Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर

Maharashtra Marathi news Updates-

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 21, 2026 | 12:45 PM
LIVE
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • 21 Jan 2026 12:45 PM (IST)

    21 Jan 2026 12:45 PM (IST)

    सुरक्षित कर्जवाढीच्या दिशेने सूर्यदयो बँकेचे पाऊल; महाराष्ट्रातून गोल्ड लोन सेवा सु

    सूर्यदयो स्मॉल फायनान्स बँक (SSFB) भारतातील एक अग्रगण्य न्यू-एज असलेल्या डिजिटल बँकेने सुरक्षित कर्जवाढीच्या व्यापक धोरणाचा भाग म्हणून 'गोल्ड लोन' विभागात प्रवेश केल्याची घोषणा केली आहे. यामुळे पारदर्शक कर्ज सुविधा मिळेल

  • 21 Jan 2026 12:40 PM (IST)

    21 Jan 2026 12:40 PM (IST)

    अर्थसंकल्प 2026 गृहनिर्माण मागणी आणि शहरी विकास टिकवण्यासाठी विकासकांकडून धोरणात्मक पाठिंब्याची मागणी

    केंद्रीय अर्थसंकल्प 2026 पूर्वी अपेक्षा वाढत असताना, महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ञ गृहनिर्माण परवडणारे ठेवण्यासाठी, अंतिम वापरकर्त्यांचा विश्वास टिकवण्यासाठी आणि शहरी तसेच पायाभूत सुविधा आधारित विकासाला गती देण्यासाठी लक्ष केंद्रीत धोरणात्मक उपाययोजनांची मागणी करत आहेत.

  • 21 Jan 2026 12:35 PM (IST)

    21 Jan 2026 12:35 PM (IST)

    बांगलादेश-भारत वादात नवा ट्विस्ट, पाकिस्तानची उडी; ICC वर जगाची नजर, काय घेणार निर्णय?

    बांगलादेशने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या ठिकाणी बदल करण्याची मागणी केली होती, ज्यावर आयसीसी आपल्या पूर्वीच्या भूमिकेवर ठाम आहे की ठिकाणी कोणताही बदल केला जाणार नाही.

  • 21 Jan 2026 12:30 PM (IST)

    21 Jan 2026 12:30 PM (IST)

    वडिलांच्या निधनानंतर १५ दिवसांतच २१ वर्षीय मुलाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

    सिडकोतील २१ वर्षीय शुभम व्यापारी याने खांडे मळा परिसरातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वडिलांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या १५ दिवसांत ही घटना घडली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे

  • 21 Jan 2026 12:25 PM (IST)

    21 Jan 2026 12:25 PM (IST)

    जिल्हा परिषदेसाठीही पक्षप्रवेशाचा ट्रेंड सुरू ! शिरुरचे माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

    पुणे महापालिका पाठोपाठ आता जिल्हा परीषदेच्या निमित्ताने पक्षप्रवेश सुरु झाले आहे. शिरुरच्या माजी आमदारांसह त्यांच्या कुटुंबियांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

  • 21 Jan 2026 12:20 PM (IST)

    21 Jan 2026 12:20 PM (IST)

    पूर्णत्वाकडे; भारताची अर्थकारणात मोठी झेप, जागतिक अर्थव्यवस्थेत 25% वाटा अन् निर्यातीत वाढ

    भारत आणि युरोपियन युनियन 'मदर ऑफ ऑल डील्स' च्या जवळ आहेत. या ऐतिहासिक करारामुळे 2 अब्ज लोकांची बाजारपेठ निर्माण होईल आणि जागतिक जीडीपीच्या जवळपास 25 % प्रतिनिधित्व करेल.

  • 21 Jan 2026 12:15 PM (IST)

    21 Jan 2026 12:15 PM (IST)

    ‘जयकुमार गोरे हे संधीसाधू, त्यांना आमिष दाखवलं गेलं म्हणून ते…’; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

    ‘जयकुमार गोरे काय बोलतात, त्याकडे मी लक्ष देत नाही. मी काँग्रेस कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं होतं. ते स्वतः काँग्रेसचे होते. कदाचित त्यामुळे त्यांनी ते पत्र वाचलं असेल. पण ते संधीसाधू आहेत. त्यांना आमिष दाखवण्यात आलं, म्हणून ते भाजपमध्ये गेले’, असे शिंदे म्हणाल्या.

  • 21 Jan 2026 12:10 PM (IST)

    21 Jan 2026 12:10 PM (IST)

    पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 25 कोटींचे अमली पदार्थ पकडले

    शिरूर तालुक्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, तबल २५ कोटींच्या जवळपास साडे दहा किलो मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. धक्कादायक म्हणजे या ड्रग्ज प्रकरणात अहिल्यानगर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याला देखील पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे. आरोपींच्या संपर्कात असल्यावरून त्याला ताब्यात घेतले आहे.

  • 21 Jan 2026 12:05 PM (IST)

    21 Jan 2026 12:05 PM (IST)

    भारतावर 500% टॅरिफ लागणार नाही! Trumpच्या मंत्र्यांचा मोठा खुलासा

    जागतिक राजकारणात सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ वॉर’ची (Tariff War) मोठी चर्चा आहे. रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करणाऱ्या देशांना ५००% टॅरिफचा इशारा दिल्यानंतर भारतामध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट (Scott Bessent) यांनी यावर अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. बेसेंट यांच्या मते, ५००% कराचे हे ‘अस्त्र’ भारतासाठी नसून रशियाचा सर्वात मोठा भागीदार असलेल्या चीनसाठी आहे.

  • 21 Jan 2026 12:00 PM (IST)

    21 Jan 2026 12:00 PM (IST)

    ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का

    स्मार्टफोन बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. कारण लोकप्रिय आणि आघाडीचा स्मार्टफोन ब्रँड OnePlus बाबत सध्या अनेक अपडेट्स समोर येत आहेत. OnePlus कंपनी लवकरच बंद होणार आहे आणि कंपनी स्मार्टफोन तयार करणं देखील थांबवणार आहे, अशा अनेक अपडेट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे स्मार्टफोन यूजर्सना मोठा धक्का बसला आहे. OnePlus कंपनी खरंच बंद होणार का, अशी चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. आयफोनला टक्कर देण्यासाठी आणि प्रिमियम स्मार्टफोन तयार करण्यासाठी OnePlus ओळखली जाते.

  • 21 Jan 2026 11:50 AM (IST)

    21 Jan 2026 11:50 AM (IST)

    नोबेल पुरस्कारासाठी वेडे झाले ट्रम्प! १, २ नव्हे थेट ८ पुरस्काराची केली मागणी

    अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा नोबेल पुरस्कारावरुन वादग्रस्त विधान केले आहे. ट्रम्प यांनी त्यांना आठ वेळा नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे असे म्हटले आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा नॉर्वेवर निशाणा साधत नोबेल न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कार (Nobel Prize) विजेत्या मारिया कोरिना माचाडो यांनी पुरस्कार त्यांना दिल्याने त्यांचे कौतुक केले आहे.

  • 21 Jan 2026 11:40 AM (IST)

    21 Jan 2026 11:40 AM (IST)

    ‘रुबाब’च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रदर्शित; तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक

    मराठी सिनेसृष्टीत सातत्याने वेगळ्या धाटणीचे, काळाशी सुसंगत प्रयोग सादर करणारे झी स्टुडिओज पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक डॅशिंग, स्टायलिश आणि मनाला भिडणारी लव्हस्टोरी घेऊन येत आहेत. या बहुप्रतीक्षित ‘रुबाब’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्याच क्षणापासून ट्रेलरने तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे.

  • 21 Jan 2026 11:30 AM (IST)

    21 Jan 2026 11:30 AM (IST)

    सावकारी जाचाने व्यापाऱ्याची आत्महत्या; 42 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

     छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सावकारी जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवला. तो व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी सात सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • 21 Jan 2026 11:20 AM (IST)

    21 Jan 2026 11:20 AM (IST)

    दुसऱ्या आठवड्यात ‘द राजा साब’ बॉक्स ऑफिसवर घसरला, कमाईत मोठी घट

    साऊथ सुपरस्टार प्रभासच्या “द राजा साब” चित्रपटाच्या चाहत्यांना आणि निर्मात्यांना खूप आशा होत्या, परंतु आता चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीत मोठी घट झाली आहे. रिलीजच्या १२ व्या दिवसापर्यंत चित्रपटाची कमाई लक्षणीयरीत्या कमी झाली होती. कोटींच्या कमाईवरून आता चित्रपट फक्त लाखांवर आला आहे. ही घसरण निर्मात्यांसाठी चिंतेचे कारण आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालांनुसार, “द राजा साब” ने त्याच्या १२ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी बॉक्स ऑफिसवर खूपच कमी कमाई केली. चित्रपटाने १२ व्या दिवशी भारतातील सर्व भाषांमध्ये फक्त ७.३ दशलक्ष कमाई केली. एखाद्या चित्रपटाची कमाई १ कोटीच्या खाली येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

  • 21 Jan 2026 11:00 AM (IST)

    21 Jan 2026 11:00 AM (IST)

    Oppo A6 5G लाँच, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी

    Oppo A6 5G स्मार्टफोन 4GB रॅम+128GB स्टोरेज, 6GB रॅम+128GB स्टोरेज आणि 6GB रॅम+256GB स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Oppo A6 5G स्मार्टफोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेजवाल्या बेस व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये, 6GB रॅम+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये आणि टॉप-ऑफ-द-लाइन 6GB रॅम+256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये आहे. कंपनी निवडक बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1 हजार रुपयांचे इंस्टंट कॅशबॅक आणि 3 महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील देत आहे. हा फोन Oppo इंडिया ऑनलाइन स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. Oppo A6 5G भारतात सफायर ब्लू, आइस व्हाइट आणि सकुरा पिंक कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)

  • 21 Jan 2026 10:50 AM (IST)

    21 Jan 2026 10:50 AM (IST)

    Zakir Khan ने कॉमेडीपासून घेतला मोठा ब्रेक

    प्रसिद्ध विनोदी कलाकार झाकीर खान सध्या त्याच्या “पापा यार” या कॉमेडी स्पेशल शोमुळे चर्चेत आहे. अलिकडेच त्याने हैदराबादमध्ये त्याचा नवा कार्यक्रम सादर केला. शो दरम्यान झाकीर खान याने त्याच्या चाहत्यांना एक मोठी घोषणा करून त्यांना आश्चर्यचकित केले. खरं तर, झाकीर खान याने चालू शो दरम्यान विनोदातून ब्रेक घेण्याची घोषणा केली. तो काही वर्षांसाठी मोठा ब्रेक घेत आहे. अभिनेत्याने त्याच्या घोषणेमागील कारण देखील स्पष्ट केले. झाकीर खान काय म्हणाला ते जाणून घेऊया.

  • 21 Jan 2026 10:40 AM (IST)

    21 Jan 2026 10:40 AM (IST)

    शिवसेना-राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाची आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

    शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज अंतिम सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी पार पडणारआहे. सलग दोन दिवस युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश यावर निकाल देणार आहेत. त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

  • 21 Jan 2026 10:30 AM (IST)

    21 Jan 2026 10:30 AM (IST)

    पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा, VIDEO VIRAL

    पुणे शहरात १९ ते २० जानेवारी २०२६ दरम्यान आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तब्बल ३५ देशांतील १७१ हून अधिक आंतरराष्ट्रीय सायकलपट्टूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेचे पहिल्या टप्प्याचे आयोजन गुडलक ते सभांजी चौक या दरम्यान करण्यात आले होते. तर दुसऱ्या टप्प्यात हिंजेवाडी येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान हिंजेवाडील सायकलिंगमध्ये एका देशा सायकलपट्टूने लोकांचे लक्ष वेधले आहे. हा सायकलपट्टू २०-२४ वर्षाचा नव्हे तर ७० वर्षाचा तरुण आहे.

  • 21 Jan 2026 10:15 AM (IST)

    21 Jan 2026 10:15 AM (IST)

    रशिया, भारत आणि चीन एकत्र येऊन ट्रम्पच्या दादागिरीला देणार उत्तर

    जागतिक राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणांतर्गत जगातील अनेक देशांना व्यापार आणि शुल्काच्या मुद्द्यावरून धमकावण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे रशियाने या ‘दादागिरी’ला उत्तर देण्यासाठी आपला जुना आणि शक्तिशाली पत्ता बाहेर काढला आहे. रशियाचे अनुभवी परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी त्यांच्या वार्षिक पत्रकार परिषदेत ‘आरआयसी’ (Russia-India-China – RIC) त्रिपक्षीय संवाद पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

  • 21 Jan 2026 10:05 AM (IST)

    21 Jan 2026 10:05 AM (IST)

    अंतराळातील ‘वंडर वुमन’ निवृत्त

    भारतीय वंशाची ‘स्पेस क्वीन’ आणि जगातील सर्वात धाडसी अंतराळवीरांपैकी एक असलेल्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी २७ वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर नासामधून (NASA) निवृत्ती घेतली आहे. नासाने मंगळवारी रात्री अधिकृत घोषणा केली की, सुनीता विल्यम्स यांची निवृत्ती २७ डिसेंबर २०२५ पासून लागू झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका ऐतिहासिक आणि आव्हानात्मक मोहिमेनंतर त्यांनी अंतराळ गणवेश (Space Suit) उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 21 Jan 2026 10:00 AM (IST)

    21 Jan 2026 10:00 AM (IST)

    Bigg Boss Marathi 6: ”आम्ही ‘लिव्ह इन’मध्ये राहतो…”, राधा पाटीलचा बॉयफ्रेंडबद्दल खुलासा

    Bigg Boss Marathi 6 मधील राधा पाटीलने मैत्रिण अनुश्रीसोबत तिच्या बॉयफ्रेंडबाबत बोलताना काही खुलासे केले आहेत.  तिच्या बॉयफ्रेंडचे नेमकं नाव काय आहे हे प्रेक्षकांना समजलेलं नाही. नावाचा उल्लेख टेलिकास्ट करताना म्यूट करण्यात आला आहे.

    राधा पाटील गप्पा मारताना म्हणाली,” आम्ही 2 बीएचके मध्ये राहतो, आमचा बेडरूम वेगळा आहे. बाकी मुलींसाठी रूम वेगळी आहे.आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो. त्याचा स्वभाव असा आहे ना मला जर कोण काही बोललं तर, तो कोणालाच ठेवणार नाही. त्याला कोणतेही व्यसन नाही. तीन वर्षात तो स्वत:च्या हाताने कधी जेवला नाही. माझ्याच हाताने जेवतो. त्यामुळे मला राहून राहून वाटतंय.. मी बिग बॉसच्या घरात आल्यावर त्याचं काय होत असेल? कसं होत असेल? मुलींची अशी एक इच्छा असते, देसी बॉय पाहिजे. अगदी तसाच आहे तो.”

  • 21 Jan 2026 09:57 AM (IST)

    21 Jan 2026 09:57 AM (IST)

    Gadchiroli Accident: दीना नदी पुलावर चारचाकी कोसळून भीषण अपघात

    गडचिरोली: गडचिरोली येथून भीषण अपघाताची एक घटना समोर आली आहे. अंत्यविधी आटोपून घरी जात असताना चारचाकी वाहन नदीत कोसळून भीषण अपघात झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील खमनचेरू-बोरी दरम्यान असलेल्या दीना नदी पुलावर घडली.

  • 21 Jan 2026 09:30 AM (IST)

    21 Jan 2026 09:30 AM (IST)

    इगतपुरीत शिक्षकाकडून ९ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपी शिक्षक अटकेत

    विद्यार्थ्यांचे भविष्य, सुरक्षितता आणि संस्कार घडवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर असते, त्या शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे ५५ वर्षीय शिक्षकाने खाऊचे आमिष दाखवून ९ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समोर येताच परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 21 Jan 2026 09:17 AM (IST)

    21 Jan 2026 09:17 AM (IST)

    India vs New Zealand 1st T20 : पहिल्या टी-20 साठी टीम इंडियाची संभाव्य Playing XI जाहीर

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 2-1 असा पराभव केला. विशेष म्हणजे, 38 वर्षांच्या इतिहासात न्यूझीलंडने प्रथमच भारतात येऊन एकदिवसीय मालिकेत टीम इंडियावर मात केली आहे.

    एकदिवसीय मालिकेनंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज नागपूर येथे रंगणार असून संध्याकाळी 7 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होणार आहे.

    ही टी-20 मालिका आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यापूर्वीच सूर्यकुमार यादव यांनी संघाच्या फलंदाजी क्रमाबाबत मोठा खुलासा केला आहे.

  • 21 Jan 2026 09:14 AM (IST)

    21 Jan 2026 09:14 AM (IST)

    लाडकी बहीण’चा हफ्ता थांबला आहे का, मग ही बातमी वाचाच...

    मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले आहे. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना अनुदानाचा हफ्ता अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे महिलांची निराशा झाली आहे. आता यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. वाचा सविस्तर-

  • 21 Jan 2026 09:12 AM (IST)

    21 Jan 2026 09:12 AM (IST)

    नागपुरात भारत–न्यूझीलंड टी-20 सामन्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल 

    नागपूर येथे आज होणाऱ्या  भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 सामनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले आहेत. सामन्याच्या काळात वर्धा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता आज, 21 जानेवारी रोजी, मॅचदरम्यान वर्धा मार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

    तसेच, पोलिसांकडून मैदान परिसरात वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली असून स्टेडियमकडे वाहन ये-जा करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग आखून देण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.

  • 21 Jan 2026 09:11 AM (IST)

    21 Jan 2026 09:11 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत महापौरपदासाठी नगरसेवकांची फोडाफोडी

    कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महापौरपद आपल्याकडे राहावे, यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या सत्तासंघर्षामुळे शहरात नाट्यमय आणि चक्रावून टाकणाऱ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.

    गेल्या दोन दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गट आणि मनसेचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण ११ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, मंगळवारी कोकण भवन येथे गट नोंदणीच्या वेळी ठाकरे गटाचे केवळ सात नगरसेवक उपस्थित राहिले.

Maharashtra to World Breaking News:  

Stock Market Today: टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स आणि भारती एअरटेलसह आज या स्टॉक्सवर असणार गुंतवणूकदारांचे लक्ष

India Share Market Update:  भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज बुधवारी सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,३०४ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ४५ अंकांनी जास्त होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भारतीय शेअर बाजाराची सुरुवात लाल रंगात होत आहे.

 

Web Title: Maharashtra breaking news live updates marathi maharashtra politics sports crime national international war news updates in marathi maharashtra zilla parishad election 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • Local Body Elections in Maharashtra
  • Maharashtra Breakig News
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी
1

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी

‘जयकुमार गोरे हे संधीसाधू, त्यांना आमिष दाखवलं गेलं म्हणून ते…’; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल
2

‘जयकुमार गोरे हे संधीसाधू, त्यांना आमिष दाखवलं गेलं म्हणून ते…’; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’वर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; सर्वांचे लागले निकालाकडे लक्ष
3

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’वर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी; सर्वांचे लागले निकालाकडे लक्ष

BMC Mayoral Suspense: आरक्षणाच्या अनिश्चिततेमुळे मुंबईच्या महापौर पदाचा सस्पेन्स कायम
4

BMC Mayoral Suspense: आरक्षणाच्या अनिश्चिततेमुळे मुंबईच्या महापौर पदाचा सस्पेन्स कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.