Top Marathi News Today Live : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार मैदानात
06 Nov 2025 09:51 AM (IST)
नगरपरिषद, नगरपंचायत यांसारख्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी तळागाळातील कार्यकर्ते तयार आहेत. ‘आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवण्याचा विचार करत आहोत’, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
06 Nov 2025 09:42 AM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, ते नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या G-20 परिषदेत सहभागी होणार नाहीत. त्यांच्या या निर्णयाने अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
06 Nov 2025 09:31 AM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. आज (दि.06) पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांमधील १२१ जागांसाठी मतदान होणार आहे. सूर्यगढ विधानसभा मतदारसंघातील ५६ बूथवर सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. बोगस मतदार, दुबार मतदार आणि मतदार याद्यांमधील प्रचंड घोळ यामुळे विरोधी कॉंग्रेस (Congress) पक्ष आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये (Bihar) होत असलेल्या निवडणुकीमध्ये काय होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिहारी जनतेला खास आवाहन केले आहे.
06 Nov 2025 09:23 AM (IST)
जालनामधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाच्या ट्रोलिंगला बळी पडत एका २८ वर्षीय तरुणाने विहिरीत उडीघेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर नामफलकाच्या बोर्डखाली लघुशंका करतानाचा दोन मित्रांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या वायरल व्हिडीओमुळे नेटीझन्सकडून धमक्याही येऊ लागल्या. त्यामुळे, या तरुणांनी माफीनाम्याचा देखील एक व्हिडीओ बनवला होता. त्याच्या माध्यमातून माफ़ू मागण्यात आली. तरीही धमक्या काही थांबल्या नाही. यालाच कंटाळून २८ वर्षीय महेश आडे याने आत्महत्या केली.
06 Nov 2025 09:13 AM (IST)
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांच्या १७३ व्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ते कमल हासन यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चाहते या चित्रपटाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते. आता, निर्मात्यांनी ‘थलाईवर १७३’ (तात्पुरते शीर्षक) बद्दल त्याच्या दिग्दर्शकापासून ते त्याच्या प्रदर्शन तारखेपर्यंतची संपूर्ण माहिती उघड केली आहे. कमल हासन यांनी सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. तसेच या दोन्ही सुपरस्टार पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
06 Nov 2025 08:40 AM (IST)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतली जाणारी टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा यंदा २३ नोव्हेंबर रोजी राज्यभर एकाच दिवशी होणार आहे. यावेळी परीक्षेत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्याच बरोबर दिव्यांग बांधवांसाठी विशेष अशी बैठक व्यवस्था शासनाने करावी अशी मागणी पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटना महाराष्ट्र संघटनेने केली
06 Nov 2025 08:25 AM (IST)
भाजप निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सरकारच चोरत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एक बॉम्ब टाकून भाजप व निवडणूक आयोग लोकशाहीचा खून कसा करत आहेत, हे देशाला दाखवून दिले. हरियाणात मतचोरी कशी केली याचे पुरावे देऊन निवडणूक आयोगाला उघडे पाडले. पण ‘निर्लज्जम सदा सुखी’ या उक्तीप्रमाणे निवडणूक आयोगाच्या कामात काहीच सुधारणा होत नाही. निवडणूक आयोग सरकारच्या हातातली कठपुतली बनले आहे, असे आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
06 Nov 2025 08:15 AM (IST)
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दरभंगाच्या १० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू झाले आहे. २.८९ दशलक्ष मतदार ईव्हीएममध्ये १२३ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. त्यापैकी ११५ पुरुष उमेदवार आणि ८ महिला उमेदवार आहेत. एकूण ६३००० मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
06 Nov 2025 08:05 AM (IST)
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी लखीसराय येथे मतदान केले. त्यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. १२१ पैकी ९५ जागा आम्ही जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनीही मतदान केले. भाजपने त्यांना लखीसराय विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की, विरोधी पक्ष मतदारांना धमकावत आहेत, पण मतदार घाबरत नाहीत.
Marathi Breaking News Updates : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा जागांसाठी सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये एकूण 1314 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्यात 1192 पुरुष तर 122 महिला उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील 102 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत, तर 19 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.
पहिल्या टप्प्यात एकूण ३७.५१३ दशलक्ष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये १९.८३५ दशलक्ष, ३२५ पुरुष, १७.६७ दशलक्ष, २१९ महिला आणि ७५८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्रांवर अपंग आणि वृद्ध मतदारांसाठी विशेष सुविधाही देण्यात आल्या आहेत. ३२२०७७ अपंग मतदार आणि ५३१४२३ ज्येष्ठ नागरिक मतदार (८० वर्षांवरील ५२४6८७ मतदार आणि १०० वर्षांवरील ६७३६ मतदारांसह) आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.






