आजच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
23 Sep 2025 10:24 AM (IST)
कुनिका सदानंद आणि झीशान कादरी यांच्यात गोष्टी जुळत नसल्याचे सतत दिसून येत आहे. दोघेही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडताना दिसतात. पण यावेळी जे घडले ते केवळ घरातील सदस्यांनाच नाही तर चाहत्यांनाही आश्चर्यचकित करते. “बिग बॉस १९” चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये, कुनिका सदानंद पुन्हा एकदा झीशान कादरीवर तिचा अधिकार दाखवताना दिसली, परंतु झीशानने तिच्यावर हल्ला चढवल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली.
23 Sep 2025 10:17 AM (IST)
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा पती राज कुंद्रा सध्या अडचणीत सापडले आहेत. ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याला समन्स बजावले आहे. ती व्यक्ती कोण आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
23 Sep 2025 10:07 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली आणि तटकरे यांच्याबद्दल भावनिक भाष्य केले. तटकरे यांचा आधार वडिलांसारखा असल्याचे सांगताना धनंजय मुंडे यांनी पक्षात जबाबदारीची मागणीही केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वूपर्ण विधान केले.
23 Sep 2025 09:59 AM (IST)
भारत-अमेरिका व्यापार करार आणि अमेरिकेच्या नवीन एच-१बी व्हिसा शुल्क वाढीबद्दल सुरू असलेल्या चिंतेमुळे, मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५० मध्ये नकारात्मक सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध राहावे असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची कमकुवत सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,२५४ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ २३ अंकांनी कमी होता.
23 Sep 2025 09:50 AM (IST)
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सुपर चारच्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानला पराभूत करून विजयी सुरुवात केली आहे आशिया कप मध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानने दुसऱ्यांदा पराभूत केले. या पराभवानंतर पाकिस्तानी माजी खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघावर सोशल मीडियावर उघडपणे टीका केली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की जर पाकिस्तानला भारताविरुद्ध क्रिकेट सामना जिंकायचा असेल तर नक्वी आणि मुनीर यांनी डावाची सुरुवात करावी.
23 Sep 2025 09:42 AM (IST)
गोंदिया: गोंदियायच्या सालेकसा तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. २ पोत्यांमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. या मृतदेहाची ओळख पटली असून तरुण हा मध्यप्रदेशचा असल्याचे समोर आले आहे. मृतकाचे नाव शुभम वाहने (26) रा. दैतबर्रा जिल्हा बालाघाट मध्यप्रदेश असे आहे. ही घटना सालेकसा तालुक्यातील दशरथटोला (बाह्मणी) परिसरात घडली आहे.
23 Sep 2025 09:39 AM (IST)
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली आणि तटकरे यांच्याबद्दल भावनिक भाष्य केले. तटकरे यांचा आधार वडिलांसारखा असल्याचे सांगताना धनंजय मुंडे यांनी पक्षात जबाबदारीची मागणीही केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वूपर्ण विधान केले.
23 Sep 2025 09:36 AM (IST)
बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आज तिचा ८२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. तिने अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत, ज्यात धर्मेंद्र सारख्या अभिनेत्यांसोबत मुख्य भूमिकांचा समावेश आहे. तिने तिच्या अभिनयाने बंगाली चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळेपण निर्माण केले आहे. अभिनेत्री एका चित्रपट कुटुंबातून आलेली आहे आणि तिच्या दोन्ही मुली बॉलीवूडच्या स्टार आहेत. तनुजाच्या वाढदिवसानिमित्त, तिच्याबद्दल काही खास गोष्टी आपण आता जाणून घेणार आहोत.
23 Sep 2025 09:33 AM (IST)
टेक जायंट कंपनी Apple ने अलीकडेच त्यांची नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे. यामध्ये कंपनीने अनेक बदल केले आहेत. शिवाय कंपनीने त्यांची ही नवीन आयफोन सिरीज अनेक अपग्रेडसह लाँच केली आहे. या नवीन आयफोन सिरीजनंतर आता कंपनीच्या फोल्डेबल फोनबाबत चर्चा सुरु झाली आहे. कंपनी त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन कधी लाँच करणार, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून पहिल्या फोल्डेबल आयफोनबाबत चर्चा सुरु आहे.
23 Sep 2025 09:18 AM (IST)
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) मुंबई युनिटने ‘फेअरप्ले’ (Fairplay) बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंग (PMLA) कायद्यांतर्गत ईडीने कंपनीची सुमारे 307.16 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेली ही सर्व मालमत्ता दुबईमध्ये असून, यामध्ये बँक खात्यातील रक्कम, तसेच फ्लॅट्स, विला आणि जमिनींचा समावेश आहे.
23 Sep 2025 09:05 AM (IST)
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा आणि राजारामबापू यांच्यासारख्या नेत्यांनी सुसंकृत राजकारण केलं. मात्र, अचानक संधी मिळून आलेले काही लोकांनी राजकारणाचा स्थर घसरवला आहे, यापुढे आम्ही कोणत्याही नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही. सांगलीत सुरुवात झाली आहे. आता महराष्ट्रभर सत्तेची मस्ती उतरवू, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला.
23 Sep 2025 08:58 AM (IST)
मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून असून, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव व संचालकांशी बोलून त्यांना सूचनाही दिल्या.
Marathi Breaking Live Updates : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याचे पाहिला मिळत आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार तर काही भागांत तुरळक पाऊस होत आहे. मुंबईसह पुणे आणि आसपासच्या भागात सोमवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यातच आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जनजीवनावर याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले होते. असे असताना आता पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक दिवसांनी पडलेल्या मुसळधार पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मुंबईत सोमवारी सकाळी पावसाचा जोर अधिक होता. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.
संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.