Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : टीईटी परीक्षेचा पेपर फुटला, रविवारी होणारी टीईटी परीक्षा रद्द

Marathi Breaking Live Updates : महाराष्ट्रातील टीईटी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या ६ लाखांहून अधिक शिक्षकांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. राज्यातील ३७ शहरांतील १०२८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा नव्याने घेतली जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 27, 2026 | 06:02 PM
Top Marathi News Today Live

Top Marathi News Today Live

Follow Us
Follow Us:

Marathi Breaking News Updates : महाराष्ट्रातील टीईटी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या ६ लाखांहून अधिक शिक्षकांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. राज्यातील ३७ शहरांतील १०२८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा नव्याने घेतली जाणार असून, पुढील २ ते ३ दिवसांत परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती उपायुक्त प्रिया शिंदे यांनी दिली.

लोहगड किल्ल्यावरून ढकलून देत केतन अग्रवाल याची हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणात केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे दोघे अटकेत आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. आता केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी शुक्रवारी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या हायप्रोफाईल हत्याकांडात आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी शुक्रवारी म्हणजेच २६ जुन रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विशाल अग्रवाल यांना दिले.

The liveblog has ended.
  • 27 Jun 2026 05:50 PM (IST)

    27 Jun 2026 05:50 PM (IST)

    Pune Rain Update: पुण्यात पावसाची ‘धडाकेबाज’ एन्ट्री

    Maharashtra Rain Alert: दोन ते चार दिवसांपूर्वी पावसाने पुणे शहरात हजेरी लावली होती. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला होता. मात्र दोन ते तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे शहर आणि उपनगरात हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यासून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुणे शहर आणि उपनगर परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहराच्या अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची काहीशी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. सिंहगड रस्ता, जंगली महाराज रस्ता, एफसी रस्ता या परिसरात पावसाने हजेरी लावली.

  • 27 Jun 2026 05:40 PM (IST)

    27 Jun 2026 05:40 PM (IST)

    MPSC Group C Recruitment 2026: एमपीएससी गट ‘क’ पदांसाठी बंपर भरती

    MPSC Group C Recruitment 2026:  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट क (Group C) च्या २,६१९ पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २७ जून २०२६ पासून सुरू झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) जाऊन अर्ज करू शकतील. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

  • 27 Jun 2026 05:30 PM (IST)

    27 Jun 2026 05:30 PM (IST)

    Pimpri-Nigdi Metro विस्ताराला मोठा वेग!

    Pimpri-Nigdi Metro Update: महामेट्रोच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गावरील अतिरिक्त चौथ्या स्थानकाचा (स्टेशन) मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी (ता. २४) झालेल्या सभेमध्ये या स्थानकासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदीला अंतिम मंजुरी देण्यात आली. यामुळे गेल्या काही काळापासून रखडलेल्या या विषयावर अखेर पडदा पडला असून, निगडी परिसरातील नागरिकांना आता मेट्रो सेवेचा अधिक कार्यक्षम लाभ घेता येणार आहे.

  • 27 Jun 2026 05:20 PM (IST)

    27 Jun 2026 05:20 PM (IST)

    Monsoon Health News : पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला!

    Ulhasnagar Central Hospital : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सर्पदंशाच्या वाढत्या घटनांनी आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली आहे. उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात अवघ्या एका दिवसात तब्बल आठ सर्पदंशग्रस्त उपचारासाठी दाखल झाल्याने प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विशेष म्हणजे, यापैकी काही रुग्णांना विषारी सापांनी दंश केला होता. मात्र, वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने सर्व रुग्णांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

  • 27 Jun 2026 05:10 PM (IST)

    27 Jun 2026 05:10 PM (IST)

    ऑपरेशन टायगरनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा; शरद पवार गटाच्या खासदाराची फडणवीसांसोबत भे

    राज्यात शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या फुटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच आता ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पक्षातील खासदार फुटणार नसल्याचा ठाम दावा केला आहे.

  • 27 Jun 2026 04:57 PM (IST)

    27 Jun 2026 04:57 PM (IST)

    Women’s T20 World Cup मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया महामुकाबला; सेमीफायनलच्या तिकिटासाठी ‘करो या मरो’ सामना, हेड-टू-हेडमध्ये कोण वरचढ?

    भारतीय महिला क्रिकेट संघ महिला टी-२० विश्वचषकातील (Women’s T20 World Cup 2026) आपला अंतिम साखळी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. हा महामुकाबला रविवार, २८ जून रोजी लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संघ्याकाळी ७ वाजता सुरु होईल. तर ६. ३० वाजता नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार मैदानात उतरतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सेमिफायनल गाठण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. भारतीय संघाने या विश्वचषकात आतापर्यंत चार गट फेरीचे सामने खेळले असून, त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. वाचा सविस्तर... 

  • 27 Jun 2026 04:47 PM (IST)

    27 Jun 2026 04:47 PM (IST)

    Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

     सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीनेच आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. आपल्या भावाच्या मदतीने पतीला रुग्णालयात दाखल करून पोलिसांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना संशय आल्याने सगळा बनाव फसला. पोलिसांनी याप्रकरणी महिला आणि तिच्या प्रियकराविरोधात विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय घडलं नेमकं? वाचा सविस्तर... 

  • 27 Jun 2026 04:37 PM (IST)

    27 Jun 2026 04:37 PM (IST)

    Hero MotoCorp ने लाँच केली New Passion+ Disc; 71 kmpl चे मिळेल मायलेज

    जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपली सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय मोटरसायकल Passion+ चा एक नवीन डिस्क व्हेरिएंट आणला. आधुनिक शहरी प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केलेले हे नवीन मॉडेल, स्टाईल, वाढीव सुरक्षा आणि उत्कृष्ट इंधन कार्यक्षमतेचा उत्तम मिलाफ मिळत आहे. वाचा सविस्तर... 

  • 27 Jun 2026 04:27 PM (IST)

    27 Jun 2026 04:27 PM (IST)

    Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

    महाराष्ट्रातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर या प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक दावे आणि चर्चा समोर येत आहेत. केतन आणि सिया गोयल यांच्या होणाऱ्या लग्नासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, 17 कोटींचा पॅलेस आणि खासगी विमानांच्या बुकिंगच्या बातम्या चर्चेत होत्या. मात्र, आता सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी या सर्व दाव्यांवर स्पष्टीकरण देत वेगळेच वास्तव सांगितले आहे. काय म्हणाले सियाचे वडील ? वाचा सविस्तर... 

  • 27 Jun 2026 04:17 PM (IST)

    27 Jun 2026 04:17 PM (IST)

    NEET Re Exam Result: नीट विद्यार्थ्यांसाठी मोठी गूड न्यूज! Answer Key मध्ये एक प्रश्न ‘ड्रॉप’, सर्व उमेदवारांना मिळणार बोनस गुण

    NEET Re Exam Provisional Answer Key: नीट युजी २०२६ (NEET UG 2026) पुनरपरीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांचे ४ गुण पक्के झाले आहेत. २१ जून रोजी झालेल्या पुनरपरीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करण्यात आली असून, यामध्ये भौतिकशास्त्र (Physics) विषयातील एक प्रश्न ‘ड्रॉप’ (वगळण्यात) करण्यात आला आहे. वगळण्यात आलेल्या या प्रश्नासाठी सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण ४ बोनस गुण (+४) दिले जातील; मग त्या उमेदवाराने तो प्रश्न सोडवला असो वा नसो. एकूण २० लाख उमेदवारांनी ही पुनरपरीक्षा दिली असून, या सर्वांना अंतिम निकालापूर्वीच एका प्रश्नाचे गुण समजले आहेत. वाचा सविस्तर... 

  • 27 Jun 2026 04:07 PM (IST)

    27 Jun 2026 04:07 PM (IST)

    “तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात, भाजपात सामील व्हा,” RSS चं कौतुक करणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंची आगपाखड

    नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे सकाळ हिंदू समाजाच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यात विश्वास नांगरे पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक करताना दिसत आहेत. यावरून नवा वाद निर्माण झालेला असतानाच यावर काँग्रेसने आक्षेप घेतला. आता माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावरून सोशल मीडिया पोस्ट लिहीत नांगरे पाटलांवर जोरदार टीका करत पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  वाचा सविस्तर... 

  • 27 Jun 2026 04:00 PM (IST)

    27 Jun 2026 04:00 PM (IST)

    नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर, टवाळखोर अन् मद्यपींवर दंडूका

    नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाढत्या ‘स्ट्रिट क्राईम’ मुळे शहरात धास्तावलेल्या नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा कडक मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्यावर दारू पिणाऱ्या (ओपन बार) मद्यपींवर पोलिसांनी थेट दंडुका उगारण्यास सुरुवात केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार, शहरातील १४ ही पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांची पथके हद्दीतील दारू दुकानांबाहेर, वाईन शॉप्स आणि मोकळ्या जागांवर गस्त घालून कडक कारवाई करत आहेत.

  • 27 Jun 2026 03:52 PM (IST)

    27 Jun 2026 03:52 PM (IST)

    Luxury Car बनवणारी कंपनी करणार 100000 कामगारांची कपात, 4 फॅक्टरीज होणार बंद

    जगातील सर्वात मोठी आलिशान कार उत्पादक कंपनी फोक्सवॅगनने नुकत्याच केलेल्या घोषणेवरून जागतिक रोजगार बाजाराची असुरक्षितता स्पष्टपणे दिसून येते. ऑडी आणि पोर्शेसारख्या आलिशान कार बनवणारी युरोपियन कंपनी फोक्सवॅगन एजी, जगभरातील आपल्या कारखान्यांमधून अंदाजे १,००,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. भारतासह जगभरातील देशांमध्ये आलिशान कारची मागणी वाढत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. एका युरोपियन मासिकाने फोक्सवॅगनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), ऑलिव्हर ब्लूम यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, कंपनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याची आणि अनेक कारखाने बंद करण्याची तयारी करत आहे.

  • 27 Jun 2026 03:42 PM (IST)

    27 Jun 2026 03:42 PM (IST)

    FIFA World Cup 2026 मध्ये मोठा उलटफेर! अवघ्या 5 लाख लोकसंख्येच्या केप व्हर्डेची नॉकआऊटमध्ये धडक

    फिफा विश्वचषक २०२६ मध्ये ( FIFA World Cup 2026) मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. दोन वेळेची वर्ल्ड चॅम्पियन उरु्ग्वेचा प्रवास संपुष्टात आला आहे. तर आपला पहिलाच विश्वचषक खेळणाऱ्या केप व्हर्डेने राऊंड ऑफ ३२ मध्ये पोहचून इतिहास रचला आहे. शनिवारी (२७ जून) एस्तादियो ग्वादालहारा येथे झालेल्या गट ‘एच’च्या निर्णायक सामन्यात, ॲलेक्स बाएनाने पहिल्या सत्रात केलेल्या गोलच्या जोरावर स्पेनने उरुग्वेचा १-० ने पराभव केला. या पराभवामुळे उरुग्वे बाद फेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडला. तर, दुसरीकडे शनिवारी खेळल्या गेलेल्या त्याच गटातील दुसऱ्या रोमांचक सामन्यात, केप व्हर्डेने सौदी अरेबियाविरुद्धचा सामना ०-० ने ड्र्रॉ केला. स्पेनने उरुग्वेला १-० ने पराभूत केल्यामुळे, केप व्हर्डे आपल्या गटात दुसऱ्या स्थानावर कायम आहे. केप व्हर्डे आता नॉकआऊट फेरी गाठणारा सर्वात लहान देश ठरला आहे.

  • 27 Jun 2026 03:32 PM (IST)

    27 Jun 2026 03:32 PM (IST)

    ‘गद्दार खासदार जिथे सापडतील तिथेच..’; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना थेट आदेश, भाजपवरही घणाघात

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमधील सभेत बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना, “गद्दार खासदार जिथे सापडतील तिथे त्यांना जाब विचारा,” असा थेट आदेश दिला.

  • 27 Jun 2026 03:22 PM (IST)

    27 Jun 2026 03:22 PM (IST)

    भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! NHSRCL मध्ये विविध पदांसाठी अर्ज सुरू; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन अर्ज

    भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात काम करण्याचे जर तुमचे स्वप्न असेल किंवा तुम्ही अशा सरकारी नोकरीच्या शोधात आहात का, जिथे उत्तम पगारासोबतच देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पाचा भाग होण्याची संधी मिळेल. तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) विविध पदांवर भरतीसाठी जाहीर केली आहे. निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा ४०,००० ते १.२५ लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. याशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते आणि सेवा-सुविधांचा लाभ मिळेल.

  • 27 Jun 2026 03:10 PM (IST)

    27 Jun 2026 03:10 PM (IST)

    FIH Pro league मध्ये भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; ७-१ ने ऐतिहासिक विजय

    भारतीय पुरुष हॉकी संघाने एफआयएच प्रो लीग ( FIH Pro league) २०२५-२६ मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ७-१ ने पराभूत करून शानदार कामगिरी केली. शुक्रवारी लंडन येथील ली व्हॅली हॉकी आणि टेनिस सेंटरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, सुरुवातीला एका गोलने मागे पडल्यानंतर, भारताने जोरदार पुनरागमन करत पाकिस्तानला सामन्यातून पूर्णपणे बाहेर काढले. दोन दिवसांपूर्वी ४-३ असा निसटता विजय मिळवल्यानंतर, भारतीय संघ या सामन्यात अधिक आक्रमक दिसला.भारताकडून सुखजीत सिंग, हरमनप्रीत सिंग , हार्दिक सिंग, जुगराज सिंग, अभिषेक, राजकुमार पाल आणि दिलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हार्दिक सिंगला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

  • 27 Jun 2026 03:00 PM (IST)

    27 Jun 2026 03:00 PM (IST)

    केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर सर्वात मोठे अपडेट, Fitment Factor बाबत मागण्या होणार पूर्ण?

    केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांमध्ये आठव्या वेतन आयोगासंदर्भातील चर्चा तीव्र झाली आहे. देशभरातील लाखो कर्मचारी त्यांच्या पगार आणि निवृत्तीवेतनात अपेक्षित वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, पगाराच्या गणनेतील एक महत्त्वाचा घटक असलेल्या ‘फिटमेंट फॅक्टर’बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. प्राथमिक चर्चेनुसार, फिटमेंट फॅक्टरबाबत सरकारचे अंदाज आणि कर्मचारी संघटनांच्या मागण्यांमध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे.

  • 27 Jun 2026 02:50 PM (IST)

    27 Jun 2026 02:50 PM (IST)

    अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

    बीड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी जेव्हा तपासाला सुरुवात केली तेव्हा धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेली घटना आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

  • 27 Jun 2026 02:40 PM (IST)

    27 Jun 2026 02:40 PM (IST)

    पुन्हा एकदा नोटबंदी? ‘महात्मा गांधी’ मालिकेतील नोटांवर RBI चा मोठा निर्णय

    दरम्यान ९ जून २०२६ रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशभरातील सर्व बँकांना एक परिपत्रक जारी करून स्पष्ट केले की, १ जुलै २०२६ पासून, नियमित बँकांमध्ये २००५ पूर्वी छापलेल्या नोटा स्वीकारणे किंवा बदलून घेणे बंद केले जाईल. त्यानंतर, या जुन्या नोटा बदलून घेण्याची सुविधा केवळ आरबीआयच्या देशभरातील १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये उपलब्ध असेल. आरबीआयच्या आदेशानंतर, देशभरातील विविध बँकांनी तात्काळ ही प्रक्रिया सुरू केली आहे. १२ जून २०२६ रोजी, बँक ऑफ महाराष्ट्राने पुण्यातील आपल्या मुख्य कार्यालयातून एक अंतर्गत परिपत्रक जारी करून, २००५ पूर्वी छापलेल्या नोटांसंदर्भात सर्व शाखा, प्रादेशिक कार्यालये आणि करन्सी चेस्ट्सना कडक सूचना दिल्या आहेत.

  • 27 Jun 2026 02:30 PM (IST)

    27 Jun 2026 02:30 PM (IST)

    संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग

    शाळेतील जुनी ओळख काढून इन्स्टाग्रामवरून पुन्हा संपर्क साधत एका २४ वर्षीय जीम ट्रेनर तरुणीचा एका माथेफिरुने तब्बल सात महिने पाठलाग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तिचे नकळत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता तिच्या मित्रालाही धमकावले आहे. ही घटना नोव्हेंबर २०२४ ते २५ जून २०२६ दरम्यान काल्डा कॉर्नर परिसरात घडली आहे. कृष्णा सुभाष गवळी (वय २४, रा. जय भवानीनगर) असे पीडितेला धमकावणाऱ्या माथेफिरुचे नाव असून, त्याच्या विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात २४ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.

     

  • 27 Jun 2026 02:20 PM (IST)

    27 Jun 2026 02:20 PM (IST)

    7200mAh बॅटरीसह नव्या Vivo स्मार्टफोनचे आगमन

    Vivo Y6a स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 1,999 युआन म्हणजेच सुमारे 28,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा नवीन स्मार्टफोन ब्लॅक, सिल्वर आणि गोल्ड रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात.

  • 27 Jun 2026 02:10 PM (IST)

    27 Jun 2026 02:10 PM (IST)

    अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकणार? आठवडाभरातच कोसळला पाकिस्तानच्या मध्यस्थीचा करार

    पश्चिम आशियावर पुन्हा एकदा युद्धाचे सावट निर्माण झाले आहे. १८ जून रोजी झालेल्या शस्त्रसंधीनंतर अवघ्या काही दिवसांतच अमेरिका आणि इराण यांच्यातील हल्ले पुन्हा सुरू झाले आहेत. शुक्रवारी (26 जून 2026) रात्री आणि शनिवारी सकाळी दोन्ही देशांनी एकमेकांच्या ठिकाणांना लक्ष्य केले. या ताज्या हल्ल्यांमुळे, दीर्घकाळापासूनच्या तणावाला आळा घालणाऱ्या शांतता कराराच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • 27 Jun 2026 02:00 PM (IST)

    27 Jun 2026 02:00 PM (IST)

    महाराष्ट्रात पुन्हा हवामान बदलले! विदर्भात आजपासून मुसळधार

    उत्तर भारतातील उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड आणि गुजरात यांसह १६ राज्यांत मेघगर्जनेसह वादळी वारे आणि पावसाचा इशारा जारी केला आहे. अनेक भागांमध्ये ताशी ४० ते ७० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • 27 Jun 2026 01:55 PM (IST)

    27 Jun 2026 01:55 PM (IST)

    उद्या होणारी टीईटी परीक्षा खरोखरच रद्द? पेपर फुटल्याच्या वृत्ताने उमेदवारांमध्ये खळबळ

    राज्यभरात कित्येक विद्यार्थी आणि कार्यरत शिक्षक सध्या टीईटी (TET- Teacher Eligibility Test) परीक्षेच्या तयारीला लागले होते. ही परीक्षा २८ जून २०२६ रोजी महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या शिक्षक पात्रता परीक्षेला उमेदवारांची रेकॉर्डब्रेक नोंदणी झाली होती. परंतु, परीक्षेच्या आदल्याच दिवशी टीईटीचा पेपर फुटल्यामुळे आता उद्या होणारी परीक्षा रद्द करण्यात येत असल्याची बातमी समोर आली आहे.

  • 27 Jun 2026 01:45 PM (IST)

    27 Jun 2026 01:45 PM (IST)

    अमेरिकन परदेशी मंत्री मार्को रुबियोची मोठी घोषणा, भारतात येणार राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प

    भारत आणि अमेरिका यांच्यात सामरिक आणि व्यापारी संबंधांचे एक नवीन पर्व सुरू होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्या घोषणेवरून हे स्पष्ट होते. त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारताला भेट देतील. रुबियो यांनी स्पष्ट केले की, या ऐतिहासिक व्हीव्हीआयपी दौऱ्याची तयारी अंतिम करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील बहुप्रतिक्षित व्यापार कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देण्यासाठी ते स्वतः भारतात येणार आहेत. 

  • 27 Jun 2026 01:35 PM (IST)

    27 Jun 2026 01:35 PM (IST)

    वडगाव पोलिसांची बेकायदा धंद्यांवर धडक कारवाई

    वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यातील बेकायदा धंद्यांविरोधात धडक कारवायांना वेग दिला आहे. त्याच मोहिमेअंतर्गत टाकवे बुद्रुक येथे छापा टाकून पोलिसांनी १ किलो ५८८ ग्रॅम गांजा तसेच प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी ९५ वर्षीय विठोबा नथु जांभुळकर (रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

  • 27 Jun 2026 01:25 PM (IST)

    27 Jun 2026 01:25 PM (IST)

    मला फुटायचे असते तर सुरत बॉर्डरवरून परतलोच नसतो ! कैलास पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

    शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाशी निष्ठावंत असल्याचे स्पष्ट केले. मला पक्ष सोडायचा असता तर २०२२ मध्ये सुरतच्या बॉर्डरवरून परत आलोच नसतो, असे ठाम विधान त्यांनी केले. कैलास पाटील म्हणाले की, आपण एका सामान्य शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलो असून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी जिल्हा परिषद सदस्य तसेच दोन वेळा आमदार होण्याची संधी दिली.

  • 27 Jun 2026 01:15 PM (IST)

    27 Jun 2026 01:15 PM (IST)

    200cc ते 250cc सेगमेंटमधील या बाइक्स ठरू शकतात फायदेशीर पर्याय

    जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला शक्तिशाली इंजिन, आकर्षक लूक आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांचे उत्तम मिश्रण हवे असेल, तर २०० सीसी ते २५० सीसी सेगमेंट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. या सेगमेंटमध्ये अशा अनेक मोटरसायकल्स उपलब्ध आहेत, ज्या दैनंदिन वापरासाठी आणि लांबच्या प्रवासासाठी उत्कृष्ट कामगिरी देतात.

  • 27 Jun 2026 01:08 PM (IST)

    27 Jun 2026 01:08 PM (IST)

    जून संपतानाच देशाच्या फॉरेक्स रिझर्व्हवर आनंदाची बातमी!

    मध्य पूर्वेतील तणाव कमी झाल्यानंतर, देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत काही दिलासादायक बातम्या समोर आल्या आहेत. गेल्या आठवड्यात घट झाल्यानंतर, देशाच्या परकीय चलन साठ्यात पुन्हा वाढ नोंदवली गेली आहे. RBI ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, १९ जून रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा ९६३ दशलक्ष अमेरिकी डॉलरने वाढून ६७२.५८७ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचला आहे. मागील आठवड्यात देशाच्या परकीय चलन साठ्यात ९.९८५ अब्ज अमेरिकी डॉलरची लक्षणीय घट होऊन तो ६७१.६२५ अब्ज अमेरिकी डॉलरवर आला होता. परकीय चलन साठ्यातील या अलीकडील वाढीमुळे आर्थिक आघाडीवर दिलासा मिळाला आहे.

  • 27 Jun 2026 01:02 PM (IST)

    27 Jun 2026 01:02 PM (IST)

    सासवड पोलिसांची बोपगावात मोठी कारवाई

    सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सासवड पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर बेकायदा धंद्याविरोधात जोरदार कारवाया सुरु केल्या आहेत. सासवडसह पुरंदर तालुक्याच्या ग्रामीण भागातील बेकायदा दारूविक्री, मटका, लॉटरी, जुगार, हुक्का पार्लर वरती कारवाई करून त्यांना कायद्याचा बडगा दाखवला आहे. तर पश्चिम भागातील बोपगावमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून तब्बल २१ लाख ७० हजारांचा सुगंधी मिश्रित गुटखा जप्त केला आहे. पोलीस शिपाई प्रणय मखरे यांनी सिराज शेख (रा. शितल पेट्रोलपंपाचे शेजारी, कोंढवा खुर्द, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • 27 Jun 2026 12:48 PM (IST)

    27 Jun 2026 12:48 PM (IST)

    कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली

    पुण्यातील कात्रजमधील संतोषनगर भागात एका दुचाकीस्वाराला धारदार लोखंडी हत्याराचा धाक दाखवून त्याच्याकडील ६ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मानव संदीप अडागळे (वय २३, रा. शनिनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) आणि रेहान परवेज कुरेशी (वय १८, रा. इंद्रायणीनगर, टेल्को कॉलनी, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना २३ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास संतोषनगर येथील डिलाईट बेकरीजवळ घडली आहे. याबाबत विकास रामचंद्र सकट (वय ४४, रा. मानाजीनगर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे.

  • 27 Jun 2026 12:36 PM (IST)

    27 Jun 2026 12:36 PM (IST)

    नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अखेर ठोकल्या बेड्या

    पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांकडूनही कारवाई सुरु आहे. अशातच आता कोथरूडमधील कुविख्यात गँगस्टर निलेश घायवळ याच्या टोळीतील सराइत गुन्हेगाराला कोथरूड पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. दरम्यान, गँगस्टर निलेश घायवळ परदेशात फरार असून, त्याचा शोध अद्याप तरी पुणे पोलिसांना लागलेला नाही. नीलेश उर्फ चांग्या हरिशंकर शर्मा (वय ३८, रा. गुजरात काॅलनी, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शर्मा याच्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाणे, तसेच जामखेड पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

  • 27 Jun 2026 12:24 PM (IST)

    27 Jun 2026 12:24 PM (IST)

    दुकानदार महिलेला 4 दिवस घराबाहेर पडू दिले नाही

    छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उधारीवर थंडपेय व सिगारेट देण्यास नकार दिल्या कारणावरुन दुकानदार महिलेला शिवीगाळ करुन दुचाकीची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यावर आणखीच संतापलेल्या तरुणाने दुकानदार महिलेला चाकूचा धाक दाखवत सलग चार दिवस घराबाहेर पडू दिले नाही. तसेच रोज घरासमोरुन शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २१ जून ते २५ जून दरम्यान एन-१२ शताब्दीनगरात घडला आहे. सनि कचरु गायकवाड (रा. शताब्दीनगर, एन-१२) असे महिलेला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचे नाव असून त्याच्याविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विमलबाई कैलास कांबळे (४०, रा. शताब्दीनगर, एन-१२) यांनी फिर्याद दिली आहे.

  • 27 Jun 2026 12:12 PM (IST)

    27 Jun 2026 12:12 PM (IST)

    संभाजीनगरमध्ये जीम ट्रेनर तरुणीचा 7 महिने पाठलाग

    शाळेतील जुनी ओळख काढून इन्स्टाग्रामवरून पुन्हा संपर्क साधत एका २४ वर्षीय जीम ट्रेनर तरुणीचा एका माथेफिरुने तब्बल सात महिने पाठलाग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तिचे नकळत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता तिच्या मित्रालाही धमकावले आहे. ही घटना नोव्हेंबर २०२४ ते २५ जून २०२६ दरम्यान काल्डा कॉर्नर परिसरात घडली आहे. कृष्णा सुभाष गवळी (वय २४, रा. जय भवानीनगर) असे पीडितेला धमकावणाऱ्या माथेफिरुचे नाव असून, त्याच्या विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात २४ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.

  • 27 Jun 2026 12:00 PM (IST)

    27 Jun 2026 12:00 PM (IST)

    लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना मोठा दणका; सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांविरोधात राज्य सरकारने आणखी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.योजनेचा बेकायदेशीरपण लाभ घेणाऱ्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या अनुदानाचीही वसुली केली जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

  • 27 Jun 2026 12:00 PM (IST)

    27 Jun 2026 12:00 PM (IST)

    तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला

    मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एका व्यापारी जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर, अमेरिकेने इराणविरुद्ध मोठी लष्करी कारवाई केली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) अनेक इराणी लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. व्यापारी जहाजावरील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.

  • 27 Jun 2026 11:40 AM (IST)

    27 Jun 2026 11:40 AM (IST)

    सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय

    पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपासातून नवे खुलासे समोर येत आहेत. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची ओळख क्रिकेटच्या मैदानावर झाल्याचा तपासात दावा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात फोनवर संपर्क झाला होता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

  • 27 Jun 2026 11:30 AM (IST)

    27 Jun 2026 11:30 AM (IST)

    ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ

    आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेल्या एक महिलेने अमेरिकेची नागरिकता सोडून पुन्हा भारतात येऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तिने अर्ज देखील केला आहे ज्यात भारतीय नागरिकता मिळण्यासाठीची मागणी करण्यात आली आहे. महिलेचे नाव कोंड्रागुंटा महालक्ष्मम्मा असून तिचे वय ९४ वर्षे आहे.  प्रक्रिया वेगाने होण्यासाठी त्यांनी अधकाऱ्यांची भेट देखील घेतली आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. रि

  • 27 Jun 2026 11:10 AM (IST)

    27 Jun 2026 11:10 AM (IST)

    अयोध्या राम मंदिर कथित दान गैरव्यवहार प्रकरणी SIT चा प्राथमिक अहवाल सादर

    सध्या उत्तर प्रदेशमधील अयोध्या राम मंदिर येथे भाविकांनी दिलेल्या दानामध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी एका विशेष तपास पथकाची (SIT – Special Investigation Team) स्थापना करण्यात आली होती. सध्या प्राथमिक तपास अहवाल सरकारला सादर करण्यात आला असून, पुढील तपास अजूनही सुरू आहे आणि अंतिम अहवाल नंतर सादर केला जाईल.

  • 27 Jun 2026 10:50 AM (IST)

    27 Jun 2026 10:50 AM (IST)

    व्हेनेझुएलाच्या भयानक भूकंपानंतर आता पाकिस्तानलाही हादरा, डेरा गाझी खानजवळ तीव्र झटका

    दक्षिण अमेरिकेतील Venezuela देशात झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या धक्क्यातून जग अजून सावरलेले नाही, आणि आता भारताच्या शेजारील पाकिस्तानातही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. शनिवारी सकाळी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील डेरा गाझी खान परिसरात ५.४ तीव्रतेचा भूकंप झाला. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

  • 27 Jun 2026 10:40 AM (IST)

    27 Jun 2026 10:40 AM (IST)

    भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती

    टेक जायंट कंपनी असलेल्या अ‍ॅपलने त्यांच्या भारतातील ग्राहकांना एक मोठा धक्का दिला आहे. कंपनीने ते भारतात त्यांच्या मॅकबुक आणि आयपॅड लाईनच्या किंमतीत वाढ केली आहे. यामध्ये काही डिव्हाईसच्या किंमती आता तब्बल एक लाख रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत.

  • 27 Jun 2026 10:30 AM (IST)

    27 Jun 2026 10:30 AM (IST)

    वयाच्या १९ व्या वर्षी एआयच्या बळावर दरमहा १ कोटींची कमाई

    आजच्या काळात एआय (AI) केवळ नोकरी मिळवण्याचे माध्यम राहिलेले नाही, तर अनेक जण याच्याच बळावर कोट्यवधींचा व्यवसाय उभा करत आहेत. नुकतेच १९ वर्षांचा भारतीय तरुण आयुष सिंह याची कहाणी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. आयुष दरमहा तब्बल १ कोटी रुपयांची कमाई करत असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, आयुषने कोणत्याही आयआयटी किंवा एमआयटी सारख्या मोठ्या संस्थेतून शिक्षण घेतलेले नाही, ना कोणती मोठी पदवी मिळवली आहे. चला तर मग जाणून घेऊया, कोण आहे हा १९ वर्षांचा भारतीय तरुण जो एआयचा वापर करून दरमहा १ कोटी रुपये कमावतोय.

  • 27 Jun 2026 10:20 AM (IST)

    27 Jun 2026 10:20 AM (IST)

    घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार

    वर्धा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी 24 वर्षीय विवाहितेची भररस्त्यात चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वडिलांनी जावयावर संशय व्यक्त केला आहे. घडलेली घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरणवार गल्लीत शुक्रवारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • 27 Jun 2026 10:10 AM (IST)

    27 Jun 2026 10:10 AM (IST)

    भारतात चिपयुक्त E-Passport ची सुरुवात! कशी वाढणार नागरिकांची सुरक्षा?

    भारताने आधुनिक प्रवास दस्तऐवज प्रणालीकडे मोठे पाऊल टाकत चिपयुक्त ई-पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे. नवीन ई-पासपोर्टमध्ये डिजिटल सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान ओळख पडताळणी अधिक जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह होणार आहे. ई-पासपोर्टचे बाह्य स्वरूप पारंपरिक पासपोर्टसारखेच राहणार आहे. मात्र त्यामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे जगभरातील विमानतळांवरील इमिग्रेशन प्रक्रिया अधिक सोपी होण्यास मदत होईल.

  • 27 Jun 2026 10:00 AM (IST)

    27 Jun 2026 10:00 AM (IST)

    शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक

    शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अद्याप दप्तर आणि इतर २७ प्रकारच्या शालेय वस्तू मिळालेल्या नाहीत. या विलंबावरून गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ‘शाळा सुरू होऊनही वस्तू मिळत नसतील, तर गरिबांच्या मुलांनी शिकायचे कसे? प्रशासनाने दप्तराची लक्तरं वेशीवर टांगली आहेत’, अशा अत्यंत तिखट शब्दांत सदस्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. कंत्राटदाराची निवड, विलंबाचे कारण आणि वस्तूंची गुणवत्ता या मुद्द्यांवरून विरोधक कमालीचे आक्रमक झाले होते.

  • 27 Jun 2026 09:50 AM (IST)

    27 Jun 2026 09:50 AM (IST)

    मुंबई विमानतळावर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा पर्दाफाश

    परदेशी सोन्याच्या तस्करीविरुद्धच्या एका मोठ्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मुंबई विमानतळावर तस्करी करणाऱ्या टोळीतील नऊ सदस्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये विमानतळावर कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. डीआरआयने मुंबई विमानतळावरून चालणाऱ्या या संघटित सोन्याच्या तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश केला. तपासादरम्यान, अधिकाऱ्यांना असे ठिकाणही सापडले जिथे तस्करी केलेले परदेशी सोने वितळवले जात होते.

  • 27 Jun 2026 09:40 AM (IST)

    27 Jun 2026 09:40 AM (IST)

    पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली

    राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता पुण्यातील कात्रजमधील संतोषनगर भागात एका दुचाकीस्वाराला धारदार लोखंडी हत्याराचा धाक दाखवून त्याच्याकडील ६ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • 27 Jun 2026 09:30 AM (IST)

    27 Jun 2026 09:30 AM (IST)

    पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून

    शहरात गुन्हेगारांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच चालले असून, आता उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळाली गावात एका ३७ वर्षीय तरुणाची जुन्या वादाची कुरापत काढून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशाल सीताराम माळवे (वय ३७, रा. सुवर्ण सोसायटी, देवळाली गाव) असे मृत युवकाचे नाव आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उपनगर पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

  • 27 Jun 2026 09:15 AM (IST)

    27 Jun 2026 09:15 AM (IST)

    नागांच्या संघर्षात अजूनही जळतोय मणिपूर; 4 महिन्यांत 48 जणांचे अपहरण

    मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यातील लिटान सराइखोंग नागा गावात ८ आणि ९ फेब्रुवारीच्या रात्री जमावाने २० हून अधिक घरे जाळली. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून सरकारने १० फेब्रुवारी रोजी उखरुल आणि कांगपोकपी जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा निलंबित केली. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर लष्कर पहारा देत आहे. असे असताना या चार महिन्यात 48 जणांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Web Title: Marathi news live updates national and international news latest updates live blog marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • Marathi News Live Updates
  • navarashtra breaking news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.