सारांश जैनची भारतीय संघात निवड (फोटो- ians)
15 ऑगस्टपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे. यासाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सारांश जैनचा भारतीय संघात प्रवेश होणे हा प्रवास म्हणावं तितका सोपा किंवा साधा नव्हता. यासाठी त्याचे कष्ट अपार जिद्द यामुळेच त्याला हे यश मिळाले आहे.
सारांश जैनने अनेक वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये अत्यंत शानदार प्रदर्शन केले आहे. आयपीएलमध्ये एकही सामना न खेळता सारांश जैनची निवड भारतीय संघात झाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून त्याने ही संधी प्राप्त केली आहे. सारांश जैन नुकताच भारत अ संघाकडून श्रीलंका अ संघाविरुद्ध खेळला आहे.
IND Vs SL: श्रीलंकेचा धूर निघणार! टेस्ट सिरिजसाठी Team India ची घोषणा; Bumrah लावणार आग तर…
दोन सामन्यांची सिरिज भारत अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्यात खेळवण्यात आली होती. पहिल्या सामन्यात तो फारशी चमक दाखवू शकला नव्हता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने अत्यंत शानदार कामगिरी केली. गोलंदाजी करत त्याने तब्बल 6 विकेट्स पटकावल्या तर फलंदाजीत त्याने 70 रन्सचे योगदान दिले होते. भारताने दूसरा सामना 10 विकेट्सने जिंकून सिरिज बरोबरीत सोडवली होती.
मध्यप्रदेशकडून खेळताना सारांश जैनने रणजी ट्रॉफी, दिलीप ट्रॉफी, इराणी ट्रॉफी आणि इंडिया ए कडून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तो ऑफ स्पिनर गोलंदाजी करतो. तसेच तो फलंदाजी देखील करतो. तो अष्टपैलू खेळाडू असून त्याला भारतीय संघात स्थान दिले गेले आहे.
सारांश जैनचा प्रवास हा संघर्षाचा राहिलेला आहे. 2014 मध्ये मध्यप्रदेशच्या एका क्लबकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असता, त्याच्या कुटुंबाने त्याच्यापासून वडील आजारी असल्याचे लपवले होते. त्याचे क्रिकेटवरील लक्ष हटू नये यासाठी कुटुंबाने असा निर्णय घेतला होता. भारतात परत आल्यावर आपल्या वडिलांना कॅन्सर झाल्याचे त्याला समजले. सारांश जैनने 2025-2026 मध्ये रणजी ट्रॉफीत चांगली कामगिरी केली. त्याने 7 सामन्यांमध्ये 518 रन्स केल्या. तसेच त्याने 30 विकेट्स देखील पटकावल्या होत्या.






