Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Mahapalika Nivadnuk Updates: महाराष्ट्रासह महापालिका निवडणुकांचे अपडेट्स एका क्लिकवर

#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक #DonaldTrump #JoeBiden #MiddleEastCrisis #IsraelPalestine #RussiaUkraineWar

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 30, 2025 | 06:49 PM
#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक

#BMCelection #MumbaiPolitics #ShivSena #MNS #GoldPrices #महापालिकानिवडणूक #पुणेमहापालिकानिवडणूक, #महाराष्ट्रस्थानिकस्वराज्यसंस्थानिवडणूक

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News : 

BMC Election 2026 : मनसेकडून 37 उमेदवारांची यादी जाहीर

 मुंबई महापालिका 2026 च्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आतापर्यंत 37 उमेदवारांचे अर्ज सादर करण्यात आले आहेत. या उमेदवारांना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी संधी दिली असून, यामध्ये यशवंत किल्लेदार, कस्तुरी रोहेकर, शैलेंद्र मोरे, बबन महाडिक, मुकेश भालेराव यांच्यासह इतरांचा समावेश आहे.

मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने उमेदवारांची घोषणा केल्याने मुंबईतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

The liveblog has ended.
  • 30 Dec 2025 06:47 PM (IST)

    30 Dec 2025 06:47 PM (IST)

    बांगलादेशातील अत्याचाराची मालिका थांबेना! आणखी एका हिंदूची हत्या; युनूस सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

    Bangladesh News In Marathi: बांगलादेशातील मैमनसिंग येथून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका कापड कारखान्यात झालेल्या हिंसक संघर्षात ४२ वर्षीय बजेंद्र बिस्वास यांची सार्वजनिक ठिकाणी हत्या करण्यात आली. वृत्तानुसार, कारखान्याच्या परिसरात गर्दीसमोर एक भयंकर हाणामारी झाली, त्यादरम्यान नोमान मियाँ नावाच्या २२ वर्षीय तरुणाने बजेंद्र बिस्वास यांच्यावर बंदूक रोखली आणि गोळीबार केला. बजेंद्र जागीच मरण पावला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी नोमान मियाँ याला अटक केली.

  • 30 Dec 2025 06:14 PM (IST)

    30 Dec 2025 06:14 PM (IST)

    Municipal Election 2026: राज्यातील १४ ठिकाणी भाजप-शिंदे गटाची युती फुटली; कोणत्या आहेत या महापालिका?

    BMC Municipal Election 2026: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Election 2026) घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याभरात आज राजकीय पक्षांमध्ये मोठ्या मोठ्या घडामोडीही घडल्या. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. इच्छुकांना पक्षांकडून तिकीट मिळाल्याने अनेक ठिकाणी आंनदाचे वातावरण होते.तर काही ठिकाणी तिकीट न मिळाल्यामुळे इच्छुकांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केल्याचेही पाहायला मिळाले. पण त्याच वेळी पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केली. अनेक ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांत प्रवेश करणाऱ्यांना तिकीट दिल्यामुळे मोठा अंसतोष उफाळल्याच्याही घटना घडल्या.

  • 30 Dec 2025 06:03 PM (IST)

    30 Dec 2025 06:03 PM (IST)

    Kolhapur News: आम्ही जगायचं की मरायचं? पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत, शेतकऱ्यांचा आक्रोश

    बाजारभोगाव: पन्हाळा तालुक्यातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या दहशतीखाली दबला आहे. बिबट्या, गवा रेडे, कोळशिंदा यांचा मोकाट संचार शेतशिवारापुरता मर्यादित राहिला नसून आता तो गाववस्त्यांपर्यंत पोहोचला आहे. हातात कुदळ-कोयता घेऊन शेतात जाणारा शेतकरी आज जिवाच्या भीतीने घराबाहेर पडताना मागे वळून पाहतो. शेतात गेलेला शेतकरी घरी जिवंत परत येईल, याचीही शाश्वती उरलेली नाही.  इतकी भयावह परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.

  • 30 Dec 2025 05:50 PM (IST)

    30 Dec 2025 05:50 PM (IST)

    ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभ बच्चन यांनी उलगडला बिर्ला कुटुंबाचा नैतिक पाया, बिग बींनी वाचले ९० वर्ष जुने ऐतिहासिक पत्र

    ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर महानायक अमिताभ बच्चन यांनी बिर्ला कुटुंबाचा ९० वर्ष जुना पत्र वाचलं, ज्यामध्ये थोर उद्योगपती जी. डी. बिर्ला यांनी आपले सुपुत्र बी. के. बिर्ला यांना व्यवसाय, चारित्र्य, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीबाबत मार्गदर्शन दिले होते. या पत्रात सांगितलं होतं की संपत्तीचा खरा उपयोग समाजसेवा आणि जनकल्याणासाठी व्हावा, सत्तेचा अहंकार टाळावा, आणि आरोग्य ही खरी श्रीमंती आहे.

  • 30 Dec 2025 05:45 PM (IST)

    30 Dec 2025 05:45 PM (IST)

    दादर स्थानकात आणखी एक नवीन प्लॅटफॉर्म! कुठे आणि कसा फायदेशीर ठरेल? जाणून घ्या सविस्तर बातमी

    मुंबईत गर्दीची रेल्वे स्थानकं म्हणजे सीएसएमटी, कुर्ला, घाटकोपर, ठाणे , दादर या स्थानकांचा समावेश असतो. आता प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरळीत रेल्वे वाहतूकीसाठी दादर रेल्वे स्थानकावर एक नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेच्या विद्यमान प्लॅटफॉर्म क्रमांक ७ च्या शेजारी हे नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे. या हालचालीमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि भविष्यात वाढत्या प्रवासी संख्येचे आणि गाड्यांचे व्यवस्थापन सुलभ होईल.

  • 30 Dec 2025 05:40 PM (IST)

    30 Dec 2025 05:40 PM (IST)

    “आम्ही महायुतीतून बाहेर…”; राजकारणात खळबळ, रामदास आठवले बाहेर पडणार?

    राज्यात लवकरच महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. महायुती अनेक ठिकाणी एकत्रितणे तर अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच आता मुंबईमध्ये शिवसेना-भाजप यांची युती झाली आहे. दरम्यान महायुतीमध्ये रामदास आठवले नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

  • 30 Dec 2025 05:30 PM (IST)

    30 Dec 2025 05:30 PM (IST)

    महापालिका निवडणुकीत कार्यकर्ते डावलले; नेत्यांच्या नातेवाईकांना तिकिटांची लॉटरी

    राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी तिकीट वाटप करताना सर्वच पक्षांमध्ये कार्यकत्यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. तिकिटाच्या शर्यतीत नेत्यांच्या नातेवाईकांची सोय करण्यात येत असल्याने सर्वच पक्षांत असंतोष पसरला आहे. भाजप हा मोठा पक्ष असल्याने तेथे इच्छुकांची गर्दी जास्त होती, परिणामी पक्षात मोठी ओढाताण सुरू आहे. बंड रोखण्यासाठी अनेक पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट निवडक उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ वाटण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना (उबाठा), मनसे, शिंदे गट आणि शरद पवार गट यांचाही समावेश आहे.

  • 30 Dec 2025 05:25 PM (IST)

    30 Dec 2025 05:25 PM (IST)

    घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडीचे बदलणार सूत्र; दर वाढीची शक्यता

    घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच एलपीजीचे भाव बदलणार आहे. गेल्या महिन्यात सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी अमेरिकन निर्यातदारांसोबत वार्षिक पुरवठा करारावर स्वाक्षरी केली. परिणामी, सरकार एलपीजी सबसिडी सूत्रात बदल करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. सध्या, सबसिडी सौदी कॉन्ट्रॅक्ट प्राइस (सीपी) वर आधारित केली जाते, जी पश्चिम आशियातील एलपीजी पुरवठ्यासाठी एक आहे.

  • 30 Dec 2025 05:20 PM (IST)

    30 Dec 2025 05:20 PM (IST)

    राज्यातील १४ ठिकाणी भाजप-शिंदे गटाची युती फुटली; कोणत्या आहेत या महापालिका?

    राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Election 2026) घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याभरात आज राजकीय पक्षांमध्ये मोठ्या मोठ्या घडामोडीही घडल्या. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. इच्छुकांना पक्षांकडून तिकीट मिळाल्याने अनेक ठिकाणी आंनदाचे वातावरण होते.तर काही ठिकाणी तिकीट न मिळाल्यामुळे इच्छुकांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केल्याचेही पाहायला मिळाले. पण त्याच वेळी पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केली. अनेक ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांत प्रवेश करणाऱ्यांना तिकीट दिल्यामुळे मोठा अंसतोष उफाळल्याच्याही घटना घडल्या.

  • 30 Dec 2025 05:15 PM (IST)

    30 Dec 2025 05:15 PM (IST)

    ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत मुंबई शहरातील खेळाडूंना नवी संधी; जिल्हा स्तरावर सकारात्मक प्रतिसाद

    राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मिशन लक्ष्यवेध या योजनेंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या केंद्राच्या माध्यमातून ऑलिम्पिक तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवू शकणाऱ्या खेळाडूंच्या घडणीस प्रोत्साहन दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ मुंबई शहरातील खेळाडूंनाही मिळणार असून, या उपक्रमास जिल्हा स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

  • 30 Dec 2025 05:10 PM (IST)

    30 Dec 2025 05:10 PM (IST)

    उमेदवारीवरून राडा! अजित पवारांना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

    राज्यात महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. अनेक ठिकाणी महायुती तर अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढणार आहे. काही भागात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारण पाहून निवडणूक लढवली जाणार आहे. त्यातच आता अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यात अजित पवारांना धक्का बसला आहे.

  • 30 Dec 2025 05:04 PM (IST)

    30 Dec 2025 05:04 PM (IST)

    नागपूरमध्ये कौटुंबिक वादातून जावयावर चाकूहल्ला; मामसासरे अटकेत

    कौटुंबिक वादातून सासरच्या दोघांनी जावयावरच चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, ही खळबळजनक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. विकास उर्फ बाल्या अरविंद डोंगरे (३२) आणि शशिकांत उर्फ श्रीकांत अरविंद डोंगरे (४५) दोन्ही रा. संजय गांधीनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जखमी जावई सुशिल हरीशचंद्र वासे (३६) रा. यादवनगर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 30 Dec 2025 04:50 PM (IST)

    30 Dec 2025 04:50 PM (IST)

    दिव्यांगांच्या दुचाकी दुरुस्ती साठी निओमेशोन सर्व्हिस कॅम्पचे आयोजन

    रत्नागिरीत आर. एच. पी. फाउंडेशनच्या सहकार्याने आणि निओमोशन, चेन्नई यांच्यातर्फे साईनगर, कुवारबाव येथे एस. के. नाकाडे यांच्या निवासस्थानी निओमोशन सर्व्हिस कॅम्प पार पडला या मध्ये दिव्यांगांच्या दुचाकीची दुरुस्ती करण्यात आली. दिव्यांग बांधव चालवत असलेल्या दुचाकी वाहनांची दुरुस्ती अत्यावश्यक असते कारण त्यांना या व्हीलचेअर वरून स्वतःची कामे करण्यास खुप मोठी मदत होत असते, ग्रामीण भागातील दिवांगाना त्यासाठी मुंबईला जावे लागत होते त्यांना इतक्या लांब जाण्यापेक्षा जवळच त्याचा लाभ घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये निओमोशन गाडीची पूर्ण तपासणी करून सर्व्हिसिंग करून दिले गेले ज्यांच्या गाडीचे भाग खराब झाले होते ते बदलून दिले गेले.या कामासाठी निओमोशन चेन्नईचे तंत्रज्ञ ऋषिकेश धनरे आणि प्रदीपकुमार सरोज आले होते. त्यांनी निओमोशनविषयी सर्वांना सविस्तर माहिती दिली. निओमोशनमुळे दिव्यांगाना रोजगार मिळाला. दिव्यांग स्वतः च्या पायावर उभा राहिला, आत्मसान्मानाने जगू लागला. निओमोशनमध्ये काही बिघाड झाला तर दुरुस्तीसाठी मुंबईला जावे लागायचे. आता निओमोशन डोअर टू डोअर जाऊन सर्व्हिस देणार आहे. त्यामुळे दिव्यांगाना खूप फायदा होणार आहे.

  • 30 Dec 2025 04:50 PM (IST)

    30 Dec 2025 04:50 PM (IST)

    थाटात पार पडला ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटचा भव्य अनावरण सोहळा

    स्टार प्रवाहची ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ च्या सेटचा भव्य दिव्य अनावरण सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात मालिकेचे निर्माते, महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणारे अभिनेता डॉ. अमोल कोल्हे, सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले, स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे आणि मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. सोहळा सावित्रीबाईंच्या जिद्दी, संघर्ष आणि दूरदृष्टीला आदर दाखवण्यासाठी आयोजित केला गेला.

  • 30 Dec 2025 04:40 PM (IST)

    30 Dec 2025 04:40 PM (IST)

    वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ

    सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशमधील पोलिस सतत त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. परंतु यावेळी एक लज्जास्पद घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • 30 Dec 2025 04:35 PM (IST)

    30 Dec 2025 04:35 PM (IST)

    मामानेच दिली 2 लाखांची सुपारी! भाच्याची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे

    बिहारमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मामानेच सुपारी देऊन भाच्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे केले. हत्या झालेल्या तरुणाचे नाव अभिषेक असे आहे. तर मुख्य आरोपी मामाचे नाव संतोष असे आहे. ही घटना भागलपूर जिल्ह्यातील नाथनगर येथे घडली. दोघांचे एकाच तरुणीसोबत अनैतिक संबंध होते. पीडित नेहमी त्याच्या मामला त्याच्या अनैतिक संबंधाबद्दल मामीला सांगण्याची धमकी द्यायचा आणि त्याला ब्लॅकमेल करत होता. यामुळे संतापलेल्या आरोपी संतोषने मारेकऱ्यांना २ लाख रुपयांची सुपारी देऊन अभिषेकची हत्या केली.

  • 30 Dec 2025 04:30 PM (IST)

    30 Dec 2025 04:30 PM (IST)

    नव्या वर्षात दारू पिऊन चालवाल गाडी तर भरावे लागेल भरघोस चलान, आकडा वाचून चक्कर येईल

    अलीकडेच, भोपाळ वाहतूक पोलिसांचे अतिरिक्त डीसीपी बसंत कौल यांनी सांगितले की जर एखादे वाहन मद्यपान करून गाडी चालवताना पकडले गेले तर दंड किमान ५,००० रुपयांपासून ते १०,००० रुपयांपर्यंत असू शकतो. हा दंड न्यायालय ठरवते. पोलिसांची जबाबदारी वाहन जप्त करणे आणि न्यायालयात सादर करणे आहे.मद्यपान करून गाडी चालवण्याच्या बाबतीत, चालकाची ब्रेथअलायझर चाचणी केली जाते, ज्यामध्ये चालकाला ब्रेथअलायझरमध्ये फुंकर घालण्यास सांगितले जाते. जर १०० मिली रक्तात अल्कोहोलचे प्रमाण ३० मिलीग्रामपेक्षा जास्त असेल किंवा त्यात ड्रग्ज असतील तर त्या व्यक्तीला भारतीय कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते.

  • 30 Dec 2025 04:25 PM (IST)

    30 Dec 2025 04:25 PM (IST)

    अहिल्यानगरमध्ये महायुती फिस्कटली! विखे, जगताप अन् शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

    अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.आता महायुतीमध्ये मोठी फूट पडल्याचे समोर आले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपाबाबत वाटाघाटी सुरू होत्या, मात्र सन्मानजनक जागा मिळत नसल्याने अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.शिवसेनेने आगामी निवडणुकीसाठी २४ जागांची मागणी होती, परंतु भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या जागा देण्यास अनुकूल नव्हते. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या हक्काच्या जागांवरही मित्रपक्षांनी दावा सांगितल्याने चर्चेचे गुऱ्हाळ फिस्कटले.

  • 30 Dec 2025 04:20 PM (IST)

    30 Dec 2025 04:20 PM (IST)

    नेरळ येथील हिंदू स्मशानभूमीचे लोकार्पण

    कर्जत तालुक्यातील नेरळ येथील उद्घाटन बरेच दिवस प्रतीक्षेत होते. अखेर 30 डिसेंबर 2025 रोजी भाई गायकर व प्रसाद थोरवे यांच्या हस्ते नेरळ येथील हिंदू स्मशानभूमीचे लोकार्पण झाले. नेरळ संकुल विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नेरळच्या विकासासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून नेरळ येथे स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात आले. स्मशानभूमी ही मनुष्याच्या जीवनातील शेवटचे चे ठिकाण मानले जाते. जीवन जगत असताना मनुष्याला अनेक सुख सुविधांचा उपयोग घेत असतो परंतु मरणानंतर काही ठिकाणी स्मशान भूमीमध्ये पत्रे फुटल्यामुळे गलकी मशानभूमी, काही ठिकाणी छप्परच नाही, अशा अनेक समस्या पाहायला मिळतात. परंतु या समस्यांना सामोरे जावे न लागावे म्हणून यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून नेरळ येथील स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्याचे काम करण्यात आले. हे काम शिवसेनेचे कार्यकर्ते मिलिंद विरले यांच्या माध्यमातून पूर्ण केले. या स्मशानभूमीसाठी 70 लाख रुपयांचे निधी उपलब्ध करून नूतनीकरण करण्यात आले.

  • 30 Dec 2025 04:16 PM (IST)

    30 Dec 2025 04:16 PM (IST)

    अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड आंदेकरच्या कुटुंबातील दोघांना उमदेवारी

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाकडून पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणातील दोन महिला आरोपींना उमेदवारी देण्यात आली आहे. कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या आरोपी सोनाली कोमकर आणि लक्ष्मी कोमकर यांना पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २३ मधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकीटावरून निवडणूक लढवणार आहेत. या दोघीही तुरुंगांतून निवडणूक लढवणार आहेत.

  • 30 Dec 2025 04:11 PM (IST)

    30 Dec 2025 04:11 PM (IST)

    ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास

    नगरपरिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणूकीचा रणसंग्राम राज्यभरात सुरु आहे. या निवडणूकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत यांच्यात चुरशीची लढत सुरु असताना आता ठाकरे गटासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ठाकरे गटाचे ठाण्यातील शिलेदार मानले जाणारे माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी राजकीय संन्यास घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ठाणे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून गेले.

  • 30 Dec 2025 03:50 PM (IST)

    30 Dec 2025 03:50 PM (IST)

    BJP Politics: ‘तिकीट नाकारले, निष्ठावंताच्या डोळ्यात अश्रू…’

    Chhatrapati Sambhajinagar News:  राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागावाटपावरून आता पर्यंत तीन ठिकाणी युती फिस्कटली आहे. पुणे, नवी मुंबई आणि संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या युतीला तडा गेला आहे. भाजप आणि शिंदे गट स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. पण या सगळ्यातच भाजपला अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक राहिले असताना अनेक इच्छुकांकडून मात्र मोठ्या प्रमाणात नाराजी आणि संपात व्यक्त केला जात आहे. या नाराजांना आवरण्यासाठी अक्षरश: पोलिसांची मदत घ्यावी लागल्याचेही समोर आले आहे.

    वाचा सविस्तर 

  • 30 Dec 2025 03:50 PM (IST)

    30 Dec 2025 03:50 PM (IST)

    Crime News: रेल्वे स्टेशन परिसरात ‘MD’ विकणाऱ्या सराईताला बेड्या

    Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगर रेल्वेस्टेशन परिसरात एमडी (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तरुणाला अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने पकडले. कारवाईदरम्यान एक आरोपी पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई २८ डिसेंबर रोजी राजी १०.१५ वाजेच्यासुमारास करण्यात आली. शेख मिजान शेख नईम (२७, रा. गल्ली क्रं., सिल्कमिल कॉलनी, रेल्वे स्टेशन) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ०.८९ ग्रॅम एमडी, अॅपलचा मोबाइल, एक रेल्वे तिकिट आणि दोन चाव्या असा सुमारे ६५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तर त्याचे साथीदार कैफ कुरेशी (रा. मदनी चौक, रोशनगेट) आणि मस्तान आरिफ (रा. भिवंडी, मुंबई) हे दोघे पसार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

    वाचा सविस्तर 

  • 30 Dec 2025 03:40 PM (IST)

    30 Dec 2025 03:40 PM (IST)

    टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण

    ईशा मालवीयाने तिच्या कारकिर्दीची बहुतेक लोकप्रियता रिअ‍ॅलिटी शोद्वारे मिळवली. आता ती मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. बिग बॉस १७ च्या स्टारने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करून पंजाबी चित्रपटसृष्टीत तिच्या प्रवेशाची पुष्टी केली. ईशाच्या चित्रपटाचे नाव “इश्क दे लेखे” आहे, ज्यामध्ये ती पंजाबी गायिका आणि अभिनेता गुरनाम भुल्लरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांचा रोमँटिक चित्रपट ६ मार्च २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची पुष्टी केली आहे.

    वाचा सविस्तर 

  • 30 Dec 2025 03:30 PM (IST)

    30 Dec 2025 03:30 PM (IST)

    पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप!

    PCB’s head coach Azhar Mahmood receives a setback :  पाकिस्तान क्रिकेटमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. पीसीबीने राष्ट्रीय कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक अझहर महमूद यांच्याशी करार संपण्याच्या तीन महिने आधी त्यांना सोडचिठ्ठी दिली आहे.  अझहरचा करार मूळतः मार्च २०२६ पर्यंत चालणार होता, परंतु बोर्डाने त्यांना अकालीच पदावरून दूर केले.

    एका विश्वासार्ह सूत्रानुसार, “अझहरचा करार मार्चमध्ये संपणार होता आणि पाकिस्तानचा पुढील कसोटी दौरा देखील त्याच सुमारास सुरू होणार होतो. त्यामुळे बोर्ड आता नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी आपली रणनीती तयार करू इच्छित आहे.” अझहर महमूद यांची मागील वर्षी   कसोटी मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. त्यांचा बोर्डासोबत दोन वर्षांचा करार देखील होता. पीसीबीकडून आता कसोटी संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या  सपोर्ट स्टाफमध्ये देखील बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    वाचा सविस्तर 

  • 30 Dec 2025 03:23 PM (IST)

    30 Dec 2025 03:23 PM (IST)

    धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री

    सोशल मिडियावर दररोज अनेक असे व्हिडिओ शेअर केले जातात, जे आपल्याला थक्क करतील. अशात अलिकडेच इथे व्यक्तीच्या साहसाचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात त्याने चक्क जंगलात जाऊन सिंहाच्या कळपात एंट्री घेतली. सिंह हा जंगलाचा राजा आहे अशात या थरारला प्राण्याच्या समोर जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. पण व्यक्ती इथे असाच नाही तर पूर्ण तयारी करून सिंहाच्या कळपात गेला. व्हिडिओमध्ये त्याने लोखंडाची एक काटेरी कवच अंगावर घातल्याचे दिसते. आपल्या या कपड्यांसह तो सिंहाच्या समोर जातो आणि पुढे काय घडते ते चला सविस्तर जाणून घेऊया.

     

  • 30 Dec 2025 03:10 PM (IST)

    30 Dec 2025 03:10 PM (IST)

    ‘कराडमध्ये आघाडीचा निर्णय अपेक्षेप्रमाणे ठरला

    कराड : कराड नगरपालिका निवडणुकीसाठी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी पालिकेचा निकाल जाहीर झाला होता. अपेक्षेप्रमाणे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून राजेंद्रसिंह यादव यांचा दणदणीत विजय झाला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजेंद्रसिंह यादव यांचे कौतुक केले.

  • 30 Dec 2025 02:57 PM (IST)

    30 Dec 2025 02:57 PM (IST)

    टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात

    ईशा मालवीयाने तिच्या कारकिर्दीची बहुतेक लोकप्रियता रिअ‍ॅलिटी शोद्वारे मिळवली. आता ती मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. बिग बॉस १७ च्या स्टारने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करून पंजाबी चित्रपटसृष्टीत तिच्या प्रवेशाची पुष्टी केली. ईशाच्या चित्रपटाचे नाव "इश्क दे लेखे" आहे, ज्यामध्ये ती पंजाबी गायिका आणि अभिनेता गुरनाम भुल्लरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांचा रोमँटिक चित्रपट ६ मार्च २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची पुष्टी केली आहे.

  • 30 Dec 2025 02:45 PM (IST)

    30 Dec 2025 02:45 PM (IST)

    जानेवारी अखेरपर्यंत विकास कामे पूर्ण करा: नितेश राणेंचे निर्देश

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून अंमलबजावणी करावी. जिल्हा परीषदेने आराखड्यात घेतलेली विकास कामे जानेवारी अखेरपर्यंत गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिले, पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हा परीषदेच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला.

  • 30 Dec 2025 02:40 PM (IST)

    30 Dec 2025 02:40 PM (IST)

    दीप्ती शर्मा इतिहास रचण्याच्या मार्गावर, हा पराक्रम आजपर्यंत कोणत्याही महिला क्रिकेटपटूने केला नाही…

    भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज तिरुअनंतपुरम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाची अष्टपैलू दीप्ती शर्माला इतिहास रचण्याची संधी आहे. या मालिकेदरम्यान दीप्तीने महिला टी-२० क्रिकेटमध्ये १५० धावांचा टप्पा गाठला आणि आता या फॉरमॅटमध्ये तिच्याकडे १५१ विकेट आहेत. जर दीप्तीने आज श्रीलंकेविरुद्ध एक विकेट घेतली तर ती या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज बनेल. सध्या ती ऑस्ट्रेलियाच्या मेगन शटसोबत पहिल्या स्थानावर आहे.

  • 30 Dec 2025 02:35 PM (IST)

    30 Dec 2025 02:35 PM (IST)

    ड्रग्स विरोधात कडक कारवाई करा; रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

    ३१ डिसेंबर तसेच सध्याचा पर्यटनाचा हंगाम पाहता सर्वच यत्रनेने सतर्क राहून अमलीपदार्थांच्या विरोधात भरीव कारवाया कराव्यात, अशी सूचना निर्देश रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नाकों को-ओडर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला अपर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.

  • 30 Dec 2025 02:30 PM (IST)

    30 Dec 2025 02:30 PM (IST)

    कोकणच्या समद्रकिनारी होणार नववर्षाचा जल्लोष

    सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी यंदा पर्यटकांनी गोव्यानंतर कोंकण पट्टयाला मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्याचे चित्र दिसून येत आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, निसर्गरम्य वातावरण, तुलनेने कमी गर्दी आणि परवडणारा खर्च यामुळे कोंकण पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे पुढे आले आहे. विशेषतः मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी शहरांतील पर्यटक मोठ्या संख्येने कोंकणातील विविध पर्यटनस्थळांकडे रवाना झाले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांतील समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, देवस्थाने आणि निसर्गरम्य स्थळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.

  • 30 Dec 2025 02:25 PM (IST)

    30 Dec 2025 02:25 PM (IST)

    विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली जागा!

    इंग्लंडने २०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला तात्पुरता संघ जाहीर केला आहे. जोफ्रा आर्चरचा संघात समावेश करण्यात आला आहे. हॅरी ब्रूककडे संघाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. विश्वचषकासोबतच श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठीही संघ जाहीर करण्यात आला आहे. अ‍ॅशेस मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या जोश टोंगचा पहिल्यांदाच टी२० संघात समावेश करण्यात आला आहे. टॉम बँटनचाही संघात समावेश करण्यात आला आहे. विल जॅक्स देखील निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

  • 30 Dec 2025 02:20 PM (IST)

    30 Dec 2025 02:20 PM (IST)

    इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात उसळले आंदोलन; हजारो Gen Z रस्त्यावर, कारण काय?

    तेहरान : इराणमध्ये (Iran)खामेनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन उसळले आहे. इराणच्या जनरेशनल झेडचे तरुण सरकारविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. अनेक शहरांमध्ये हिंसक परिस्थिती असून लोक सरकारविरोधी घोषणाबाजी करत आहेत. समोवारी (२९ डिसेंबर) रात्री हे आंदोलन सुरु झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार, मंगळवार संध्याकाळापर्यंत ही निदर्शने सुरुच राहणार असून यामुळे इराणमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

  • 30 Dec 2025 02:14 PM (IST)

    30 Dec 2025 02:14 PM (IST)

    पोलिसांचंही बँक खातं नाही सुरक्षित ! सायबर चोरट्यांनी तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा

    मंगळवेढा : मंगळवेढा येथे आरटीओ ई-चालानच्या नावावर एका पोलीस हवालदाराच्या बँक खात्यातून 8 लाख 49 हजार रुपये काढून घेण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात हॅकरविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे मंगळवेढ्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास आता केला जात आहे.

  • 30 Dec 2025 02:00 PM (IST)

    30 Dec 2025 02:00 PM (IST)

    'सगळी भीती आणि दुःख संपले आहे...', गोविंदा आता लवकरच करणार Comeback; म्हणाला 'हिरो नंबर वन येत आहे..'

    अभिनेता गोविंदा गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. चाहते त्याला पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत. आता, सलमान खानच्या "बॅटल ऑफ गलवान" या चित्रपटात गोविंदाने कॅमिओ साकारल्याच्या बातम्या पसरत आहेत. गोविंदाने अलीकडेच एका कार्यक्रमात यावर प्रतिक्रिया दिली आणि तो लवकरच पुनरागमन करणार असल्याचे उघड केले. अभिनेता आता नक्की काय म्हणाला आहे जाणून घेऊयात.

  • 30 Dec 2025 01:55 PM (IST)

    30 Dec 2025 01:55 PM (IST)

    भाजपकडून बहुतेक विद्यमानांना घरचा रस्ता; नवाेदित चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयाेग

    उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दिवस शिल्लक असतानाच भाजपने थेट यादी जाहीर न करता उमेदवारांना अर्ज दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यात भाजपने बहुतेक विद्यमानांना घरचा रस्ता दाखविल्याचे दिसते. यामुळे पक्षात नाराजी निर्माण झाली आहे. महापालिका निवडणुकीपुर्वी भाजपकडून प्रभाग निहाय सर्वेक्षण केले गेले हाेते. तसेच प्रत्येक नगरसेवकाच्या कामाचा आढावा घेण्यात आला हाेता. या सर्वांचा विचार करून इच्छुकांना उमेदवारीची संधी दिली गेल्याचे दिसते.

  • 30 Dec 2025 01:48 PM (IST)

    30 Dec 2025 01:48 PM (IST)

    शिंदेसेना–भाजप युतीत मोठा स्फोट

    संभाजीनगरमध्ये युती व्हावी असा प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला. स्थानिक पातळीवर आम्ही बैठका घेतल्या. स्थानिक कार्यकर्ते एक वेगळ्या भूमीकेत पाह्यला मिळाले. आधीच शंका आली होती. मी दरवेळी स्थानिक नेत्यांना फोन करून बैठका केल्या, बावनकुळे यांच्याबरोबर देखील बैठक झाली. शेवटच्या संपर्कात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या समोर जागा वाटप ठरले. त्यावेळी युती झाली या संभ्रमात होतो. मात्र ज्यावेळी जागा द्यायची तेव्हा शिवसेनेच्या जागा सोडल्या जातील असा प्रस्ताव दिला. आमचे कार्यकर्ते नाराज होतील अशी त्यांची भूमिका होती. तर दुसरीकडे युतीच्या चर्चा असल्याचे सांगणे. या घडीला सुद्धा कोणताही नवीन प्रस्ताव दिला नाही. आग्रही भूमिकेला तडा दिला.आमची ताकद वाढली आम्ही काहीही करू शकतो, असा त्यांना अहंकार होता त्याचा अंत आज भाजप शिवसेना युती तोडल्याने झाली.

  • 30 Dec 2025 01:45 PM (IST)

    30 Dec 2025 01:45 PM (IST)

    ”सूर्यकुमार यादव खूप मेसेज करायचा,पण आता..”, बोल्ड अभिनेत्रीचा धक्कादायक दावा

    अभिनेत्री आणि मॉडेल खुशी मुखर्जी सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय असते. तिच्या बोल्ड फॅशन निवडींमुळे तिच्याबद्दल सतत चर्चा सुरू असतात. दरम्यान, तिने भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याबद्दल एक विधान जारी केले आहे. मुखर्जीचा दावा आहे की अनेक क्रिकेटपटू तिचा पाठलाग करत आहेत. ती असेही म्हणते की सूर्यकुमार यादव तिला मेसेज करायचा.

  • 30 Dec 2025 01:37 PM (IST)

    30 Dec 2025 01:37 PM (IST)

    कोल्हापूरच्या गारगोटी-कडगाव रस्त्यावर ‘बर्निंग कार’चा थरार; आगीत कार जळून खाक

    कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथे गारगोटी-कडगाव मुख्य रस्त्यावर सायंकाळी सातच्या सुमारास चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. या आगीत चारचाकी कार पूर्णपणे जळून खाक झाली. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, कारचे यामध्ये मोठे नुकसान झाले.

  • 30 Dec 2025 01:30 PM (IST)

    30 Dec 2025 01:30 PM (IST)

    ‘Dhurandhar’ चे जगभरात बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, आता ‘जवान’ चित्रपटालाही देणार टक्कर

    आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना अभिनीत, “धुरंधर” हा स्पाय थ्रिलर चित्रपट भारतीय आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. रिलीजच्या पहिल्या तीन आठवड्यात मोठ्या प्रमाणात कमाई केल्यानंतर, हा चित्रपट चौथ्या आठवड्यातही अनेक विक्रम मोडत आहे. चित्रपटाने २५ दिवसांत जगभरात किती कमाई केली आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

  • 30 Dec 2025 01:25 PM (IST)

    30 Dec 2025 01:25 PM (IST)

    भारताचा जीडीपी ८% वाढतेय, तरी परकीय गुंतवणूक का बाहेर पडतेय?

    परकीय गुंतवणूकदारांनी २०२५ मध्ये भारतीय बाजारातून १८ अब्ज डॉलर (सुमारे १ लाख ५८ हजार कोटी रुपये) काढून घेतले आहेत. २०२३-२४ पासून परकीय थेट गुंतवणूक (FDI) सातत्याने घटत चालली असून ही बाब चिंतेची आहे. भारताची जीडीपी वाढ सरासरी वार्षिक ८ टक्क्यांच्या दराने होत असतानाही परकीय गुंतवणूक का येत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. या दराने वाढणा-या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवरही परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPI) दृष्टिकोन नकारात्मक किंवा उदासीन का राहतो, की ते इक्विटी विकून आपली गुंतवणूक परत घेत आहेत. परकीय गुंतवणूकदार भारतात नवी भांडवली गुंतवणूक करण्याऐवजी येथून पैसा काढण्याकडे वळले आहेत.

  • 30 Dec 2025 01:10 PM (IST)

    30 Dec 2025 01:10 PM (IST)

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पावर केंद्राचं लक्ष! संसदीय पॅनल बैठकीत संवर्धनाच्या आव्हानांवर चर्चा

    केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विषयक स्थायी समितीच्या संसदीय पॅनलने आपल्या दोन दिवसांच्या ताडोचा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या भेटीदरम्यान संवर्धन आणि पर्यावरणीय आव्हानांचा आढावा घेतला. या पॅनलने प्रकल्पाच्या सभोवतालच्या वेगाने होणाऱ्या औद्योगिक विस्ताराचा विशेषतः खाणकाम आणि औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचा वन्यजीव अधिवासाची अखंडता, वाघांची हालचाल आणि प्रदेशाच्या पर्यावरणीय संतुलनावर होणाऱ्या परिणामांची तपासणी केल्याचे समजते.

  • 30 Dec 2025 01:05 PM (IST)

    30 Dec 2025 01:05 PM (IST)

    युती अन् आघाड्या पाहून कार्यकर्ते गोंधळले; निष्ठेबरोबर शत्रुत्वही पाण्यात

    महापालिका निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पुणे महापालिका निवडणुकीत होणाऱ्या युत्या आणि आघाड्या पाहून सर्वच पक्षाचे कार्यकर्ते गोंधळले आहेत. पक्षाशी किंवा नेत्याशी निष्ठा ठेवून कार्यकर्त्यांनी भांडणे केली, कदाचित अन्य पक्षाशी शत्रुत्व घेतले. त्यांना सद्यस्थितीत पश्चाताप होत असेल.अगदी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागला गेला. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट तयार झाले. कार्यकर्तेही दोन गटात विभागले गेले. स्वतंत्र सभा, बैठका झाल्या. त्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. पवारसाहेबांचे वय झाले आहे, आता त्यांनी थांबावे अशी भाषणे झाली.

  • 30 Dec 2025 01:00 PM (IST)

    30 Dec 2025 01:00 PM (IST)

    अल्मोडा येथे भीषण रस्ता अपघात; प्रवासी बस खोल दरीत कोसळली

    उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील भिकियासैन-विनायक रस्त्यावर एक मोठा रस्ता अपघात झाला. ही बस खोल दरीत कोसळल्यामुळे अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. बस रामनगरकडे जात होती.

  • 30 Dec 2025 12:50 PM (IST)

    30 Dec 2025 12:50 PM (IST)

    नागपूर–वर्धा रोडवर भीषण अपघात! भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकवर आदळली; तिघांचा मृत्यू

    नागपूर–वर्धा रोडवरील जुनापाणी गावाजवळ पहाटे ट्रॅव्हल्सने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 25 प्रवासी गंभीर ते किरकोळ जखमी झाले. जखमींवर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 30 Dec 2025 12:45 PM (IST)

    30 Dec 2025 12:45 PM (IST)

    चारित्र्याच्या संशयाने घेतला जीव! पतीकडून पत्नी व 4 वर्षीय चिमुकल्याची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

    बुलढाण्याच्या मेहकरमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने झोपेत असलेल्या पत्नी रूपाली आणि 4 वर्षीय मुलगा रियांश यांची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

  • 30 Dec 2025 12:41 PM (IST)

    30 Dec 2025 12:41 PM (IST)

    आई-वडिलांची क्रूरता! अक्कलकुव्यात नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या अर्भकाचा मृतदेह आढळला

    नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा–वरखेडी नदीपात्रात 6–7 महिन्यांच्या पुरुष अर्भकाचा मृतदेह आढळला. अज्ञात पालकांनी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा संशय असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

  • 30 Dec 2025 12:05 PM (IST)

    30 Dec 2025 12:05 PM (IST)

    कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचे 69 उमेदवार अर्ज दाखल करणार

    कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसचे 69 उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. तर याआधी काँग्रेसने पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली आहे. मात्र आता काँग्रेस तिसरी यादी जाहीर न करता उमेदवारांना थेट एबी फॉर्म देणार असून यात आणखी नव्या 12 उमेदवारांना संधी मिळणार आहे. 81 जागांपैकी काँग्रेस 69 जागांवर तर शिवसेना 11 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

  • 30 Dec 2025 11:55 AM (IST)

    30 Dec 2025 11:55 AM (IST)

    शिंदेंच्या शिवसेनेला मुंब्र्यातून मोठा धक्का

    शिंदेंच्या सेनेचे चार नगरसेवक लढणार राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून..

    राजन किने अनिता किने मोरेश्वर किने या सर्वच माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा एबी फॉर्म स्वीकारला असून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकींना शिंदेंची साथ सोडत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत..

    मुंब्रा शिवसेना शाखेचा वादामध्ये राजन किने यांचा मोठा सहभाग होता मुंब्रा मध्ये शिवसेनेला वाढवण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान ठरले आहे.. त्यांच्या या निर्णयामुळे मुंब्रातील राजकीय खेळी बदलण्याची शक्यता..

Web Title: Maharashtra breaking news today maharashtra politics elections live upates bmcelection top national and international breaking news in marathi crime news live stock markets trade and industry updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 09:01 AM

Topics:  

  • Maharashta Breaking News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.