Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तयार राहा…, पुढील आठवड्यात पालिका निवडणूकासह स्था.स्व.संस्थांच्या निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष…

सुप्रीम कोर्टात लवकरच सुनाणी होऊन निकाल लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच पुढील आठवड्यात पालिका निवडणूकासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता असून, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 29, 2023 | 12:09 PM
तयार राहा…, पुढील आठवड्यात पालिका निवडणूकासह स्था.स्व.संस्थांच्या निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष…
Follow Us
Follow Us:

मुंबई– राज्यातील अनेक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मागील आठवड्यात महापालिकांच्या निवडणुकांबाबत (Municipality Elections) सुनावणी पार पडली. मात्र सुनावणी पुढे ढकलली आहे, त्यामुळं ही सुनावणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचं बोललं जात आहे. ओबीसी आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्यानंतर या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. या निर्णयाविरोधात वेगवेगळ्या 13 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुप्रीम कोर्टात लवकरच सुनाणी होऊन निकाल लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच पुढील आठवड्यात पालिका निवडणूकासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता असून, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कधी होणार निवडणुका?

स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातलं प्रकरण मागील आठवड्यात सुप्रीम कोर्टात पहिल्या क्रमांकावर होतं. निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा निर्णय सुप्रीम कोर्टात होणार आहे. मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड यांना मिळून एकूण 20 पेक्षा अधिक महापालिकांच्या निवडणुका कधी होणार, हे स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. निवडणुका मार्च, एप्रिल किंवा मे महिन्यात होतील असं बोललं जात आहे. त्यामुळं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार निर्णयाकडे सगळ्यांचीच नजर लागलीय.

शिंदे सरकारचं आव्हान…

या प्रकरणावर सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठित करण्याचेही आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. मुंबईतील प्रभाग रचनेबाबतचा निर्णय देखील पाच आठवड्यांसाठी जैसे थे ठेवावा, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. महाविकास आघाडीच्या काळात मुंबईच्या प्रभाग रचनेत बदल करण्यात आला होता आणि वॉर्डांची संख्या 227 हून 236 करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यावर त्यांनी वॉर्डांची संख्या 227 केली. याला शिवसेनेनी आव्हान दिले होते. 20 जुलै 2017 रोजी सुप्रीम कोर्टानं मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणास परवानगी दिली होती. मात्र, ज्या 367 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया आधीच पुढे गेलीय, तिथं ओबीसी आरक्षण देऊ नये, असंही म्हटलं होतं.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होणार?

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाचा मुद्दा ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. तसेच यावर वारंवार सुनावणी पुढे ढकलत आहेत, त्यामुळं मागील वर्षापासून पालिका निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत, त्याचा तरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होतो का? याची सर्वांना प्रतिक्षा आहे.

Web Title: Be ready election dates for local bodies including municipal elections likely to be announced next week all eyes on the supreme court decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2023 | 12:09 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Amit Shah
  • amit thackeray
  • Ashish Shelar
  • BJP
  • BKC ground
  • BMC
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • J. P. Nadda
  • jayant patil
  • Maharashtra BJP
  • Metro Rail
  • Mumbai
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Nitesh Rane
  • PM Narendra Modi
  • Prasad Lad
  • Projects in Maharashtra
  • Rahul Gandhi
  • raj thackeray
  • Rashmi Thackeray
  • shivsena
  • supriya sule
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून राहुल नार्वेकर विरुद्ध कपिल सिब्बल; ‘बिनबुडाचे आरोप’, विधानसभा अध्यक्षांचा पलटवार
1

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून राहुल नार्वेकर विरुद्ध कपिल सिब्बल; ‘बिनबुडाचे आरोप’, विधानसभा अध्यक्षांचा पलटवार

Ashish Shelar: Gen Z साठी मराठी सिनेमाचा नवा अंदाज! सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा
2

Ashish Shelar: Gen Z साठी मराठी सिनेमाचा नवा अंदाज! सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती करु नका; पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याची सपकाळांकडे मागणी
3

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती करु नका; पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याची सपकाळांकडे मागणी

Kalyan Dombivli Politics: कल्याण-डोंबिवलीत भाजप-मनसे संघर्ष पेटला; ‘सलाम-डकार’वरून नंदू परब आणि मनसे आमनेसामने
4

Kalyan Dombivli Politics: कल्याण-डोंबिवलीत भाजप-मनसे संघर्ष पेटला; ‘सलाम-डकार’वरून नंदू परब आणि मनसे आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.