Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: “संघाने सांगितले तर राजीनामा देतो”, मोहन भागवतांचे खळबळजनक विधान

Maharashtra Live Updates: भारतात सध्या सोन्याच्या दरामुळे ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. वाढत्या सोन्याच्या आणि चांदीच्या दरांमुळे ग्राहक हैराण झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 09, 2026 | 07:01 PM
Top Marathi News Today Live : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरणावर रोहित पवार आज बोलणार

Top Marathi News Today Live : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरणावर रोहित पवार आज बोलणार

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News: टी-20 वश्वचषक सामना सुरु झाला आहे. काल झालेल्या श्रीलंका विरुद्ध आयर्लंड या सामन्यात श्रीलंकेने २०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडचा २० धावांनी पराभव करून पहिला विजय मिळवला. तर लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस सिझन 6 मध्ये एंटरटेनमेंटची राणी राखी सावंतने एंट्री होणार आहे. राखी सावंत या सिझनमधील पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक आहे. तर भारतात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात आज घसरण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

The liveblog has ended.
  • 09 Feb 2026 06:55 PM (IST)

    09 Feb 2026 06:55 PM (IST)

    Sharad Pawar Health: "... कोणीही पुण्यात येऊ नये"; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

    Ruby Hospital Pune: राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर  या ठिकाणी उपचार केले जात आहेत. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्या असल्याचे समोर आले आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी याबाबत भाष्य केले असून, कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

  • 09 Feb 2026 06:38 PM (IST)

    09 Feb 2026 06:38 PM (IST)

    Weather Update : उन्हाळ्याची चाहूल; मात्र रात्री थंडी कायम; चिमुकल्यांच्या आरोग्यावर परिणाम

    अमरावती: शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली असली तरी रात्रीची थंडी अजूनही कायम असल्याने दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत जाणवू लागली आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री थंड हवामान याचा थेट परिणाम नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. शाळकरी मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. तसेच हवामानातील सततच्या बदलामुळे टायफॉइडसारख्या गंभीर आजारांची लक्षणेही दिसू लागली आहेत.

  • 09 Feb 2026 06:30 PM (IST)

    09 Feb 2026 06:30 PM (IST)

    Patan Election Result: पाटणमध्ये ‘शंभू’राज! पालकमंत्री शंभूराज देसाईंचा भाजपला धोबीपछाड; देसाई गटाचा एकतर्फी विजय

    पाटण, (वा.): संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत देसाई गटाने विरोधकांचा सुफाडा साफ करत निर्विवाद विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या ७ पैकी ६ व पंचायत समितीच्या १४ पैकी १३ जागांवर विजय मिळवून पाटण तालुक्यात ‘शंभू’राज स्थापन केले.

  • 09 Feb 2026 06:23 PM (IST)

    09 Feb 2026 06:23 PM (IST)

    तुमच्याकडे Kia ची EV कार आहे? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठी आहे खास, वाचा सविस्तर…

    मुंबई: किया इंडिया या ऑटोमोबाईल कंपनीने आज भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) सोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केल्‍याची घोषणा केली. या सहयोगांतर्गत त्‍यांच्‍या सार्वजनिक ईव्‍ही चार्जिंग नेटवर्कचा विस्‍तार करण्‍यात आला आहे. तसेच त्‍यांची के-चार्ज परिसंस्‍था देशभरात १५,००० हून अधिक चार्जिंग टचपॉइण्‍ट्सपर्यंत वाढली आहे. हा धोरणात्‍मक सहयोग किया ईव्‍ही ग्राहकांसाठी चार्जिंग सुविधा अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देतो.  तसेच इलेक्ट्रिक वेईकल अवलंबनामधील सर्वात मोठ्या अडथळ्यांचे निराकरण करतो, जेथे रेंजसंदर्भात आत्‍मविश्वास निर्माण करतो.

  • 09 Feb 2026 06:17 PM (IST)

    09 Feb 2026 06:17 PM (IST)

    नाणेकरवाडी–म्हाळुंगे गटात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम; जिल्हा परिषदेसह पंचायत समितीत संमिश्र निकाल

    चाकण/अतिश मेटे : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया शनिवारी सायंकाळी पूर्ण झाली. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. खेड तालुक्यातील नाणेकरवाडी–म्हाळुंगे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरण स्पष्ट झाले आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समिती म्हाळुंगे गणात विजय मिळवत आपला प्रभाव कायम राखला असून, पंचायत समिती नाणेकरवाडी गणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने बाजी मारली आहे.

  • 09 Feb 2026 06:04 PM (IST)

    09 Feb 2026 06:04 PM (IST)

    “… हे स्पष्ट झाले आहे”; जिल्हा परिषदेच्या निकालावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे भाष्य

    Zp Election And Pancyat Samiti Elections: आज राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचा निकाल जाहीर होत आहे. मतमोजणी शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. राज्यात भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीने घवघवीत यश प्राप्त केले आहे. दरम्यान यावर आता राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 09 Feb 2026 05:38 PM (IST)

    09 Feb 2026 05:38 PM (IST)

    थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी, ‘तू या मैं’ची OTT रिलीज डेट जाहीर

    “तू या मैं” हा चित्रपट व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी १३ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी या सर्व्हायव्हल थ्रिलरची ओटीटी रिलीज तारीख देखील जाहीर केली आहे. बिजॉय नाम्बियार दिग्दर्शित हा चित्रपट १० एप्रिलपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. यात आदर्श गौरव आणि शनाया कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

  • 09 Feb 2026 05:14 PM (IST)

    09 Feb 2026 05:14 PM (IST)

    पहिल्यांदाच Maruti Victoris वर मिळतेय धकामकेदार सूट!

    मिळालेल्या माहितीनुसार, मारुतीकडून Victoris SUV वर या महिन्यात हजारो रुपयांची बचत करण्याची संधी दिली जात आहे. कंपनीकडून या कारच्या अनेक व्हेरिएंट्सवर आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आले आहेत. माहितीनुसार, या SUV वर कमाल 78 हजार रुपये पर्यंतची ऑफर दिला जात आहे. ही ऑफर Victoris च्या E-CVT Strong Hybrid व्हेरिएंटवर उपलब्ध असून, यात कॅश ऑफर आणि लॉयल्टी बोनसचा समावेश आहे.

  • 09 Feb 2026 04:50 PM (IST)

    09 Feb 2026 04:50 PM (IST)

    परभणीच्या जनतेने “घराणेशाही नाकारली; भाजप नेते सुरेश वरपुडकर कुटुंबाचा पराभव

    महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी अनेक राजकीय नेत्यांची झोप उडवली आहे. परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक निकाल समोर आला आहे. परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी प्रमुख भाजप नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबाला पूर्णपणे नाकारल्याचे चित्र आहे. परभणी जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या वरपुडकर कुटुंबासाठी ही निवडणूक एका मोठ्या राजकीय झटकाच मानली जात आहे. याचे कारण म्हणजे, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वरपुडकर यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांपैकी चार जणांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  • 09 Feb 2026 04:45 PM (IST)

    09 Feb 2026 04:45 PM (IST)

    निवडणूक ड्युटीला दांडी मारणाऱ्या ११९ कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल; प्रशासनाचा कडक इशाारा

    जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २०२६ दरम्यान (ZP Election 2026) नियुक्त करण्यात आलेले तब्बल ११९ कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता गैरहजर राहिल्याने मतदान प्रक्रियेत गंभीर अडथळे निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार गंगापुरात उघड झाला आहे. या प्रकरणी स्वीप कक्ष प्रमुख अरविंद कापसे यांच्या फिर्यादीवरून गंगापुर पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 09 Feb 2026 04:35 PM (IST)

    09 Feb 2026 04:35 PM (IST)

    रक्तासाठीची धावपळ संपणार! ई-रक्तकोशवर मिळणार संपूर्ण माहिती, जिल्ह्यात २ शासकीय तर ६ खाजगी रक्तपेढ्या

    रुग्णांना आवश्यक रक्तसाठ्याची माहिती सहज आणि तत्काळ मिळावी, यासाठी केंद्र सरकारने ‘ई-रक्तकोश’ हे ऑनलाइन पोर्टल विकसित केले. या पोर्टलमुळे थेंलसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेलसह विविध आजारांच्या रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी करावी लागणारी धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. रुग्ण, रक्तदान शिबिरांचे आयोजक आदींना उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती सहज मिळावी, यासाठी केंद्र आरोग्य मंत्रालयाने शासनाने ‘ई- रक्तकोश पोर्टल’ विकसित केले. या पोर्टलवर रक्ताविषयीची सर्व माहिती एका क्लिकवर मिळते. थैलसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि रक्ताशी निगडित इतर आजारांचे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची रक्त मिळवण्यासाठीची धावपळ मात्र कमी होणार आहे

  • 09 Feb 2026 04:30 PM (IST)

    09 Feb 2026 04:30 PM (IST)

    राजधानीवर संकट येणार? ‘दिल्ली खलिस्तान बनेल अन् संसदेत भीषण…’; Bomb ने उडवण्याची धमकी

    सध्याचे युग हे सोशल मिडियचे आहे. सोशल मिडियाचा चांगला वापर करण्याऐवजी काही जण धमकी देणे,घाबरवणे असा वापर करताना दिसून येतात. आज सकाळीच राजधानी दिल्लीतील अनेक मोठ्या शाळांना आणि संसदेला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. यामुळे शाळा आणि संसद भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

  • 09 Feb 2026 04:20 PM (IST)

    09 Feb 2026 04:20 PM (IST)

    “आज अजितदादा असते तर विजयोत्सव…” मावळातील निकालानंतर आमदार सुनील शेळके झाले भावूक

    मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ झाला आहे. राष्ट्रवादी पक्षाला मावळामध्ये मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी आमदार शेळके हे भावूक देखील झाले आणि त्यांनी आपली भावना व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दणदणीत विजयामागे मावळच्या जनतेचा विश्वास आणि नेतृत्वावरची निष्ठा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

  • 09 Feb 2026 04:15 PM (IST)

    09 Feb 2026 04:15 PM (IST)

    सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकरण! 16 हजारांची लाच घेऊन अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याचा आरोप

    मध्यप्रदेशच्या छतरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी हॉस्पिटलमधून वैद्यकीय नैतिकतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात नियमांचे उल्लंघन करून करण्यात आल्याचे समोर आले आहे. एका नर्सिंग ऑफिसरने अधिकृत डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हा अवैध प्रकार केला. त्यासाठी 16,000 रुपयांची लाच देखील घेतला. याचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे.

  • 09 Feb 2026 04:10 PM (IST)

    09 Feb 2026 04:10 PM (IST)

    Bigg Boss Marathi 6: ‘आता मी सतीसावित्री… उद्या होणार गांधारी!’ राखी सावंतने दाखवायला सुरु केला दणका

    ‘बिग बॉस मराठी ६’ ने अनेक वळणं पाहिली आहेत. पहिल्या वळणावर सगळे स्पर्धक वाचले. मग भांडून-खेळून एक-एक करत सगळे घराच्या बाहेर जाताना दिसत आहेत. कालच स्पर्धक ओमकार राऊत खेळातून बाद झाला पण या पर्वाची पहिली वाइल्ड कार्ड सदस्य राखी सावंतने घरात एंट्री घेतली आहे. आता या घरात काय-काय पाहायला मिळणार आहे? याचा अंदाज नक्कीच प्रेक्षकांना असेल. अशामध्ये प्रेक्षकांनी बिचूकले यांनाही शोमध्ये आणा अशी मागणी केली आहे.

  • 09 Feb 2026 04:05 PM (IST)

    09 Feb 2026 04:05 PM (IST)

    वाळव्यात जयंत पाटलांनी केला विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम; भाजप अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

    जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालात वाळवा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांनी आपल्या विरोधात एकवटलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. महायुतीच्या नेत्यांना मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. तर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मोठा फटका बसला आहे.

  • 09 Feb 2026 04:00 PM (IST)

    09 Feb 2026 04:00 PM (IST)

    मावळ तालुक्यात झेडपी–पंचायत समितीच्या १५ जागांवर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय

    Maval News : वडगाव मावळ : सतिश गाडे : मावळ तालुका येथे झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ने तब्बल १५ जागांवर दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे.(Maval News) गेल्या २५ वर्षांपासून मावळ पंचायत समितीवर सत्ता असलेल्या भाजपाला यावेळी एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे हा निकाल भाजपासाठी मोठा धक्का मानला जात असून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासाठीही हा पराभव राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे. (Political News)

    वाचा सविस्तर

  • 09 Feb 2026 03:50 PM (IST)

    09 Feb 2026 03:50 PM (IST)

    ZIM vs OMA, T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय

    ZIM vs OMA, ICC T20 World Cup 2026 : आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज कोलंबो  सिंहली स्पोर्ट्स क्लब स्टेडीयमवर झिम्बाब्वे आणि ओमान आमनेसामने आले आहेत. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर ओमान संघ  प्रथम फलंदाजी करणार आहे. झिम्बाब्वे संघ आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील पहिल्यास आमण्यात  चांगली कामगिरी करून विजयी सलामी देण्याच्या प्रयत्नात असणार आहे, तर ओमान संघ देखील या सामन्यात विजय मिळवून आपला सुरवात खास करण्याच्या विचारत असणार आहे.

     

  • 09 Feb 2026 03:40 PM (IST)

    09 Feb 2026 03:40 PM (IST)

    Punjab Crime: कॉलेजमध्ये गोळीबाराचा थरार!

    पंजाब: पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यात एक हृदयद्रावक गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. एका विद्यार्थ्याने आपल्या क्लासमेटची गोळ्या झाडून हत्या केली. त्यांनतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना उसमा गावातील ‘माई भागो लॉ कॉलेज’ मध्ये घडली. या घटनने परिसरात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मृत व्यक्तीचे नाव संदीप कौर असे आहे. तर, हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख प्रिन्स राज अशी आहे. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याप्रमाणे प्रिन्स राज वर्गात प्रवेश करतो आणि तिथे बसलेल्या संदीप कौरच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडतो. त्यांनतर लगेच तो पुन्हा पिस्तूल लोड करतो आणि स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतो. या गोळीबाराला दोघांचाही मृत्यू झाला.

  • 09 Feb 2026 03:20 PM (IST)

    09 Feb 2026 03:20 PM (IST)

    लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स!

    लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. लग्नात रॉयल आणि मॉर्डन लुक दिसावा म्हणून अनेक वेगवेगळ्या ब्रँडच्या साड्या, लेहेंगे, सिल्क साडी खरेदी केल्या जातात. साड्यांची खरेदी केल्यानंतर त्यावर नेमका कसा लुक करावा, बऱ्याचदा हे सुचत नाही. नवरीच्या साड्यांची खरेदी लग्नाच्या दोन ते तीन महिने आधीपासूनच केली जाते. पण लग्न सोहळ्यात नवरीसोबत करवलीला सुद्धा खूप जास्त मान असतो. त्यामुळे करवलीने लग्नात कायमच साडी नेसण्यापेक्षा साऊथ इंडियन हाफ साडी नेसल्यास लुक खूप सुंदर दिसेल. चला तर पाहुयात साऊथ इंडियन हाफ साडीचे काही सुंदर प्रकार.

  • 09 Feb 2026 03:18 PM (IST)

    09 Feb 2026 03:18 PM (IST)

    Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हलवाई स्टाईल ‘दही कचोरी’

    भारतीय स्ट्रीट फूड म्हटलं की डोळ्यांसमोर लगेचच चाटचे विविध प्रकार येतात आणि त्यात दही कचोरीचा नंबर अगदी वरचा लागतो. कुरकुरीत कचोरी, त्यावर गोडसर दही, आंबट-गोड चटण्या, मसाले आणि वरून कोथिंबीर व सेव… हा सगळा संगम म्हणजे चवीचा सणच! उत्तर भारतात लोकप्रिय असलेली ही डिश आता महाराष्ट्रातही तितकीच आवडीने खाल्ली जाते. दही कचोरी ही केवळ चाट नाही तर ती प्रत्येक वयोगटाला भुरळ घालणारी एक खास डिश आहे. पाहुण्यांसाठी काही वेगळं बनवायचं असेल, संध्याकाळच्या चहासोबत चटपटीत काही हवं असेल किंवा उपवासानंतर काहीतरी खास खायचं असेल. दही कचोरी हा उत्तम पर्याय ठरतो. सोप्या पद्धतीने, घरगुती साहित्य वापरून तुम्ही ही लोकप्रिय चाट अगदी सहज तयार करू शकता. चला तर मग, चवदार आणि खमंग दही कचोरी रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

  • 09 Feb 2026 02:55 PM (IST)

    09 Feb 2026 02:55 PM (IST)

    Baby Shower ला सजली सोनम कपूर, पारंपरिक-आधुनिक फॅशनचा सुरेख संगम;

    बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने रविवार, ८ फेब्रुवारी रोजी खास बेबी शॉवरचे आयोजन केले होते. सोनम कपूरच्या स्टाईलप्रमाणेच हा कार्यक्रम अतिशय जवळचा, सुंदर आणि सहज स्टायलिश होता. पती आनंद आहुजासोबत तिच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करण्यासाठी तयार असलेल्या सोनमने तिच्या मुंबईतील घरी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. .या खाजगी कार्यक्रमाला कपूर कुटुंबातील सदस्यांसह बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

  • 09 Feb 2026 02:50 PM (IST)

    09 Feb 2026 02:50 PM (IST)

    विश्वचषकातील कामागिरीचा ‘वैभव’ सन्मान! ICC च्या सर्वोत्तम संघात लागली वर्णी

    Vaibhav Suryavanshi selected in ICC’s best team : युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीचा रविवारी आयसीसी अंडर-१९ विश्वचषक सर्वोत्तम संघात समावेश करण्यात आला, ज्यामध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ८० चेंडूत १७५ धावा काढल्यानंतर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झालेल्या १४ वर्षीय सूर्यवंशीला त्याचे सहकारी कनिष्क चौहान आणि हेनिल पटेल यांच्यासह १२ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले.

  • 09 Feb 2026 02:45 PM (IST)

    09 Feb 2026 02:45 PM (IST)

    महाशिवरात्रीच्या दिवशी तयार होत आहे दुर्मिळ योग, या राशीच्या लोकांचे पालटणार नशीब

    हिंदू धर्मामध्ये सण व्रत वैकल्यांना विशेष महत्त्व आहे. यावर्षी महाशिवरात्र रविवार, 15 फेब्रुवारी रोजी आहे. महाशिवरात्रीचा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवशी दुर्मिळ योग तयार होणार आहेत त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये ही महाशिवरात्र खूप खास मानली जाते. या शुभ योगामुळे काही राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे. या योगामुळे काही लोकांना लाभ होऊ शकतो.

  • 09 Feb 2026 02:40 PM (IST)

    09 Feb 2026 02:40 PM (IST)

    ‘संघाने सांगावे राजीनामा देतो!’ ७५ वर्षे वयोमानावर मोहन भागवत यांचे मोठे विधान

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित ‘संघाच्या प्रवासाची १०० वर्षे-नवीन क्षितिज’ या दोन दिवसांच्या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी (रविवार) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघटनेचे कामकाज, भविष्यातील दिशा आणि नेतृत्व याबाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. संघातील पदापेक्षा काम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये आयोजित व्याख्यानमालेत त्यांच्या निवृत्तीबद्दलच्या चर्चेला पूर्णविराम देताना मोहन भागवत म्हणाले की, वयाच्या ७५ वर्षांनंतर व्यक्तीने कोणतेही पद न घेता काम करावे असे सर्वसाधारणपणे मानले जाते.

  • 09 Feb 2026 02:34 PM (IST)

    09 Feb 2026 02:34 PM (IST)

    बर्फाच्या चादरमध्ये खुलले केदारनाथ धामचे सौंदर्य; गुडघाएवढ्या बर्फात भारतीय सैनिकांचा खडा पहारा

    उत्तराखंडमधील जगप्रसिद्ध देवस्थान आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ धाम (Kedarnath) हे अत्यंत लोकप्रिय आहे. मंदिरात एकाच वेळी निसर्गाचे भयंकर आणि सुंदर रूप दिसून येते. सध्या केदारनाथ धाम येथे जोरदार बर्फवृष्टी होत आहे. यामुळे संपूर्ण मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या शिखरांवर अनेक फूट जाड बर्फाची चादर पसरली आहे. या ठिकाणी हाडांना गोठवणारी थंडी आणि अत्यंत कठीण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अशा स्थितीमध्ये देखील बाबा केदारनाथचे सुरक्षा रक्षक सतर्क आहेत.

  • 09 Feb 2026 02:30 PM (IST)

    09 Feb 2026 02:30 PM (IST)

    बांगलादेशात निवडणुकीपूर्वी युद्ध! BNP-जमातच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

    Bangladesh Political Crisis : ढाका : बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीला केवळ ७२ तास राहिले असून पुन्हा हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच ताज्या घडामोडीनुसाप, बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटपाट झाली आहे. या झटापटीत ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.  रविवारी (०८ फेब्रवारी) रात्री उशिरा हा संघर्ष घडला आहे.

  • 09 Feb 2026 02:25 PM (IST)

    09 Feb 2026 02:25 PM (IST)

    मुलगा गर्लफ्रेंडसोबत पकडला गेला… घरी नव्हे, थेट मेट्रो स्टेशनवरच करून टाकला साखरपुडा

    प्रेम करण्यात चूकी नाही. बऱ्याचदा लोक जेव्हा रिलेशनशिपमध्ये जातात तेव्हा आपल्या आई-वडिलांकडून हे प्रेमप्रकरण लपवून ठेवले जाते. आईवडिलांच्या धाकात मुलं लपून-छपून आपल्या पार्टनरला भेटायला जातात. पण जेव्हा हेच प्रमप्रकरण रंगेहात पकडलं जातं तेव्हा कौंटुबिक राडा ठरलेलाच असतो. विचार करा, जर तुम्हाला तुमच्या आईने गर्लफ्रेंडसोबत पकडलं तर तुमची काय अवस्था होईल. आपण सर्व या परिस्थितीचा विचार करता आई मुलाला मारेल किंवा ओरडेल असा विचार मनात येईल.

  • 09 Feb 2026 02:20 PM (IST)

    09 Feb 2026 02:20 PM (IST)

    भारत-फ्रान्स संरक्षण करार निर्णायक टप्प्यात! हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी ११४ राफेलची खरेदी

    भारत आपल्या हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी सतत काम करत आहे. अत्याधुनिक राफेल विमाने आधीच हवाई दलाच्या ताफ्यात आहेत. ११४ राफेल विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया आता वेगवान करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत भेटीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत ३.२५ लाख कोटी रुपयांच्या ११४ राफेल विमानांच्या खरेदीला मान्यता मिळू शकते ऑपरेशन सिंदूरपासून, भारत आपल्या संरक्षण क्षेत्राला वेगाने बळकटी देत आहे.

  • 09 Feb 2026 02:15 PM (IST)

    09 Feb 2026 02:15 PM (IST)

    मराठी मनोरंजन विश्वात नवा अध्याय; मनवा नाईक दिग्दर्शित नव्या मराठी चित्रपटाची घोषणा

    सर्जनशील विचार एकत्र आले की एखादी कलाकृती अधिक समृद्ध आणि प्रभावी होते, आणि असाच एक सुंदर योग सध्या मराठी मनोरंजन विश्वात घडताना दिसत आहे. निर्माते सिद्धेश चौधरी, गौरी कालेलकर-चौधरी आणि लेखिका-अभिनेत्री मनवा नाईक या तिघीही पहिल्यांदाच एका नव्या मराठी चित्रपटासाठी एकत्र काम करताना दिसणार आहेत, या नव्या सहकार्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच या तिघींचा हा नवाकोरा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

  • 09 Feb 2026 02:10 PM (IST)

    09 Feb 2026 02:10 PM (IST)

    ‘मर्दानी 3’ ने ओलांडला 30 कोटींचा टप्पा, 9 व्या दिवशी चित्रपटाने केली एवढी कमाई!

    बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचा “मर्दानी ३” हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. तसेच प्रेक्षक या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही वर्चस्व गाजवताना दिसत आहे. राणी मुखर्जीचा “मर्दानी ३” हा चित्रपट सनी देओलच्या “बॉर्डर २” ला जोरदार टक्कर देत आहे. दरम्यान, “मर्दानी ३” चा नवव्या दिवसाचा कमाईचा आकडा देखील चर्चेत आहे. चित्रपटाने नवव्या दिवशी किती कोटींचा गल्ला केला हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • 09 Feb 2026 02:05 PM (IST)

    09 Feb 2026 02:05 PM (IST)

    मुंबई ते नागपूर आता ‘नॉन-स्टॉप’ होणार! राज्य सरकारचा मोठा रस्ता प्रकल्प

    Mumbai-Nagpur Expressway: मुंबई ते नागपूर हा प्रवास आता सोपा आणि जलद होणार आहे. दक्षिण मुंबई ते नागपूर प्रवास सुलभ करण्यासाठी राज्य सरकार मुंबई-वडोदरा महामार्ग ठाणे कोस्टल रोडशी जोडण्याची तयारी करत आहे. ठाण्यात १८ किलोमीटर लांबीचा ८ लेन रस्ता बांधला जाणार आहे. एकदा तो पूर्ण झाला की, नागपूरहून येणारी वाहने समृद्धी महामार्गाने थेट दक्षिण मुंबईला पोहोचू शकतील. या नॉन-स्टॉप प्रवासामुळे वाहतूक कोंडी कमी होईलच, शिवाय इंधन आणि वेळेचीही लक्षणीय बचत होईल.

  • 09 Feb 2026 02:00 PM (IST)

    09 Feb 2026 02:00 PM (IST)

    सकाळी ग्रामस्थांना जाणवला दुर्गंध…पाहताच विहिरीत दिसला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह

    बिहार: बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सासारामध्ये एका विवाहित २५ वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विहिरीच्या शेजारून चालत जाणार्या माणसांना विहिरीतून घाण वास येऊ लागला. त्यांनी आत डोकावून पाहिले असता एका महिलेचा मृतदेह तरंगताना त्यांना आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली.

  • 09 Feb 2026 01:55 PM (IST)

    09 Feb 2026 01:55 PM (IST)

    उद्यापासून सुरु होणार बारावी बोर्ड परीक्षा; यंदा पहिल्यांदाच असणार ‘ही’ यंत्रणा

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांना मंगळवार (दि.१०) सुरुवात होत आहे. यंदा कॉपीमुक्त वातावरणात आणि सुरळीत परीक्षा पार पडण्यासाठी बोर्ड प्रशासनाने व्यापक तयारी केली असून, नाशिक जिल्ह्यामध्ये १२९ केंद्रावर ८२ हजार ३३८ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. १० फेब्रुवारीला पहिला इंग्रजी विषयाचा पेपर होणार आहे.

  • 09 Feb 2026 01:45 PM (IST)

    09 Feb 2026 01:45 PM (IST)

    रेसर बाईकवरून रिल्स बनवणे पडले महागात

    नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर महाविद्यालयासमोर रेसर बाईकच्या माध्यमातून स्टंटबाजी करत रिल्स बनवले जात होते. हे रिल्स बनवणाऱ्या दोन तरुणांना वाहनांसह ताब्यात घेत सिन्नर पोलिसांनी त्यांना तब्बल 19 हजारांचा दंड ठोठावला. दोन्ही तरुणांना ही स्टंटबाजी चांगलीच महागात पडली. पोलिसांनी अशाप्रकारे कारवाई केल्याने तरुणांना चांगला फटका बसला.

  • 09 Feb 2026 01:40 PM (IST)

    09 Feb 2026 01:40 PM (IST)

    मुंबई ते नागपूर आता ‘नॉन-स्टॉप’ होणार! राज्य सरकारचा मोठा रस्ता प्रकल्प

    मुंबई ते नागपूर हा प्रवास आता सोपा आणि जलद होणार आहे. दक्षिण मुंबई ते नागपूर प्रवास सुलभ करण्यासाठी राज्य सरकार मुंबई-वडोदरा महामार्ग ठाणे कोस्टल रोडशी जोडण्याची तयारी करत आहे. ठाण्यात १८ किलोमीटर लांबीचा ८ लेन रस्ता बांधला जाणार आहे. एकदा तो पूर्ण झाला की, नागपूरहून येणारी वाहने समृद्धी महामार्गाने थेट दक्षिण मुंबईला पोहोचू शकतील. या नॉन-स्टॉप प्रवासामुळे वाहतूक कोंडी कमी होईलच, शिवाय इंधन आणि वेळेचीही लक्षणीय बचत होईल.

  • 09 Feb 2026 01:35 PM (IST)

    09 Feb 2026 01:35 PM (IST)

    पाकिस्तानचे बांगलादेशसोबत डावपेच सुरूच… PCB चा ‘ब्लॅकमेलिंग’चा प्रयत्न

    टी-२० विश्वचषकात १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होईल की नाही याचे गूढ अद्यापही अस्पष्ट आहे. सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी देणारा पाकिस्तान विश्वचषकाचा वापर राजकीय हत्यार म्हणून करत आहे. त्यांच्या विनंतीनुसार, आयसीसीने श्रीलंकेतील त्यांचे सर्व सामने अशा प्रकारे आयोजित केले आहेत की भारताविरुद्धचा त्यांचा सामना तटस्थ ठिकाणी आयोजित करता येईल. परिणामी, सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा कोणताही वैध आधार नाही. बांगलादेशचे रक्षण करण्यासाठी त्यांनी या सर्व युक्त्या वापरल्या आहेत.

  • 09 Feb 2026 01:25 PM (IST)

    09 Feb 2026 01:25 PM (IST)

    एप्रिल २०२६ पासून ठेवी विम्यात होणार बदल; RBI च्या निर्णयाने ग्राहकांना मिळणार दिलासा

     रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) १ एप्रिल २०२६ पासून बँक खाते ठेव विमा प्रणालीमध्ये क्रांतिकारी बदल करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. दशकांपासून चालणारी फ्लॅट रेट प्रणाली टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल आणि त्याऐवजी जोखीम-आधारित प्रीमियम मॉडेल आणले जाईल असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. या नवीन प्रणाली अंतर्गत, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बँकांना कमी प्रीमियम भरण्याचा फायदा होईल. या निर्णयामुळे बँकांना त्यांचे जोखीम व्यवस्थापन सुधारण्यास आणि बँकिंग प्रणाली अधिक पारदर्शक बनविण्यास प्रोत्साहन मिळेल.

  • 09 Feb 2026 01:15 PM (IST)

    09 Feb 2026 01:15 PM (IST)

    अजितदादांच्या विमानात सुसाईड बॉम्बर; अमोल मिटकरींचा पुन्हा गंभीर आरोप

    राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. मात्र, रविवारी त्यांनी या सगळ्याचा कळस गाठत अजित पवार यांना मारण्यासाठी त्यांच्या विमानात सुसाईड बॉम्बर अर्थात आत्मघातकी बॉम्बरचा वापर झाला असावा का, अशी शंका बोलून दाखवली आहे. एवढेच नव्हे अजित पवार यांच्या विमानाचे पायलट सुमित कपूर यांना संमोहित केले होते का, असा सवालही अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. अमोल मिटकरी यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला.

  • 09 Feb 2026 01:07 PM (IST)

    09 Feb 2026 01:07 PM (IST)

    चटपटीत पाणीपुरी विक्री ठिकाणी साप…, अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    गोलगप्पा, पाणीपुरी , पुचक ही नावं ऐकताच तोंडाला पाणी सुटते. लहानांपासून ते आबालवृद्ध प्रत्येकाला चटपटीत पाणीपुरी आवड असते. पण याच पाणीपुरी संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. विरार शहरातील एका रस्त्यावरील पाणीपुरी विक्री ठिकाणी साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.अचानक साप दिसताच ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांची गर्दी तात्काळ पांगली.

  • 09 Feb 2026 01:00 PM (IST)

    09 Feb 2026 01:00 PM (IST)

    ढाब्यावर सापडलेल्या ‘त्या‌’ दोन राखीव ईव्हीएम प्रकरणावर निवडणूक आयोगाचे म्हणणे आले,

    महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सांगितले की, मोहोळमध्ये राखीव मतदान यंत्रे वेळेवर जमा न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, अलर्ट मिळाल्यानंतर निवडणूक अधिकारी, तहसीलदार आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान असे आढळून आले की, ईव्हीएम राखीव होत्या आणि शनिवारी मतदानासाठी त्यांचा वापर करण्यात आला नव्हता. त्यांनी सांगितले की, दोन्ही मशीन सील करण्यात आल्या आहेत.

  • 09 Feb 2026 12:50 PM (IST)

    09 Feb 2026 12:50 PM (IST)

    एकतर्फी प्रेमातून कोयत्याने प्राणघातक हल्ला; नृत्यांगना गंभीर जखमी

    एकतर्फी प्रेमातून फोनवर बोलत नसल्याचा राग धरून तरुणाने जामखेडमध्ये नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. गायत्री सावंत गंभीर जखमी असून आरोपी फरार आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

  • 09 Feb 2026 12:45 PM (IST)

    09 Feb 2026 12:45 PM (IST)

    वावंजे जिल्हापरिषद मतदार संघात भाजपा उमेदवार विजय

    पनवेल तालुक्यातील आठ जिल्हा परिषद मतदार संघा पैकी एक असलेल्या वावंजे मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने विजय संपादित केला आहे या ठिकाणी पंचायत समितीच्या दोन जागा देखील भाजपाच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत.

    वावंजे जिल्हा परिषद गटातून भाजप महायुतीच्या कमला देशेकर विजयी,
    वावंजे पंचायत समिती गणातून आरती काठे आणि चिंध्रण मधून अंकुश खैर विजयी,
    भाजपचा पनवेल तालुक्यातील पहिला मोठा विजय,
    वावंजे जिल्हा परिषदेत आणि पंचायत समितीत शेकापचा दारुण पराभव !

  • 09 Feb 2026 12:40 PM (IST)

    09 Feb 2026 12:40 PM (IST)

    2026 चा U19 World Cup जिंकल्यानंतर टीम इंडिया मुंबईत पाहोचल्यानंतर विमानतळावर झाले जल्लोषात स्वागत

    विश्वचषक जिंकून टीम इंडिया मायदेशी परतली आहे आणि वैभव सूर्यवंशी विमानतळावर माजी कर्णधार एमएस धोनीच्या वेशभूषेत दिसला. भारतामध्ये टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

  • 09 Feb 2026 12:30 PM (IST)

    09 Feb 2026 12:30 PM (IST)

    Nashik: राज्य मार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा, महिनाभरात सहा ते सात अपघात

    नाशिकमधील काही भागात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीवघेणा प्रवास ठरत आहे. या भागात वारंवार अपघात घडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दूर्लक्ष होत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे चारचाकीसह दुचाकी वाहणाच नुकसान होत आहे.

  • 09 Feb 2026 12:20 PM (IST)

    09 Feb 2026 12:20 PM (IST)

    प्रभासच्या ‘स्पिरिट’ला आणखी एक झटका ;दीपिकानंतर आता ‘या’ अभिनेत्याने घेतली माघार

    संदीप रेड्डी वांगाचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘स्पिरिट’ सध्या चर्चेत आहे. प्रभासच्या चित्रपटाशी संबंधित येणारे अपडेट चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपिका पदुकोणने चित्रपटातून माघार घातली असल्याचे वृत्त होते.ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज देखील या मेगा प्रोजेक्टमधून बाहेर पडल्याचे समजले आहे.

  • 09 Feb 2026 12:15 PM (IST)

    09 Feb 2026 12:15 PM (IST)

    एकदाच रिचार्ज, वर्षभर टेंशन फ्री! 949 GB डेटासह मिळणार हे जबरदस्त फायदे, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

    बीएसएनएल भारत कनेक्ट 26 प्लॅन हा एक अ‍ॅन्युअल रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅन मर्यादित काळापर्यंत खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभर ग्राहकांना पुन्हा रिचार्ज करण्याची चिंता नाही.

  • 09 Feb 2026 12:10 PM (IST)

    09 Feb 2026 12:10 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी

    सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 61 निवडणूक विभाग व 10 पंचायत समितींच्या 122 निर्वाचन गणांसाठी शनिवारी (दि.7) मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. आता या मतदानाची मतमोजणी आज होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली. सध्या भाजप आघाडीवर दिसत आहे.

  • 09 Feb 2026 12:05 PM (IST)

    09 Feb 2026 12:05 PM (IST)

    मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित खा डार्क चॉकलेट

    चॉकलेट केवळ डे साजरा करण्यासाठी नाहीतर शरीरासाठी सुद्धा आवश्यक आहे. यामध्ये असलेले घटक हृदयाचे आरोग्य सुधारतात. डार्क चॉकलेटमधील अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. याशिवाय खराब झालेला मूड सुधारण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन करावे.

  • 09 Feb 2026 12:01 PM (IST)

    09 Feb 2026 12:01 PM (IST)

     तळवडे जिल्हा परिषद गट

    १) सिद्धाली मोरे (शिंदेसेना ) - ३५४

    २) समिक्षा चव्हाण (उद्धव सेना) - ५१५

    ३) नोटा - ४८-

    विजयी
    तळवडे पंचायत समिती गण

    १) अपेक्षा मासये, शिवसेना, शिंदेसेना - १५९

    २)भामिनी सुतार, शिवसेना, उद्धवसेना - २५९

    3) नोटा - ११

    विजयी -

     

    ताम्हाणे पंचायत समिती गण
    १) समिक्षा वाफेलकर (शिंदेसेना) - २०५

    २) योगी डांगे (उद्धवसेना) २३२

    3) नोटा - ४४
    विजयी -

Web Title: Maharashtra breaking news live today marathi maharashtra politics national international politics war sports t20 world cup 2026 updates crime updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 08:06 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Puducherry: जिथे वर्षातून दोनदा साजरा होतो स्वातंत्र्य दिन! काय आहे ‘पूर्वेकडील फ्रान्स’चा रंजक इतिहास
2

Puducherry: जिथे वर्षातून दोनदा साजरा होतो स्वातंत्र्य दिन! काय आहे ‘पूर्वेकडील फ्रान्स’चा रंजक इतिहास

साखर निर्यात सुरूच राहणार, विक्री किंमत वाढविण्याचा विचार सुरू; केंद्राची महत्त्वपूर्ण माहिती
3

साखर निर्यात सुरूच राहणार, विक्री किंमत वाढविण्याचा विचार सुरू; केंद्राची महत्त्वपूर्ण माहिती

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.