Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही, शरद पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान, राहुल गांधी म्हणाले..

सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नाही. सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्या मुद्द्यांवर चर्चा करूयात, असं शरद पवार म्हणाले.

  • By Amrut Sutar
Updated On: Mar 28, 2023 | 11:00 AM
सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही, शरद पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान, राहुल गांधी म्हणाले..
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली- सध्या राज्यासह देशात सावरकारांबाबत राहुल गांधी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन वाद निर्माण झाला आहे. “माफी मागायला माझे नाव सावरकर नाहीय…” असं राहुल गांधीनी (Rahul Gandhi) वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद होत आहे. यावरुन बरेच राजकारण रंगले आहे. काल नवी दिल्लीत विरोधीपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. मालेगाव सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राहुल गांधींना सावरकारांविषयी सांभाळून बोला, असा सल्ला दिल्यानंतर, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत सावरकरांविषयी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टिका केली. तर दिल्लीत शरद पवारांनी देखील राहुल गांधींचे कान टोचले आहेत.

काय म्हणाले शरद पवार?

सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नाही. सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्या मुद्द्यांवर चर्चा करूयात, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या मताला मित्र पक्षातील अनेक खासदारांनी सहमती दर्शवली आहे. काल रात्री राजधानी दिल्लीमध्ये विरोधीपक्षाची बैठक झाली. या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक महत्वाची वक्तव्यं केली आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनीही मी शरद पवारांच्या मताचा मी आदर करतो, असं म्हटल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस सावरकरांच्या मुद्द्यावरुन माफी मागणार का? असं प्रश्न उपस्थित केला जात आहे.

थोबाडीत मारणार का?

मालेगाव सभेत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राहुल गांधींना सावरकारांविषयी सांभाळून बोला, असा सल्ला दिल्यानंतर, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तुम्ही फक्त सल्ला दिला, तुमची भूमिका स्पष्ट का केली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. तुम्ही राहुल गांधींच्या थोबाडीत मारणार का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना विचारला आहे. यानंतर आज माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे गट, भाजपावर टिका केली आहे.

सावरकरांशी भाजपा व RSSचा संबंध काय?
दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, स्वातंत्र्यसंग्रामात भाजपा व आरएसएस कुठे होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे, आम्ही सावरकर जगलो आहोत, जगत आहोत, त्यामुळं भाजप व शिंदे गटाने आम्हाला सावरकारांबद्दल शिकवू नये. तसेच सावरकरांशी भाजपा व आरएसएसचा संबंध काय? असा सवाल संजय राऊतांनी विचारत, भाजपावर टिका केली.

…तर चर्चेतून मार्ग निघेल
काल विरोधीपक्षाची बैठक पार पडली, आम्ही त्या बैठकीला उपस्थित नव्हतो, पण शरद पवारांनी देखील सावरकाराविषयी वादग्रस्त बोलणं टाळले पाहिजे. सावरकर हे स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाचे नेते होते. त्यांचे कार्य मोठे आहे, सावरकरांचा संघाशी काही संबंध नव्हता, असं पवारांनी काँग्रेसला पटवून दिलं आहे. आम्हाला काँग्रेसची भूमिका पटली नाही, म्हणून आम्ही काल बैठकीला गेलो नाही. पण सावरकरांच्या मुद्दावरुन आमची बोलणं राहुल गांधींशी सुरु आहे. चर्चेतून मार्ग निघेल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

Web Title: It is not right to call savarkar an apologist sharad pawar pierced rahul gandhi ears rahul gandhi said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2023 | 10:59 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Amit Shah
  • amit thackeray
  • Ashish Shelar
  • BJP
  • BMC
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • J. P. Nadda
  • jayant patil
  • Maharashtra BJP
  • Mumbai
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Nitesh Rane
  • PM Narendra Modi
  • Prasad Lad
  • Rahul Gandhi
  • raj thackeray
  • Rashmi Thackeray
  • shivsena
  • supriya sule
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

काँग्रेस भूमिकेवर ठाम, बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
1

काँग्रेस भूमिकेवर ठाम, बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

बोगस उपसूचना प्रकरण: विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आक्रमक; आयुक्तांकडे केली मोठी मागणी
2

बोगस उपसूचना प्रकरण: विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आक्रमक; आयुक्तांकडे केली मोठी मागणी

Mumbai Accident: विरारमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची जोरदार धडक; शाळेत जात असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू
3

Mumbai Accident: विरारमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची जोरदार धडक; शाळेत जात असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू

Narendra Modi : “तुम्ही कोणत्याही टीएमसी नेत्याच्या कृपेमुळे येथे नाही,” मतुआ-नामाशुद्र समाजाला पंतप्रधान मोदींचा संदेश
4

Narendra Modi : “तुम्ही कोणत्याही टीएमसी नेत्याच्या कृपेमुळे येथे नाही,” मतुआ-नामाशुद्र समाजाला पंतप्रधान मोदींचा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.