Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
23 Jan 2026 10:52 AM (IST)
टी-२० विश्वचषक २०२६ भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. भारत आणि श्रीलंका ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ साठी सर्व संघ आता त्यांच्या तयारीला अंतिम स्वरूप देत आहेत. या मेगा स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होतील. दक्षिण आफ्रिकेनेही विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला होता, परंतु आता संघाने आपल्या संघात दोन मोठे बदल जाहीर केले आहेत.
एडन मार्कराम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, मार्को जॅन्सन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स.
23 Jan 2026 10:46 AM (IST)
जागतिक राजकारणात आणि आरोग्य क्षेत्रात आज एक अत्यंत मोठा भूकंप झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेने (America) अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) ७८ वर्षांचे जुने नाते तोडले आहे. अमेरिकेच्या आरोग्य आणि परराष्ट्र विभागाने काल गुरुवारी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून स्पष्ट केले की, अमेरिका आता या जागतिक आरोग्य संस्थेचा सदस्य नाही. या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी म्हणून जिनिव्हा येथील WHO मुख्यालयाबाहेर डौलाने फडकणारा अमेरिकेचा ‘स्टार्स अँड स्ट्राइप्स’ ध्वज अखेर उतरवण्यात आला आहे.
23 Jan 2026 10:39 AM (IST)
| संघ | सामना | विजय | पराभव | निकाल लागला नाही | गुण | रन रेट |
|---|---|---|---|---|---|---|
| आरसीबी | 5 | 5 | 0 | 0 | 10 | +1.882 |
| गुजरात जायंट्स | 6 | 3 | 3 | 0 | 6 | -0.341 |
| मुंबई इंडियन्स | 6 | 2 | 4 | 0 | 4 | +0.483 |
| दिल्ली कॅपिटल्स | 5 | 2 | 3 | 0 | 4 | -0.586 |
| यूपी वाॅरियर्स | 6 | 2 | 4 | 0 | 4 | -0.769 |
23 Jan 2026 10:31 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये OB52 अपडेट लाईव्ह झाल्यानंतर अनेक ईव्हेंट सुरू झाले आहेत. या अपडेटनंतर गेममध्ये अनेक गोष्टी बदलल्या आहेत. नवीन लोकेशन, कॅरेक्टर्स आणि मॅप गेममध्ये जोडण्यात आले आहेत. एवढंच नाही तर नव्या अपडेटनंतर गेममध्ये एकामागून एक असे अनेक ईव्हेंट लाइव्ह झाले आहे. या सर्व ईव्हेंटमध्ये प्लेयर्सना एक्सक्लूसिव गेमिंग आइटम रिवॉर्ड्स स्वरूपात जिंकण्याची संधी मिळणार आहे.
23 Jan 2026 10:23 AM (IST)
ऑस्कर २०२६ मध्ये बऱ्याच काळानंतर एक विक्रम मोडला गेला आहे. २०२६ च्या ऑस्करसाठी अंतिम नामांकने काल जाहीर करण्यात आली. भारताचे लक्ष “होमबाउंड” वर होते, परंतु हा चित्रपट २०२६ च्या ऑस्कर नामांकनांमधून वगळण्यात आला आहे. दरम्यान, आणखी एका चित्रपटाने १६ नामांकने मिळवून इतिहास रचला आहे, ज्याने “टायटॅनिक” आणि “ला ला लँड” सारख्या हॉलिवूड चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. हा चित्रपट दुसरा तिसरा कोणी नसून रायन कूगलर दिग्दर्शित “सिनर्स” आहे. चित्रपट रसिकांची मने जिंकल्यानंतर, त्याने ऑस्कर नामांकनांमध्येही वर्चस्व गाजवले आहे.
23 Jan 2026 10:06 AM (IST)
भारतीय राजकारणाच्या इतिहासात असे अनेक नेते झाले ज्यांनी निवडणुका जिंकल्या, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पद भूषवले. मात्र, २३ जानेवारी १९२६ रोजी जन्मलेला एक असा ‘वाघ’ होता, ज्याने आयुष्यात कधीही कोणतीही निवडणूक लढवली नाही, साधे आमदारकीचे पदही भूषवले नाही, तरीही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सत्तेची सूत्रे त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानातून हलत असत. ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ! आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अशा काही पैलूंचा आढावा घेऊया, ज्यांनी त्यांना खऱ्या अर्थाने ‘किंगमेकर’ बनवले.
23 Jan 2026 09:29 AM (IST)
मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. त्यानंतर गुरुवारीच महापौरपदासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. यात राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंसोबत होता. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मनसेच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
23 Jan 2026 09:29 AM (IST)
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष 'मुंबईचा महापौर कोण?' याकडे लागले आहे. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीत मुंबई महापालिकेचे महापौरपद 'खुला प्रवर्ग महिला' गटासाठी राखीव झाले आहे. या आरक्षणामुळे राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी मिळाली असून, सत्ताधारी भाजपमध्ये महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या दिग्गज महिला नगरसेविकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
23 Jan 2026 09:24 AM (IST)
जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या (Buldhana Lonar Lake) पाण्याच्या पातळीत गेल्या सप्टेंबर महिन्यापासून झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, या वाढलेल्या पाण्यामुळे लोणार सरोवरात (Lonar Sarovar) अकराव्या व बाराव्या शतकातील अनेक प्राचीन मंदिरे ही पाण्यात बुडाली आहेत. वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे लोणार सरोवराची जैवविविधता ही धोक्यात आली आहे. मात्र यावर केंद्र आणि राज्य सरकारचा कुठलाही विभाग दखल घेत नसल्याने आता लोणारवासियांनी चक्क 'वर्ल्ड हेरिटेज सेंटर' आणि 'युनेस्को' ला पत्र लिहलं आहे. सोबतच याबाबत हस्तक्षेप करून तात्काळ लोणार सरोवर वाचवावं, अशी विनंती केली आहे.
23 Jan 2026 09:13 AM (IST)
बदलापूर: बदलापूर शहरात पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका नामांकित शाळेच्या स्कूल व्हॅनमध्ये अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नेमकी घटना काय?
बदलापूर पश्चिमेकडील एका खासगी शाळेत ही चिमुकली शिक्षण घेत आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ती दुपारी १२:३० वाजेपर्यंत घरी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न परतल्याने चिंतेत असलेल्या आईने व्हॅन चालकाला फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण दीड तासाने मुलगी घरी परतली, परंतु ती प्रचंड घाबरलेली होती. आईने विश्वासात घेऊन विचारले असता, व्हॅन चालकाने आपल्या गुप्तांगाला स्पर्श केल्याचे तिने सांगितले.
23 Jan 2026 09:01 AM (IST)
नागपूर: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील आगामी टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ नागपुरात दाखल झाला आहे. बुधवारी होणाऱ्या या महत्त्वाच्या लढतीपूर्वी भारतीय क्रिकेटपटूंनी सरावातून थोडा विरंगुळा शोधत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवला. सोमवारी सूर्यकुमार यादव, ईशान किशन, संजू सॅमसन, रिंकू सिंग आणि रवी बिश्नोई यांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध 'पेंच व्याघ्र प्रकल्पा'ला भेट देऊन जंगल सफारीचा आनंद लुटला.
या क्रिकेटपटूंनी पेंच व्याघ्र प्रकल्पातील 'तुरिया गेट'मधून जंगलात प्रवेश केला. यावेळी त्यांना व्याघ्र दर्शन झाले नसले तरी, एका चपळ बिबट्याचे दर्शन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. वाघोबांना पाहण्याची इच्छा असली तरी बिबट्याला इतक्या जवळून पाहण्याचा अनुभव खेळाडूंसाठी तितकाच थरारक ठरला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेसाठी दौऱ्यावर असताना महाराष्ट्रात मात्र राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
दावोसमध्ये पत्रकारांनी कल्याण-डोंबिवलीतील या संभाव्य युतीबाबत विचारले असता, देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. “सध्या मी दावोसमधील गुंतवणुकीवर आणि जागतिक करारांवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतात परतल्यानंतर मुंबईत जे करार झाले आहेत आणि जी राजकीय परिस्थिती आहे, त्यासंदर्भात सविस्तर उत्तरे देईन,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही या विषयावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे.






