Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील 6850 मतं वाढवली – राहुल गांधी

Marathi Breaking Live Marathi : राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह देश-विदेशातील ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 18, 2025 | 07:19 PM
Top Marathi News Today : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Top Marathi News Today : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Updates : राज्यातील सर्व शासकीय डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज एकदिवसीय संप केला जाणार आहे. या संपामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी होमिओपॅथी पदवीधरांना ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजि’ पूर्ण केल्यानंतर आधुनिक वैद्यकीय पद्धतीत नोंदणीची परवानगी दिल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (सेंट्रल मार्ड) यांनी तीव्र विरोध केला.

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्याची घोषणा केली आहे. यामुळे मुंबईसह राज्यातील रूग्णसेवेवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. सरकार व एमएमसीने घेतलेला निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सेंट्रल मार्डने दिला आहे. होमिओपॅथी पद्धतीला विरोध करत नाहीत, पण प्रत्येक वैद्यकीय शाखा आपल्या शास्त्रीय चौकटीतच कार्य करावी, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे या डॉक्टर्सकडून संपावर जाण्याचा इशारा दिला गेला आहे.

The liveblog has ended.
  • 18 Sep 2025 07:12 PM (IST)

    18 Sep 2025 07:12 PM (IST)

    Fadnavis On Rahul Gandhi: फडणवीसांनी हायड्रोजन बॉम्बची हवाच काढली; म्हणाले, "लवंगी फटाका देखील..."

    Rahul Gandhi On Election Comission: कॉँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत हायड्रोजन बॉम्ब फोडला आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. ज्या ठिकाणी कॉँग्रेस जिंकत होते त्या ठिकाणची मते वळवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधी याचे आरोप सपशेल फेटाळून लावले आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाष्य केले आहे.

    🕖 6.53pm | 18-9-2025📍Mumbai.

    LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/cYBRj6OoFi

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 18, 2025

  • 18 Sep 2025 06:52 PM (IST)

    18 Sep 2025 06:52 PM (IST)

    Maratha Reservation: विषय गंभीर! हैदराबाद गॅझेटबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; भुजबळ म्हणाले…

    Maharashtra Reservation Politics: राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठा लढा उभा केला होता. आरक्षण मिळल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. अखेर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. तसेच सरकारने हैदराबाद गॅझेटचा देखील जीआर काढला आहे. याबाबत आता हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.

  • 18 Sep 2025 06:37 PM (IST)

    18 Sep 2025 06:37 PM (IST)

    Sharad Pawar : शेजारी देशांच्या धोरणाबाबत केंद्र सरकार अपयशी…; शरद पवारांनी व्यक्त केली खंत

    Sharad Pawar Press Confernce : कोल्हापूर : देशांबाबतच्या भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. “नेपाळसारख्या शांतता प्रिय देशात आज अराजकता निर्माण झाली आहे. भारतीयांना नेपाळमध्ये प्रवेश करताना पूर्वी कोणतेही बंधन नव्हते, मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तान कायमच भारताबद्दल कुरघोडी करतो, चीनसोबतचे संबंध चिंताजनक झाले आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारताने त्याग केला हे आज बांगलादेश विसरल्यासारखे दिसते, तर श्रीलंका देखील आपला मित्र राहिलेली नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकार परराष्ट्र धोरणात कितपत यशस्वी ठरत आहे, याचा विचार व्हायला हवा,” असे शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे.

  • 18 Sep 2025 06:25 PM (IST)

    18 Sep 2025 06:25 PM (IST)

    Sabrimala Temple Gold Missing: शबरीमाला मंदिरातील कोटींचे सोने गायब? सगळीकडे खळबळ; HC ने थेट....

    Kerala High Court: केरळच्या शबरीमाला मंदिराबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या जगप्रसिद्ध असणाऱ्या शबरीमाला मंदिरातून कोट्यवधींचे सोने गायब झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत केरळ हायकोर्टाने तपासणीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

  • 18 Sep 2025 06:01 PM (IST)

    18 Sep 2025 06:01 PM (IST)

    भारतीय क्रिकेटर Tilak Verma कडून वडिलांना 'ही' खास इलेक्ट्रिक एसयूव्ही भेट

    भारतीय संघाचा खेळाडू तिलक वर्माने नुकतीच महिंद्रा XEV 9e खरेदी केली. या क्रिकेटपटूने ही इलेक्ट्रिक एसयूव्ही त्याच्या वडिलांना भेट दिली, ज्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिंद्रा XEV 9e ची किंमत 22.65 लाख (एक्स-शोरूम) आहे, तर टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत 31.25 लाख (एक्स-शोरूम) आहे.

  • 18 Sep 2025 05:57 PM (IST)

    18 Sep 2025 05:57 PM (IST)

    Pune Heavy Rain: परतीच्या पावसाने पुणे बेहाल! अचानक झालेल्या सरींमुळे शहरात अक्षरशः...

    Pune Rain News:  गेल्या एक ते दोन दिवसांपासून पुणे शहरात पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याचे दिसून आले होते. हवामान विभागाने महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र पावसाने काहीशी उसंत घेतल्याचे दिसून येत होते. त्यानंतर आज दुपारी अचानक मुसळधार पावसाने पुण्यात हजेरी लावली आहे. दरम्यान पुणे शहरात अचानक पवसाजे हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडल्याचे दिसून आले.

  • 18 Sep 2025 05:34 PM (IST)

    18 Sep 2025 05:34 PM (IST)

    नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर

    जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून मोठी बातमी येत आहे. भारताचा स्टार अ‍ॅथलीट नीरज चोप्रा जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर पडला आहे. नीरज चोप्राचा अंतिम फेरीतील सर्वोत्तम थ्रो ८४.०३ मीटर होता. या अंतिम फेरीत भारताला एक आशा शिल्लक आहे. पाचव्या फेरीनंतर भारताचा सचिन यादव बाहेर पडला आहे. सचिन यादवने ८६.२७ मीटरचा त्याचा सर्वोत्तम थ्रो केला होता.

     

  • 18 Sep 2025 05:19 PM (IST)

    18 Sep 2025 05:19 PM (IST)

    श्री अंबाबाई मंदिरातील भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

    काही दिवसांवर येवून ठेपलेल्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील सीसीटीव्ही कक्ष सज्ज झालं आहे.मंदिर परिसरात 120 सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आले आहेत.. शिवाय यंदा पहिल्यांदाच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी AI चा वापर करण्यात येणार आहे.

  • 18 Sep 2025 05:04 PM (IST)

    18 Sep 2025 05:04 PM (IST)

    टीम इंडिया भिडणार ओमानशी; अबु धाबीमध्ये कसा आहे भारतीय संघाचा टी-२० रेकॉर्ड?

    यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने ग्रुप-ए मधील आपले दोन्ही सामने जिंकून सुपर-४ मध्ये स्थान निश्चित केले आहे. आता टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्ये ओमान संघाविरुद्ध १९ सप्टेंबर रोजी आपला शेवटचा सामना खेळायचा आहे. भारताने आपले सुरुवातीचे दोन्ही सामने दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले होते, पण ओमानविरुद्धचा हा सामना अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियमवर होणार आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 18 Sep 2025 04:59 PM (IST)

    18 Sep 2025 04:59 PM (IST)

    टीम इंडिया भिडणार ओमानशी; अबु धाबीमध्ये कसा आहे भारतीय संघाचा टी-२० रेकॉर्ड?

     यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने ग्रुप-ए मधील आपले दोन्ही सामने जिंकून सुपर-४ मध्ये स्थान निश्चित केले आहे. आता टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्ये ओमान संघाविरुद्ध १९ सप्टेंबर रोजी आपला शेवटचा सामना खेळायचा आहे.

  • 18 Sep 2025 04:52 PM (IST)

    18 Sep 2025 04:52 PM (IST)

    संजू राठोडने “सुंदरी” गाण्याने यूट्यूब फॅनफेस्ट 2025 मध्ये आणली रंगत

    मुंबईत यूट्यूब फॅनफेस्ट 2025 दरम्यान संगीताची प्रचंड ऊर्जा अनुभवायला मिळाली, जेव्हा उत्साही आणि जबरदस्त परफॉर्मर संजू राठोडने आपल्या नव्या सिंगल ‘सुंदरी’ या गाण्याचा थेट प्रीमियर केला आणि संपूर्ण चाहत्यांच्या गर्दीत धमाका केला.

  • 18 Sep 2025 04:41 PM (IST)

    18 Sep 2025 04:41 PM (IST)

    बांगलादेशने शेख हसीनांचे Voter ID केले ब्लॉक

    एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. शेख हसीना (Shaikh Hasina) आता बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूका लढवू शकणार नाहीत. कारण बांगलदेशच्या (Bangladesh) निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान शेखी हसीना यांचे मतदार ओळखपत्र ब्लॉक केले आहे.

  • 18 Sep 2025 04:38 PM (IST)

    18 Sep 2025 04:38 PM (IST)

    Eknath Shinde On Rahul Gandhi: "मनमोहन सिंग PM असताना ईव्हीएम..."; शिंदेंचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर

    Rahul Gandhi On Election Comission:  काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषद घेत असून यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. काही ठिकाणी काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळल्याचं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. या आरोपांना आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांना कोर्टात जाण्याचा सल्ला दिला आहे.

  • 18 Sep 2025 04:27 PM (IST)

    18 Sep 2025 04:27 PM (IST)

    अमेरिकेच्या ड्रग्ज तस्करी अहवालात ‘हे’ 23 देश रडारवर

    ट्रम्प अहवालात भारतासह २३ देशांची नावे, पण भारताचं योगदान ठळक. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेससमोर नुकताच एक महत्त्वपूर्ण अहवाल सादर केला. या अहवालाचं नाव आहे “प्रेसिडेंशियल डिटरमिनेशन”.

  • 18 Sep 2025 04:21 PM (IST)

    18 Sep 2025 04:21 PM (IST)

    पाकिस्तानचे नाटक काही संपेना!

    Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मध्ये झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मोठा गोंधळ घातला. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यानंतर, पाकिस्तानने आयसीसीकडे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेतून हटवण्याची मागणी केली.

  • 18 Sep 2025 04:05 PM (IST)

    18 Sep 2025 04:05 PM (IST)

    चंद्रकांत पाटलांनी Rahul Gandhi यांना दिला कोल्हापुरी ‘झटका’; म्हणाले, “उठसूट इलेक्ट्रॉनिक मीडियाचा…”

    Rahul Gandhi On Election Comission: काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषद घेत असून यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. काही ठिकाणी काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळल्याचं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. मतचोरीच्या आरोपांबाबत राहुल गांधी पत्रकार परिषदेत अनेक मोठे खुलासे केले. राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप केला. त्यांनी पुरावेही सादर केले आणि निवडणूक आयोगाच्या संरक्षणाखाली हे घडत असल्याचा दावा केला. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र आता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधी यांना सुनावले आहे.

  • 18 Sep 2025 03:50 PM (IST)

    18 Sep 2025 03:50 PM (IST)

    बॅनर लावण्याचा वादातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले

    भाजपचे पदाधिकारी मोहन कोणकर यांना शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली मारहाणतर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मुकेश कोट यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.

  • 18 Sep 2025 03:45 PM (IST)

    18 Sep 2025 03:45 PM (IST)

    रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन समाजाचा संताप

    "ईव्हीएम हटा – बॅलेट पेपर लावा", "संविधान वाचवा – लोकशाही वाचवा", "जल-जंगल-जमीन आमचा हक्क आहे" अशा घोषणांनी आज अलिबाग शहर दणाणून गेले. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने धरणे आंदोलन करण्यात आले.

  • 18 Sep 2025 03:40 PM (IST)

    18 Sep 2025 03:40 PM (IST)

    मुख्यमंत्री दौऱ्यावर राजकीय विरोधक पक्ष एकत्र ;काळे झेंडे दाखवण्याची चेतावणी

    भाईंदर महापालिकेतील भ्रष्टाचार व भोंगळ आणि मनमानी कारभाराबाबत मुख्यमंत्र्यांची  भेट घेणार आहेत. दोन्ही आमदार विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार व नागरिकांची लूट करीत असल्याचा आरोप केला आहे.

     

     

  • 18 Sep 2025 03:38 PM (IST)

    18 Sep 2025 03:38 PM (IST)

    Maharashtra Politics: “…त्यावर बोलण्याची गरज नाही”; ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर नाना पटोलेंनी संपवला विषय

    Congress Leader Nana Patole: कॉँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळआय त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक, एसआयआर, मीनाताई ठाकरे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर भाष्य केले आहे. यावेळआय त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. निवडणुका या पारदर्शकपणे व्हाव्यात असे त्यांनी म्हटले आहे.

  • 18 Sep 2025 03:35 PM (IST)

    18 Sep 2025 03:35 PM (IST)

    उल्हासनगरमध्ये ट्रॅफिक पोलिसांची मनमानी

    टोईंग गाड्यांमुळे उल्हासनगर-४ आणि ५ मधील वाहनचालक त्रस्त असून ट्रॅफिक वार्डनसोबत बेकायदेशीर वसुली केली जात आहे. याचकारणाने वाहतूक समस्येवकडे दुर्लक्ष केलं जात आहे.

     

  • 18 Sep 2025 03:30 PM (IST)

    18 Sep 2025 03:30 PM (IST)

    खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

    खोपोली शहर व खालापूर तालुका ओबीसी समाजाच्या वतीने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याबाबत शासनाने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरला तीव्र हरकत नोंदविण्यात आली. याबाबत १७ सप्टेंबर रोजी खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले.

  • 18 Sep 2025 03:25 PM (IST)

    18 Sep 2025 03:25 PM (IST)

    सिंधुदुर्गात महामार्गासह ग्रामीण भागातील खड्ड्यांवरून बॅनरबाजी

    सिंधुदुर्गात मुंबई-गोवा महामार्गावर तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. मार्गात खड्डे असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागतेय. या खड्ड्यांमुळे अपघात होऊन काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, ठेकेदार कंपनी या खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करतेय. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी प्रशासनाच्या कामाविरोधात बॅनरबाजी केली असून यावर “आपण चंद्रावर प्रवास करीत आहात; जरा सांभाळून रस्ता हरविला आहे” असे उपरोधिक बॅनर लावून नागरिकांकडून निषेध व्यक्त केला आहे.

  • 18 Sep 2025 03:19 PM (IST)

    18 Sep 2025 03:19 PM (IST)

    आरोग्य विभागाच्या राज्यस्तरीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

    महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) सीसीएमपी अभ्यासक्रमधारक होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणीला विरोध दर्शविला जात आहे. या नोंदणी करण्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने राज्यभर बंदची हाक दिली आहे. याचपार्श्वभूमीवर पुकारलेल्या बंदला कल्याणमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

  • 18 Sep 2025 02:57 PM (IST)

    18 Sep 2025 02:57 PM (IST)

    “आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर….”, संजय राऊतांविरोधात ठाण्यात आंदोलन

    Sanjay Raut on Eknath shinde News Marathi : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी आनंद दिघे यांचा फोटो छापण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने आनंद दिघे यांचा फोटो लावण्वर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला. मात्र याचदरम्यान आता खासदार राऊतांनी आनंद दिघे यांच्यावर केले वादग्रस्त विधानानंतर राऊत यांच्या विरोधात ठाण्यात आंदोल करण्यात येत आहे.

  • 18 Sep 2025 02:55 PM (IST)

    18 Sep 2025 02:55 PM (IST)

    टेक डिस्ट्रीब्युशन कंपनी iValue Infosolutions चा IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला

    Ivalue Infosolutions IPO Marathi News: तंत्रज्ञान सेवा आणि उपाय प्रदाता आयव्हॅल्यू इन्फोसोल्युशन्स आयपीओ गुरुवारी (१८ सप्टेंबर) सबस्क्रिप्शनसाठी उघडला. कंपनीने त्यांच्या आयपीओसाठी किंमत पट्टा २८४ ते २९९ रुपये प्रति शेअर ठेवला आहे. गुंतवणूकदार सोमवार (२२ सप्टेंबर) पर्यंत या इश्यूसाठी अर्ज करू शकतात. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (ओएफएस) वर आहे. याचा अर्थ प्रमोटर्स त्यांचे संपूर्ण हिस्सेदारी विकत आहेत. कंपनीने १.८७ कोटी इक्विटी शेअर्सच्या विक्रीद्वारे ५६०.२९ कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनी ही रक्कम इतर कोणत्याही कारणासाठी वापरणार नाही. ती शेअर्स विकणाऱ्या भागधारकांना जाईल.

  • 18 Sep 2025 02:50 PM (IST)

    18 Sep 2025 02:50 PM (IST)

    या पाकिस्तानचं करायचं काय? गाठली खालची पातळी!

    PAK vs IND : आशिया कप २०२५ स्पर्धा(Asia cup 2025) चांगलीच वादात सापडली आहे. याच्यामागे पाकिस्तानचा संघ खर कारण आहे. काल झालेल्या  युएई आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर पाकिस्तान संघ बहिष्कार टाकणार होता. सामान्याआधी पाकिस्तान संघाला पीसीबीने हॉटेलवरच थंबण्यास सांगितले त्यामुळे रात्री ८ वाजता सुरू होणारा सामना एक तास विलंबाने म्हणजे ९ वाजता सुरू झाला होता.  भारतीय संघाला हस्तांदोलन करण्यास मनाई करणाऱ्या सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट हटवण्याची मागणी आयसीसीकडून फेटाळण्यात आली त्यामुळे पाकिस्तान संघाने बहिष्कार टाकण्याचे ठरवले अखेर आयसीसीसोबत चर्चा झाल्यावर पाकिस्तान नरमला  आणि नाट्य थांबले. आता मात्र एक पाऊल पुढे जाऊन कुरापती करत आहे.

  • 18 Sep 2025 02:45 PM (IST)

    18 Sep 2025 02:45 PM (IST)

    भर रस्त्यात नवरा-बायकोचे जोरदार भांडण

    सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यामध्ये भांडणाचे तर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. लोक कधीही, कुठेही भांडायला सुरुवात करतात. त्यांना आसापासच्या परिसराचे अजिबात भान राहत नाही, गेल्या काही काळात नवरा-बायकोच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये बायको नवऱ्याला बेदम मरहाण करताना दिसत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • 18 Sep 2025 02:42 PM (IST)

    18 Sep 2025 02:42 PM (IST)

    फ्रान्समध्ये 24 तासांचा ऐतिहासिक संप

    France 24-hour strike : फ्रान्ससारख्या प्रगत देशात लोकशाहीचा आवाज किती ताकदीचा असतो, याचे जिवंत उदाहरण लवकरच जग पाहणार आहे. कारण एका दिवसासाठी संपूर्ण फ्रान्स ठप्प होणार आहे. शाळा, रेल्वे, विमानसेवा बंद पडतील. रस्त्यावर लाखो लोकांचा लोंढा उतरणार आहे. पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे की सुमारे ८ लाख नागरिक एकाचवेळी निदर्शनात सहभागी होतील. हा फक्त संप नाही, तर लोकांच्या असंतोषाचा स्फोट आहे.

  • 18 Sep 2025 02:30 PM (IST)

    18 Sep 2025 02:30 PM (IST)

    जागतिक व्यापारात नवी तणावरेषा! ‘ट्रम्प जगाचे सम्राट नाहीत’

    Silva Slammed Trump : जागतिक राजकारणात कधी कधी एक वाक्य हजारो राजनैतिक चर्चांना जन्म देतं. तसंच घडलं आहे ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केलेल्या थेट टीकेमुळे. “ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असू शकतात, पण जगाचे सम्राट नाहीत” हे वाक्य फक्त एक प्रतिक्रिया नाही, तर आजच्या बदलत्या आंतरराष्ट्रीय व्यापार समीकरणांचं प्रतिबिंब आहे.

  • 18 Sep 2025 02:10 PM (IST)

    18 Sep 2025 02:10 PM (IST)

    त्रयोदशी श्राद्धाच्या दिवशी अद्भूत योगायोग…

    सनातन धर्मामध्ये तिथींना विशेष महत्त्व आहे. त्रयोदशी तिथी ही त्यापैकीच एक आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी क्रवार, 19 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी एक योगायोग घडून येत आहे. कारण या दिवशी मासिक शिवरात्र आणि प्रदोष व्रत हे दोन्ही महादेवांचे व्रत एकाच वेळी पाळले जाणार आहेत. पंचांगानुसार, या दिवशी सूर्य कन्या राशीमध्ये राहील तर चंद्र सकाळी 7.5 वाजेपर्यंत कर्क राशीत असेल. त्यानंतर, तो सिंह राशीत संक्रमण करेल. अभिजितचा मुहूर्त सकाळी 11.50 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12.39 वाजता संपेल. त्रयोदशी श्राद्ध कधी असते आणि त्याचे महत्त्व काय आहे? त्रयोदशीला कोणते दोन दुर्मिळ योगायोग येतात? या दिवशी पूजा कधी करायची जाणून घ्या.

  • 18 Sep 2025 02:04 PM (IST)

    18 Sep 2025 02:04 PM (IST)

    काहीतरी मोठं होणार! Malegaon Bomb ब्लास्टमधील निर्दोष आरोपींना पुन्हा अटक? हायकोर्टाने धाडलेली नोटीस काय?

    Malegaon Bomb Blast: महाराष्ट्रातील मालेगाव शहरातील प्राणघातक बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे विशेष न्यायालय १७ वर्षांनंतर म्हणजेच ३१ जुलै रोजी निकाल दिला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने निकाल देताना सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. मात्र आता या निर्दोष आरोपींची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कारण हायकोर्टाने त्यांना नोटीस पाठवली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे, हे जाणून घेऊयात.

  • 18 Sep 2025 02:02 PM (IST)

    18 Sep 2025 02:02 PM (IST)

    ‘The Bads of Bollywood’च्या प्रीमियरला संपूर्ण बॉलीवूड इंडस्ट्री उपस्थिती!

    आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या डेब्यू शोच्या मुंबई प्रीमियरला काजोल, अजय देवगण, अंबानी कुटुंब, खुशी कपूर, फरहान अख्तर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तसेच आर्यन खानचा 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' आजपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाले आहे. त्याला कलाकारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचदरम्यान आर्यन खानचे बॉलीवूड पदार्पणासाठी अनेकांनी त्याचे कौतुक देखील केले आहे.

  • 18 Sep 2025 01:00 PM (IST)

    18 Sep 2025 01:00 PM (IST)

    नागपूर हादरलं! ११ वर्षीय मुलाची अपहरण करून निर्घृण हत्या

    नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शाळकरी मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या मुलाचे नाव जितू युवराज सोनेकर (वय 11) असे आहे. जितू हा खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होता. शाळेतून सुट्टी झाल्यानंतर आरोपींनी अपहरण करून त्याची हत्या केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

  • 18 Sep 2025 12:50 PM (IST)

    18 Sep 2025 12:50 PM (IST)

    रस्ता न दिल्याच्या वादातून कुख्यात घायवळ टोळीचा गोळीबार

    गाडीला साईड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून पुण्यातील कोथरूड भागात मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी केलेल्या या गोळीबारात ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ हा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 18 Sep 2025 12:42 PM (IST)

    18 Sep 2025 12:42 PM (IST)

    धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

    प्रणित धोंडीराम कांबळे (वय २०, रा. राजीव गांधीनगर टोप) या युवकाविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित फिर्यादी सतरा वर्षीय युवती व आरोपी प्रणित कांबळे टोप येथे राहतात. फिर्यादी मुलीने दिलेल्या माहितीनुसार, युवकाने गेल्या काही महिन्यांपासून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यात ती गर्भवती झाली. तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • 18 Sep 2025 12:25 PM (IST)

    18 Sep 2025 12:25 PM (IST)

    काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळली, राहुल गांधींचा आरोप

    काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेला सुरूवात झाली आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. काही ठिकाणी काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळल्याचं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं.

  • 18 Sep 2025 12:18 PM (IST)

    18 Sep 2025 12:18 PM (IST)

    राहुल गांधींकडे मुद्दाच उरलेला नाही, त्यांनी पक्ष खड्ड्यात नेण्याचं ठरवलंय - अमित साटम

    राहुल गांधींकडे मुद्दाच उरलेला नाही, त्यांनी त्यांचा पक्ष खड्ड्यात नेण्याचं ठरवलं आहे, अशी बोचरी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केली आहे. राहुल गांधीच्या आजच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी ही टीका केली. शिवाय आगामी निवडणुकांमध्येही काँग्रेसचा बँड वाजणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

  • 18 Sep 2025 11:55 AM (IST)

    18 Sep 2025 11:55 AM (IST)

    उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी

    उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी झाली आहे. चमोली जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी यांनी सांगितले की, "बुधवारी रात्री चामोली जिल्ह्यातील नंदनगर घाट परिसरात ढगफुटीमुळे नुकसान झाले. नंदनगरच्या कुंत्री लंगाफली वॉर्डमध्ये सहा घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. सात जण बेपत्ता आहेत, तर दोघांना वाचवण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे." अशी माहिती देण्यात आली आहे.

  • 18 Sep 2025 11:50 AM (IST)

    18 Sep 2025 11:50 AM (IST)

    मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

    गुरुवारी पहाटे पुणे जिल्ह्यातील मुंबई-बेंगळुरू महामार्गावर कंटेनर ट्रकला कारने धडक दिल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि इतर अनेक जण जखमी झाले. महामार्गावर देहू रोडजवळील ईदगाह मैदानाजवळ सकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास चारही विद्यार्थी लोणावळा हिल स्टेशनवरून परतत असताना हा अपघात झाला.

  • 18 Sep 2025 11:45 AM (IST)

    18 Sep 2025 11:45 AM (IST)

    महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील हजारो नावं डिलीट - राहुल गांधी

    महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील हजारो नावं डिलीट करण्यात आली आहे. यामध्ये कॉंग्रेसला पाठिंबा देणारे लोक जास्त आहेत. याबाबत आयोगाने माहिती न दिल्यास वोटचोरांना संरक्षण देतायेत असं मानू, असा आक्रमक पवित्रा राहुल गांधी यांनी केला आहे.

  • 18 Sep 2025 11:39 AM (IST)

    18 Sep 2025 11:39 AM (IST)

    दलित लोकांना लक्ष्य करुन नावे वगळली जातात - राहुल गांधी

    देशामध्ये मतदार यादीमधून मोबाईल नंबरचा वापर करुन नावं वगळली जात आहेत असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यामध्ये दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय लोकांची नावे लक्ष्य करुन वगळली जात आहेत. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार राज्यामध्ये हे प्रकार झाले असल्याचा आरोप केला जात आहे.

  • 18 Sep 2025 11:31 AM (IST)

    18 Sep 2025 11:31 AM (IST)

    खासदार अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त रोहित पवारांची खास पोस्ट

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने आमदार रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाचे निष्ठावान खा. अमोल कोल्हे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 18 Sep 2025 11:29 AM (IST)

    18 Sep 2025 11:29 AM (IST)

    महाराष्ट्रामध्येही वगळ्यात आली मतदारांची नावे

    लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये मतदारांची नावे वगळण्यात आली असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

  • 18 Sep 2025 11:28 AM (IST)

    18 Sep 2025 11:28 AM (IST)

    आयोगाला आम्ही सबळ पुरावे दिले आहेत - राहुल गांधी

    लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे. देशामध्ये मतदारांची नावे कापली जात आहेत. यातील बहुतांश लोक हे कॉंग्रेसला पाठिंबा देणारे लोक आहेत. याबाबत आम्ही आयोगाला सबळ पुरावे दिले आहेत. यावर आयोगाने उत्तर दिले नाही तर आम्ही हे सरकारसाठी काम करत आहेत असं समजू, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

  • 18 Sep 2025 11:00 AM (IST)

    18 Sep 2025 11:00 AM (IST)

    अभिजीत खांडकेकर पुन्हा एकदा प्रियाच्या आठवणीत भावुक, म्हणाला…

    एका मुलाखतीदरम्यान अभिजीत पुन्हा एकदा प्रियासाठी भावुक होताना दिसला आहे. आणि म्हणाला, “आज तिच्याबद्दल असं बोलावं लागेल याची मी कल्पनाही केली नव्हती. गेल्या दीड वर्षात तिला हा आजार झाला, कॉम्प्लिकेशन सुरु झाले. प्रियाचे कुटुंबीय, शंतनु आणि मोजक्या लोकांना याबद्दल माहिती होतं त्यापैकी मीही होतो. आम्ही खूप चांगले मित्र होतो. तिची तब्येत इतकी ढासळत जाईल, एक दिवस अशी बातमी येईल याची कल्पना असूनही आपल्या मनाला ते पटत नसतं. अजूनही विश्वास बसत नाही.”

  • 18 Sep 2025 10:50 AM (IST)

    18 Sep 2025 10:50 AM (IST)

    देसी स्टाईल तवा बर्गर आता घरीच बनवा

    • यासाठी सर्वप्रथम उकडलेले बटाटे, गाजर, कांदा, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, लाल तिखट,
    • गरम मसाला आणि मीठ एकत्र करून मिश्रण तयार करा.
    • तयार मिश्रणाचे समसमान गोळे करून पॅटीज तयार करा.
    • ब्रेडक्रम्समध्ये घोळवून कमी तेलात टव्यावर कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी परता.
    • एका टव्यावर थोडं बटर लावून बर्गर बन गरम करून घ्या.
    • बनच्या खालच्या भागावर मेयोनीज/टोमॅटो सॉस लावा.
    • त्यावर भाजलेली पॅटी, टोमॅटो- काकडीच्या चकत्या आणि चीज स्लाईस ठेवा.
    • आता वरचा बन ठेवून हलकासा दाबा.
    • तयार तवा बर्गर एका प्लेटमध्ये काढा आणि गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह करा.
    • हा घरगुती तवा बर्गर चविष्ट, पौष्टिक आणि बाजारातील बर्गरपेक्षा जास्त सुरक्षित आहे.
  • 18 Sep 2025 10:40 AM (IST)

    18 Sep 2025 10:40 AM (IST)

    नागपूरमध्ये ११ वर्षीय मुलाची अपहरण करून निर्घृण हत्या

    नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शाळकरी मुलाची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या मुलाचे नाव जितू युवराज सोनेकर (वय 11) असे आहे. जितू हा खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होता. शाळेतून सुट्टी झाल्यानंतर आरोपींनी अपहरण करून त्याची हत्या केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

  • 18 Sep 2025 10:30 AM (IST)

    18 Sep 2025 10:30 AM (IST)

    US Fed ने केली व्याजदरात 0.25% टक्क्यांची कपात, शेअर बाजारात उसळी

    युएस फेडरल रिझर्व्हने केलेला कोणताही धोरणात्मक बदल केवळ यूएस अर्थव्यवस्थेपुरता मर्यादित नाही तर जगभरातील वित्तीय बाजारपेठांवर परिणाम करतो. यूएस व्याजदर जगभरातील गुंतवणूकदारांच्या निर्णयांवर परिणाम करतात. जेव्हा युएस व्याजदर कमी होतात तेव्हा परदेशी गुंतवणूकदार उदयोन्मुख बाजारपेठांकडे (जसे की भारत) अधिक आकर्षित होतात कारण तेथे जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीचा भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण जेव्हा अमेरिकेचे दर कमी असतात तेव्हा परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात अधिक गुंतवणूक करतात. यामुळे FII (विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार) चा ओघ वाढू शकतो, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ होण्याची शक्यता असते.

  • 18 Sep 2025 10:20 AM (IST)

    18 Sep 2025 10:20 AM (IST)

    पूजा करतेवेळी घंटी का वाजवली जाते?

    ज्यावेळी घंटा वाजवली जाते त्यावेळी घंटेचा आवाज सर्वत्र घुमतो. या प्रतिध्वनीमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शांत आणि सकारात्मक वातावरण तयार होते. घरातील वातावरण हे नेहमी हलके राहते आणि मन शांत होते. हा आवाज इतका शक्तिशाली असतो की घंटा वाजवण्याच्या काही सेकंदांनीही संपूर्ण दिवसाची ऊर्जा बदलू शकते. जर पूजेदरम्यान मन स्थिर नसेल तर तर घंटेच्या आवाजामुळे आपले मन स्थिर होते. हा आवाज मेंदूला सक्रिय करतो आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो. पूजेच्या सुरुवातीला आणि शेवटी घंटा वाजवणे शुभ मानले जाते. यामुळे प्रार्थना करताना लक्ष केंद्रित होण्यास मदत होते आणि त्याचा प्रभाव अधिक वाढतो.

Web Title: Top marathi news today live breaking news live updates maharashtra politics live news latest news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 08:47 AM

Topics:  

  • Breaking News
  • live updates
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live : भारतात खळबळ, कोलकता भूकंपाने हादरलं! 5.5 रिश्टर स्केलचे ढाकाजवळ धक्के
1

Top Marathi News Today Live : भारतात खळबळ, कोलकता भूकंपाने हादरलं! 5.5 रिश्टर स्केलचे ढाकाजवळ धक्के

Maharashtra Politics : पंढरपूर नगरपरिषदेसाठी दुसऱ्या दिवशी ‘इतक्या’ उमेदवारांनी घेतला अर्ज माघारी
2

Maharashtra Politics : पंढरपूर नगरपरिषदेसाठी दुसऱ्या दिवशी ‘इतक्या’ उमेदवारांनी घेतला अर्ज माघारी

Mumbai: पुण्याची बदनामी काँग्रेसने करु नये, नवनाथ बन यांचा विरोधकांना इशारा
3

Mumbai: पुण्याची बदनामी काँग्रेसने करु नये, नवनाथ बन यांचा विरोधकांना इशारा

Maharashtra Politics: भाजपमध्ये बंड! ’13 सच्चे कार्यकर्ते’ निवडणुकीच्या रिंगणात; राजकारणात भूकंप
4

Maharashtra Politics: भाजपमध्ये बंड! ’13 सच्चे कार्यकर्ते’ निवडणुकीच्या रिंगणात; राजकारणात भूकंप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.