Karan Sonawane Shared Mumbai Indian Team With Insta Reel
आयपीएलच्या १८ व्या सीझनला २२ मार्चपासून दणक्यात सुरुवात झाली आहे. आता आयपीएल म्हटल्यावर अनेकांची आवडती क्रिकेट टीमही ‘मुंबई इंडियन’च असते. ‘मुंबई इंडियन’ या क्रिकेट टीमचे लाखो फॅन फॉलोवर्स आपल्याला पाहायला मिळतील. सध्या ही क्रिकेट टीम आयपीएलमुळे तर कमालीची चर्चेत आहेच, पण त्यासोबतच ह्या टीमचा इन्स्टाग्रामवर ‘काली बिंदी’ गाण्याचा रील सुद्धा तुफान व्हायरल होत आहे. नुकतंच ‘मुंबई इंडियन’ टीमने गायक संजू राठोडच्या ‘काली बिंदी’ गाण्यावर एक धम्माल रील बनवला आहे, जो रील सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण या रीलमध्ये टीमसोबत सोनावणे वहिनीही आहेत. सोनावणे वहिनी म्हणजेच सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम एन्फ्लूएंसर करण सोनावणे…
‘मुंबई इंडियन’ आणि करण सोनावणेच्या इन्स्टाग्रामवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये, सोशल मिडिया एन्फ्लूएंसर करण सोनावणेसोबत संपूर्ण ‘मुंबई इंडियन’ची टीम आणि गायक संजू राठोडही पाहायला मिळत आहे. शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये, सर्वात पहिली झलक सोशल मिडिया एन्फ्लूएंसर करण सोनावणेची पाहायला मिळत आहे. त्याच्यासोबत सुर्यकुमार यादव दिसत आहे. तो सोनावणे वहिनींना, “सोनावणे वहिनी मस्त एक व्हायरल व्हिडिओ करणार का ?” असा प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर सोनावणे वहिनी लाजताना दिसत आहे. आणि त्यानंतर त्या गाण्यावर एकापेक्षा एक जबरदस्त ठुमके मारत गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे.
विराट कोहलीचे अभिनयात पदार्पण? ‘या’ प्रोजेक्टमध्ये दिसणार क्रिकेटर; व्हायरल फोटोमागील सत्य काय?
करण सोनावणेसोबत ‘मुंबई इंडियन’टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्या, त्यासोबत सुर्यकुमार यादव, रेस टॉप्ले, विल जॅक्स, दीपक चहर, रजनगड बावा, बेवन जॉन जेकब, तिलक वर्मा, रॉबिन मिंझ, कॉर्बिन बॉश या क्रिकेटर्सने डान्स केला. त्यानंतर शेवटी रीलमध्ये गाण्याचा गायक संजू राठोडही आलेला दिसत आहे. पण सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. करण सोनावणे हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले की, “Pookie Video Of The Year Goes To… Watch Till End” दरम्यान नेटकऱ्यांकडून व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला जात असून संजू राठोडच्या ‘काली बिंदी’ गाण्याची एकच चर्चा होत आहे. सध्या हे गाणं इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंगवर असल्याचं पाहायला मिळत आहे.