‘इंडोनेशियातील बाली येथे सुरू असलेल्या जी २०’ (G20) परिषदेतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ‘जी २०’ (G20) परिषदेत सहभागी झालेले कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांना कोरोनाची लागण झाली आहे. हुन सेन यांनी अलीकडेच अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेतली होती.
[read_also content=”बापरे! श्रद्धा वालकर प्रकरणी नवी माहिती, क्राईम वेब सिरीज पाहून हत्या केल्याची आरोपीची कबुली https://www.navarashtra.com/maharashtra/new-information-in-shraddha-walker-case-accused-confesses-to-murder-after-watching-crime-web-series-nrps-344946.html”]
कंबोडियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी ‘जी २०’ परिषदेतील सर्व बैठका रद्द केल्या आहेत. या संदर्भात फेसबुक पोस्ट लिहीत त्यांनी माहिती दिली. सोमवारी रात्री त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले असल्याचं ते म्हणाले, इंडोनेशियातील एका डॉक्टरने याबाबत पुष्टी केली आहे की, त्यांना कोविड -19 ची लागण झाली आहे.
[read_also content=”एलोन मस्ककडून कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा सपाटा सुरूच ; क्षणार्धात ट्विटरचे ४४०० कर्मचारी बनले ‘जॉब’लेस https://www.navarashtra.com/world/elon-musk-continues-to-fire-employees-nrab-344662.html”]