Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : देशातील 16 राज्यांत मान्सून दाखल; उत्तर भारतातही लवकरच सुरुवात

Marathi Breaking Live Updates : देश-विदेशसह राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 09, 2026 | 06:12 PM
Top Marathi News Today Live : देशातील 16 राज्यांत मान्सून दाखल; उत्तर भारतातही लवकरच सुरुवात

Top Marathi News Today Live : देशातील 16 राज्यांत मान्सून दाखल; उत्तर भारतातही लवकरच सुरुवात

Follow Us
Follow Us:

Marathi Breaking News Updates : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच थोड्या विश्रांतीनंतर नैऋत्य मान्सूनने वेग पकडला आहे. 4 जूनला केरळमध्ये दाखल झाल्यापासून मान्सून १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून उत्तर बंगालमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे केरळ, तामिळनाडू आणि किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे.

पुढील तीन दिवसांत वायव्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू, तसेच उर्वरित ईशान्येकडील राज्ये आणि छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल व सिक्कीमच्या काही भागांपर्यंत पाऊस पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. 11 जूनपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिल्ली-एनसीआरसह वायव्य भारताच्या काही भागांमध्ये आणि बिहारसह पूर्व भारताच्या काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो.

सध्या, उत्तर भारतातील तापमान पुन्हा एकदा 45 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, नैऋत्य मान्सून आता केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आसामसह सर्व सात ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचला आहे.

The liveblog has ended.
  • 09 Jun 2026 06:00 PM (IST)

    09 Jun 2026 06:00 PM (IST)

    NEET 2026 Exam : ‘नीट’ फेरपरीक्षा ‘या’ तारखेला होणार

    NEET 2026 Exam Updates: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET 2026 परीक्षेबाबत एक मोठे विधान केले आहे. देश यापूर्वीही अनेक आव्हानांना सामोरा गेला असून, सध्याच्या परिस्थितीबाबत सरकार पूर्णपणे सतर्क आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी भारत सरकारची संपूर्ण यंत्रणा सक्रिय असून कॅबिनेट सचिव, गृहसचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. शिक्षणमंत्र्यांनी या संदर्भात गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली असून, ते आरोग्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहेत. परीक्षा पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी सरकार सर्व शक्य पावले उचलत आहे.

  • 09 Jun 2026 05:44 PM (IST)

    09 Jun 2026 05:44 PM (IST)

    PoK मधील जनतेचा पाकिस्तानविरोधात एल्गार! भारताचा कडक इशारा

    India-Pakistan Dispute: पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (PoK) सध्याची परिस्थिती आणि तिथे सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर कडक शब्दांत टीका केली आहे. बनावट बातम्या आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंचा वापर करून या भागातील आपल्या अपयशावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) केला आहे. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, पाकिस्तान खोट्या बातम्या आणि बनावट व्हिडिओंचा आधार घेऊन मूळ मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या नियंत्रणाखालील प्रदेशांमध्ये होणारे मानवाधिकारांचे उल्लंघन आणि प्रशासकीय अपयश लपवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने अवलंबलेली ही एक अयशस्वी रणनीती असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

  • 09 Jun 2026 05:30 PM (IST)

    09 Jun 2026 05:30 PM (IST)

    चित्रपट आणि ऑटोमोबाईल उद्योगाची भागीदारी समजून घ्या

    बॉलिवूड आणि हॉलीवूड चित्रपटांमध्ये गाड्या केवळ वाहतुकीचे साधन नसतात, तर त्या कथानकाचा महत्त्वाचा भाग बनतात. अनेकदा एखादी कार चित्रपटातील नायकाइतकीच लोकप्रिय होते. पडद्यावर दिसणाऱ्या आकर्षक, वेगवान आणि दमदार गाड्या प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवतात. त्यामुळेच आज अनेक वाहन कंपन्या आपल्या मॉडेल्सना चित्रपटांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी मोठी गुंतवणूक करतात.

  • 09 Jun 2026 05:20 PM (IST)

    09 Jun 2026 05:20 PM (IST)

    Why Not Water Tanks: परदेशातील घरांच्या छतावर पाण्याच्या टाक्या का नसतात?

    Why No Water Tanks on Foreign Roofs: भारतात कदाचितच एखादे असे घर असेल ज्याच्या छतावर पाण्याची टाकी नसेल. काही घरांवर काळ्या रंगाची टाकी दिसते तर काहींवर पांढऱ्या. या टाक्यांचा वापर पाणी साठवण्यासाठी आणि संपूर्ण घरात त्याचा पुरवठा करण्यासाठी केला जातो. परंतु, तुम्ही कधी विचार केला आहे का की अमेरिका, युरोप आणि इतर अनेक देशांमधील घरांच्या छतावर पाण्याच्या टाक्या का दिसत नाहीत? चला तर मग जाणून घेऊया यामागचे खरे कारण…..

  • 09 Jun 2026 05:15 PM (IST)

    09 Jun 2026 05:15 PM (IST)

    स्विगीकडून डिलिव्हरी पार्टनर्ससाठी ‘है जवानी तो इश्क होना है’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

    Hai Jawani To Ishq Hona Hai : आपल्या डिलिव्हरी पार्टनर्सप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्विगीने एक खास उपक्रम राबवला. अभिनेता वरुण धवनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘है जवानी तो इश्क होना है’ (HJTIHH) या चित्रपटाचा विशेष शो मुंबईतील डिलिव्हरी पार्टनर्ससाठी आयोजित करण्यात आला. मुंबईतील फन रिपब्लिक मॉल येथे झालेल्या या विशेष प्रदर्शनात 150 हून अधिक डिलिव्हरी पार्टनर्स सहभागी झाले.

  • 09 Jun 2026 05:01 PM (IST)

    09 Jun 2026 05:01 PM (IST)

    किपरच्या बूटने केला Priyansh Arya चा गेम; ऋतुराज अन् प्रियांश एकाच क्रीजमध्ये अन्…

    India A Vs SRI Lanka A Live: सध्या श्रीलंका येथे ट्राय सिरिज सुरू आहे. आज या सिरिजचा पहिला सामना हा इंडिया विरुद्ध श्रीलंका असा खेळवला जात आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रभसीमरन सिंह आणि वैभव सूर्यवंशी लवकर आउट झाले. प्रियांश आर्य 32 रन्सवर आउट झाला.  प्रियांश आर्य अत्यंत विचित्र पद्धतीने आउट झाला. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

  • 09 Jun 2026 04:55 PM (IST)

    09 Jun 2026 04:55 PM (IST)

    CJP Maharashtra Protest: पुण्यातील किती झुरळे सहभागी होणार?; CJPच्या महाराष्ट्रातील पहिल्या आंदोलनाची घोषणा

    कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतरच्या मैदानात आंदोलन करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर सुरू झालेल्या या चळवळीला अवघ्या १५ दिवसांत देशभरातील तरुणाईचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनासाठी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके ६जूनच्या सकाळी अमेरिकेतून मायदेशी दाखल झाले. विमानतळावरच त्यांना दिल्ली पोलिसांची परवानगी मिळाली. त्यानंतर ते थेट जंतरमंतर या आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले. दिल्लीत झालेल्या आंदोलनावेळीच त्यांनी देशातील अनेक भागांमध्ये हे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.  वाचा सविस्तर... 

  • 09 Jun 2026 04:49 PM (IST)

    09 Jun 2026 04:49 PM (IST)

    मुंबईत ७६ हजारांहून अधिक अकरावी प्रवेश निश्चित; पण अद्याप किती लाख जागा रिक्त आहेत? जाणून घ्या आकडेवारी!

    FYJC 11th Admission: अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत मुंबई विभागातील विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक ३३,३८५ हजार विद्यार्थ्यांनी या शाखेची निवड केली तर विद्यार्थ्यांनी वाणिज्य (कॉमर्स) शाखेची निवड केली. यावरून प्रवेश प्रक्रियेतील स्पर्धा आणि विद्यार्थ्यांचा व्यवसायिक अभ्यासक्रमाकडे वाढता कल दिसून येत आहे. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्यांतील अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली असून या भागात ७६,२१४  हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. या विभागात एकूण ४ लाख ७७  हजार २९० जागा उपलब्ध असून या रिक्त जागांसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी पुढील फेरीच्या प्रतीक्षेत आहेत. वाचा सविस्तर... 

  • 09 Jun 2026 04:38 PM (IST)

    09 Jun 2026 04:38 PM (IST)

    सर्वात मोठी बातमी! Team India ला धक्का; इंग्लंड अन् आयर्लंड दौऱ्याआधी ‘हा’ खेळाडू बाहेर, कारण काय?

     बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी बीसीसीआयने श्रेयस अय्यरकडे भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व सोपवले आहे. भारतीय संघ लवकरच इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. मोहम्मद सिराज या दौऱ्यातून बाहेर गेला असल्याचे समोर येत आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने प्रसिद्ध कृष्णाची निवड केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे इंग्लंड अन् आयर्लंड दौऱ्याआधी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 09 Jun 2026 04:25 PM (IST)

    09 Jun 2026 04:25 PM (IST)

    मंत्रिमंडळ बैठकीत चार मोठे निर्णय; विद्यार्थी, उद्योग आणि GST बाबतीत महत्वाचे निर्णय…

    राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (मंगळवार, ९ जून) पार पडली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत चार धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील करपद्धती, महाविद्यालये आणि उदयोगांबाबतीत हे मोठे निर्णय घेण्यात आले असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. वाचा सविस्तर... 

  • 09 Jun 2026 04:16 PM (IST)

    09 Jun 2026 04:16 PM (IST)

    IND vs AFG: रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार का? वनडे मालिकेपूर्वी फिटनेसबाबत आली सर्वात मोठी अपडेट!

    अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (CoE) मधील क्रीडा विज्ञान (स्पोर्ट्स सायन्स) पथकाने अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) तंदुरुस्त (फिट) घोषित केले आहे. यासोबतच, स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यालाही (Hardik Pandya) खेळण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. आयपीएल 2026 दरम्यान रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला पाच सामने मुकावे लागले होते.

  • 09 Jun 2026 04:07 PM (IST)

    09 Jun 2026 04:07 PM (IST)

    शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग वाढली! कृषी विभागाकडून सतर्कतेचा इशारा, पेरणीची घाई करू नये

    मृगनक्षत्र लागताच महागाव तालुक्यासह शेंबाळपिंपरी परिसरात शेतकऱ्यांमध्ये खरीप पेरणीची लगबग दिसून येत आहे पाऊस येण्याचे चिन्हे दिसताच आणि आकाशात आभाळ पाहून शेतकरीराजा सुखावल्याचे पाहावयास मिळत आहे. यापूर्वीच परिसरात शेतीतील नांगरणी वखरणी झाली आहे. जमीन प्रखर उन्हात तापून गर्भातील नांगरणीमुळे ढेकळ मुरून सुपीक मातीत रूपांतर झाले आहे. निसर्गाचे आणि मृग नक्षत्राचे पाणी जोपर्यंत पेरणीसाठी पडत नाही, तोपर्यंत शेतकरी पेरणी करणार नाही, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. वाचा सविस्तर... 

  • 09 Jun 2026 03:55 PM (IST)

    09 Jun 2026 03:55 PM (IST)

    जळगावात थरारक हत्याकांड

    जळगाव: जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून एका वृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना जळगाव शहरातील शामनगर परिसरात घडली. रामानंदनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. काय घडलं नेमकं?

  • 09 Jun 2026 03:50 PM (IST)

    09 Jun 2026 03:50 PM (IST)

    ऑपरेशन ब्लु स्टार म्हणजे इतिहासातील काळा दिवस, गिरीश महाजन यांचे वादग्रस्त विधान

    ऑपरेशन ब्लु स्टार च्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त पंजाबमधील अमृतसर येथील चौक मेहता येथे शीख समुदायातील एका गटातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हेदेखील उपस्थित होते. गिरीश महाजन यांची या कार्यक्रमातील उपस्थिती खळबळजनक ठरली असून गिरीश महाजन यांच्या वादग्रस्त विधानाने आता काँग्रेसच्या गोटातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ‘ऑपरेशन ब्लु स्टार म्हणजे इतिहासातील काळा दिवस असल्याचे वक्तव्य महाजन यांनी केल्याने आता देशभरातून टीका होत आहे. वाचा सविस्तर

  • 09 Jun 2026 03:45 PM (IST)

    09 Jun 2026 03:45 PM (IST)

    शेवगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचखोरीचा बाजार; भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वरदहस्त?

    पोपट पिटेकर, अहिल्यानगर : शेवगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शासनाचा महसूल बुडवून आणि तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून अवैध दस्त नोंदणी केल्याप्रकरणी दुय्यम निबंधक डी. डी. लंगोटे यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार असतानाच, आता या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. भ्रष्ट कारभाराचा हा पैसा थेट वरपर्यंत जात असल्याचे खळबळजनक वास्तव समोर येत आहे. नेमकं प्रकरण काय?

  • 09 Jun 2026 03:40 PM (IST)

    09 Jun 2026 03:40 PM (IST)

    नवविवाहित दांपत्याने विहिरीत उडी मारली

    यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मारेगाव तालुक्यात नवविवाहित दांपत्याने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पोटाला दगड बांधले आणि विहिरीत उडी मारली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकं काय घडलं?

  • 09 Jun 2026 03:35 PM (IST)

    09 Jun 2026 03:35 PM (IST)

    जपाननंतर नेपाळनेही भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी घातली

    जपानच्या पाठोपाठ नेपाळनेही भारतातून आयात होणाऱ्या आंब्यावर बंदी घातली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मालाची चाचणी करण्यात आली तेव्हा कीटकनाशकांचे प्रमाणा मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले. यामुळे अन्नसुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित करत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नेपाळच्या सरकारने सांगितले. सरकारने स्पष्ट केले की, भारतासोबत व्यापारी संबंध कमी करण्याचा कोणताही उद्देश नाही.

    बंदी घालण्यापूर्वी सुनारे १५.८ मेट्रिक टन भारतीय आंबे नेपाळमध्ये पोहोचले होते. ज्यांची किंमत अंदाजे १० लाख नेपाळी रुपये इतकी आहे. जपानने भारतीय आंब्यांवर तपासणी आणि स्वच्छताविषयक नियमांच्या पालनातील त्रुटींमुळे बंदी घातली होती. यामध्ये हापूस , केशर, लंगडा आणि बंगनपल्ली यांसारख्या भारतीय आंब्यांच्या प्रसिद्ध जातींच्या निर्यातीला फटका बसला होता.

     

  • 09 Jun 2026 03:30 PM (IST)

    09 Jun 2026 03:30 PM (IST)

    होर्मुझमध्ये नाकेबंदी कायम राहणार - ट्रम्प

    डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझबाबात मोठे विधान केले आहे. इरणसोबत अंतिम करार होईपर्यंत होर्मुझचा मार्ग बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत कोणताही ठोस करार होत नाही, तोपर्यंत या मार्गावरुन कोणतीही वाहतूक होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इराणला होर्मुझ पुन्हा सुरळित करायचा असेल तर शांतता करार मान्य करावा असाही इशारा ट्रम्प यांनी दिला.

  • 09 Jun 2026 03:20 PM (IST)

    09 Jun 2026 03:20 PM (IST)

    इराण-इस्रायल युद्धविरामास सहमत?

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांच्या आवाहनानंतर इराण आणि इस्रायल एका आठवड्यासाठी किंवा त्याहून अधिक काळासाठी युद्ध थांबवण्यास सहमत झाले आहेत.

  • 09 Jun 2026 03:15 PM (IST)

    09 Jun 2026 03:15 PM (IST)

    निराधार महिला पेन्शन योजनेत मोठा SCAM

    UP Welfare Fraud: उत्तर प्रदेश सरकारकडून निराधार आणि पतीविना राहणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेचाही गैरफायदा घेतल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पती जिवंत असतानाही त्यांना मृत दाखवून प्रयागराज विभागातील तब्बल 1,751 महिलांनी निराधार पेन्शन योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. यापैकी सर्वाधिक 619 प्रकरणे प्रयागराज जिल्ह्यात आढळली आहेत. वाचा सविस्तर

  • 09 Jun 2026 03:10 PM (IST)

    09 Jun 2026 03:10 PM (IST)

    टाटा मोटर्सने खरेदी केले होते जॅग्वार आणि रेंज रोव्हर

    2008 हे वर्ष जागतिक वाहन उद्योगासाठी संकटाचे होते. आर्थिक मंदीमुळे अनेक मोठ्या कंपन्या अडचणीत सापडल्या होत्या. अशा काळात भारतीय कंपनी Tata Motors ने एक असा निर्णय घेतला ज्याला त्या वेळी अनेकांनी धाडस नव्हे तर “जुगार” म्हटले. टाटांनी ब्रिटनच्या प्रतिष्ठित Jaguar Land Rover (JLR) या लक्झरी ब्रँड्सना Ford Motor Company कडून विकत घेतले. परंतु काळाने सिद्ध केले की हा व्यवहार भारतीय उद्योगजगताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या मास्टरस्ट्रोकपैकी एक होता. वाचा सविस्तर

  • 09 Jun 2026 03:05 PM (IST)

    09 Jun 2026 03:05 PM (IST)

    अमेरिकेने चिनी कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये केले सामील

    US Blacklist : वॉशिंग्टन/बीजिंग : अमेरिकेच्या पेंटागॉन विभागाने चीनविरोधात मोठी कारवाई केली आहे. चीच्या पीपल्स लिबरेशन आर्मी संबंधित असलेल्या कंपन्यांना ब्लॅकलिस्टमध्ये सामील केले आहे. यामध्ये अलीबाबा ग्रुप, बायडू, बीवायडी, नीआयओ यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. यामुळे आता या कंपन्यांना अमेरिकन कंपन्यांमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. वाचा सविस्तर

  • 09 Jun 2026 02:59 PM (IST)

    09 Jun 2026 02:59 PM (IST)

    मुंब्रा–डायघरमध्ये आगीचा मोठा भडका; टायर गोदाम ज्वाळांच्या विळख्यात

    ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा–डायघर (Mumbra – Dighar) परिसरात एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीने काही वेळातच विक्राळ रूप धारण केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. टायर आणि ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे मोठे लोट दूरवर दिसून येत आहेत.

  • 09 Jun 2026 02:50 PM (IST)

    09 Jun 2026 02:50 PM (IST)

    पुणे विषारी दारू प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

    फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे मेथेनॉल मिश्रित विषारी गावठी दारू प्यायल्याने झालेल्या नागरिकांच्या मृत्यूनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारूधंद्यांविरुद्ध मोठी धडक मोहीम राबवली आहे. २९ मे ते ४ जून २०२६ या कालावधीत विभागाने तब्बल १४२ गुन्हे दाखल करून ११६ आरोपींना अटक केली आहे.

  • 09 Jun 2026 02:42 PM (IST)

    09 Jun 2026 02:42 PM (IST)

    अमरावतीला वादळी पावसाचा तडाखा

    अमरावती शहराला वादळी पावसाने चांगलंच झोडपलंय. वादळी पावसामुळे अमरावतीत अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे वीजेच्या तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत कोसळलेली झाडं हटवून विज पुरवठा सुरळीत करण्यात आला. आमदार रवी राणा यांनी रात्री उशिरापर्यंत नुकसानीची पाहणी केली असून प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या आहेत.

  • 09 Jun 2026 02:31 PM (IST)

    09 Jun 2026 02:31 PM (IST)

    संभाजीनगर मध्यवर्ती बँक निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का

    संभाजीनगर मध्यवर्ती बँक निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर अब्दुल सत्तार यांचा अर्ज बाद झाला आहे. कन्नड शिवसेना आमदार संजना जाधव यांचा अर्ज बाद झाला आहे.

  • 09 Jun 2026 02:21 PM (IST)

    09 Jun 2026 02:21 PM (IST)

    पुनर्विकास नोटीस जाहिरात प्रकरण, छगन भुजबळांचं कार्यालय पोलिसांत तक्रार करणार

    पुनर्विकास नोटीस जाहिरात प्रकरणी छगन भुजबळांचं कार्यालय पोलिसांत तक्रार करणार आहे.  जाहिरात कुणी दिली याची चौकशी होणार असल्याचं समोर येत आहे.  जाहिरातीत बंगल्याचा पत्ता का दिला चौकशी होणार आहे.

     

  • 09 Jun 2026 02:20 PM (IST)

    09 Jun 2026 02:20 PM (IST)

    शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी खेळ

    शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. साईभक्तांना बुरशीयुक्त पेढा विकला जात आहे. पेढ्याच्या पाकिटावर एक्सपायरी डेटच नसल्याचा प्रकार समोर आला आहे.  अन्न व औषध प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे.

  • 09 Jun 2026 02:09 PM (IST)

    09 Jun 2026 02:09 PM (IST)

    चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत 'समर्थ'ची भरारी, सर्व १४ जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी

    अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. विद्यमान कार्यकारिणीच्या या आघाडीने सर्व १४ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले.

  • 09 Jun 2026 02:00 PM (IST)

    09 Jun 2026 02:00 PM (IST)

    मनसे नेते राजेश शेटे यांना भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार

    बदलापूर येथून एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष राजेश शेटे यांना भरधाव कारणे जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात शेटे गंभीर जखमी झाले असून चालक धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा अपघात 7 जून रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर घडला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली असून पोलीस तपास करत आहे.

  • 09 Jun 2026 01:55 PM (IST)

    09 Jun 2026 01:55 PM (IST)

    शेतकरी चिंतेत ! पूर्वमान्सूनची साथ नाही; येवला तालुक्यात खरीप हंगामावर संकटाची छाया

    खरीप हंगामाच्या तोंडावर येवला तालुक्यातील शेतकरी सध्या आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. गतवर्षी याच कालावधीत जोरदार पूर्वमान्सून व मान्सून पावसामुळे शेतांमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाला होता आणि पेरण्यांना वेग आला होता. मात्र यंदा जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. गेल्या वर्षी मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वीच अनेक भागांत चांगल्या पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरी, मका, सोयाबीन, मूग, उडीद आणि कापूस पिकांच्या पेरण्या सुरू केल्या होत्या. अनेक शेतांमध्ये पेरणीची कामे पूर्णही झाली होती. यंदा मात्र पावसाची परिस्थिती निराशाजनक असल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

  • 09 Jun 2026 01:50 PM (IST)

    09 Jun 2026 01:50 PM (IST)

    वाहतूक पोलिसामुळे तरुण गंभीर जखमी; दुचाकी थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळली

    लातुरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. लातूर शहरातील गांधी चौकाजवळील मिनी मार्केट सिग्नल परिसरात वाहतूक पोलिसांनी अडविलेल्या एका दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याची घटना घडली असून, या अपघातात संबंधित युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेबाबत विविध चर्चा रंगत असून, अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या प्रकरणातील सत्य सीसीटीव्ही फुटेज आणि अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

     

  • 09 Jun 2026 01:45 PM (IST)

    09 Jun 2026 01:45 PM (IST)

    पेट्रोल – डिझेलचे दर धडाधड कोसळणार… भारतासाठी आली Good News

    जगाला महागाईने विळखा घातला आहे आणि या सगळ्याचा मुख्य कारण ते म्हणजे कच्च तेल. कच्च्या तेलाच्या किमती वाढतच चालल्या आहेत. भारतच नव्हे तर जगभरात गेल्या 100 दिवसांपासून कच्च्या तेलाचीच चर्चा सुरु आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्यानंतर कच्च्या तेलाचा पुरवठा होत नसल्याने सगळं विस्कळीत झालं आहे. ग्लोबल मार्केटमध्ये जे कच्च तेल 70-75 डॉलर बॅलर विकलं जात होतं, तेच तेल 100-120 डॉलर प्रति बॅरलने विकलं जात आहे. कारण होत नसलेला पुरवठा आणि वाढलेला तणाव हे आहे. पण असं असतानाच जगातून एक खूशखबर आली आहे. केवळ भारतासाठीच नव्हे तर तेलाच्या संकटाचा सामना करणाऱ्या प्रत्येक देशासाठी ही आनंदी बातमी मानली जात आहे. ग्लोबल रेटिंग एजन्सी फिच रेटिंगने तेलाच्या किंमतीवरून अंदाज व्यक्त केला आहे. नेमकं काय घडणार समजून घेऊयात.

  • 09 Jun 2026 01:40 PM (IST)

    09 Jun 2026 01:40 PM (IST)

    India Post GDS 4th Merit List जाहीर; एकूण २८,६३६ जागांमध्ये तुमची निवड झाली का?

    इंडिया पोस्टतर्फे एकूण २८,६३६ पदांसाठी ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून आतापर्यंत तीन गुणवत्ता याद्या (Merit Lists) जाहीर झाल्या आहेत. आता चौथी गुणवत्ता यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंडिया पोस्टने जीडीएस पदांच्या निवडीसाठी ही नवीन गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे ते आता ऑनलाइन माध्यमातून गुणवत्ता यादीत आपले नाव पाहू शकतात. हे नाव पाहण्यासाठी उमेदवारांना पीडीएफ (PDF) डाउनलोड करावी लागेल.या पीडीएफमध्ये तुमचे नाव आणि रोल नंबर असल्यास तुमची निवड झाली आहे हे निश्चित होते. या भरतीद्वारे २८,६३६ पदे भरली जाणार आहेत. या रिक्त पदांची विभागणी प्रवर्गानुसार केली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया इंडिया पोस्टच्या पदांची मेरिट लिस्ट कशी व कुठून डाऊनलोड करायची.

  • 09 Jun 2026 01:35 PM (IST)

    09 Jun 2026 01:35 PM (IST)

    आईला दिलेलं वचन, 6.5 लाख झाडांमध्ये फुललं; आईसाठी सयाजी शिंदेंचा अनोखा संकल्प

    मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता सयाजी शिंदे हे केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नव्हे, तर सामाजिक आणि पर्यावरणीय कार्यांसाठीही ओळखले जातात. नुकतीच त्यांच्या आयुष्यातील एक भावनिक आणि प्रेरणादायी गोष्ट पुन्हा चर्चेत आली आहे. आईवरील प्रेमातून सुरू झालेला त्यांचा एक संकल्प आज महाराष्ट्रभरातील लाखो झाडांच्या रूपाने फुलताना दिसत आहे. 2016 साली सयाजी शिंदे यांच्या 92 वर्षीय आईच्या वाढत्या वयामुळे ते भावूक झाले होते. आई एक दिवस आपल्याला सोडून जाईल, हा विचार त्यांना सतावत होता. मात्र, आईच्या आठवणी कायमस्वरूपी जपण्यासाठी त्यांनी एक वेगळाच मार्ग निवडला.

  • 09 Jun 2026 01:25 PM (IST)

    09 Jun 2026 01:25 PM (IST)

    पुण्याचे माजी महापौर अन् त्यांच्या कुटुंबाचे मतदार यादीतून नाव गायब

    पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्याचे माजी महापौर व नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव मतदार यादीतून गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही माहिती धनकवडे यांनी दिली आहे. मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिमेदरम्यान माझ्यासह कुटुंबांचे नाव मतदार यादीतून गायब करण्यात आले आहे. यासंदर्भात गावच्या तलाठ्यापासून ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला, मात्र बहुतांश ठिकाणी टोलवाटोलवीची उतरे मिळत आहेत” असा गंभीर आरोप दत्तात्रय धनकवडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे.

  • 09 Jun 2026 01:15 PM (IST)

    09 Jun 2026 01:15 PM (IST)

    पदव्युत्तर कोर्ससाठी प्रवेश घेताय; मग आता केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून ३ लाख रुपये मिळणार!

    उच्च शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या कुमकुवत वर्गातील विद्यर्थ्यांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पदव्युत्तर शिष्यवृत्ती योजना(NSPG) जाहीर केली आहे, या स्कॉलरशिप अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन(PG) म्हणजेच पदव्युत्तर शिक्षणादरम्यान दरमहा १५,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.सरकारच्या या शिष्यवृत्तीचा फायदा हुशार पण आर्थिक टंचाईमुळे शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळून त्यांचे शिक्षण अर्धवट सुटणार नाही.

  • 09 Jun 2026 01:05 PM (IST)

    09 Jun 2026 01:05 PM (IST)

    आमदार रोहित पवार करणार उपोषण; कर्जमाफीच्या अटीविरोधात पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

    महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत अनेक अटी आणि नियम लादण्यात आले आहेत. यामुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील. सरकारने या अटी हटवून सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद गट) राज्य सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार यांनी १२ जूनपासून पंढरपूरमध्ये अनिश्चित काळासाठी उपोषणाची घोषणा केली आहे.

  • 09 Jun 2026 01:02 PM (IST)

    09 Jun 2026 01:02 PM (IST)

    तळेगाव दाभाडेतील संतापजनक प्रकार

    एका १२ वर्षीय मुलीचे नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करून तिचा विनयभंग केला. तसेच धमकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला आहे. विपुल विश्वकर्मा (वय १९, रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे), कोझी कॅफेचे चालक यांच्यासह एका १७ वर्षीय मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित १२ वर्षीय मुलीच्या आईने याप्रकरणी ३ जून २०२६ रोजी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

     

  • 09 Jun 2026 12:48 PM (IST)

    09 Jun 2026 12:48 PM (IST)

    परळीतील संतापजनक प्रकार

    माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझ्या मामांना, आजी आजोबाला जिवंत सोडणार नाही. तुझे फोटो व्हायरल करील असे म्हणत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.  आरोपी कृष्णा बाबुराव शिंदे (रा. बेलांबा ता. परळी) याने एका अल्पवयीन मुलीला मैत्री करण्यासाठी वारंवार त्रास दिला. मुलीने त्याला नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करणे सुरू ठेवले. गल्लीमध्ये पीडित मुलगी दूध आणण्यासाठी गेलेली असताना पाठीमागे येऊन त्याने तिला पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच तू माझ्याशी बोलत नाहीस, तू माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन. त्याचप्रमाणे तुझ्या मामा व आजी आजोबांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. ही घटना ७ जुलै २०२५ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत बेलांबा परिसरात घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुलीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

  • 09 Jun 2026 12:36 PM (IST)

    09 Jun 2026 12:36 PM (IST)

    ऊसतोडणी घोटाळ्याचा सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात

    तब्बल अकरा वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध पोलीस यंत्रणांना गुंगारा देणाऱ्या आंतरराज्य फसवणूक टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अखेर आळेफाटा पोलिसांनी नाट्यमय कारवाईत जेरबंद केले आहे. बनावट सातबारे, खोटी कागदपत्रे, अनेकांच्या नावे उघडलेली बँक खाती आणि सव्वा कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक अशा गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेल्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने ऊसतोडणी व्यवसायाशी संबंधित अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. पोलीसांनी ज्ञानदेव तेजराव वाघ (रा. गेवराई खुर्द, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि जगन्नाथ रेवननाथ जायभाये (रा. दुनगाव, जि. जालना) यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • 09 Jun 2026 12:24 PM (IST)

    09 Jun 2026 12:24 PM (IST)

    कोरेगाव खुर्दमध्ये दोन गटांत मारहाण

    खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द येथील दोंद वस्ती परिसरात मोटारसायकलची चावी काढल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण चार जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना शनिवारी (६ जून) दुपारी ४ ते सायंकाळी ५:३० दरम्यान घडली आहे.

  • 09 Jun 2026 12:12 PM (IST)

    09 Jun 2026 12:12 PM (IST)

    पुणेकरांनो तयारी ठेवा, महापौरांनी मागविला अहवाल

    पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, मान्सूनचे आगमनही लांबल्याने पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा नियोजनाचा सविस्तर अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश देतानाच पाणी कपातीची तयारी करण्याच्या सूचना महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे सोमवारपासून पाणी कपात लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापौर नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "सोमवारपासून पाणी कपातीची अंमलबजावणी करण्याच्या मनस्थितीत आम्ही आलो आहोत. याबाबतचे अंतिम परिपत्रक पुढील दोन दिवसांत महापालिका आयुक्त नवल किशोर राम जारी करतील." पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग सेंटर्स, स्विमिंग पूल तसेच बांधकाम मजुरांच्या कॅम्पसाठी वापरले जाणारे पिण्याचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय शहरभर ‘सेव्ह वॉटर’ मोहीमही राबविण्यात येणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

  • 09 Jun 2026 12:00 PM (IST)

    09 Jun 2026 12:00 PM (IST)

    काॅलेज टाॅपर विद्यार्थीने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी संपवले आयुष्य

    मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातून नवीन बातमी समोर येत आहे ज्याने सर्वांना हादरवून सोडलं. काॅलेजमध्ये टाॅपर असाणारी प्रिया मिश्रा परिक्षेत उत्तीर्ण तर झाली पण तिला याचा आनंद साजरा करता आला नाही. माहितीनुसार, निकालाच्या दुसऱ्याच दिवशी तिने विष पित आत्महत्या केली. घटनेमुळे सध्या प्रियाचे कुटुंब दु:खात असून मृत्यूपूर्वी तिने एक व्हिडिओ शूट केल्याचे समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये प्रिया रडताना दिसली. तिने रडतच आयुष्य संपवण्यामागे नेमकं काय कारण आहे ते स्पष्ट केलं आहे.यामागचे कारण तिला होणारा मानसिक छळ आणि ब्लॅकमेलिंग असल्याचे स्पष्ट होत आहे.

  • 09 Jun 2026 11:50 AM (IST)

    09 Jun 2026 11:50 AM (IST)

    मध्यपूर्वेत पुन्हा खळबळ! होर्मुझजवळ अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; थोडक्यात बचावले वैमानिक

    पश्मिच आशियातील फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरु झालेला तणाव काही निवळण्याचे नाव घेईना. इस्रायल-इराणमध्ये पुन्हा संघर्ष पेटला असून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना अमेरिकेसाठी एक धक्कादयक माहिती समोर आली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकन लष्कराचे Apache हे लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे.

  • 09 Jun 2026 11:40 AM (IST)

    09 Jun 2026 11:40 AM (IST)

    कॅमेरा झूम केला अन् समोर आलं धक्कादायक दृश्य; डोंगराळ भागात झाडाला लटकलेला मृतदेह

    विरारमधील कुलस्वाई माता मंदिराजवळील डोंगराळ भागात एका 34 वर्षीय तरुणाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, फोटोशूट करत असलेल्या तरुणाच्या मोबाईल कॅमेऱ्याच्या झूममुळे हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

  • 09 Jun 2026 11:30 AM (IST)

    09 Jun 2026 11:30 AM (IST)

    सीबीएसई १० वीचा दुसरा बोर्ड निकाल ‘या’ दिवशी लागणार? जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येणार निकाल!

    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंंडळाकडून या वर्षापासून दोन बोर्ड परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. 10 वी दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. या अंतर्गत पहिल्या बोर्ड परीक्षेत सर्वांची उपस्थिती अनिवार्य असते. तर दुसऱ्या बोर्ड परीक्षेत फक्त तेच विद्यार्थी भाग घेऊ शकतात, ज्यांना पहिल्या परीक्षेतील एखाद्या विषयात कमी गुण असून ते सुधारण्याची इच्छा आहे. यावर्षी 10वीची दुसरी बोर्ड परीक्षा 15 मे ते 21 मे 2026 या कालावधीत पार पडली. या परीक्षेस बसलेले विद्यार्थी आता निकालाची वाट पाहत आहेत. लवकरच 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होऊ शकतो. हा निकाल विद्यार्थी सीबीएससीच्या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून पाहू शकतात. तसेच तो डाउनलोड करू शकतात.

  • 09 Jun 2026 11:20 AM (IST)

    09 Jun 2026 11:20 AM (IST)

    राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार! दत्तात्रय भरणेंची घोषणा; सरकारवर ३६,५८५ कोटींचा भार

    राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेचा लाभ तब्बल ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, यासाठी सरकारला ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

  • 09 Jun 2026 11:10 AM (IST)

    09 Jun 2026 11:10 AM (IST)

    Deepika Padukoneने फ्लॉन्ट केला बेबी बंप, Ranveer Singh सोबत नव्या घराच्या बाल्कनीत दिसली अभिनेत्री

    व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये दीपिका आणि रणवीर त्यांच्या नव्या घराच्या बाल्कनीत उभे असल्याचे दिसत आहे. दीपिकाने पांढऱ्या रंगाचा सैल आणि आरामदायी पोशाख परिधान केला असून तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसून येत आहे. तर रणवीर सिंग नेहमीप्रमाणे कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून त्याने जीन्स, टी-शर्ट, टोपी आणि चष्मा परिधान केला आहे. दोघेही एकमेकांशी संवाद साधताना आणि घराच्या कामाची पाहणी करताना दिसत असल्याने हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

  • 09 Jun 2026 10:45 AM (IST)

    09 Jun 2026 10:45 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन एक दिवस पुढे ढकलला; काय आहे नेमकं कारण?

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला वर्धापन दिन येत्या १० जूनला होणार होता. दोन्ही राष्ट्रवादींचे वर्धापन दिन मुंभईत होणार असल्याचीही माहिती समोर आली होती. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचा यंदा २७ वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये ११ जूनला साजरा करण्यात येणार आहे.

Web Title: Marathi breaking live updates marathi top news international news national news crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Marathi Breaking
  • Navarashtra Live Updates

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.