Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: देशात आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

Maharashtra Breaking News: सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,४०० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ५०८.४० अंकांनी, म्हणजेच ०.६८ टक्क्यांनी घसरून ७४,२६७.३४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १६५.१५ अंकांनी, म्हणजेच ०.७० टक्क्यांनी घसरून २३,३८२.६० वर स्थिरावला.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 02, 2026 | 06:04 PM
Top Marathi News Today Live

Top Marathi News Today Live

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News:

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावधान! लाल रंगात होणार बाजाराची सुरुवात

India Share Market Update: २ जून रोजी आज भारतीय शेअर बाजार लाल रंगात उघडणार असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मंगळवारी घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-डाउन सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास २०० पॉइंट्सच्या डिस्काउंटवर, २३,२६२ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

The liveblog has ended.
  • 02 Jun 2026 05:50 PM (IST)

    02 Jun 2026 05:50 PM (IST)

    Tamilnadu Politics: निवडणुकीनंतर भाजपला पहिला झटका!

    Annamalai Submits Resignation To BJP Chief Nitin Nabin: तामिळनाडू भाजपचे धडाडीचे नेते अण्णामलाई यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत, अण्णामलाई यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी मंगळवारी (2 जून) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर आज दुपारी चार वाजता ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. शाह यांच्यासोबतच्या भेटीनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले जात आहे.

  • 02 Jun 2026 05:40 PM (IST)

    02 Jun 2026 05:40 PM (IST)

    Medicine Price: रक्तदाबचे औषध रू. 9.40, डायबिटीस रु. 11.91

    तेल आणि वायूच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, ३० अत्यावश्यक औषधांबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागाचा एक भाग असलेल्या राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA) ३० औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. NPPA ने मधुमेह, रक्तदाब, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, हाडांचे आजार, हृदयरोग आणि अवयव प्रत्यारोपण यांसारख्या विविध आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. नियम अधिक कडक करत, NPPA ने म्हटले आहे की, जर ग्राहकांना निर्धारित किमतीपेक्षा जास्त पैसे देण्यास सांगितले गेले, तर आवश्यक कारवाई केली जाईल.

  • 02 Jun 2026 05:30 PM (IST)

    02 Jun 2026 05:30 PM (IST)

    Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग

    मुंबईत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी ऑटो-रिक्षा चालवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या उपक्रमातून त्यांनी महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. कार्यक्रमात त्यांनी ‘हरित वाहतूक’ आणि शाश्वत जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.या कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी ई-रिक्षा चालवली, तर त्यांच्या मागे रिक्षात बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर बसली होती.

  • 02 Jun 2026 05:20 PM (IST)

    02 Jun 2026 05:20 PM (IST)

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार?

    राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून लाडकी बहीण योजनेवरून चर्चा सुरु आहेत. राज्य सरकारने राज्यातील ८० लाख महिला या योजनेस अपात्र असल्याचे ठरवत त्यांचे नाव योजनेतून काढून टाकले आहे. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार विरोध दर्शवत सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. यावरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरॊप त्यांनी केले असून त्यांच्या या आरोपांनी आता राज्यात खळबळ उडाली आहे.

  • 02 Jun 2026 05:10 PM (IST)

    02 Jun 2026 05:10 PM (IST)

    ‘Drishyam 3’: खतरनाक खुनाचा थरार! विजय साळगावकर पुन्हा येतोय

    जीतू जोसेफ दिग्दर्शित आणि मोहनलाल अभिनीत मल्याळम चित्रपट ‘दृश्यम ३’ २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून, हा सस्पेन्स थ्रिलर बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. काही समीक्षकांनी या थ्रिलरला संमिश्र प्रतिसाद दिला असला तरी, प्रेक्षकांनी त्यावर भरभरून प्रेम दाखवले आहे आणि त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दमदार राहिले आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात जगभरात २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. चाहते अजय देवगण च्या ‘दृश्यम ३’ च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता ‘दृश्यम ३’ च्या हिंदी आवृत्तीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

  • 02 Jun 2026 05:01 PM (IST)

    02 Jun 2026 05:01 PM (IST)

    Political News: महायुतीमध्ये वाढती दरी! फडणवीसांच्या बैठकीला शिंदे अनुपस्थित

    Maharashtra Mahayuti Dispute: विधान परिषद निवडणुकांची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी ‘महायुती’मधील अंतर्गत कलह आता उघडपणे समोर येत आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान याचे संकेत स्पष्टपणे दिसून आले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहभाग घेतला नाही. शिंदे यांची या बैठकीतील अनुपस्थिती हा महायुतीमध्ये वाढणाऱ्या असंतोषाचा एक स्पष्ट संकेत मानला जात आहे.

  • 02 Jun 2026 04:57 PM (IST)

    02 Jun 2026 04:57 PM (IST)

    महिलेच्या नकाराची क्रूर किंमत! 27 सेकंदांत 8 वेळा आपटून दीड वर्षीय चिमुकल्याची हत्या

    फिरोजाबाद जिल्ह्यातील शिकोहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत, एका महिलेने लग्नास नकार दिल्याने एका तरुणाने तिच्या दीड वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. फिरोजाबादच्या शिकोहाबादमधील यादव कॉलनीत, विराज उर्फ ​​जितेंद्र पाठक याने, आपली वहिनी रती हिच्याशी लग्न करण्याचा हट्ट पूर्ण न झाल्याने, तिच्या दीड वर्षांच्या मुलाला, आरवला, रस्त्यावरच निर्घृणपणे आठ वेळा आपटून मारहाण करून ठार केले.

  • 02 Jun 2026 04:46 PM (IST)

    02 Jun 2026 04:46 PM (IST)

    ‘श्रीराम फायनान्स’ आता ‘पदुकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन’चे मुख्य प्रायोजक; तळागाळातील खेळाडूंना मिळणार बळ

    श्रीराम समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने (एसएफएल) पदूकोण स्कूल ऑफ बॅडमिंटन (पीएसबी) बरोबर मुख्य प्रायोजक म्हणून भागीदारी करत असल्याची आज महत्वपुर्ण घोषणा केली आहे. बंगळुरू येथील ‘पदुकोण-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्स’ येथे श्रीराम फायनान्सचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. उमेश रेवणकर आणि भारताचे दिग्गज बॅडमिंटन विजेते व पीएसबीचे संस्थापक पद्मश्री प्रकाश पदुकोण यांच्या उपस्थितीत या विशेष भागीदारीची घोषणा करण्यात आली.

  • 02 Jun 2026 04:34 PM (IST)

    02 Jun 2026 04:34 PM (IST)

    अमृता फडणवीसांच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग

    मुंबईत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी ऑटो-रिक्षा चालवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या उपक्रमातून त्यांनी महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 02 Jun 2026 04:22 PM (IST)

    02 Jun 2026 04:22 PM (IST)

    बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जोरदार तयारी

    रांजणगाव गणपती : ५ जुलै रोजी मतदान होत असलेली शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने व एकदिलाने लढविण्याचा निर्धार पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 02 Jun 2026 04:12 PM (IST)

    02 Jun 2026 04:12 PM (IST)

    निर्णायक युद्ध! हरमनप्रीतची ‘अग्निपरीक्षा’; ‘इथे’ दिसणार Live Match

    आयपीएलचा ठरत संपताच लवकर महिला टी20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. हा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे. दरम्यान त्याआधी भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची मालिका खेळत आहे. त्यातील शेवटचा सामना होणार आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा....

  • 02 Jun 2026 04:00 PM (IST)

    02 Jun 2026 04:00 PM (IST)

    कर्ज महागणार का? RBI च्या पतधोरणाआधी ग्राहक आणि बाजारपेठेची धाकधूक

    Repo Rate News Marathi : जून २०२६ मध्ये होणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीपूर्वी, बाजारपेठ व्याजदराच्या निर्णयावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जरी अन्नधान्य महागाई (सीपीआय) सध्या आरबीआयच्या लक्ष्यित मर्यादेत असली तरी, अनेक नवीन धोके मध्यवर्ती बँकेसाठी चिंता वाढवत आहेत. कोटक महिंद्रा एएमसीच्या फिक्स्ड इन्कम विभागाचे प्रमुख, अभिषेक बिसेन यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत आरबीआय रेपो दर ५.२५% वर स्थिर ठेवू शकते. मात्र मध्यवर्ती बँकेची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक कठोर वाटू शकते. वाचा सविस्तर

  • 02 Jun 2026 03:55 PM (IST)

    02 Jun 2026 03:55 PM (IST)

    धैर्यशील कदम यांचा दमदार उमेदवारी अर्ज

    सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी सोमवारी मोठ्या उत्साहात आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून भाजपने या निवडणुकीतील आपली ताकद दाखवत विजयाचा निर्धार व्यक्त केला. वाचा सविस्तर

  • 02 Jun 2026 03:45 PM (IST)

    02 Jun 2026 03:45 PM (IST)

    देशभरातील प्रमुख जलाशयांमधील पाणीसाठा १२ टक्क्यांनी घटला

    Water crisis red alert: कडाक्याची उष्णता आणि दुष्काळाच्या वाढत्या भीतीमुळे देशभरातील पाणीसंकट वेगाने अधिकच गडद होत चालले आहे. केंद्रीय जल आयोगाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीमुळे चिंता अधिकच वाढली आहे. या आकडेवारीनुसार, देशातील प्रमुख जलाशयांमधील पाणीपातळी अवघ्या २२ दिवसांत १२ टक्क्यांनी खाली आली आहे. वाचा सविस्तर

  • 02 Jun 2026 03:40 PM (IST)

    02 Jun 2026 03:40 PM (IST)

    शेतकरी कर्जमाफीवर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब

    राज्यातही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेत राज्य सरकारने घेतला आहे. कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबतीत शिक्कामोर्तब करण्यात आले असून २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैंठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आगामी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग अटी आणि शर्तीसंदर्भात परिपत्रक काढणार आहे. वाचा सविस्तर

  • 02 Jun 2026 03:35 PM (IST)

    02 Jun 2026 03:35 PM (IST)

    कांद्याला हमी भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा विराट क्रांती महामोर्चा

    पुणे : शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा कवडीमोल दराने विकावा लागत आहे. कांद्याला प्रति किलो दोन रुपयेही दर मिळत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष व महाविकास संघर्ष करत राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. वाचा सविस्तर

  • 02 Jun 2026 03:30 PM (IST)

    02 Jun 2026 03:30 PM (IST)

    दक्षिण आफ्रिकेच्या उपराष्ट्रपतींनी घेतली उपराष्ट्रपती सी.पी राधाकृष्णन यांची भेट

    भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी राजधानी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती शिपोकोसा पॉलस माशातिले याची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर, व्यापार वाढवण्यावर आणि जागतिक हित्यांच्या मुद्द्यांवर सहकार्य बळकट करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

    #WATCH | Shipokosa Paulus Mashatile, Deputy President of South Africa, along with his delegation, meets Vice President CP Radhakrishnan in Delhi pic.twitter.com/djxFCpcMZL

    — ANI (@ANI) June 2, 2026

  • 02 Jun 2026 03:25 PM (IST)

    02 Jun 2026 03:25 PM (IST)

    सट्टेबाजांवर नेम धरला पण गोळी न्यूज पोर्टल्सना

    Karanataka Cyber Police: नुकतीच आयपीएलचा अंतिम सामना पार पडला. गुजरात विरुद्ध आरसीबी अंतिम सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने विजेतेपद पटकावले आहे. दरम्यान आरसीबी आणि चाहते विजयाचा जल्लोष करत असतानाच कर्नाटकच्या सायबर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. वाचा सविस्तर

  • 02 Jun 2026 03:15 PM (IST)

    02 Jun 2026 03:15 PM (IST)

    उजनी धरण ‘उणे २१’ टक्क्यांवर! ‘सुपर एल निनो’मुळे यंदा पाऊस लांबण्याचा धोका; चिंता वाढली

    Ujjani Dam Storage: राज्याच्या दुष्काळी भागासाठी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून धरण आता उणे २१ टक्क्यांवर पोहोचले आहे. यंदा ‘सुपर एल निनो’ च्या प्रभावामुळे मान्सून लांबण्याची आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केल्याने उजनीतील उपलब्ध पाणी केवळ पिण्याच्या वापरासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेती व नदीसाठी पाणी सोडण्यावर पूर्णविराम लागला असून पुढील निर्णय राज्य शासनाच्या स्तरावर घेतला जाणार आहे. वाचा सविस्तर

  • 02 Jun 2026 03:10 PM (IST)

    02 Jun 2026 03:10 PM (IST)

    कुर्डुवाडी-बार्शी मार्गावर भीषण अपघात

    सोलापूर: सोलापूर येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावरील चिंचगाव (ता. माढा) शिवारात एसटी बस आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की यात थेट दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांची अवघ्या ७ वर्षांची मुलगी सुदैवाने बचावली आहे. ती गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना माईलस्टोन इंग्लिश मीडियम स्कूलजवळ घडला आहे. वाचा सविस्तर

  • 02 Jun 2026 03:05 PM (IST)

    02 Jun 2026 03:05 PM (IST)

    जपानमध्ये चक्रीवादळ जांगमीचा धुमाकूळ

    Typhoon Jangmi News in Marathi : जपानमध्ये विनाशकारी चक्रीवादळ जांगमीने पुन्हा एकदा कहर केला आहे. मंगळवारी (०२ जून) या वादळाने दुपारपर्यंत हाहाकार माजवला. या वादळाच नऊ जण गंभीर झाले असून देशाच्या अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे जपानी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. वाचा संपूर्ण अपडेट

  • 02 Jun 2026 02:59 PM (IST)

    02 Jun 2026 02:59 PM (IST)

    मिरा-भाईंदर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ची मोठी कारवाई

    भाईंदर: मिरा रोड येथील एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ प्रकरणाच्या तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने तेलंगणातील जहीराबाद येथे सुरू असलेला एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करत ६.२२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण अंमली पदार्थ रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाला असून आतापर्यंत या प्रकरणात एकूण २०.७२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    नयानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, ४ एप्रिल २०२६ रोजी मिरा रोड पूर्व येथील छेडा आदर्श बिल्डिंगमधील एका घरावर टाकलेल्या छाप्यात १ किलो ३२४ ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. या पदार्थाची बाजारातील किंमत तब्बल २ कोटी ६६ लाख १७ हजार २८० रुपये इतकी होती. या प्रकरणात श्रीमती फिरदोस अरबाज कुरेशी व तिचा पती अरबाज वकील कुरेशी यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • 02 Jun 2026 02:47 PM (IST)

    02 Jun 2026 02:47 PM (IST)

    अवघड ट्रेकमध्ये चिमुकल्यांची दमदार कामगिरी

    जुन्नर परिसरातील अत्यंत आव्हानात्मक जीवधन गड ते वानरलिंगी सुळका हा ट्रेक ५ वर्षीय पाखी महाले आणि १२ वर्षीय आयुष महाले यांनी यशस्वीरित्या पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
    सुमारे ३०० फुटांची खोल दरी झिपलाईनद्वारे पार करत ४०० फूट उंच सुळक्यावर चढाई आणि त्यानंतर रॅपलिंग करत त्यांनी हा धाडसी ट्रेक पूर्ण केला. देहरे (बोरीचापाडा), जव्हार येथील रहिवासी देवदत्त महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही भावंडांनी दाखवलेल्या जिद्द, धाडस आणि आत्मविश्वासाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • 02 Jun 2026 02:36 PM (IST)

    02 Jun 2026 02:36 PM (IST)

    विजेचे खेळखंडोबा.. नेरळकर धडकले महावितरण कार्यालयात..

    नेरळ मध्ये गेली काही दिवस सतत वीज पुरवठा खंडित होत आहे.सोमवारी पावसाची स्थिती नव्हती की विजेचे कडकडाट नव्हता.अशावेळी रात्री दहा वाजता वीज खंडित झाली आणि नेरळ ग्रामस्थ संतप्त झाले.त्यांनी 300 च्या संख्येने महावितरण कार्यालय गाठले आणि आपला संताप व्यक्त केला. नेरळ परिसरात वारंवार आणि तासन्‌तास वीजपुरवठा खंडित होत होती. रात्री तर पावसाची कोणतीही स्थिती नव्हती आणि वीज गेल्याने वीज ग्राहकांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी निर्माण झाली आहे. वीज गेल्याने संतप्त झालेल्या सुमारे २०० ते ३०० वीज ग्राहकांनी महावितरण कार्यालय गाठत जोरदार निषेध नोंदविला . पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. दरम्यान, सततच्या वीज समस्येविरोधात मोर्चा काढून आपला संताप व्यक्त करण्याची धमकी दिली आहे.मात्र वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून नेरळकर आक्रमक झाले.पोलिसांनी महावितरण अधिकाऱ्यांना समजावत सांगत वीज गेल्यावर ग्राहकांचे फोन उचलण्याचे काम करावे आहे सूचित केले.मात्र जमाव प्रचंड असल्याने पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.

  • 02 Jun 2026 02:29 PM (IST)

    02 Jun 2026 02:29 PM (IST)

    सात प्रमुख मागण्यांसाठी पालघर मधे आमरण उपोषण

     

    पालघरमध्ये आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून वातावरण तापले आहे. आदिवासी एकता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुद्दत आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून, सात प्रमुख मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

  • 02 Jun 2026 02:17 PM (IST)

    02 Jun 2026 02:17 PM (IST)

    भिवंडीतील नरपोली पोलीस ठाणे दहशतवाद्यांच्या रडारवर

    भिवंडी उत्तर प्रदेश एटीएसच्या तपासात भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. वांद्रेतील गरीबनगर परिसरातील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर हल्ल्याचा कट रचण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दानियाल अशरफ याने नरपोली पोलीस ठाण्याचे फोटो तसेच परिसरातील पुलाचा व्हिडिओ तयार करून पाकिस्तानस्थित हँडलर्सना पाठवल्याचा आरोप आहे. आरोपींना पोलिस ठाणी आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत संवेदनशील माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

  • 02 Jun 2026 02:10 PM (IST)

    02 Jun 2026 02:10 PM (IST)

    'लाडकी बहीण' योजनेला मोठी कात्री

    राज्यात मोठ्या गाजावाजासह सुरू झालेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेबाबत एक मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या गेमचेंजर ठरलेल्या या योजनेतील तब्बल ८१ लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत. बँक पडताळणी, ई-केवायसी मोहीम आणि कौटुंबिक उत्पन्नाच्या माहितीची काटेकोर छाननी केल्यानंतर महिला व बालविकास विभागाने ही मोठी कपात केली आहे. या कपातीनंतर आता योजनेतील पात्र महिलांची संख्या १ कोटी ६६ लाखांवर आली आहे. २.४७ कोटींवरून १ कोटी ६६ लाखांवर संख्या योजनेच्या सुरुवातीला कोणतीही कडक तपासणी नसताना सरसकट सर्वांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते, ज्यामुळे सुरुवातीला लाभार्थींची संख्या २.४७ कोटींवर पोहोचली होती. मात्र, यामध्ये अनेक बोगस लाभार्थी असल्याचे आणि पुरुष तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विभागाने बँक खाती आणि आधार जोडणीची पडताळणी सुरू केली.

  • 02 Jun 2026 02:00 PM (IST)

    02 Jun 2026 02:00 PM (IST)

    पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ‘या’ बड्या कंपन्यांमध्ये पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू!

    पंतप्रधान मोदी यांनी कार्यालये आणि व्यवसायांना शक्य तिथे वर्क फ्रॉम होम (घरी राहून काम करणे) करण्याचे आणि अनावश्यक प्रत्यक्ष बैठकांऐवजी ऑनलाईन परिषदा घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नागरिकांना वाहनांचा अनावश्यक वापर कमी करण्याचे आणि बिगर-गरजेचे आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचेही आवाहन केले आहे.पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनामुळे नागरिक आणि व्यवसायांना कोविड काळातील वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल बैठकांचे दिवस पुन्हा आठवले आहेत. वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देण्यासोबतच, कंपन्या अधिकृत प्रवास कमी करणे, इंधनाचा वापर मर्यादित करणे आणि डिजिटल बैठकांना प्रोत्साहन देणे यावरही भर देत आहेत.

  • 02 Jun 2026 01:55 PM (IST)

    02 Jun 2026 01:55 PM (IST)

    कमाल फीचर्सचा डबल तडका! Huawei च्या दोन स्मार्टफोन्सची चीनमध्ये एंट्री…

    टेक कंपनी Huawei ने चीनमध्ये त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज Nova 16 लाँच केली आहे. कंपनीने या स्मार्टफोन सिरीजअंतर्गत Nova 16 Ultra, Nova 16 Pro, Nova 16, आणि Nova 16z हे चार स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यापैकी Huawei Nova 16 Pro आणि Nova 16 Ultra चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

  • 02 Jun 2026 01:45 PM (IST)

    02 Jun 2026 01:45 PM (IST)

    30 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी पाठलाग करुन पकडले

    राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरटे दररोज नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्यांचे गुन्हे करणाऱ्या अट्टल आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच वाहने असा तब्बल ४५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • 02 Jun 2026 01:35 PM (IST)

    02 Jun 2026 01:35 PM (IST)

    आंबेगाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली; धरणातील पाणीसाठा सध्या केवळ दहा टक्क्यांवर

    डिंभे धरणातील पाणी कमी झाल्याची माहिती मिळताच विस्थापित गावकरी आणि पर्यटकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक जण आपल्या जुन्या घरांच्या जागा शोधताना आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. पाण्याच्या गर्भात लपलेले जैन मंदिर, जुन्या वस्तीचे अवशेष आणि बाजारपेठेच्या खुणा पाहून गावकऱ्यांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. मात्र, या आठवणींसोबत विस्थापनाच्या जखमाही पुन्हा ताज्या होत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी मावळ खोऱ्यातील व्यापारी केंद्र असलेल्या या गावातून परिसरातील अनेक गावांचा आर्थिक व्यवहार चालत असे. त्यामुळे या गावाशी अनेक कुटुंबांच्या भावना जोडलेल्या आहेत.

  • 02 Jun 2026 01:25 PM (IST)

    02 Jun 2026 01:25 PM (IST)

    ‘स्वतःच्या सौंदर्याचा वापर करून…’, कंगना रनौतने गिरिजा ओकच्या ‘नॅशनल क्रश’ या टॅगची उडवली खिल्ली?

    आपल्या बोल्ड स्टाईल आणि स्पष्टवक्त्या वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी कंगना रणौत सध्या तिच्या आगामी देशभक्तीपर ॲक्शन-ड्रामा चित्रपट ‘भारत भाग्य विधाता’मुळे चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून, त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ‘भारत भाग्य विधाता’ प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत. दरम्यान, आता कंगना रणौतचे एक वक्तव्य समोर आले असून, त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

  • 02 Jun 2026 01:15 PM (IST)

    02 Jun 2026 01:15 PM (IST)

    अमेरिकेत अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा; ३० भारतीय ट्रक चालक अटकेत

    अमेरिकेत बेकायदेशीरपणे ट्रक चालवणाऱ्या ३० भारतीयांना अटक करण्यात आली आहे. ऑपरेशन चेकमेटच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून या व्यक्तींना हद्दपार केले जाण्याची शक्यता आहे. सध्या हे भारतीय ट्रक ड्रायव्हर अमेरिकन सीमा गस्त दलाच्या ताब्यात आहेत. सध्या अमेरिकेत अनधिकृत भारतीय ट्रक ड्रायव्हर्सना हद्दपार करण्याची विशेष मोहिम सुरु आहे. ११ मे ते १५ मे दरम्यान अॅरिझोनाच्या युमा सेक्टरमध्ये ऑपरेशन चेकमेट राबवण्यात आले. या कारवाईदरम्यान ५२ जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये ३० भारतीय ट्रक ड्रायव्हरचा समावेश आहे. यूएस कस्टम्स अँड बॉर्ड प्रोटेक्शनने या १ जून रोजी याबाबत माहिती दिली.

  • 02 Jun 2026 01:05 PM (IST)

    02 Jun 2026 01:05 PM (IST)

    रायगडावर रंगणार ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा, ४० समित्यांमार्फत जय्यत नियोजन

    रायगडावर येत्या 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत होणार आहे. दूर्गराज रायगडावर 6 जून 2026 रोजी होणाऱ्या 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची शिवभक्तांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. दुर्गराज रायगड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 5 आणि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दिमाखात आणि वैविध्यपूर्ण उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. ६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडावर शिवाजी महाराजांना “छत्रपती” पदाने गौरविण्यात आले आणि हिंदवी स्वराज्याची अधिकृत स्थापना झाली. हा दिवस महाराष्ट्रात आणि विशेषतः रायगडावर अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.

  • 02 Jun 2026 01:02 PM (IST)

    02 Jun 2026 01:02 PM (IST)

    लातूर विमानतळ विकासासाठी 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर

    लातूर जिल्ह्याच्या हवाई संपर्क व्यवस्थेलानवी दिशा देणारा आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, लातूर विमानतळाच्या सर्वांगीन विकासासाठी ५६.७४ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच विमानतळाच्या नियमित परिचालनासाठी प्रतिवर्ष ३७.७८ लाख रुपयांच्या खर्चालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरकरांना दिलेला शब्द पूर्ण करत हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

  • 02 Jun 2026 12:48 PM (IST)

    02 Jun 2026 12:48 PM (IST)

    मी किंचितही मागे हटणार नाही; विकास लवांडे यांचा निर्धार

    “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो त्याचे प्राशन करतो तो घुरघुरल्याशिवाय राहत नाही. याच विचारांचा आधार घेत मी सामाजिक आणि वैचारिक प्रश्न उपस्थित केले, त्यामुळेच माझ्यावर नियोजित पद्धतीने हल्ला झाला,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला. मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहाला गुरुवारी (दि.२८) दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. “आपण कोणत्याही व्यक्तीच्या जाती-धर्माच्या विरोधात नाही. हा पूर्णपणे वैचारिक लढा आहे आणि तो शेवटपर्यंत सुरू राहील. कितीही प्रकार माझ्यासोबत घडले तरी मी किंचितही मागे हटणार नाही,” असा निर्धार लवांडे यांनी व्यक्त केला.

  • 02 Jun 2026 12:36 PM (IST)

    02 Jun 2026 12:36 PM (IST)

    प्रताप सरनाईकांचा देवगड आगारातील अधिकाऱ्यांना इशारा

    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील सर्व आगारांच्या परिसरात ७८ हजार झाडे लावण्याचा संकल्प राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. रविवारी देवगड आगाराला भेट देऊन त्यांनी बसस्थानकाची सविस्तर पाहणी केली. यावेळी प्रवासी, नागरिक आणि एसटी कर्मचाऱ्यांनी विविध समस्यांचा पाढाच मंत्र्यांसमोर वाचला. यावर तात्काळ दखल घेत संबंधित समस्या सोडवून त्याबाबतचा अहवाल त्वरित सादर करा, अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा सरनाईक यांनी विभाग नियंत्रक व संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

  • 02 Jun 2026 12:24 PM (IST)

    02 Jun 2026 12:24 PM (IST)

    माळेगाव परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

    बारामती तालुक्यातील माळेगाव तसेच माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अवैध गावठी व देशी दारूच्या धंद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या अवैध व्यवसायांमुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असून परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. विशेष म्हणजे या प्रकारांकडे संबंधित यंत्रणेकडून अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

  • 02 Jun 2026 12:12 PM (IST)

    02 Jun 2026 12:12 PM (IST)

    आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर!

    फुगेवाडीतील विषारी दारूकांडामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा रोष सोमवारी सायंकाळी उशिरा पुन्हा एकदा उफाळून आला. या प्रकरणातील आरोपींना तपास आणि पंचनाम्यासाठी सीआयडीच्या पथकाने घटनास्थळी आणल्यानंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींना परत नेत असताना नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. काहींनी आरोपींकडे धाव घेण्याचाही प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला होता. सीआयडीचे पथक सोमवारी सायंकाळी आरोपींना घेऊन फुगेवाडीत दाखल झाले होते. घटनास्थळी पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू असताना परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र तपास सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. तपासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींना पुन्हा वाहनाकडे नेण्यात येत असताना नागरिकांचा संताप अचानक उसळला. दारूकांडात मृत्यूमुखी पडलेल्या आणि बाधित झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड रोष असल्याचे यावेळी दिसून आले. काही नागरिकांनी आरोपींना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी थेट त्यांच्याकडे धाव घेतली.

  • 02 Jun 2026 11:50 AM (IST)

    02 Jun 2026 11:50 AM (IST)

    राज्यात पाणीटंचाईची भीती; महाराष्ट्रातील धरणांत अवघा 27.79% पाणीसाठा

    गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात आता सर्वांना पावसाची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रामध्ये 10 जूनपर्यंत मान्सून येण्याची शक्यता कमी असून, तो अजून केरळमध्ये पोहोचलेला नाही. दरम्यान, राज्यात तीव्र उष्णता आणि इतरत्र अवकाळी पावसाचा अनुभव येत आहे. या परिस्थितीत, धरणांमधील पाणीसाठा सातत्याने कमी होत आहे.

  • 02 Jun 2026 11:49 AM (IST)

    02 Jun 2026 11:49 AM (IST)

    National Politics: देशाच्या राजकारणात भुकंपाचे संकेत; आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

    West Bangal  Politics : पश्चिम बंगालच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या उलथापालथी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण सातत्याने बदलत चालले आहे. पक्षांतर्गत राजीनाम्यांमुळे पश सत्रामुळे पश्चिम बंगलाच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसले जणू धक्क्यांमागून धक्के बसू लागले आहेत. अशातच आता बंगालच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत असून, थेट ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना वगळून एक ‘नवीन तृणमूल काँग्रेस’ पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

     

  • 02 Jun 2026 11:40 AM (IST)

    02 Jun 2026 11:40 AM (IST)

    नेतन्याहूंवर भडकले ट्रम्प? लेबनॉनवरील हल्ल्यांवरुन पेटला वाद

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) इस्रायलचे पंतप्रधानांवर भडकले असल्याची माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, लेबनॉनवरील इस्रायलच्या आक्रमक भूमिकेमुळे ट्रम्प बेंजामिन नेतन्याहूंवर तीव्र नाराज आहेत. यामुळेच इराणसोबतची शांतता चर्चा धोक्यात आली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

  • 02 Jun 2026 11:30 AM (IST)

    02 Jun 2026 11:30 AM (IST)

    खुर्चीवर इंदिरा गांधी अन् जमिनीवर राज कपूर, मनोज कुमार; बॉलिवूडच्या दिग्गजांचा हा दुर्मिळ फोटो चर्चेत

    भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे बॉलिवूडसोबत एक विशेष नाते होते. अनेक चित्रपट कलाकारांशी त्यांची घनिष्ठ मैत्री असली तरी, इतरांशी त्यांचे संबंध काहीसे गुंतागुंतीचेही होते. जेव्हा इंदिरा गांधींनी १९७५ मध्ये आणीबाणी लागू केली, तेव्हा बॉलिवूड आणि सरकार यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. एक जुना फोटो सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इंदिरा गांधी अनेक आघाडीच्या बॉलिवूड कलाकारांसोबत दिसत आहेत. फिरोज खान, शर्मिला टागोर, सायरा बानू, राजेंद्र कुमार, गुलशन रॉय, यश चोप्रा, श्रीराम बोहरा, बी. आर. चोप्रा, शशी कपूर आणि लता मंगेशकर यांसारखे प्रमुख कलाकार उभे राहून पोज देताना दिसत आहेत. लता मंगेशकर इंदिरा गांधींच्या जवळ उभ्या आहेत. हे छायाचित्र इंदिरा गांधींच्या पहिल्या कार्यकाळातील (१९६६ ते १९७१) असल्याचे मानले जाते. पण, या छायाचित्राचे नेमके वर्ष अस्पष्ट आहे.

  • 02 Jun 2026 11:20 AM (IST)

    02 Jun 2026 11:20 AM (IST)

    Jalna Crime: स्वतःचा मृत्यू दाखवण्यासाठी तरुणाचा खून; विम्याच्या पैशांसाठी रचला थरारक कट, पोलिसांचा मोठा खुलासा

    जालना जिल्ह्यात कार जळून व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला अपघात मानली जात होती. मात्र पोलिस तपासात हा नियोजनबद्ध खून असल्याचे उघड झाले. विम्याची रक्कम आणि कर्जातून सुटका मिळवण्यासाठी नितीन गवळीने एका तरुणाचा खून करून मृतदेह कारमध्ये जाळल्याचा आरोप आहे. दोन आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार फरार आहे.

  • 02 Jun 2026 11:10 AM (IST)

    02 Jun 2026 11:10 AM (IST)

    चोरीच्या आरोपावरुन दलित मुलीला गावभर फिरवलं, झाडाला बांधून केली बेदम मारहाण; आरोपीवर तक्रार दाखल

    चोरीच्या आरोपाखाली १४ वर्षीय मुलीला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला ज्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

  • 02 Jun 2026 10:55 AM (IST)

    02 Jun 2026 10:55 AM (IST)

    शेजाऱ्याची हैवानीयत! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

    उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या आरोपीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीला पकडण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याच्या मुसक्या आवळण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

  • 02 Jun 2026 10:50 AM (IST)

    02 Jun 2026 10:50 AM (IST)

    स्वतःचा मृत्यू दाखवण्यासाठी तरुणाचा खून; विम्याच्या पैशांसाठी रचला थरारक कट

    जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 31 मे 2026 रोजी एका कारचा अपघात झाला होता. अपघातावेळी कारला आग लागली होती. आणि या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा प्रकार अपघाताची वाटत असल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, जालना पोलिसांनी केलेल्या तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपासानंतर या घटनेमागील अत्यंत धक्कादायक सत्य समोर आली आहे. हा प्रकार अपघात नसून एक नियोजनबद्ध हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • 02 Jun 2026 10:45 AM (IST)

    02 Jun 2026 10:45 AM (IST)

    चोरीच्या आरोपावरुन दलित मुलीला झाडाला बांधून केली बेदम मारहाण

    उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, तरकुलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिश्रौली गावात, चोरीच्या आरोपाखाली दलित किशोरी नावाच्या मुलीला झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. तिचे केस पकडून गावभर तिची धिंड काढल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे ज्यानंतर पोलिसांनी घटनेवर कायदेशीर तक्रार दाखल केली. घटनेतील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  • 02 Jun 2026 09:59 AM (IST)

    02 Jun 2026 09:59 AM (IST)

    करमाळा तालुक्यातील केतुर येथे वादळी वाऱ्याचा फटका

    करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील केतुर नंबर एक येथे रविवारी (दि.31) रात्रीच्या सुमारास अचानक वादळी वारा आला. या वादळी वाऱ्याचा तडाखा एका वृद्ध दाम्पत्याला बसला. या वादळात घराची भिंत अंगावर कोसळून वृद्ध पती-पत्नीचा मृत्यू झाला. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील केत्तूर,1 तसेच करमाळा तालुक्याच्या उजनी लाभक्षेत्रातील पोमलवाडी येथील वृद्ध दाम्पत्य उजनी जलाशया जवळील आपल्या वस्तीवर राहत होते. रविवार (ता.31) रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने सिमेंट विटा एकावर एक रचून तयार केलेल्या भिंत अंगावर कोसळून जागीच दोघा नवले दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • 02 Jun 2026 09:50 AM (IST)

    02 Jun 2026 09:50 AM (IST)

    गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट!

    फ्री फायर मॅक्समध्ये स्लिपी रिंग ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट पुढील काही दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना विविध रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

Web Title: 2nd june2026 live breaking news marathi maharashtra national international sports crime share market iran israel war news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • National Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

Viral Video: एका क्षणात होत्याच नव्हतं झालं असतं पण… व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल
2

Viral Video: एका क्षणात होत्याच नव्हतं झालं असतं पण… व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

Wildlife Rescue: जीवासाठी तासन्‌तास झुंज…  पण मदत पोहोचण्याआधीच अस्वलासोबत घडलं भयंकर, video Viral
3

Wildlife Rescue: जीवासाठी तासन्‌तास झुंज… पण मदत पोहोचण्याआधीच अस्वलासोबत घडलं भयंकर, video Viral

Maharashtra Breaking News Updates Today: ‘डीपफेक’ विरोधात नितीन गडकरी यांची कोर्टात याचिका दाखल
4

Maharashtra Breaking News Updates Today: ‘डीपफेक’ विरोधात नितीन गडकरी यांची कोर्टात याचिका दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.