मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने सर्वात मोठी कारवाई केली आहे. पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतलं आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान मुंबईतून आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अस्लम शेख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. भाजप नेते मोहित कंबोज आणि अस्लम शेख हे एकत्र देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या सागर या बंगल्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक घोटाळ्याचे अनेकदा गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांच्याविरोधात आज सर्वात मोठी कारवाई होताना दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. सोमय्यांनी अस्लम शेख यांच्यावर थेट २०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते.






