2026 03:30 PM (IST)
कर्नाटक: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या सुरक्षेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत देशाला हादरवून सोडणारी माहिती समोर आल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. नेमकं प्रकरण काय?
25 Jun 2026 03:25 PM (IST)
Nedarlands Head Coach: सध्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत नेदरलँड्स पुरुष क्रिकेट संघाबबत एक मोठी बातमी समोर आली आहे. नेदरलँड्स पुरुष क्रिकेट संघाचे हेड कोच रायन कूक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नेदरलँड्स क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. कारण काय?
25 Jun 2026 03:20 PM (IST)
उद्धव ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया विचारण्यासाठी आलेल्या पत्रकारांवर त्यांनी संताप व्यक्त करत धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप होत आहे.
आज (गुरुवार, 25 जुन) पत्रकारांनी त्यांना सध्या सुरु असलेल्या राजकीय वादांबाबत प्रश्न विचारले असता संजय दिना पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. “पुन्हा इथे आलात तर मारून पाठवेन,” अशा शब्दांत त्यांनी पत्रकारांना इशारा दिल्याचे समोर आले आहे. नेमकं काय म्हणाले संजय पाटील?
25 Jun 2026 03:15 PM (IST)
पुणे : आषाढी वारीदरम्यान पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी राज्य शासनाने व्यापक नियोजन केले आहे. आळंदी, देहू आणि पालखी मार्गावरील सर्व सुविधा सक्षम करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वाचा सविस्तर
25 Jun 2026 03:10 PM (IST)
पुणे : कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघातानंतर मुलाचे रक्ताचे नमुने बदलप्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आरोपी विशाल अग्रवालचा जल्लोष करतानाचा कथित व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. याप्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाच्या जामिनाच्या अटींच्या भंग झाला आहे. यातून साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा जामीन रद्द करण्यात यावा, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी आज विशेष न्यायालयात केला. नेमकं काय घडलं?
25 Jun 2026 03:05 PM (IST)
Venezuela Earthquake News in Marathi :काराकस : व्हेनेझुएलात दोन सर्वात शक्तिशाली भूकंपाने हाहा:कार माजवला आहे. राजधानी काराकससह देशाच्या अनेक भागांमध्ये प्रचंड विध्वंस घडला आहे. अनेक बहुमजली इमारती जमिनदोस्त झाल्या असून लोक मलब्यांच्या ढिगाऱ्यांखाली अडकले आहे. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलात आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील व्हेनेझुएलाला तातडीने मदत पाठवली आहे. वाचा सविस्तर
Deeply saddened by the devastation caused by the severe earthquakes in Venezuela.
On behalf of the people of India, I extend our heartfelt condolences to the Government and people of Venezuela, especially to the families who have lost their loved ones. We pray for the speedy…
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2026
25 Jun 2026 03:00 PM (IST)
Venezuela Earthquake News in Marathi : काराकस : व्हेनेझुएलात अवघ्या ४० सेकंदात झालेल्या दोन अत्यंत शक्तिशाली भूकंपाने प्रचंड विध्वंस घडला आहे. या भूकंपाने संपूर्ण व्हेनेझुएलाला हादरवून टाकले असून देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. पहिल्या भूकंपाची तीव्रता ही ७.२ इतकी होती, तर दुसरा भूकंप हा ७.५ रिश्टर स्केलचा अत्यंत धोकादायक होता. दुसऱ्या भूंकापाने राजधानी काराकससह देशाच्या अनेक भागांत इमारती कोसळल्या असून अनेक लोक मलब्यांच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहे. वाचा सविस्तर
25 Jun 2026 02:55 PM (IST)
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेत प्रगती होत असूनही, आखाती प्रदेशातील तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर, देशातील ग्राहकांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार अनेक सुधारणात्मक उपाययोजना करत आहे. दरम्यान, ३० जूननंतर एलपीजी कनेक्शन कापले जातील असे अनेक दावे सोशल मीडियावर पसरत आहेत. ३० जूननंतर गॅस सिलेंडरचा पुरवठा मिळणार नाही या भीतीने लोक घाबरले आहेत. जर तुम्हीही गोंधळात असाल, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तसे काहीही नाही. ही निव्वळ एक अफवा आहे.
25 Jun 2026 02:40 PM (IST)
राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी गेल्या तीन वर्षांत राज्यात तब्बल ४० हजार ५५९ बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्या लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली. राज्यातील कुपोषणाचे संपूर्ण निर्मूलन करण्याबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात आदिती तटकरे यांनी पोषण ट्रॅकरवरील आकडेवारी सभागृहात मांडली. त्यानुसार, राज्यातील बालकांचे वजन व उंची मोज मोजून त्यांची सामान्य, मध्यम कुपोषित आणि तीव्र कुपोषित अशा श्रेणींमध्ये नोंद केली जाते.
25 Jun 2026 02:30 PM (IST)
भारतात रस्ते पर्यटनाची व्याख्या आता पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी लांबच्या प्रवासासाठी केवळ रेल्वेला प्राधान्य दिले जायचे, पण आज आधुनिक आणि अत्याधुनिक सुखसुविधांमुळे खाजगी ‘ट्रॅव्हल्स बसेस’ भारतीय प्रवाशांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. ही केवळ वाहतुकीची साधने राहिलेली नसून, ती भारतीय पर्यटन संस्कृतीचा एक महत्त्वाचा आणि लक्झरी भाग बनली आहेत.
25 Jun 2026 02:20 PM (IST)
आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत भारत आणि जपानचे संबंध एका नव्या आणि ऐतिहासिक उंचीवर पोहोचले आहेत. जपानची राजधानी टोकियो (Japan) येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक ‘रायझिंग इंडिया कॉन्क्लेव्ह’ (Rising India Conclave) या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमात जपानच्या अर्थमंत्र्यांनी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. भारतीय उद्योजिका नुपूर तिवारी यांनी आयोजित केलेल्या या परिषदेत बोलताना जपानच्या अर्थमंत्री सात्सुकी कातायामा यांनी स्पष्ट केले की, “भारत आणि जपानमधील संबंध हे येणाऱ्या काळात जगातील सर्वात महत्त्वाच्या आणि शक्तिशाली संबंधांपैकी एक बनण्याची क्षमता ठेवतात.”
25 Jun 2026 02:15 PM (IST)
पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करण्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. हे बांधकाम थांबवण्याची नोटीस संबंधितांना देण्यात येणार आहे. पावसाने दिलेली ओढ आणि खडकवासला धरणसाखळीतील मर्यादीत पाणीसाठा या पार्श्वभूमीवर सध्या शहरात पाणी कपात सुरु आहे. या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.
25 Jun 2026 02:05 PM (IST)
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) सध्या अत्यंत भयानक आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या मूलभूत हक्कांसाठी गेल्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून रस्त्यावर उतरलेल्या स्थानिक नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तानी सरकार आणि तिथल्या लष्कराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या प्रशासनाने या भागातील जनआंदोलन दडपण्यासाठी थेट लोकांच्या अन्न, पाणी आणि औषधांवरच गदा आणली आहे. आंदोलकांना शरण येण्यास भाग पाडण्यासाठी संपूर्ण प्रदेशाची आर्थिक आणि अन्न नाकेबंदी करण्यात आली असून, यामुळे येथील लाखो नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत.
25 Jun 2026 02:00 PM (IST)
बुधवारी संध्याकाळी व्हेनेझुएला भूकंपाच्या दुहेरी झटक्यांनी हादरला असून यामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. मृतांचा आकडा १० हजार पार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भूकंपामुळे व्हेनेझुएलाच्या सर्वात मोठे विमानतळ सायमन बोलिव्हर इंटरनॅशनल एअरपोर्टचे गंभीर नुकसान झाले आहे. एअरपोर्ट बंद करण्यात आले आहे. विमामतळाचे छतही कोसळले याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
25 Jun 2026 01:55 PM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीत गीत-संगीताला नेहमीच विशेष स्थान राहिलं आहे. प्रेक्षकांना भावणाऱ्या कथेसोबतच श्रवणीय गाणीही चित्रपटाची लोकप्रियता वाढवतात. आता आगामी मराठी चित्रपट ‘लाईव्ह’मध्येही अशाच दमदार संगीताची जोड पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील एका खास गाण्याची सध्या जोरदार चर्चा आहे. लावणीचा पारंपरिक ठसका आणि आधुनिक अंदाज यांचा संगम असलेलं हे आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे हे गाणं नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.
25 Jun 2026 01:50 PM (IST)
कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघातानंतर मुलाचे रक्ताचे नमुने बदलप्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आरोपी विशाल अग्रवालचा जल्लोष करतानाचा कथित व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. याप्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाच्या जामिनाच्या अटींच्या भंग झाला आहे. यातून साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा जामीन रद्द करण्यात यावा, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी आज विशेष न्यायालयात केला.
25 Jun 2026 01:45 PM (IST)
जगभरात नवीन आलेल्या एआय टेक्नॉलिजीचा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. गुगलने निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये एआय-शक्तीवर चालणारा स्मार्ट स्पीकर, ‘गुगल होम स्पीकर’ लाँच केला आहे. या स्पीकरसाठी प्री-ऑर्डरदेखील सुरू झाल्या आहेत. नवीन व्हॉइस असिस्टंट, ‘जेमिनी फॉर होम’ असून जो वापरकर्त्यांना मल्टीटास्किंग, जेमिनी लाइव्ह आणि होम ब्रीफ्स यांसारखी विविध वैशिष्ट्ये देतो. गूगल होम स्पीकरची किंमत $९९.९९, म्हणजेच अंदाजे ८,९०० आहे.
25 Jun 2026 01:40 PM (IST)
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून आणि त्यानंतर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये दहशतीचे जाळे निर्माण करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीने महाराष्ट्रात देखील पाय रोवले आहेत. धक्कादायक म्हणजे, आता या टोळीकडून व्यापाऱ्यांना धमकावणे आणि त्यांच्याकडून खंडण्या उकळण्यासारखे गंभीर प्रकार सुरू झाले आहेत. विशेषत: या टोळीने महाराष्ट्रात व्याप्ती वाढवली असली, तरी त्याची सूत्रे पुण्यातूनच हलविली जात असल्याचे सातत्याने समोर येऊ लागले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेपुढे मोठे या टोळीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
25 Jun 2026 01:35 PM (IST)
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षीच जगप्रसिद्ध गोलंदाजांना चौकार मारणारा युवा सनसनाटी खेळाडू वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. तो आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळण्याची शक्यता आहे. यानंतर, भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. निवड समितीने आयर्लंड, इंग्लंड आणि आशियाई खेळांसाठीच्या टी-२० संघात त्याचा समावेश केला आहे. इंग्लंडच्या कायद्यानुसार, वैभवला वरिष्ठ खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
25 Jun 2026 01:30 PM (IST)
पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करण्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. हे बांधकाम थांबवण्याची नोटीस संबंधितांना देण्यात येणार आहे. पावसाने दिलेली ओढ आणि खडकवासला धरणसाखळीतील मर्यादीत पाणीसाठा या पार्श्वभूमीवर सध्या शहरात पाणी कपात सुरु आहे. या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.
25 Jun 2026 01:25 PM (IST)
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची कबुली खुद्द सरकारने विधानसभेत दिली आहे. या योजनेचा तब्बल १२ हजार ४१५ शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे लेखी उत्तरातून समोर आले असून, या अपात्र लाभार्थीना सुमारे १६५ कोटी रुपयांचा लाभ मिळाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विधानसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत विरोधकांकडून सातत्याने अनियमिततेचे आरोप केले जात होते. आता सरकारच्या लेखी उत्तरामुळे या आरोपांवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांसाठी सुरू करण्याचा सरकारचा मूळ हेतू होता.
25 Jun 2026 01:15 PM (IST)
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) सध्या अत्यंत भयानक आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या मूलभूत हक्कांसाठी गेल्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून रस्त्यावर उतरलेल्या स्थानिक नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तानी सरकार आणि तिथल्या लष्कराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या प्रशासनाने या भागातील जनआंदोलन दडपण्यासाठी थेट लोकांच्या अन्न, पाणी आणि औषधांवरच गदा आणली आहे. आंदोलकांना शरण येण्यास भाग पाडण्यासाठी संपूर्ण प्रदेशाची आर्थिक आणि अन्न नाकेबंदी करण्यात आली असून, यामुळे येथील लाखो नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत.
25 Jun 2026 01:02 PM (IST)
नवले पुलाखाली नर्हे पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल सतरा लाख रुपये किमतीचा बंदी असलेला सुगंधित तंबाखू आणि गुटखा जप्त केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली. हबास मुबारक खान (वय ३४, रा. बाडमेर, राजस्थान) व सोहेल अस्लम मुलाणी (वय २२, रा. गंजपेठ, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस अंमलदार देवा रमेश चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, (दि. २१ जून) संध्याकाळी साडेपाच वाजता पोलिसांना नवले ब्रिजच्या खाली गुटखा साठवला असल्याची माहिती मिळाली. धाड टाकली असता आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरएमडी पानमसाला, एम गोल्ड तंबाखू, गोवा गुटखा आणि विमल पानमसाल्याचा मोठा साठा करत असल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण १७ लाख ७३४ रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपींना अटक केली आहे.
25 Jun 2026 12:48 PM (IST)
25 Jun 2026 12:36 PM (IST)
खराडी भागात कौटुंबिक वादातून महिलेच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. किरण दयाराम बाबर (वय ३२, रा. भनगाई वस्ती, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती दयाराम तोताराम बाबर (वय ३६) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरण हिचा भाऊ दादू सजन बोरसे (वय २३, रा. भनगाई वस्ती, खराडी) यांनी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
25 Jun 2026 12:24 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचेही काही आमदार आणि खासदार बंडखोरीच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. यावर आता स्पष्ट बोलताना शरद पवार दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांंच्या बंडखोरीच्या चर्चांवर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. शरद पवार यांनी म्हटले की, आमचा एकसुद्धा आमदार कुठे जाणार नाही. शरद पवार यांना विचारण्यात आले की, ठाकरेंच्या खासदारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे? यावर शरद पवार यांनी स्पष्ट बोलताना म्हटले की, आमचा एकसुद्धा आमदार कुठे जाणार नाही. यावेळी शरद पवार यांच्यासोबत गाडीत युगेंद्र पवारही होते.
25 Jun 2026 12:12 PM (IST)
आंतरराष्ट्रीय प्रकल्प करीत असताना भूसंपादन प्रक्रिया सर्वात मोठी असते. त्यासाठी १०० टक्के भूसंपादन करण्यासाठी किमान एक वर्ष लागतो. मात्र पुरंदर विमानतळाबाबत दोन, तीन महिन्यात भूसंपादन पूर्ण करण्याचे शासनाचे प्रयत्न असून, १५ ऑगस्ट पर्यंत पुरंदर विमातळ बाधित सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देण्यात येतील, यासाठी अधिकारी काम करीत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
25 Jun 2026 12:00 PM (IST)
जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. नाटो (NATO) चे सरचिटणीस मार्क रुटे यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण संदर्भातील कठोर परराष्ट्र धोरणाचे आणि लष्करी कारवाईचे जाहीरपणे समर्थन केले आहे. व्हाईट हाऊसमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना रुटे यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेच्या या कणखर भूमिकेमुळे आणि योग्य वेळेत घेतलेल्या लष्करी निर्णयामुळे इराणला अण्वस्त्रे विकसित करण्यापासून रोखता आले. जर ही कारवाई झाली नसती, तर आज संपूर्ण जग एका अत्यंत मोठ्या आणि कधीही भरून न येणाऱ्या सुरक्षा संकटात सापडले असते, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.
25 Jun 2026 11:50 AM (IST)
पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र टाकळी भीमा येथील रहिवासी सचिन रंजना बाळासाहेब वडघुले यांची ‘भारतीय जैन संघटने’तर्फे आयोजित प्रतिष्ठित गुणगौरव सोहळ्यासाठी निवड करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई येथील विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना अधिकृतपणे सन्मानित देखील करण्यात आले आहे. संपूर्ण जैन संघटनेच्या लाखो विद्यार्थ्यांमधून निवडण्यात आलेल्या अवघ्या ३९ गुणवंतांमध्ये सचिन वडघुले यांनी आपले स्थान पटकावून आपल्या गावाचे नाव राज्यपातळीवर उज्ज्वल केले आहे.
25 Jun 2026 11:40 AM (IST)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
25 Jun 2026 11:30 AM (IST)
सोमवारी संध्याकाळच्या सुमारास राजकोटमध्ये २३ वर्षीय नंदिनी बोसमिया आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. नंदिनी ही आम आदमी पार्टीची (AAP) नेता होती. घटनेची माहिती मिळताच तिला आनन-फानन रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे तिला मृत घोषित केलं. नंदिनी बोस्मिया मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होती आणि ‘आप’च्या तिने जेटपूर-नवागढ महानगरपालिका निवडणूक लढवली होती. नंदिनीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली असून कुटुंबियांनी नंदिनीच्या बाॅयफ्रेंडवर हत्येचा आरोप लावला आहे.
25 Jun 2026 11:20 AM (IST)
दक्षिण अमेरिका शहर व्हेनेझुएला भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. बुधवारी (२४ जून) संध्याकाळी व्हेनेझुएलात दोन शक्तिशाली भूकंप झाले. केवळ ४० सेकंदात या भूकंपाने हाहा:कार माजवला आहे. यामुळे लोकांना आपल्या बचावासाठी वेळही मिळाला आहे. राजधानी काराकससह अनेक भागांतील इमारती कोसळल्या असून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
25 Jun 2026 11:10 AM (IST)
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (FIFA) ऑल नेपाळ फुटबॉल असोसिएशनला (ANFA) तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. हा निर्णय नेपाळमधील फुटबॉल खेळासाठी आणि त्याच्या खेळाडूंसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. फिफाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, परिषदेच्या ब्युरोने २४ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीनंतर हे कठोर पाऊल उचलले आणि पुढील सूचना मिळेपर्यंत नेपाळवर बंदी घातली. आता या गोष्टीचा सर्वांनाच धक्का बसला असून इतक्या मोठ्या निर्णयामागे नक्की काय कारण आहे याचीच चर्चा सुरू झाली आहे.
25 Jun 2026 10:55 AM (IST)
सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते त्यांच्या ‘जेलर २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत असतानाच, या ज्येष्ठ अभिनेत्याच्या १७३ व्या चित्रपटाचे, ‘धर्मन’चे, पहिले शीर्षक पोस्टर बुधवारी प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती कमल हासन यांच्या ‘राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल’ या कंपनीने केली असून, ‘ओह माय कडवुले’ आणि ‘ड्रॅगन’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे अश्वथ मरिमुथू यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. ‘धर्मन’चे पहिले पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे, याचे मुख्य कारण म्हणजे रजनीकांत यांचा धाक दाखवणारा लूक. यामध्ये ते रक्ताने माखलेले हात असलेल्या एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसत आहेत.
25 Jun 2026 10:45 AM (IST)
पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेला केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे. लोहगड किल्ल्यावरून तरुण व्यवसायिक केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याला दरीत ढकलून सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी मिळून हत्या केली. चेतन चौधरीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचे लोकेशन लपवण्यासाठी त्याने आपल्या नोकराचा फोण वापरला. नोकराच्या फोनचे लोकेशन देखील लोहगडाच्या जवळपास आढळले आहेत. आता या प्रकरणी नोकर नीरज कुमार याने पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र आता आरोपी चेतन चौधरी याच्या वडिलाने “चेतनचा या हत्येशी काहीही संबंध नाही,त्याला या प्रकरणात बळजबरीने गोवण्यात आले आहे,” असा दावा केला आहे.