Top Marathi News Today Live : बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
Marathi Breaking News Updates : गेल्या काही दिवसांपासून उकाड्याचा भयाण त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेषतः विदर्भात तर सूर्य चांगलाच कोपला असून, विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान ४० अंशांच्या पार पोहोचले आहे. सोमवारी राज्यात सर्वाधिक अकोल्यामध्ये तापमानची नोंद झाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही अकोला तापले होते. विशेष म्हणजे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे. तर देशात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे.
अकोल्यात मंगळवारी 44 अंश सेल्सिअस तापमान होते. एल डोराडो हे संकेतस्थळ जागतिक तापमानाची नोंद ठेवते आणि या संकेतस्थळावर अकोल्याची जगातील दुसरे ‘उष्ण’ शहर म्हणून नोंद करण्यात आली. विदर्भातील उन्हाळा तापू लागला आहे. दरम्यान, मंगळवारी राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे.
15 Apr 2026 06:45 PM (IST)
महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात उघडकीस आलेल्या सेक्स स्कँडलमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. मुख्य आरोपी, १९ वर्षीय अयान अहमद उर्फ तनवीर याला अटक करण्यात आली आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम (AIMIM) पक्षाशी त्याचे संबंध असल्याच्या आरोपांनंतर या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. आरोपीकडून अंदाजे ३५० अश्लील व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. त्याने कथितरित्या १८० अल्पवयीन मुलींना लक्ष्य केले होते. अमरावतीचे रहिवासी असलेले राज्यसभा सदस्य अनिल बोंडे यांनी राज्य सरकारने विशेष तपास पथकाद्वारे (SIT) या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
15 Apr 2026 06:40 PM (IST)
Ratnagiri News Marathi: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील प्रसिद्ध कड्यावरच्या गणपती मंदिरात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी करत दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली. १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे साधारण २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. आंजर्ले येथील कड्यावरच्या गणपती मंदिरात मध्यरात्री चोरीची धक्कादायक घटना घडली असून, चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 Apr 2026 06:35 PM (IST)
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डॅव्हिड वॉर्नर (David Warner) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मद्यपान करून गाडी चालवल्याच्या (Drink-Driving) आरोपावरून वॉर्नरला आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या घटनेचा थेट परिणाम त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर होण्याची शक्यता असून, बिग बॅश लीग (BBL) मधील सिडनी थंडर संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेतले जाण्याची चिन्हे आहेत.
15 Apr 2026 06:30 PM (IST)
Pune-Bengaluru Vande Bharat Train : पुणे : भारतीय रेल्वे महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, विशेषतः पुणेकरांसाठी (Pune News) एक मोठी भेट घेऊन येत आहे. बहुप्रतिक्षित वंदे भारत स्लीपर ट्रेनला मुंबई-बंगळूरू मार्गासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ही ट्रेन केवळ प्रवाशांचा वेळच वाचवणार नाही, तर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आरामदायी अनुभवही देईल.
15 Apr 2026 06:25 PM (IST)
2026 च्या आयपीएल हंगामात, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला अत्यंत खराब कामगिरीचा सामना करावा लागत आहे. या स्पर्धेत आतापर्यंत संघाने पाच सामने खेळले आहेत, परंतु त्यांना एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली, 2024 मध्येही संघाची कामगिरी निराशाजनक होती आणि या हंगामातही ते गुणतालिकेत अगदी तळाशीच आहेत. तीन वेळा विजेतेपद पटकावलेल्या या संघाच्या या बिकट अवस्थेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या परिस्थितीचा विचार करता, कोलकाताच्या या खराब कामगिरीचा फटका कर्णधार रहाणेला बसू शकतो का? स्पर्धेच्या मध्यावरच त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
15 Apr 2026 06:20 PM (IST)
कर्जत : नेरळ गावातून जाणाऱ्या नेरळ माथेरान मिनी ट्रेन मार्गावरील नेरळ पाडा येथील फाटक गेली चार दिवस दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे.हे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येत असताना कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा सूचना वाहनचालक यांना देण्यात आलेली नाही.त्यामुळे वाहनचालक यांच्यात संतापाची भावना असून मध्य रेल्वे विभागाच्या या निर्णयाविरुद्ध मुंबई येथील विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.
15 Apr 2026 06:15 PM (IST)
Central Board of Secondary Education (CBSE) ने 2026 सालचा इयत्ता 10वीचा निकाल जाहीर केला आहे. यंदा निकाल लवकर जाहीर करण्यात आला असून मे 2026 मध्ये होणाऱ्या दुसऱ्या बोर्ड परीक्षांमुळे मूल्यांकन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान 33 टक्के गुण आवश्यक आहेत. एखाद्या विषयात 1-2 गुण कमी असल्यास ग्रेस मार्क्स देण्याची शक्यता देखील आहे. यावर्षी CBSE 10वीच्या परीक्षा 17 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.
15 Apr 2026 06:09 PM (IST)
पुणे: ‘टँकर माफिया’ असा आरोप फेटाळून लावत पुण्यातील (Pune) पाणी टँकर व्यावसायिकांनी संपाचा मार्ग स्वीकारला असून, १५ एप्रिलपासून सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तोट्यात सेवा देणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे ऐन उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेत बोलताना टँकर मालकांचे प्रतिनिधी सुशांत लोणकर, रविकांत घुले आणि सुनील घुले यांनी ‘आम्ही माफिया नसून नागरिकांना पाणीपुरवठा करणारे सेवा प्रदाते आहोत,’ असा ठाम दावा केला.
15 Apr 2026 05:47 PM (IST)
भारतात आपल्याला अनेक ऑटो कंपन्या पाहायला मिळतात. यातही विदेशी ऑटो कंपन्या सुद्धा भारतात त्यांची दमदार वाहने लाँच करत आहे. नुकतेच व्हिएतनामची ऑटो कंपनी VinFast ने सुद्धा त्यांची पहिली इलेक्ट्रिक एमपीव्ही भारतात लाँच केली आहे.
VinFast कंपनीने भारतात त्यांची नवीन इलेक्ट्रिक एमपीव्ही VinFast VF MPV 7 लाँच केली आहे. या कारची बुकिंग काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आली होती आणि आता ती अधिकृतपणे बाजारात दाखल झाली आहे.
15 Apr 2026 05:20 PM (IST)
बिहारच्या राजकारणात एक मोठे स्थित्यंतर घडून आले आहे. नितीश कुमार यांचे पर्व संपले असून बिहारमध्ये भाजप राज सुरु झाले आहे. पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपचा नेता मुख्यमंत्री झाले आहे. भाजप नेते सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी पहिल्यांदाच जनतेशी संवाद साधला असून विकासाची हमी दिली आहे. आपण तात्काळ कामाला सुरुवात करणार असल्याचे आणि राज्यात ‘मोदी-नितीश मॉडेल’ कायम राहील, असे स्पष्ट मत नवनियुक्त मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी व्यक्त केले.
15 Apr 2026 04:49 PM (IST)
Tata IPL 2026 Mumbai Indians Vs PBKS: आयपीएलच्या हंगामातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उद्या होणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जच्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार नसल्याचे समजते आहे. हा सामना उद्या संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्ज जबरदस्त फॉर्ममध्ये असून, मुंबई इंडियन्सला सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे. मात्र आता मुंबईच्या संघाची चिंता वाढली आहे.
15 Apr 2026 04:40 PM (IST)
भाईंदर : बंगळुरू, बिहार आणि चंदीगडनंतर आता मिरा-भाईंदर शहरातही तथाकथित “झॉम्बी ड्रग” संदर्भातील धक्कादायक प्रकरणे समोर येत असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सार्वजनिक सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. “झॉम्बी ड्रग” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घातक अमली पदार्थाच्या सेवनामुळे व्यक्तीचे वर्तन पूर्णपणे अनियंत्रित होत असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी या ड्रगच्या प्रभावाखाली असलेले लोक विचित्र हालचाली करताना, स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
15 Apr 2026 04:30 PM (IST)
Tata IPL 2026 Live RCB Vs LSG Updates: आज संध्याकाळी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जांयट्समध्ये सामना होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस झाला की 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. दरम्यान हा सामना पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी सामना महत्वाचा असणार आहे. मात्र आजच्या सामन्यात विराट कोहली खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
15 Apr 2026 04:10 PM (IST)
Maharashtra Politics : मुंबई : दोन महिन्यापूर्वी मोठ्या उत्साहात महानगर पालिकेच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये महायुतीने बाजी मारली असून तरी मुंब्रा मधील एक महिला नेत्या जोरदार चर्चेत आली. मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 सर्वाधिक चर्चेत राहिला. या प्रभागातून एमआयएमच्या (AIMIM) उमेदवार सहर शेख यांच्या विजयाची चर्चा फक्त मुंबईत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली. विजयानंतर आनंद साजरा करताना नगरसेवक सहर शेख यांनी ‘कैसे हराया’चा नारा दिला आणि सोशल मीडियाच्या दुनियेत त्या लोकप्रिय झाल्या. मात्र आता याच सहर शेख यांचं नगरसेवक पद धोक्यात आले आहे.
15 Apr 2026 04:03 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जाण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी शासनाने ‘ई-फाईल’ प्रणालीला प्राधान्य दिले आहे. छत्रपती संभाजीनगर येथेही ई फायलिंगने गती घेतली आहे. यामुळे आता ‘हातोहात फाईल’ नेण्याची जुनी प्रथा पूर्णपणे बंद होणार आहे. आज घडीला जिल्ह्यात ८० टक्के ई-फायलिंग होत असून ते १०० टक्क्यांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.
15 Apr 2026 03:50 PM (IST)
Bigg Boss Marathi 6 पर्वातील पहिली Finalist तन्वी कोलते सध्या घरातील इतर 4 सदस्यांशी लढा देत आहे. ‘बिग बॉस मराठी पर्व 6’ चे Top 5 सदस्य मिळाले असून, यामध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, दीपाली सय्यद, अनुश्री माने तसेच विशाल कोटियन यांनी बाजी मारली आहे. 100 दिवस आणि 17 स्पर्धकांच्या या खेळात कोण बाजी मारेल? कोण असेल तो एक स्पर्धक जो Bigg Boss Marathi 6 च्या Trophy चा मानकरी ठरेल? याकडे सर्व बिग बॉस प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. घरातील TOP 5 सदस्यांच्या कुटुंबांनी आणि चाहत्यांनी, आपला आवडता सदस्य जिंकावा म्हणून प्रयत्न सुरु केले आहेत.
15 Apr 2026 03:45 PM (IST)
मावळ तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांत घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला असून, समिती बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांच्या राजकीय खेळीला यश मिळाल्याची जोरदार चर्चा आहे.
15 Apr 2026 03:40 PM (IST)
धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अविवाहित तरुणीने गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचे सेवन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत तरुणी हि १८ वर्षांची असून ती सहा महिन्यांची गरोदर होती. अधिक प्रमाणात औषधांची तिचा रक्तदाब कमी होऊन झटके येऊ लागले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेने मोहाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
15 Apr 2026 03:35 PM (IST)
माथेरान आणि पायथ्याशी असलेल्या वन क्षेत्रात वन्यजीवांचे वास्तव्य असल्याच आढळून आले आहे.काल रात्री माथेरान घाट रस्त्याने प्रवास करणारा बिबट्या अनेकांचे नजरेस पडला.हा बिबट्याला टॅक्सी चालकाने आपल्या मोबाईल मध्ये शूट केल्याने बिबट्याचा वावर माथेरान जंगलात. आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे. दरम्यान,बिबट्याच्या दर्शनाने वन विभागाने स्थानिक रहिवाशी यांना सतर्क राहावे अशी सूचना करण्यास फलकबाजी सुरू केली आहे.
15 Apr 2026 03:30 PM (IST)
माथेरान आणि पायथ्याशी असलेल्या वन क्षेत्रात वन्यजीवांचे वास्तव्य असल्याच आढळून आले आहे.काल रात्री माथेरान घाट रस्त्याने प्रवास करणारा बिबट्या अनेकांचे नजरेस पडला.हा बिबट्याला टॅक्सी चालकाने आपल्या मोबाईल मध्ये शूट केल्याने बिबट्याचा वावर माथेरान जंगलात. आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे. दरम्यान,बिबट्याच्या दर्शनाने वन विभागाने स्थानिक रहिवाशी यांना सतर्क राहावे अशी सूचना करण्यास फलकबाजी सुरू केली आहे.
15 Apr 2026 03:25 PM (IST)
एखादा व्यक्ती मृत्यू पावला की विधिवत त्याचे अंत्यविधी करुन त्याला श्रद्धांजली वाहिली जाते. त्यासाठी खास कार्यक्रम देखील आयोजित केला जातो ज्यात त्याच्या जवळचे लोक शेवटचे शवाचे दर्शन घेऊन व्यक्तीच्या जाण्याचे दु:ख व्यक्त करतात. यावेळी संपूर्ण वातावरण शांत आणि दु:खद असते. पण अंत्यसंस्काराच्या या कार्यक्रमात गेलेल्या व्यक्तीवरुन हाणामारी सुरु झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? अमेरिकेतील एका अंत्यविधीदरम्यान अशी घटना घडून आली आहे. प्रियकराच्या जाण्याने दोन प्रयसींमध्ये वाद सुरु झाला आणि शवपेटीसमोरच मारामारी करण्यास सुरुवात केली. दोघीही प्रियकराच्या जाण्याचं दु:ख विसरुन अंत्यसंस्कारातच जोरदार हाणामारी करताना दिसल्या ज्यानंतर या घटनेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले
15 Apr 2026 03:23 PM (IST)
आज एम. ए. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. आरसीबीने (LSG Vs RCB) आपले तीनही सामने जिंकले आहेत. तर एलएसजीने दोन सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्याच्या पीच रिपोर्टबद्दल आपण जाणून घेऊयात.
15 Apr 2026 03:20 PM (IST)
नाट्य दिग्दर्शक कुमार सोहोनी हे मराठी रंगभूमीवरील एक प्रयोगशील आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व मानले जाते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी सतत नवनवीन प्रयोग केले असून, नवीन संहिता शोधणे, नवोदित कलाकारांना संधी देणे आणि प्रत्येक नाटकात वेगळेपण आणणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य राहिले आहे.त्यांच्या या प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचं १२५वं नाटक ‘भुल भुलैय्या’. हे नाटक प्रेक्षकांसमोर एक अनोखा प्रयोग म्हणून सादर होत असून, त्यांच्या दीर्घ नाट्यकारकिर्दीतील एक विशेष आणि महत्त्वपूर्ण मैलाचा दगड मानला जात आहे.
15 Apr 2026 02:58 PM (IST)
कल्याणमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल ४७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
15 Apr 2026 02:49 PM (IST)
बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नेत्या मैदानात आहेत. तर आपल्या काकींच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी घोंगडी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे.
15 Apr 2026 02:40 PM (IST)
कैसे हराया फेम एमआयएमच्या उमेदवार सहर शेख यांच्याकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आलं आहे. त्यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळविल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचं नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता आहे.
15 Apr 2026 02:32 PM (IST)
अमरावतीतील परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार ११ पोलिस अधिकारी आणि ३६ अंमलदारांचा या पथकात समावेश आहे. या प्रकरणाचा तपास SIT मार्फत केला जाणार असून, सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार हे या पथकाचे प्रमुख असणार आहेत.
15 Apr 2026 02:20 PM (IST)
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात काही वेळापूर्वी तरुणाच्या एका टोळक्यात जोरदारा फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. लांडेवाडीतील एका दुकानाबाहेर तीन तरुणांनी मिळून एका तरुणाला लाथा बुक्याने बेदम मारहाण केली आहे. मात्र तरुणाचा टोळकं आप आपसात का हाणामारी करत होता हे मात्र समजू शकलं नाही.
15 Apr 2026 02:11 PM (IST)
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर टीका केली आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाला डी-लिमिटेशन लागू करायचे असल्याचा आरोप त्यांनी केला. महिलांचा केवळ राजकीय हेतूसाठी वापर केला जात असून, या मागे वेगळाच अजेंडा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
15 Apr 2026 02:02 PM (IST)
पुण्यात पीएमपी बसच्या ब्रेकडाउनचे प्रमाण मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या महिन्यात तब्बल १८०१ बस मार्गावर बंद पडल्या असून, फेब्रुवारीच्या तुलनेत सुमारे ४०० ने वाढ झाली आहे. विशेषतः ठेकेदारांच्या बस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रात पीएमपीचे एकूण ३८१ मार्ग असून, या समस्येमुळे प्रवासी वाहतूक विस्कळीत होत आहे.
15 Apr 2026 01:55 PM (IST)
चंद्रपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त सुरु असलेल्या मिरवणुकीत डीजेमध्ये नाचण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना गांधी चौकात घडली आहे. या घटनेने आंबेडकर जयंती उत्सवाला गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.
15 Apr 2026 01:35 PM (IST)
अक्षय कुमार यांच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. ट्रेलरमध्ये हॉरर आणि कॉमेडी यांचा मजेदार संगम पाहायला मिळतो, त्यामुळे हा चित्रपट एक चांगला फॅमिली एंटरटेनर ठरेल असे मानले जात आहे.चित्रपटाच्या प्रमोशनमुळेही त्याची क्रेझ वाढत आहे. सध्या हातात लालटेन घेतलेले अक्षय कुमारचे वेगवेगळे पोस्टर्स शहरात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत आणि चाहत्यांमध्ये उत्साह वाढवत आहेत.
15 Apr 2026 01:35 PM (IST)
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाटस येथील टोलनाक्यावर कोयत्यांनी टोलनाक्याची तोडफोड करत एका टोल कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी सहा तरुणांवर यवत पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, दोघे जण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.रमेश बाबाजी शेगर, शाहरुख बाबु शेख, अभिषेक सुधीर चौगुले (तिघे रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे), प्रसाद शंकर मेरगळ, (रा. बिरोबावाडी ता. दौंड, जि. पुणे) शुभम रामचंद्र मारणे (रा. कात्रत्र, पुणे), जीवन रविंद्र गायकवाड (रा. कानगाव ता.दौंड जि. पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलनाक्यावर सोमवारी (दि. १३) सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास टोल नाक्यावर लेन क्रमांक ४ वर चारचाकी स्विफ्ट कारमधून चार-पाच जण खाली उतरले.
15 Apr 2026 01:25 PM (IST)
जागतिक राजकारणात एकामागून एक धक्कादायक घडामोडी घडत असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी घेतलेल्या एका निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेचा पाया हादरवून टाकला आहे. इस्लामाबादमधील शांतता चर्चा अपयशी ठरताच, ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) लष्करी नाकेबंदी करण्याचा ऐतिहासिक आणि धोकादायक आदेश दिला आहे. ज्या नाकेबंदीला ट्रम्प यांनी एकेकाळी विरोध केला होता, तीच शस्त्र त्यांनी आता इराणला आर्थिकदृष्ट्या संपवण्यासाठी उपसले आहे.
15 Apr 2026 01:15 PM (IST)
आम आदमी पक्षामधील अंतर्गत वाद हे चव्हाट्यावर आले आहेत. खासदार राघव चढ्डा यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून त्यांना उपनेतेपदावरुन काढून टाकण्यात आले. आपने ही जबाबदारी AAP खासदार अशोक मित्तल यांच्यावर दिली आहे. मात्र आता अशोक मित्तल हे ईडीच्या रडारवर आले आहेत. अशोक मित्तल यांच्या घरी ईडीची (ED Action) रेड पडली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
15 Apr 2026 01:05 PM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाला आश्चर्यचकित केले आहे. वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी पुढील दोन दिवसांत सुरू होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, या चर्चेसाठी पाकिस्तान हेच ठिकाण असेल, असे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सूचित केले आहे. इतकेच नाही, तर ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख, फील्ड मार्शल असिम मुनीर यांची भरभरून प्रशंसा केली आहे.
15 Apr 2026 12:57 PM (IST)
नाशिक शहरातील सिडको परिसरात सोमवारी (ता.१३) रात्री उशिरा शिंदेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख सुयश पाटील यांच्यावर 6 ते 7 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
15 Apr 2026 12:45 PM (IST)
पुण्यातील पबमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची माहिती समोर आली असून याबाबत कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 Apr 2026 12:34 PM (IST)
महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे. आता सातबारा (७/१२), ८-अ उतारा, मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड), फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्डमधील विविध आवश्यक दाखले थेट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. ही सुविधा महाभूमी संकेतस्थळावरून थेट मोबाईलवर पोहोचवण्यात येणार असून, यासाठी फक्त माफक शुल्कात म्हणजे केवळ १५ रुपयांत नोंदणी करता येईल. सध्या राज्यात गेल्या काही वर्षांपासून सातबारा व इतर उतारे ऑनलाइन उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना जवळच्या सेतू केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रावर जावे लागते.
15 Apr 2026 12:23 PM (IST)
बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नेत्या मैदानात आहेत. तर आपल्या काकींच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी घोंगडी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे.
15 Apr 2026 12:12 PM (IST)
कैसे हराया फेम एमआयएमच्या उमेदवार सहर शेख यांच्याकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आलं आहे. त्यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळविल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचं नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता आहे.
15 Apr 2026 12:00 PM (IST)
हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात कॉलेजला जाणाऱ्या 19 वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. आरोपीला स्थानिकांच्या मदतीने अटक करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे.
15 Apr 2026 11:50 AM (IST)
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या बालेघर या आदिवासीबहुल गावातील नागरिकांच्या मूलभूत व घटनात्मक हक्कांसाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, कायदेशीर सल्लागार अॅड. तृणाल टोणपे व अॅड. निकिता आनंद यांनी आवाज उठवला. आदिवासींच्या हक्कासाठी त्यांनी मंगळवारी (दि.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त गावात शांततापूर्ण धरणे आंदोलनाचे करण्यात आले.
15 Apr 2026 11:50 AM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मूळ गावी दरे तर्फ तांब, ता. महाबळेश्वर येथे राहण्यासाठी आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुक्कामी दौऱ्यादरम्यान देखील आराम न करता स्थानिक समस्या जाणून घेतल्या. या दौऱ्यावेळी एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील समस्या जाणून घेतल्या आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी कोयना धरण परिसराची पाहणी केली असून जनतेच्या हिताच्या कामांचा आढावा घेतला आहे.
15 Apr 2026 11:50 AM (IST)
बलुचिस्तानमधील संघर्षाने आता एक अत्यंत धोकादायक आणि ऐतिहासिक वळण घेतले आहे. जमिनीवर पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करून सोडल्यानंतर, आता बलुच लिबरेशन आर्मीने आपला मोर्चा अरबी समुद्राकडे वळवला आहे. रविवारी सकाळी पाकिस्तान-इराण सागरी सीमेजवळील जिवानी शहरात बीएलएने पाकिस्तानी तटरक्षक दलावर आपला पहिला सागरी हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे तीन जवान जागीच ठार झाले असून, यामुळे पाकिस्तानच्या सागरी सुरक्षेच्या चिंधड्या उडाल्या आहेत.
15 Apr 2026 11:45 AM (IST)
जागतिक हिमोफिलिया दिन २०२६ ची संकल्पना ‘निदानः उपचाराची पहिली पायरी’ ही आहे. ही संकल्पना हिमोफिलिया व्यवस्थापनातील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एकावर प्रकाश टाकतेः ते म्हणजे निदान न झालेल्या लोकांची प्रचंड संख्या. डब्ल्यूएफएचच्या अंदाजानुसार, जगभरातील हिमोफिलियाने ग्रस्त असलेल्या ७५% पेक्षा जास्त लोकांचे कधीही औपचारिक निदान झालेले नाही.
15 Apr 2026 11:40 AM (IST)
२०२६ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. सलग चौथ्या पराभवानंतर BCCI ने संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेवर कारवाई केली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता संघ निर्धारित वेळेत आपल्या षटकांचा कोटा पूर्ण करू शकला नाही. या गुन्ह्यासाठी रहाणेला १.२ दशलक्ष अर्थात १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान षटकांचा वेग कमी ठेवल्याबद्दल तो दोषी आढळला.
15 Apr 2026 11:35 AM (IST)
कोल्हापुरातील दानोळी गावात भाजीपाला व्यावसायिकाचे 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून काही तासांतच करंट देऊन निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे.
15 Apr 2026 11:30 AM (IST)
देशात लोकांची धार्मिक श्रद्धा इतकी जास्त आहे की कधी श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत होतं हे त्यांना समजत नाही. श्रद्धेच्या नावाखाली लोक अनेकदा वाटेल ते करु पाहतात. अशीच एक घटना सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे ज्यात ट्रेनच्या डब्यालाच लोकांनी मंदिर बनवल्याचं दिसून आलं. व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर यात आपल्याला दिसते की, ट्रेनच्या डब्याचील वरच्या बर्थवर लोकांनी देवी-देवतांच्या मूर्त्या ठेवल्या आहेत. फुलांना त्या जागेला सजवलेले आहे आणि हातात आरतीचं ताट घेऊन महिला आरती करत देवाची पूजा करत आहेत. प्रवासासाठी ओळखली जाणारी ही ट्रेन रेल्वे कमी आणि एक मंदिरंच जास्त वाटतं होती. या घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत असून सार्वजनिक वाहतुकीत असे उपक्रम योग्य नाही अशी प्रतिक्रिया यूजर्सने दिली आहे.
15 Apr 2026 11:00 AM (IST)
जागतिक राजकारणात अनेकदा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरतात. असाच एक चमत्कार वॉशिंग्टनमध्ये घडला आहे. अनेक दशकांपासून एकमेकांचे कट्टर शत्रू राहिलेले इस्रायल (Israel )आणि लेबनॉन यांनी सर्व मतभेद बाजूला सारून थेट चर्चेचे पाऊल उचलले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्या मध्यस्थीने पार पडलेली ही बैठक मध्य-पूर्वेतील रक्तपाताला पूर्णविराम देणारी ठरू शकते. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या चर्चेने दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.






