नागपूर (Nagpur). कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी आरोग्य विभाग (The health department) आणि महानगर पालिका विभागाने (the municipal corporation) लसिकरणाची महामोहीम (vaccination campaign) हाती घेतली आहे. दरम्यान नागपुरात शुक्रवारी २८ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले आहे. यामध्ये शहरातील २२ आणि ग्रामीण भागातील ०६ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या शून्य इतकी नोंदविण्यात आली.
[read_also content=”औरंगाबाद/ केंद्र सरकारकडून औरंगाबादच्या ‘माझी स्मार्ट बसला’ प्रथम पुरस्कार; प्रवाश्यांसाठी राष्ट्रीय कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू करण्याचा लवकरच प्रस्ताव https://www.navarashtra.com/latest-news/aurangabad-my-smart-bus-won-first-award-from-the-central-government-proposal-to-introduce-national-common-mobility-card-for-passengers-soon-nrat-147295.html”]
प्राप्त कोरोना अहवालानुसार मंगळवारी नागपूर शहरात प्रशासनाकडून ७९६१ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर कोरोनामुक्त झालेल्या १०६ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.