Maharashtra Breaking News Updates Today:
US Attack on Iran : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेतील तणावाला आता दोन आठवडे उलटून गेले आहेत. मात्र अमेरिका-इराण संघर्ष (US Iran War) काही थांबण्याचे नाव घेईना. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी इराणची कमकुवत नस दाबल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणच्या धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या खर्ग बेटावरील लष्करी तळ उद्ध्वस्त केला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली असून आखाती क्षेत्रात युद्धाचे ढग आणखी गडद झाले आहे. जागतिक तेल पुरवठ्यावरही मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
14 Mar 2026 06:45 PM (IST)
Hingoli Politics: मागील काही वर्षांत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ झाले, अनेक दिग्गज नेते पक्षात दाखल झाले; मात्र त्यांचे राजकीय पुनर्वसन रखडल्याने नाराजीही वाढत होती. आता माजी आमदार रामराव वडकुते यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर ही कोंडी फुटल्याची चर्चा असून हिंगोली जिल्ह्यात पुढील संधी कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपाने आगामी २०२९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर या हिंगोली विधानसभा मतदारसंघ मागील १५ वर्षांपासून भाजपाच्च्या ताब्यात असला तरी वसमत आणि कळमनुरी मतदारसंघांमध्ये भाजपाला अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे या भागात संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
14 Mar 2026 06:40 PM (IST)
Gambhir Surya visists Siddhivinayak temple : 2026 च्या T20 World Cup भारताने आपल्या नावावर केला आणि विजेत्या भारतीय संघाने अहमदाबादमधील हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीचं दर्शन घेतलं. या दर्शनानंतर कॅप्टन सूर्यासह टीम इंडियावरुन बऱ्या प्रतिक्रिया आल्या होत्या. यानंतर बरंच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर आता विजेत्या भारतीय संघाने मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.
14 Mar 2026 06:23 PM (IST)
पाच वेळा विजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ सुरू होण्यापूर्वी कायदेशीर वादात अडकला आहे. सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडने मद्रास हायकोर्टात CSK विरुद्ध कॉपीराइट उल्लंघनाचा खटला दाखल केला आहे. फ्रँचायझीवर जेलर, जेलर २ आणि कुली सारख्या चित्रपटांमधील गाणी, संवाद आणि पार्श्वसंगीत बेकायदेशीरपणे सोशल मीडियावर त्यांच्या कंटेंटचा प्रचार करण्यासाठी वापरल्याचा आरोप आहे.
14 Mar 2026 06:13 PM (IST)
Criss Bigger Threat Than Oil for India : सध्या जागतिक स्थरावर सुरु असलेली युद्धजन्य परिस्थिती आणि हा पश्चिम आशियातील संघर्ष सुरूच राहिला तर भारताला कच्च्या तेलाच्या कमतरतेपेक्षा एका मोठा धोका संभवू शकतो. त्याचे पडसाद सध्या देशभर पाहायला मिळत आहेत. या परिस्थितीत, होर्मुझची सामुद्रधुनी देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक प्रमुख दबाव बिंदू म्हणून उदयास येत आहे, असा इशारा श्रीराम अॅसेट मॅनेजमेंटच्या अहवालात देण्यात आला आहे. “द इराण क्रायसिस: इट्स इम्प्लिकेशन्स फॉर इंडिया अँड मार्केट्स” या शीर्षकाच्या अहवालात त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. भारतासाठी एलएनजी पुरवठ्याला असलेला धोका तेलापेक्षाही गंभीर आहे, कारण देशाकडे गॅस आयातीचे मर्यादित पर्याय आहेत. दरम्यान, कच्चे तेल अजूनही इतर प्रदेशांमधून मिळू शकते.
14 Mar 2026 06:06 PM (IST)
नागपूर : अलिकडे वाघ आणि बिबट्या गावात येण्याचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. नागपूरसारख्या वर्दळीच्या शहरातील बिबट्या घुसला होता. आता वाघ व बिबट्या शिरण्याची समस्या फक्त वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये राहिली नाही. वन्यप्राण्यांचाय हल्ल्यात होणारी जीवितहानी रोखण्यासाठी नागपूर वन विभाग आणि ग्रामीण पोलिसांनी तंत्रज्ञानाचे मोठे पाऊल उचलले आहे.
14 Mar 2026 05:58 PM (IST)
Iran-USA War : मध्य पूर्वेतील वाढत्या तणाव आणि इराणशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, इंधन पुरवठ्याचे संकट वाढत चालले आहे. अनेक ठिकाणी एलपीजी इंधनाचा तुटवडा आणि गॅस सिलिंडर बुकिंगच्या प्रक्रियेत बदल बदल झाल्याच्या बातम्यां प्रसिद्ध होत आहेत. दररोजच्या वापरातील एलपीजी सिंलेंडरच्या बाबतीतील लोकांची चिंता आणखी वाढली आहे. पण हा एलपीजी आपल्या घरापर्यंत कसा आला, त्याचा शोध कोणी आणि कुठे लावला, याबाबत आपल्याला माहिती आहे का, याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
14 Mar 2026 05:55 PM (IST)
सध्या जागतिक स्थरावर सुरु असलेली युद्धजन्य परिस्थिती आणि हा पश्चिम आशियातील संघर्ष सुरूच राहिला तर भारताला कच्च्या तेलाच्या कमतरतेपेक्षा एका मोठा धोका संभवू शकतो. त्याचे पडसाद सध्या देशभर पाहायला मिळत आहेत. या परिस्थितीत, होर्मुझची सामुद्रधुनी देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक प्रमुख दबाव बिंदू म्हणून उदयास येत आहे, असा इशारा श्रीराम अॅसेट मॅनेजमेंटच्या अहवालात देण्यात आला आहे. “द इराण क्रायसिस: इट्स इम्प्लिकेशन्स फॉर इंडिया अँड मार्केट्स” या शीर्षकाच्या अहवालात त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. भारतासाठी एलएनजी पुरवठ्याला असलेला धोका तेलापेक्षाही गंभीर आहे, कारण देशाकडे गॅस आयातीचे मर्यादित पर्याय आहेत. दरम्यान, कच्चे तेल अजूनही इतर प्रदेशांमधून मिळू शकते.
14 Mar 2026 05:54 PM (IST)
West Bengal Politics: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विशाल सभेला संबोधित केले. तसेच तब्बल 18 हजार कोटींच्या विकसकामांचे लोकार्पण अन् उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार तयारी सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे. या वर्षात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.
14 Mar 2026 05:41 PM (IST)
अलिकडे वाघ आणि बिबट्या गावात येण्याचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. नागपूरसारख्या वर्दळीच्या शहरातील बिबट्या घुसला होता. आता वाघ व बिबट्या शिरण्याची समस्या फक्त वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये राहिली नाही. वन्यप्राण्यांचाय हल्ल्यात होणारी जीवितहानी रोखण्यासाठी नागपूर वन विभाग आणि ग्रामीण पोलिसांनी तंत्रज्ञानाचे मोठे पाऊल उचलले आहे.
14 Mar 2026 05:24 PM (IST)
पाच वेळा विजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ सुरू होण्यापूर्वी कायदेशीर वादात अडकला आहे. सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडने मद्रास हायकोर्टात CSK विरुद्ध कॉपीराइट उल्लंघनाचा खटला दाखल केला आहे. फ्रँचायझीवर जेलर, जेलर २ आणि कुली सारख्या चित्रपटांमधील गाणी, संवाद आणि पार्श्वसंगीत बेकायदेशीरपणे सोशल मीडियावर त्यांच्या कंटेंटचा प्रचार करण्यासाठी वापरल्याचा आरोप आहे.
14 Mar 2026 05:06 PM (IST)
Revolt Motors ने आपल्या इलेक्ट्रिक बाईक्सवर ग्राहकांना तब्बल 25000 रुपयांपर्यंतचा फायदा देण्याची घोषणा केली आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे. सरकारच्या PM E-Drive Scheme अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा सध्याचा टप्पा 31 मार्च 2026 रोजी संपणार असल्याने, ग्राहकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी कंपनीने ही खास योजना जाहीर केली आहे.
14 Mar 2026 04:50 PM (IST)
वसई विरार शहर महानगर पालिकेकडून क्रिकेटपटू आयुष म्हात्रे यांचा सत्कार नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे यांचा शुक्रवारी महापालिका मुख्यालयात विशेष सत्कार करण्यात आला. आयुष म्हात्रे यांनी क्रिकेट विश्वचषक जिंकून देशासोबत वसई-विरार शहराचेही नाव उज्वल केले आहे.
14 Mar 2026 04:45 PM (IST)
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाने वॉर्ड क्रमांक १२ आणि १३ मधील डॉक्टरांकडे मेडिकल डिस्चार्जची कागदपत्रे देण्याची मागणी केली. मात्र रुग्णालयाच्या नियमानुसार वैद्यकीय कागदपत्रे थेट बाहेर देणे शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्यास नकार दिला.यामुळे संतप्त झालेल्या रुग्णाने आणि त्याच्या एका नातेवाईकाने डॉक्टरांच्या अंगावर धावून जात सलाईन स्टॅन्डने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डॉक्टरांना शिवीगाळही करण्यात आली.या प्रकारामुळे रुग्णालयात सेवा देणारे इंटर्न डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी सुरक्षित आहेत का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
14 Mar 2026 04:40 PM (IST)
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून कमर्शियल गॅस वरती बंदी घालण्यात आली आहे. कुठल्याच प्रकारे कमर्शियल गॅसची विक्री केली जात नसल्यामुळे सध्या हॉटेल व्यवसायिक व मेस साठी गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे. शहरात सध्या कमर्शियल गॅसच्या टंचाईमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक हॉटेल्स, मेस आणि वस्तीगृहांवर याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. विशेषतः शिवाजीनगर भागातील मुलींच्या वस्तीगृहांमध्ये गॅस संपल्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील एका महिला वस्तीगृहात गॅस उपलब्ध नसल्याने चुली पेटवून मुलींसाठी जेवण तयार करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
14 Mar 2026 04:35 PM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा आवश्यक साठा असल्याने तुटवडा भासणार नाही..त्यामुळे ग्राहकांना आता घरपोच सिलेंडर मिळणार असून एजन्सीवरून थेट सिलेंडर वितरण करू नये अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यातं..शिवाय व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा देखील लवकरच सुरळीत होईल अशी महत्त्वाची माहिती कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नवराष्ठ न्यूजशी बोलताना दिली आहे..घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा मुबलक आहे..त्यामुळे नागरिकांनी कुठेही घाबरून जावू नये..असं आवाहन देखील जिल्हा पुरवठा अधिकारी चव्हाण यांनी केलं आहे..युद्ध सुरू होण्याआधी जितका गॅसचा पुरवठा होत होता तितकाच पुरवठा आता देखील होत आहे..एकाच वेळी जास्त लोकांनी बुकिंग केल्यामुळे सिस्टीमवर परिणाम झाला.. मात्र पुरवठा कुठेही कमी झालेला नाही..त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
14 Mar 2026 04:30 PM (IST)
गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाणेकरांना एक भव्य सांस्कृतिक सोहळा अनुभवायला मिळणार आहे. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने १९ मार्च रोजी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
14 Mar 2026 04:25 PM (IST)
वसई विरार शहरात सध्या नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत पाणीपट्टी आणि घरपट्टी वाढवण्याच्या हालचाली सुरु आहेत. संभाव्य कर वाढीला भारतीय जनता पक्षाने तीव्र विरोध दर्शवला असून अगोदर पाणीटंचाईचा प्रश्न सोडवावा अशी मागणी भाजपने केली आहे.
14 Mar 2026 04:20 PM (IST)
अहिल्यानगर शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेत तक्रार नोंदवली. गॅस बुकिंगमधील तांत्रिक अडचणी, एजन्सीबाहेरील गर्दी आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद असल्याने विद्यार्थ्यांची वसतिगृहे व एमआयडीसीमधील उद्योगांनाही फटका बसत असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणात जबाबदार अधिकारी व कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
14 Mar 2026 04:15 PM (IST)
अमेरिका इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडर पुरवठ्यावर निर्बंध आल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे काही ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. अहिल्यानगरमधील सावेडी परिसरात जय आनंद खानावळ चालकाने व्यवसाय टिकवण्यासाठी विटांची चूल तयार करून त्यावर स्वयंपाक सुरू केला आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची अडचण होऊ नये म्हणून हा उपाय करण्यात आला आहे.
14 Mar 2026 04:10 PM (IST)
तमाशापुढे नवी आव्हाने उभी राहिली आहेत. तमाशा कलावंतांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग सांस्कृतिक कार्य संचालक महाराष्ट्र राज्य ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन नवी मुंबईतील सानपाडा येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभ आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडला
14 Mar 2026 04:05 PM (IST)
जुना पालघर परिसरात जैन मंदिराजवळ मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्वप्निल पालांडे, कुणाल दुबळा आणि अफरोज शेख अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांच्या भीतीने पळत असताना तरुण रेल्वे रुळांवर गेले आणि त्याच वेळी मालगाडीची धडक बसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून प्रकरणाचा पुढील तपास जीआरपी पोलिसांकडून सुरू आहे.
14 Mar 2026 02:50 PM (IST)
अलीकडेच, जसवीर कौरने एका पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की दोन वर्षे काम करूनही, तिला अचानक “सीआयडी” शो सोडण्यास सांगण्यात आले. तिच्या या विधानाने सोशल मीडियावर खळबळ उडाली. आता, तिने तिच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.
पॉडकास्टमध्ये, जसवीरने स्पष्ट केले की कामाचा ताण खूप जास्त होता, परंतु कधीकधी टीम त्याच्या सुट्टीच्या विनंतीला सहमती देईल. एके दिवशी, सर्वकाही बदलले. ती म्हणाली, “अचानक, ऑफिसने मला सांगितले की मला शो सोडावा लागेल.”
14 Mar 2026 02:45 PM (IST)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली आहे. नमन पुरस्कार २०२६ मध्ये माजी भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड, भारतीय कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल, महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि माजी भारतीय कर्णधार मिताली राज यांचा समावेश आहे. बीसीसीआय प्रतिष्ठित ‘नमन पुरस्कार २०२६’ मध्ये भारतीय क्रिकेटच्या सर्व पैलूंमध्ये उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करेल. हा समारंभ रविवार, १५ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केला जाईल. हा वार्षिक समारंभ आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि वयोगटातील क्रिकेटमध्ये अपवादात्मक कामगिरी आणि दीर्घकालीन योगदानांना मान्यता देतो आणि ज्यांच्या कार्याने देशातील खेळाच्या वाढीला आणि उंचीला आकार दिला आहे अशा व्यक्तींचा सन्मान करतो.
14 Mar 2026 02:40 PM (IST)
राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत अखेर मोठी हालचाल सुरू झाली आहे. तब्बल २१ वर्षांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली असून त्यासाठी नवीन नियम आणि पात्रता निकष जाहीर करण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणा) नियम, २०२६’ या नावाने ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमांच्या आधारेच राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
14 Mar 2026 02:35 PM (IST)
भारत आणि जगाचे लक्ष सध्या मध्यपूर्वेकडे असतानाच, आपल्या शेजारील देशांमध्ये युद्धाची भीषण ठिणगी पडली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावाद (Afghanistan-Pakistan Conflict) आता केवळ ड्युरंड रेषेपुरता मर्यादित राहिला नसून, तो थेट राजधानीपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास अफगाणिस्तानच्या हवाई दलाने (Taliban Air Force) इस्लामाबादच्या फैजाबाद भागातील मोक्याच्या ‘हमजा’ लष्करी तळाला लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे संपूर्ण इस्लामाबाद स्फोटांच्या आवाजाने हादरून गेले असून, पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.
14 Mar 2026 02:30 PM (IST)
मुंबई पुण्यापासून जवळ असलेलं हे हवेचं ठिकाण कोणतं तर माथेरान. शाळकरी मुलांना सुट्य़ा पडल्या की, लगेचच माथेरानची पिकनिक काढली जाते. मात्र हेच माथेरान आता वणव्याच्या आगीत धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे. वनअधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी पाड्यातील गावकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
14 Mar 2026 02:25 PM (IST)
भारतासह जगभरातील सर्वच देशभरात हार्ट अटॅक हा अतिशय गंभीर आजार मानला जातो. कारण हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर कोणत्याही क्षणी मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. जीवनशैलीत सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी गोष्टींच्या परिणामामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. दरवर्षी सुमारे 8,05,000 हार्ट अटॅक येतो, तर पहिल्यांदा हार्ट अटॅक येणाऱ्या लोकांची संख्या सुमारे 6,05,000 आहे आणि 2,00,000 लोकांना पुन्हा एकदा हार्ट अटॅक आल्याचे दिसून आले आहे.
14 Mar 2026 02:20 PM (IST)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाच्या बाणेर रॅम्पबाबत समाजमाध्यमांवर पसरलेल्या शंकांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या उड्डाणपुलाच्या संरचनेत कोणतीही तांत्रिक त्रुटी नसून तो वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाने दिला आहे. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी सर्व आवश्यक तांत्रिक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून हा पूल तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित व सक्षम असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
14 Mar 2026 02:15 PM (IST)
लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबाबत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने त्यांना सोडण्याचा निर्णय घेतला असून सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांची अटक तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात मंगळवारी (10 मार्च 2026) सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले की ते या आठवड्यात तुरुंगात असलेल्या हवामान कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या भाषणांचे व्हिडिओ पाहतील आणि त्यांच्या पत्नी गीतांजली जे. अँग्मो यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) त्यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर १७ मार्च रोजी अंतिम सुनावणी घेतील.
14 Mar 2026 02:10 PM (IST)
मध्यपूर्वेतील रणसंग्राम (US-Israel Iran War) आता एका अशा वळणावर आला आहे, जिथे केवळ क्षेपणास्त्रेच नाही तर समुद्राच्या तळाशी दडलेली ‘अदृश्य’ शक्ती जगाला आव्हान देत आहे. इराणने नुकताच आपल्या “मिसाइल सिटी” (Missile City) चा एक धक्कादायक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हे कोणतेही सामान्य शहर नसून जमिनीखाली खोदलेले लांबच लांब बोगदे आहेत, जे आधुनिक नौदल ड्रोन, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि समुद्री सुरुंगांनी काठोकाठ भरलेले आहेत. या व्हिडिओने अमेरिका आणि इस्रायलच्या संरक्षण यंत्रणांना विचार करायला भाग पाडले आहे.
14 Mar 2026 02:05 PM (IST)
स्टार प्लस नेहमीच वैविध्यपूर्ण कलाकृतींसह प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतो. नुकताच त्यांनी आपल्या लोकप्रिय शो Tara चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आणला आणि रसिक प्रेक्षकांनी त्याचे भरभरून कौतुक केले.
14 Mar 2026 01:55 PM (IST)
पुण्यामध्ये हडपसरला सुरू असणाऱ्या रॅम्बो सर्कस मधील कलाकारांना पुरक उत्पन्न मिळत नसल्याने ते कलाकार लहान लहान वस्तू विकून सर्कसमधे दुखापत झालेल्या कलाकारांच्या दवाखान्याचा खर्च करतात. त्याचप्रमाणे सर्कस मधील एका मुलीला कर्करोग झाल्याने त्यासाठीही ह्या कलाकारांनी होईल त्या मार्गाने आर्थिक मदत केली आहे. परिवारासारखे हे कलाकार एकमेकांसाठी झटत असतात.
14 Mar 2026 01:45 PM (IST)
जागतिक युद्धाचा भटका उडाल्यानंतर या युद्धाचा परिणाम इतरत्र सगळीकडे दिसून आला. सगळ्याच किमती वाढल्या तश्या कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. अलिकडेच ते प्रति बॅरल 120 डॉलर्सच्या जवळपास पोहोचलं आहे आणि अजूनही 100 डॉलर्सच्या वर व्यापार करत आहे. इराण आणि अमेरिका/इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक थांबली आहे. या मार्गावरुन जगातील सुमारे 20% तेल वाहतूक केली जाते. पुरवठ्यात घट झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. यामुळे जग उद्ध्वस्त झालं आहे, मात्र या सगळ्यात एक देश मात्र चांगला नफा कमवतो आहे तो देश म्हणजे रशिया. रशिया आपलं तेल प्रीमियम दराने विकून दररोज 150 दशलक्ष डॉलर्स अतिरिक्त कमाई करत आहे.
14 Mar 2026 01:35 PM (IST)
जगभरात सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील वाढत्या लष्करी संघर्षामुळे तणावाचे वातावरण आहे. या परिस्थितीत उत्तर कोरियाने जगाचे आणखी टेन्शन वाढवले आहे. उत्तर कोरियाने शनिवारी (१४ मार्च २०२६) सकाळी एक संशयास्पद बॅलेस्टिक प्रोजेक्टाइलचे यशस्वी प्रक्षेपणे केले आहे. यामुळे जपान(Japan), दक्षिण कोरिया (South Korea) आणि अमेरिकेसह संपूर्ण आशिया-प्रशांत महासागरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
14 Mar 2026 01:25 PM (IST)
मध्यपूर्वेतील रणसंग्राम (US-Israel Iran War) आता एका अशा वळणावर आला आहे, जिथे केवळ क्षेपणास्त्रेच नाही तर समुद्राच्या तळाशी दडलेली ‘अदृश्य’ शक्ती जगाला आव्हान देत आहे. इराणने नुकताच आपल्या “मिसाइल सिटी” (Missile City) चा एक धक्कादायक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हे कोणतेही सामान्य शहर नसून जमिनीखाली खोदलेले लांबच लांब बोगदे आहेत, जे आधुनिक नौदल ड्रोन, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि समुद्री सुरुंगांनी काठोकाठ भरलेले आहेत. या व्हिडिओने अमेरिका आणि इस्रायलच्या संरक्षण यंत्रणांना विचार करायला भाग पाडले आहे.
14 Mar 2026 01:20 PM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री, प्रवास आणि आनंदाचा उत्सव साजरा करणारा सखे गं साजणी हा चित्रपट येत्या ३ एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याचे शीर्षक गीत अनोख्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले. पुण्यातील Elpro City Square Mall येथे फ्लॅश मॉबच्या माध्यमातून या गाण्याचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. अचानक सुरू झालेल्या या सादरीकरणाने मॉलमधील वातावरण क्षणातच रंगतदार झाले. उपस्थित प्रेक्षकांनीही या उत्साहात सामील होत टाळ्यांचा कडकडाट आणि नृत्याच्या स्टेप्ससह कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
14 Mar 2026 01:15 PM (IST)
लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबाबत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने त्यांना सोडण्याचा निर्णय घेतला असून सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांची अटक तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात मंगळवारी (10 मार्च 2026) सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले की ते या आठवड्यात तुरुंगात असलेल्या हवामान कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या भाषणांचे व्हिडिओ पाहतील आणि त्यांच्या पत्नी गीतांजली जे. अँग्मो यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) त्यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर १७ मार्च रोजी अंतिम सुनावणी घेतील.
14 Mar 2026 01:10 PM (IST)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाच्या बाणेर रॅम्पबाबत समाजमाध्यमांवर पसरलेल्या शंकांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या उड्डाणपुलाच्या संरचनेत कोणतीही तांत्रिक त्रुटी नसून तो वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाने दिला आहे. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी सर्व आवश्यक तांत्रिक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून हा पूल तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित व सक्षम असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
14 Mar 2026 01:05 PM (IST)
आयपीएल २०२६ सुरू होण्यास दोन आठवडे शिल्लक असताना, कोलकाता नाईट रायडर्सने झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानी त्यांच्या संघात सामील झाल्याची घोषणा केली. पीएसएल (Pakistan Super League) सोडून आयपीएलमध्ये सामील होण्याच्या मुझारबानीच्या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज झाले असण्याची शक्यता आहे. त्यांनी आता वेगवान गोलंदाजावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
14 Mar 2026 01:00 PM (IST)
इराकची राजधानी बगदाद (US-Israel Iran War) आज सकाळी भीषण स्फोटांच्या आवाजाने हादरली. जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘ग्रीन झोन’मध्ये असलेल्या अमेरिकन दूतावासावर एकामागून एक क्षेपणास्त्रे आणि आत्मघातकी ड्रोनचा वर्षाव करण्यात आला. या हल्ल्याने केवळ अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे काढले नाहीत, तर संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी अधिक गडद केली आहे. स्फोटानंतर दूतावासाच्या आवारातून निघणाऱ्या काळ्या धुराच्या लोटांनी संपूर्ण शहराला दहशतीच्या छायेत ढकलले आहे.
14 Mar 2026 12:55 PM (IST)
गुजरात वेगाने शहरी राज्य बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पुढील काही वर्षांत, शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या खेड्यांपेक्षा जास्त होईल. शहरी लोकसंख्या खेड्यांपेक्षा जास्त होण्याची ही पहिलीच वेळ असेल. सरकारच्या सामाजिक-आर्थिक आढावा २०२५-२६ नुसार, २०२७ पर्यंत गुजरातची लोकसंख्या अंदाजे ७४.८ दशलक्षांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये अंदाजे ३७.९ दशलक्ष शहरांमध्ये आणि ३६.९ दशलक्ष खेड्यांमध्ये राहतात. याचा अर्थ राज्याची शहरी लोकसंख्या ५०% पेक्षा जास्त होईल. या बदलामुळे विकसित राज्यांमध्ये गुजरातचे स्थान आणखी मजबूत होत असले तरी, बिहारसारखी राज्ये अजूनही शहरीकरण आणि उत्पन्नाच्या बाबतीत खूप मागे आहेत.
14 Mar 2026 12:50 PM (IST)
सुप्रीम कोर्टाने नोकरी करणाऱ्या महिला आणि विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान हक्काची सुटी मिळावी असा आदेश देण्यास नकार दिला आहे. याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने म्हटले की, अशा धोरणामुळे नकळत लैंगिक रूढ़िवादी विचारांना खतपाणी मिळू शकते आणि यामुळे महिलांसाठी रोजगाराच्या संधी कमी होऊ शकतात. कोर्टाने ही गोष्ट सरकारच्या धोरणांशी जोडली गेली आहे, असे सांगत याचिकेवर थेट आदेश देणे टाळले. तसेच अशा प्रकारच्या याचिकांमुळे महिला सक्षम नाहीत, मासिक पाळीमुळे त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचे होत आहे, असे वातावरण निर्माण होईल, ज्यामध्ये त्यांचेच नुकसान आहे. असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले. याचिकाकर्त्यांनी त्यांची मागणी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या समोर ठेवली आहे.
14 Mar 2026 12:45 PM (IST)
मुंबईमधील गोरेगावयेथे मासे खाल्ल्याच्या संशयातून दोन मित्रांनी अफसर (35) याची दगडाने ठेचून हत्या केली. आरोपी हरियाणाला पळून गेले होते; पोलिसांनी त्यांना अटक केली.
14 Mar 2026 12:40 PM (IST)
भारताच्या अलिकडच्या टी-२० विश्वचषक विजयानंतर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने जसप्रीत बुमराहच्या त्याच्या अपवादात्मक गोलंदाजीचे कौतुक केले आहे. बुमराहला एक अपवादात्मक खेळाडू म्हणून संबोधत क्लार्क म्हणाला की तो सध्या जगातील सर्वात घातक गोलंदाज आहे. मोठ्या सामन्यांमध्ये दबाव सहन करण्याची आणि संघाला विजयाकडे नेण्याची त्याची क्षमता ही बुमराहची सर्वात मोठी ताकद आहे असे क्लार्क मानतो. तो म्हणाला, ” जसप्रीत बुमराह चेंडूने पूर्णपणे लबाड आणि हुशार आहे. तो एक विचित्र आहे.”
14 Mar 2026 12:35 PM (IST)
नाट्य निर्माते अशोक शिगवण यांनी अलिकडेच एका मुलाखतीत अंडरवर्ल्ड भाष्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चात आहे. मुंबई आणि गॅंगस्टर यांचं नात फार जुनं आहे. गुन्हेगारी विश्वात जाऊन आलेल्या अशोक शिगवण यांनी त्या काळात काय काय घडलं होते याबद्दल सांगितले आहे. अशोक शिगवण यांच्यावर 12 गुन्हे दाखल होते जे आता नाहीत. एक काळ असा होता की त्यांनी दाऊदच्या बिहिणीचा बॉडी गार्ड म्हणून काम केलं आहे. आता अशोक शिगवण हे नाव मनोरंजन विश्वातलं मोठं नाव आहे. त्यांनी अनेक नाटकांची निर्मिती केली आहे.
14 Mar 2026 12:30 PM (IST)
भारतीय टेक कंपनी लावाने शुक्रवारी भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Lava Bold 2 5G या नावाने भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीने गेल्यावर्षी एप्रिल 2025 मध्ये Lava Bold 5G स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनचा सक्सेसर म्हणून आता कंपनी Lava Bold 2 5G घेऊन आली आहे. हा स्मार्टफोन देशातील ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. Lava Bold 2 5G स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध आहे. याशिवाय हा स्मार्टफोन एकाच स्टोरेज आणि रॅम व्हेरिअंटमध्ये खरेदी करू शकता.
14 Mar 2026 12:25 PM (IST)
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनांचा दुबार लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर कारवाईचे संकेत मिळाले आहेत. राज्यभरातील १६७६ लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील २९७ लाभार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
14 Mar 2026 12:20 PM (IST)
शेअर बाजार सहसा शनिवार आणि रविवारी बंद असतो, परंतु आज, १४ मार्च रोजी, बीएसई आणि एनएसई खुले राहतील. इक्विटी, चलन आणि कमोडिटीजसह सर्व प्रमुख विभागांमध्ये ट्रेडिंग होईल. हे सामान्य ट्रेडिंग सत्र नसून एक मॉक ट्रेडिंग सत्र असेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे मार्केट रिहर्सलसारखे आहे जिथे रिअल मनी गुंतलेली नसते, परंतु सिस्टम अगदी रिअल मार्केट ट्रेडिंगसारखेच कार्य करेल.
14 Mar 2026 12:15 PM (IST)
मध्यपूर्वेतील रणसंग्राम आता एका अशा वळणावर आला आहे जिथे पूर्ण युद्धाची ठिणगी पडली आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या खळबळजनक वृत्तानुसार, इराणने सौदी अरेबियातील अत्यंत महत्त्वाच्या ‘प्रिन्स सुलतान’ हवाई तळावर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला आहे. या हल्ल्यात अमेरिकन हवाई दलाच्या ५ इंधन भरणारी विमाने गंभीर जखमी झाली आहेत. जरी या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात असले, तरी अमेरिकेच्या लष्करी ताकदीवर झालेला हा मोठा प्रहार मानला जात आहे.
14 Mar 2026 12:10 PM (IST)
खोपोली खोपोली नगरपरिषदेत बांधकाम परवानगी घेताना जे शुल्क भरावे लागते ते शुल्क न भरता भरल्याच्या खोट्या पावत्या प्रशासनाला सादर करून खोपोलीमधील चार विकासकांनी नगरपरिषदेची फसवणूक केल्याची घटना घडल्याची माहिती खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दिली आहे.






