Maharashtra Breaking News Updates Today: पुण्यातील नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा फोन
Maharashtra News Marathi: पुण्यामधील नसरापूर येथील बाल अत्याचाराच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, हीच मागणी आता संपूर्ण महाराष्ट्रातून केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या वडिलांना फोन केल्याची माहिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन पीडित मुलीच्या वडिलांना दिलं आहे.
04 May 2026 04:55 PM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून इंधन तुटवडा निर्माण झाला आहे. कणकवलीसह कुडाळ शहरात असलेल्या सर्वच पेट्रोलपंपांवर पेट्रोल-डिझेल मिळत नसल्याचे दिसून येतेय. इंधन मिळत नसल्याने वाहनचालकांची धावपळ होत आहे. हा इंधन साठा तांत्रिक कारणामुळे संपला की पुरवठ्यात काही अडथळा निर्माण झाला आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र, हा तुटवडा लवकर दूर न झाल्यास नागरिकांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
04 May 2026 04:50 PM (IST)
भिवंडी तालुक्यातील सायगाव आतकोली गावातून एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. येथे एका आंब्याच्या झाडावर चक्क सीताफळ उगवलेले दिसत आहे. हा अनोखा प्रकार पाहून स्थानिक नागरिक चक्रावून गेले असून परिसरात याची मोठी चर्चा सुरू आहे.या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काहीजण याला निसर्गाचा चमत्कार मानत आहेत, तर काहीजण यामागील वैज्ञानिक कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. संबंधित झाड पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून हा प्रकार सध्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे.तज्ज्ञांच्या मते, अशा घटना कधी कधी कलम (grafting) प्रक्रियेमुळे घडू शकतात, मात्र याबाबत अधिक तपासाची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
04 May 2026 04:45 PM (IST)
दापोली तालुक्यातील निवेदिता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील भोर मधील नरसापूर परिसरात बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी अटक असलेल्या नराधमाला फाशी द्या अशी प्रमुख लेखी मागणी गृहमंत्री तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करण्यात आली आहे*. .
सोमवार दिनांक ४ मे रोजी सदर बाबतचे निवेदन दापोली तहसीलदार यांचेकडे दापोलीकरांनी बहुसख्येने उपस्थित राहून सादर करण्यात आले आहे*.या निवेदनानुसार पुणे जिल्ह्यातील भोर मधील नसरापूर परिसरात बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.आणि त्याला फाशीची शिक्षा होणे बाबत मागणी करण्यात आली आहे.
04 May 2026 04:35 PM (IST)
मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भाईंदर पूर्वेकडील भाजप कार्यालयाच्या पाठीमागील रामदेव पार्क परिसरात मोकळ्या जागेवर उभारलेल्या अनधिकृत झोपड्यांना शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती असून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच मीरा-भाईंदर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी स्थानिकांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. आग विझविण्याचे काम काही तास सुरू होते. सुदैवाने जीवितहानी टळल्याची माहिती समोर येत असली, तरी काहींना किरकोळ दुखापती झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत परिसर बंदोबस्तात ठेवला.
04 May 2026 04:30 PM (IST)
कल्याण शहरातील काळा तलावाच्या काठावर मृत माशांचा खच तरंगताना पाहायला मिळाला . माशांच्या मृत्यूचा नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाढत्या उष्णतेचे झळ या माशांना बसले असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . दररोज सकाळी या तलावातील माशांना खाद्य देण्यासाठी शेकडो नागरिक येत असतात . मृत माशांचा हा खच पाहून या नागरिकांनी हळहळ व्यक्त केली .
04 May 2026 04:25 PM (IST)
नवी मुंबईच्या महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲग्रीकल्चर असोसिएशन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्यातील बारामती आणि राहुल पोटनिवडणूक आणि पादुचेरी, आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये भाजपने मिळविलेल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना, नरेंद्र मोदींनी केलेल्या कामाचा करिश्मा दिसून आला.पश्चिम बंगाल सारखे राज्य जिंकणे म्हणजे जनतेने दिलेले प्रेम आणि टाकलेला विश्वास हेच या निकालातून दिसून येते,तर बारामती आणि राहुरी मध्ये लागलेले निकाल अपेक्षितच असल्याचे गणेश नाईक यांनी म्हटले.
04 May 2026 04:20 PM (IST)
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच अक्षय कर्डिले यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उत्साही कार्यकर्त्यांनी कर्डिले यांना खांद्यावर उचलून घेत मतदान केंद्राबाहेर काढले. गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आवाजात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
04 May 2026 04:15 PM (IST)
बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० मताधिक्याने विजय होऊन त्यांनी देशातील पहिल्या क्रमांकाचे रेकॉर्ड मोडून विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. बारामती विधानसभा मतदार संघाच्या या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवार यांना देशात पहिल्या क्रमांकाचे निवडून आणण्याचे आवाहन केले होते. अखेर बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना देशात विक्रमी मताधिक्याने निवडून देऊन विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित करून दिला.
04 May 2026 04:10 PM (IST)
पुण्यातील नसरापुर घटनेमुळं संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे..या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात आज इंडिया आघाडी आक्रमक झालीये.कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
04 May 2026 04:05 PM (IST)
सिंधुदुर्गात आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने आंबा किमती घसरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात पर्यटक, मुंबईकर कोकणवासीय सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून यामुळे आंबा विक्री स्टॉल्सवर मोठी गर्दी दिसून येतेय. हापूस, पायरी आंबा मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. सध्या हापूस ४०० ते ६०० रु. डझन (आकारानुसार) तर पायरी ३०० ते ४०० रु. डझन दर आहे.
04 May 2026 04:02 PM (IST)
उरणच्या केगाव समुद्र किनारी असणाऱ्या ओशन पर्ल या रिसॉर्टवर रविवारी रात्री छापा टाकला. पोलिसांना या रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला होता. मोरा सागरी पोलीस ठाणे आणि उरण पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईमध्ये फक्त दोन ग्राम गांजा हस्तगत करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या किनाऱ्यावर सर्रास सईआरझेड कायद्याच उल्लंघन करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येतोय.
04 May 2026 02:00 PM (IST)
जेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि बँकिंग प्रणालीवर चर्चा होते. तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) उल्लेख नेहमीच प्रथम होतो. पण तुम्हाला माहिती आहे का ? आरबीआयचे पहिले गव्हर्नर हे भारतीय नव्हे तर ऑस्ट्रेलियन बँकर होते. चला तर मग जाणून घेऊया आरबीआयबद्दलची सविस्तर माहिती..
04 May 2026 01:55 PM (IST)
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन पुन्हा एकदा त्यांच्या नव्या सेलसह ग्राहकांना चकित करण्यासाठी सज्ज झाले आहे. येत्या काहीच दिवसांत अॅमेझॉनवर ग्रेट समर सेल 2026 सुरु होणार आहे. या सेलची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली असून कंपनीने सेलची तारीख देखील जाहीर केली आहे. येत्या 8 मे पासून अॅमेझॉन ग्रेट समर सेल 2026 सुरु होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील करोडो ग्राहकांना सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप, फॅशन आणि होम अप्लायंसेजच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट आणि अनेक ऑफर्स मिळणार आहेत.
04 May 2026 01:45 PM (IST)
घोडबंदर येथील जे. पी. इन्फ्रा मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या अवजड वाहनाने एका दुचाकीस्वाराला ठोकर दिली. ही ठोकर इतकी भयानक होती की, या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे या तरुणाचा त्याच्या राहत्या घरासमोरच अपघात झाला. अंश सुजित बागल (17) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो घोडबंदर येथील अपना घर संकुलाचा रहिवासी होता.रविवारी रात्रीच्या सुमारास तो दुचाकीवरून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला होता. दरम्यान, संकुलाबाहेरील रस्त्यावर गाडी वळवत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिमेंट काँक्रीट वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.
04 May 2026 01:30 PM (IST)
सध्याच्या काळात जागतिक राजकारणात आणि विशेषतः आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार अत्यंत संवेदनशील बनला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) ही जगातील कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाची मानली जाते, परंतु तेथे सुरू असलेल्या युद्धांमुळे आणि अमेरिकेच्या कडक निर्बंधांमुळे अनेक जहाजे अडचणीत आली आहेत. या सागरी मार्गावरून होणारी तेल वाहतूक ठप्प झाल्यासारखी असली, तरी काही टँकर आणि मालवाहू जहाजे अजूनही गुप्तपणे या नाकेबंदीला चकमा देऊन मार्ग काढत आहेत. यासाठी ते पारंपारिक मार्गांऐवजी अत्यंत चाणाक्ष आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, ज्याला ‘डार्क शिपिंग’ (Dark Shipping) म्हटले जाते.
04 May 2026 01:28 PM (IST)
पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांनी थट्टानचावडी विधानसभा जागा जिंकली आहे. पुदुचेरीमध्ये एनडीए आघाडी लक्षणीय आघाडीवर असून, या विजयामुळे रंगस्वामी चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा आहे.
04 May 2026 01:25 PM (IST)
मध्यपूर्वेतील तणाव आता अत्यंत टोकाला येऊन पोहोचला आहे. इराणने अमेरिकेवर पुन्हा शाब्दिक स्ट्राईक सुरु केली आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे. इराणने यावेळी सोशल मीडिया नाही, तर थेट इराणच्या चौकातच ट्रम्प यांची खिल्ली उडवणारा बिलबोर्ड लावला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
04 May 2026 01:15 PM (IST)
एप्रिलमध्ये फोक्सवॅगन टायगुन, टेस्ला मॉडेल वाय एल आणि मर्सिडीज-बेंझ सीएलए यांसारख्या अनेक प्रमुख गाड्या लॉन्च झाल्या. यावर्षी मे महिन्यातही भारतीय बाजारपेठेत अनेक नवीन गाड्या लॉन्च होणार आहेत. या नव्या गाड्यांमध्ये आधुनिक फीचर्स, प्रगत तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीवर भर दिसून येतो, ज्यामुळे ग्राहकांना अधिक चांगले आणि पर्यावरणपूरक पर्याय मिळणार आहेत मे महिन्यात कोणत्या नवीन गाड्या लॉन्च होत आहे त्यांची यादी जाणून घेऊया
04 May 2026 01:10 PM (IST)
तमिळ सुपरस्टार थलपथी विजय तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतही आपले नशीब आजमावत आहेत. विजय जवळपास ३६ वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय असून त्यांनी सातत्याने एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, त्यांच्या सभा आणि रोड शोंना प्रचंड गर्दी होत होती. मात्र, आता निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच, त्यांच्या एका चाहत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. आपल्या नायकाचा पक्ष, टीव्हीके (तमिळनाडू वेटी कळघम), निवडणूक हरेल अशी भीती त्या चाहत्याला वाटत होती. सुरुवातीच्या मतमोजणीचे कल विजयच्या टीव्हीके पक्षाच्या मोठ्या विजयाचे संकेत देत आहेत.
04 May 2026 01:05 PM (IST)
आपण नेहमीच रस्त्यावरून धावणारी हजारो वाहने पाहतो. या सर्व वाहनांवर नंबर प्लेट असणे अत्यंत आवश्यक असते. १९८८ च्या मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicles Act), भारतात कोणतीही गाडी चालवण्यासाठी तिची आरटीओ (RTO) मध्ये नोंदणी असणे आणि वाहनावर नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. जर कोणत्याही सामान्य नागरिकाच्या गाडीला नंबर प्लेट नसेल, तर वाहतूक पोलिसांकडून मोठा दंड आकारला जातो आणि वाहन जप्तही केले जाऊ शकते. मात्र, देशात अशी काही विशेष वाहने आहेत, ज्यांना या नियमातून कायदेशीर सूट देण्यात आली आहे. या वाहनांना रस्त्यावर फिरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण, कधी तुम्ही विचार केला आहे का की, या वाहनांचे मालक कोण आहेत आणि त्यांना ही सूट का दिली जाते? आजच्या या सविस्तर बातमीमध्ये आपण याविषयी सखोल माहिती जाणून घेणार आहोत.
04 May 2026 01:02 PM (IST)
अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी ८० हजारांची लाच मागणाऱ्या लोहगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले आहे. लोहगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. मनोज मधुकर बरुटे (वय ३८, रा. गंगा सोसायटी, कळस, आळंदी रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी बरुटे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
04 May 2026 12:48 PM (IST)
कोंढवा भागात दारू पिताना झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मनीषकुमार महादेव पासवान (वय २२, रा. पंचशीलनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महादेव अर्जुन कांबळे (वय ३५, रा. श्री स्वामी समर्थनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) याला अटक केली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक शिवराज खराडे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
04 May 2026 12:36 PM (IST)
नवीन कात्रज बोगद्याजवळ कंटेनरवर कार आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात कारमधील दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कंटेनर चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रघुनाथ मारुती घारे (वय ५५, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. अपघातात घारे यांचे नातेवाईक संजय चाळके, नात गाथा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
04 May 2026 12:25 PM (IST)
मावळ तालुक्यातील थुगाव परिसरात पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ३) दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पर्यटकांच्या निष्काळजीपणावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मृत तरुणांची नावे प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव आणि आयान शेख (सर्व राहणार पुणे) अशी आहेत. हे तिघे मित्र फिरण्यासाठी मावळमधील थुगाव परिसरात आले होते. पवना नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरल्यावर पाण्याची खोली व प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने एक जण बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी उडी घेतलेल्या इतर दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने तेही पाण्यात ओढले गेले. काही क्षणातच तिघेही पाण्याखाली गेले आणि त्यांचा मृत्यू झाला.
04 May 2026 12:12 PM (IST)
बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने सुमारे ५८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, मतमोजणीच्या सुरुवातीलाच सुनेत्रा पवार यांनी विरोधकांना मागे टाकत मोठी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीअखेर सुनेत्रा पवार २६,७७३ मतांनी आघाडीवर आहेत. या आघाडीमुळे बारामतीत विरोधकांचे आव्हान सध्यातरी कमकुवत झाल्याचे दिसत आहे.
04 May 2026 12:00 PM (IST)
जेव्हा आपण डायनासोरच्या युगाचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर टी-रेक्स (T-Rex) किंवा समुद्रातील महाकाय मोसासौर (Mosasaur) येतात. परंतु, नुकत्याच समोर आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या वैज्ञानिक संशोधनाने या सर्व समजुतींना आव्हान दिले आहे. जर्नल ‘सायन्स’ (Science) मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, सुमारे १० कोटी वर्षांपूर्वी (क्रिटेशियस कालखंडात) महासागरांवर केवळ माशांचे किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांचे राज्य नव्हते, तर त्या काळात ६२ फूट (१९ मीटर) लांब असा ‘क्रॅकेन’ (Kraken) सारखा महाकाय ऑक्टोपस देखील समुद्राचा खरा राजा होता. वाचा सविस्तर
04 May 2026 11:55 AM (IST)
एका इराणी सुपरटँकरने अमेरिकन नौदला चकवा दिला आहे. हा टँकर इंडोनेशियातील लोम्बोक अमेरिकेच्या नजरेआड यशस्वीपणे इंडोनेशियातील लोम्बोक येथे दाखल झाला आहे. Derya नावाच्या महाकाय तेल वाहू टँकर असे याचे नाव आहे. हे टँकर भारताला १८.८ लाख दशलक्ष बँरल्सचा पुरवठा करणार होता. परंतु यामध्ये अपयश आल्याने जहाजाला परतावे लागले. या जहाजाने आपला मार्ग बदलला असून दक्षिणेच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणी जहाजांना परतावे लागत आहे.
Twenty-four hours have passed since a NITC VLCC supertanker entered the Lombok Strait in Indonesia with Iranian crude oil. Right now, a second such tanker named DERYA (9569700) is doing the same. She attempted to deliver 1.88 million barrels to India in mid-April during the… pic.twitter.com/cNe3PDjfvv
— TankerTrackers.com, Inc. (@TankerTrackers) May 4, 2026
04 May 2026 11:50 AM (IST)
आंतरराष्ट्रीय सागरी संघटना(IMO) ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या समुद्रात अंदाजे २००० जहाजे अडकून पडली आहेत. जवळपास २०,००० नाविक समुद्रात अडकले आहेत. या जहाजांमध्ये तेल, वायू, मोठी मालवाहू, पर्यटक क्रूझचा समावेश आहे. यामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. जहाजांवर अन्न, इंधन आणि पाण्याचा साठा कमी झाला आहे. यामुळे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय आतापर्यंत १९ हल्ले झाले असून यामध्ये १० जणांचा मृत्यू तर ८ जखमी झाले आहेत.
04 May 2026 11:45 AM (IST)
अमेरिका इराण तणाव वाढतच चालला आहे. यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी खुला होण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जपानने चिंता व्यक्त केली आहे. जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांनी होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या झालेल्या चर्चेत त्यांनी हे विधान केले. तसेच दोन्ही देशांनी उर्जा पुरवठा सुरक्षेसाठी संयुक्तपण प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देशांनी संयुक्तपणे संकटाचा सामना करण्यासाठी सहमीत दर्शवली आहे.
04 May 2026 11:40 AM (IST)
जागतिक राजकारणातील सर्वात संवेदनशील भाग असलेल्या मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी नुकतीच ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ची घोषणा केली आहे, ज्याचा उद्देश होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेली आंतरराष्ट्रीय जहाजे मुक्त करणे हा आहे. मात्र, ट्रम्प यांच्या या हालचालीला इराणने कडाडून विरोध केला असून, अमेरिकेचा हा ‘मानवतावादी’ मुखवटा नसून ती लष्करी दादागिरी असल्याचे म्हटले आहे. या वादामुळे जागतिक तेल पुरवठा आणि सागरी सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर
04 May 2026 11:35 AM (IST)
किया भारतीय बाजारपेठेत सिरोस एसयूव्हीसाठी ओळखली जाते. वाहन निर्माता कंपनीद्वारे सादर केल्या जाणाऱ्या या एसयूव्हीची तुलना थेट मारुती ब्रेजासोबत केली जाते. या दोन्ही एसयूव्ही त्यांच्या दमदार फीचर्स आणि परफॉर्मंसाठी ओळखल्या जातात. मात्र दोन्ही गाड्यांमध्ये बराच फरक आहे. याबद्दल आता जाणून घेऊया. तुम्ही Kia Syros किंवा Maruti Brezza या दोन्हीपैकी कोणतीही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा. गाडी खरेदी करण्यापूर्वी दोन्हीमधील फरक समजून घ्या.
04 May 2026 11:30 AM (IST)
Israel Defence Deal : पश्चिम आशियात इराणशी तणाव सुरु असतानाच इस्रायलने एक मोठा निर्णय घेतला आहे. इस्रायलने आपल्या लष्करी ताकदीत पुन्हा वाढ करण्याची तयारी सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल अमेरिकेच्या लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. यामघ्ये F-35I आणि F15IA विमानांचा सामेवश आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे.
04 May 2026 11:25 AM (IST)
पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने आपल्याच जिवलग मित्राचा गळा चिरून आणि पोटात सुरा खुपसून खून करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना एकलहरा जवळील राखेच्या खदाणीजवळ घडली. सुदैवाने, पीडित तरुणाने वार हाताने अडवल्याने त्याचे प्राण वाचले. मात्र, या झटापटीत त्याच्या हाताची बोटे गंभीररीत्या कापली गेली आहेत. वाचा सविस्तर
04 May 2026 11:20 AM (IST)
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, संयुक्त अरब अमिराती (UAE) जवळ एका तेल वाहू जहाजावर हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यूएईच्या फुजैराहच्या उत्तरेस १५५ किलोमीटर अंतरावर हा हल्ला झाला. अद्याप हा हल्ला कोणी केला हे स्पष्ट झालेले नाही. सुदैवान जहाजावरील कर्मचाऱ्यांरी सुखरुप आहेत. या घटनेमुळे पश्चिम आशियातील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे.
04 May 2026 11:15 AM (IST)
इराणने पुन्हा एकदा इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादविरोधात मोठी कारवाई केली आहे. इराणने मोसादसाठी हेरगिरी करणाऱ्या तीन जणांना फाशीची शिक्षा दिली आहे. सोमवारी(०४ मे) इराणच्या मशहद येथे मोसादशी संबंधित तीन व्यक्तींना फाशी देण्यात आले असल्याचे तेहरान टाइम्सने वृत्त दिले आहे. त्यांच्यावर जानेवारी २०२६ मध्ये सत्तापालटाचा कट रचल्याचा आरोप ठोठावण्यात आला होता. मानवाधिकार संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर आतापर्यंत किमान २५ जणांना फाशी देण्यात आली आहे.
04 May 2026 11:10 AM (IST)
एक मोठी माहिती समोर आली आहे. सध्या अमेरिका इराणच्या जहाजांची नाकेबंदी करत आहे. याच वेळी अमेरिकन लष्कराने एका जप्त केलेल्या जहाजाला पाकिस्तानच्या ताब्यात दिले आहे. हे जहाज आणि त्यावरील खर्मचाऱ्यांना इराणला परत केले जाणार असल्याचे अमेरिकेच्या 'सेंट्रल कमांड'च्या (CENTCOM) एका प्रवक्त्या म्हटले आहे.
२१ एप्रिल २०२६ रोजी हे जहाज चीनहून इराणकडे परतत होते. यावेळी अमेरिकेच्या नौदलाने यावर ताबा मिळवला. या जहाजावरुन शस्त्रनिर्मिती साहित्य वाहून नेले जात असल्याचा दावा अमेरिकन अधिकाऱ्यांनी केला होता. यावर इराणने तीव्र निषेध करत अमेरिकेला समुद्री डाकू म्हटले होते.
U.S. Marines depart amphibious assault ship USS Tripoli (LHA 7) by helicopter and transit over the Arabian Sea to board and seize M/V Touska. The Marines rappelled onto the Iranian-flagged vessel, April 19, after guided-missile destroyer USS Spruance (DDG 111) disabled Touska’s… pic.twitter.com/mFxI5RzYCS
— U.S. Central Command (@CENTCOM) April 20, 2026
04 May 2026 10:50 AM (IST)
रविवारी, स्टार सलामीवीर साई सुदर्शनच्या ५७ धावांच्या खेळीच्या आणि भेदक गोलंदाजांच्या त्रिकुटाच्या जोरावर गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सचा पराभव केला. मोहम्मद सिराज, जेसन होल्डर आणि कागिसो रबाडा यांच्या भेदक गोलंदाजीमुळे टायटन्सने पंजाबला १६३ धावांवर रोखले. सुदर्शनने पुन्हा एकदा दमदार खेळी करून संघाला विजयी लक्ष्य गाठण्यास मदत केली. पदार्पण करणाऱ्या सूर्यांश शेडगेनेही ५७ धावा केल्या. पराभव होऊनही, पंजाब गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे.
04 May 2026 10:40 AM (IST)
आजच्या काळात मोबाईल गेमिंगमध्ये दोन बॅटल रॉयल गेम्स प्लेअर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यामध्ये फ्री फायर मॅक्स आणि पबजी मोबाईल या दोन्हीचा समावेश आहे. दोन्ही मोबाईल गेम्स अॅक्शन, सरवाईव्हल आणि शूटिंगचा अतिशय चांगला अनुभव ऑफर करतात. दोन्ही गेम्समधील अनुभव काही प्रमाणात सारखा असला तरी देखील या दोन्ही मोबाईल गेम्समध्ये काही फरक देखील आहे.
04 May 2026 10:30 AM (IST)
जर तुमचा जोडीदार तुमच्या पाठीमागे खंबीर उभा असेल तर मोठी आव्हाने लहान वाटू लागतात. खऱ्या प्रेमाने आणि कठोर परीश्रमाने यूपी लोकसेवा परीक्षेत यश प्राप्त केल्याची गोष्ट कानपूरच्या मोनाली सिंगची आहे. मोनाली सिंग आणि त्यांचे पती आकर्ष खरे यांनी सिद्ध केले की विवाह हा यशाच्या प्रवासातला अडथळा नसून एक शक्ती आहे. चला तर मग जाणून घेऊया या जोडप्याचा प्रेरणादायी प्रवास …
04 May 2026 10:20 AM (IST)
डिजिटल महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या सेवांपैकी एक असलेले ‘आपले सरकार’ पोर्टल गेल्या ६ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे पूर्णपणे बंद पडले असून, राज्यातील नागरिक आणि सेवा केंद्रधारकांची मोठी गैरसोय होत आहे. पोर्टलचे मुख्य पान उघडत नसल्याने किंवा सतत ‘एरर’ येत असल्याने नवीन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे किंवा अर्जाची स्थिती तपासणे ही सर्व कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. यामुळे राज्यातील हजारो ‘आपले सरकार’ सेवा केंद्र धारकांसह सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, डिजिटल सेवा यंत्रणा कोलमडल्याचे चित्र दिसत आहे.
04 May 2026 10:10 AM (IST)
जागतिक तेल बाजारात सध्या मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) OPEC+ संघटनेतून बाहेर पडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या संघटनेने कच्चा तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे.
04 May 2026 09:59 AM (IST)
फिलीपिन्सच्या (Philippines) अल्बे प्रांतात एका मोठ्या नैसर्गिक घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. रविवार, ३ मे २०२६ रोजी फिलीपिन्सचा सर्वात सक्रिय आणि प्रसिद्ध असा ‘मायन ज्वालामुखी’ (Mayon Volcano) पुन्हा एकदा जागृत झाला आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आकाशात राखेचे प्रचंड लोट पसरले असून, आजूबाजूचा परिसर धुरकट झाला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासनाने हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
04 May 2026 09:49 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराण युद्धात तटस्थ देशांना मदत करण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी केलेल्या या घोषणेनंतर जागतिक बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील झाला असून आज ४ मे रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १४२ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,२४० च्या पातळीवर व्यवहार करत होता.
04 May 2026 09:39 AM (IST)
जगावर पुन्हा एकदा एका धोकादायक विषाणूचे सावट निर्माण झाले आहे. कोरोनाच्या सावटातून जग सावरत असतानाच आता ‘हँटाव्हायरस’ (Hantavirus) या जीवघेण्या विषाणूने समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका आलिशान क्रूझ जहाजावर आपले पाय पसरले आहेत. ‘एमव्ही होंडियस’ (MV Hondius) या डच क्रूझ जहाजावर या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ३ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर आजारी आहेत. या घटनेमुळे जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
04 May 2026 09:29 AM (IST)
भारतात 4 मे रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,092 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,834 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,319 रुपये आहे. भारतात 4 मे रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,38,340 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,50,920 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,190 रुपये आहे. भारतात 4 मे रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 264.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,64,900 रुपये आहे.
04 May 2026 09:19 AM (IST)
Firefighters Memorial Day May 4 : ४ मे हा दिवस संपूर्ण जगभरात ‘आंतरराष्ट्रीय अग्निशमन दल स्मृती दिन’ (International Firefighters’ Day) म्हणून अत्यंत आदराने आणि सन्मानाने साजरा केला जातो. हा दिवस केवळ एक कॅलेंडरमधील तारीख नसून, आगीच्या भयंकर ज्वालांशी आणि जीवघेण्या आपत्तींशी लढा देत इतरांना जीवनदान देणाऱ्या शूर अग्निशमन दलाच्या जवानांच्या असीम त्यागाचे, शौर्याचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करतो, परंतु त्या वेळी जीवाची पर्वा न करता स्वतःला संकटात टाकून इतरांना सुरक्षित बाहेर काढणारे हे जवान देवदूतासारखे कार्य करतात. या दिनानिमित्त आपण अशा सर्व शूर वीरांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या अतुलनीय योगदानाची कृतज्ञता व्यक्त करतो.
04 May 2026 09:10 AM (IST)
Lipulekh border dispute Nepal 2026 : आंतरराष्ट्रीय राजकारण आणि शेजारी देशांमधील संबंधांमध्ये सध्या एक अत्यंत संवेदनशील वळण आले आहे. भारताच्या उत्तर सीमेवरील शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळने रविवारी (३ मे २०२६) एक मोठे राजनैतिक पाऊल उचलत भारत आणि चीन या दोन्ही महासत्ता देशांना हादरवून सोडले आहे. नेपाळच्या बालेन सरकारने लिपुलेख खिंडीतून आयोजित करण्यात येणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला ( kailas mansarovar yatra) तीव्र आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही देशांच्या दूतावासांना एक कडक ‘राजनैतिक निषेध पत्र’ पाठवले आहे. या पत्रामुळे केवळ भारत-नेपाळ नव्हे, तर चीन-नेपाळ संबंधांमध्येही एक नवीन राजनैतिक पेच निर्माण झाला आहे.






